नरेंद्र मोदींमध्ये वेगळे काय आहे?
नरेंद्र मोदीमध्ये असे काय आहे जे त्यांना सर्वांपासून वेगळे करते हा प्रश्न जर कोणी विचारला तर ते अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल तेव्हा तुमचे अंतर्मनच तुम्हाला सांगेल की हा माणूस वेगळा आहे. परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या पुढे जाऊन विचार कराल आणि तुम्ही स्वतंत्र भारताचा इतिहास बघाल तेव्हा तुम्ही उद्दिष्टांची एक मोठी यादी तयार कराल जी त्यांना असामान्य बनवते. येथे शक्ती आणि उत्साह दोन्ही असलेला नेता आहे. आपण अनेक द्रष्टे राजकीय नेते तसेच सविस्तर माहितीवर लक्ष असणारे नेते पहिले आहेत परंतु नरेंद्र मोदींकडे दोन्ही गुण आहेत. जेव्हा त्यांनी त्यांचे पूर्ण लक्ष आकाशाकडे केंद्रित केले असताना त्यांचे पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत.
जनसामान्यांचा नेता:
ते ज्याप्रकारे लोकांपर्यंत पोहोचले आहेत तसे खूप कमी भारतीय राजकारण्यांना शक्य झाले आहे. हे काही राजकीय बंधन नाही तर भावनिक बंध आहेत जे सामान्य माणसासोबत विकसित करायला नरेंद्राला शक्य झाले. त्यांचे चाहते हे शहरी बुद्धीमानांपासून ग्रामीण जनसामान्यांपर्यंत, म्हातारे आणि तरुण, पुरुष आणि महिला, भारतात आणि परदेशात सर्वदूर आहेत.भारतातील सर्व लोकांशी जोडण्यासाठी ते आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मिडीयाचा नाविन्यतेने वापर करतात.
विकासाचे वेड:
नरेंद्र मोदींच्या डोक्यात नेहमी एक विचार असतो – विकास. ह्याचे उदाहरणच द्यायचे झाले तर, काही वर्षांपूर्वी गुजरात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ते राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर गेले होते. त्याचप्रमाणे, वर्ष २०१२ मध्ये निवडणुका तोंडावर असतानाच नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर गेले होते, या दौऱ्यामुळे गुजरात आणि जपान दरम्यान आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य वृधिंगत झाले. साहजिकच, कितीही निवडणुका झाल्या तरी राजकारण्यांसाठी पुन्हा निवडून येणे आणि सत्तेत पुन्हा येणे हे त्यांच्यासाठी प्रमुख प्राधान्य असते. नरेंद्र मोदींसाठी निवडणुकीच्या वर्षातही, राजकीय कार्यापेक्षा राज्यात गुंतवणूक आणणे हे जास्त महत्वाचे वाटत होते.
समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन:
समस्या सोडवण्यासाठीच्या नरेंद्र मोदींच्या दृष्टीकोनातच गुजरातचे यश आहे. पहिले ते समस्या बघतात – एकांगी नाहीतर पूर्णतः.सर्व शक्य बाजूंनी समस्येला समजून घेण्यासाठी ते त्यावर दीर्घकाळ घालवतात, कारण त्यांना माहित आहे की, समस्येला नीट समजून घेतले तर अर्धी समस्या तिथेच संपते. ते उत्कृष्ट श्रोते आहेत. नंतर ते समस्येवर विचार करतात. ते कधीही तात्कालिक पाऊल उचलत नाहीत किंवा कुठच्याही आडमार्गाचा किंवा वरवरच्या बदलांचा अवलंब करत नाहीत. ते नेहमी शाश्वत आणि भविष्याच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना आणि मूळापासून परिवर्तन करण्याचा विचार करतात. नंतर ते दिशादर्शक आराखडा तयार करतात – जे लक्ष्य, उद्दिष्टे आणि नियंत्रित निर्देशक स्पष्ट असतात; आणि त्यानंतर उपाययोजना अंमलबजावणीचे काम सुरु करतात.
ते केवळ योग्य प्रक्रिया, योग्य संस्थेची निवड करत नाहीत तर योग्य व्यक्तीची देखील निवड करतात. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यात करण्याची क्षमता आहे आणि ते पाठपुरावा देखील करतात. ते काही व्यवस्थापनाचे निरीक्षण पदवीधर नाहीत परंतु, त्यांचा विवेक आणि नवकल्पना व्यवस्थापकीय शाळांमध्ये जे शिकवले जाते त्याच्याही पुढे आहे.
सर्वसाधारणतः आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जो संपूर्ण राज्याचा आणि देशभर प्रवास केला त्यामुळे त्यांना तळागाळातील लोकांच्या समस्या समजल्या आणि पक्षाचे महासचिव आणि वाचनाच्या व्यासंगाने त्यांना जागतिक अनुभव मिळवून समस्यांचे समाधान शोधण्याचा योग्य दृष्टीकोण आणि दृष्टी दिली.
भव्य परिणामांचे प्रकल्प:
एक धोरणकर्ते म्हणून त्यांनी नेहमी जलद वेगाने प्रकल्पाचा विचार आणि त्याची अंमलबजावणी केली त्याचेच परिणाम आपल्याला गुजरातमध्ये दिसत आहेत. ते नेहमीच परिणामांविषयी उत्सुक असतात. देशाच्या उर्वरित भागात नदीजोड प्रकल्प हा अजूनही चर्चेचा विषय असताना त्यांनी गुजरातमध्ये १२ नद्या एकमेकांशी जोडल्या ज्याचा परिणाम म्हणजे प्रदीर्घ काळापासून सुकलेल्या नद्यांमध्ये देखील पाणी वाहू लागले. याचबरोबर, सुजलामसुफलाम अंतर्गत, केवळ ३ वर्षात ३०० किलोमीटर लांब कालव्याचे काम पूर्ण केले आणि आतापर्यंत पाणी टंचाई असणाऱ्या राज्यातील भागत पाणी उपलब्ध करुन दिले. ज्योतिग्राम योजनेंतर्गत, अवघ्या ३० महिन्यांमध्ये ५६५९९ किलोमीटरची नवीन पारेषण लाईन, १८००० हून अधिक गाव आणि ९६८१ छोट्या उपनगरांमध्ये १२६२१ ट्रान्सफोर्मर बसवण्यात आले. राज्यभर पाण्याचे आणि गैसचे जाळे पसरविणे, ई ग्राम विश्व ग्राम अंतर्गत सर्व गावांना ब्रॉडबॅंडने जोडणे ही सर्व प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीची उदाहरणे आहेत.
मोठे आणि छोटे दोन्ही सुंदर आहे:
करोडो रुपयांच्या प्रकल्पांचा विचार आणि अंमलबजावणी करताना त्यांनी कधीच छोट्या उपाययोजनांना आणि स्थानिक तंत्रज्ञानाला डावलले नाही. ते म्हणतात: “ विज्ञान हे नेहमी जागतिक असावे पण तंत्रज्ञान हे स्थानिक” जल क्षेत्रामध्ये त्यांनी बोरी बांध आणि शेत तळ्यासारख्या सारख्या लोकप्रिय स्थानिक उपाययोजनांचा अवलंब केला. व्हायब्रंट गुजरात परिषदे दरम्यान जागतिक तज्ज्ञांना भेटत असतानाच त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि प्रयोगांना देखील प्रोत्साहन दिले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सूचना आणि दररोज पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून सामान्य नागरिकांकडून येणाऱ्या काल्पना आणि मत स्वीकारली.
प्रशासनाला राजकारणापासून वेगळे केले:
ते वस्तुनिष्ठ निर्णयकर्ते आहेत. ते नेहमी राजकारण आणि प्रशासन वेगळे ठेवतात.प्रशासकीय निर्णयामुळे जरी राजकीय परिणाम झाले तर ते वस्तुनिष्ठतेचाच अवलंब करतात. यामुळेच गुजरात प्रशासनाला स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत मिळाली आणि जागतिक दर्जानुसार आणि व्यावसायिकतेसह प्रशासन काम करत आहे. गुजरात सरकारच्या अनेक संघटनांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे ज्याची साधारणतः सरकारी यंत्रणांना आवश्यकता नसते.
जनतेची नस जाणणे
मोदी हे मागासवर्गीय जातीतले आहेत आणि गुजरातमधील मागास प्रदेशात त्यांचे बालपण गेले. एक सामान्य माणूस ज्या समस्यांचा सामना करतो त्यांच्या तरुण वयात त्यांनी त्या सर्व विशेषतः पाणी आणि विजे यासारख्या समस्यांचा सामना केला आहे. यासंदर्भात त्यांना कधीही काहीही करायची संधी मिळाली तेव्हा त्यांनी तडफदारपणे या समस्यांचे निराकरण करण्यसाठी धोरणात्मक योजना तयार करून कार्यप्रणालीचा आराखडा तयार केला.
सर्वसमावेशक विकास:
प्रमुख उद्योग आणि पायाभूत विकास क्षेत्रावर अधिक लक्ष दिल्यामुळे तसेच मागासवर्गीय आणि मागास क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यावर नेहमीच टीका होते. ह्यापेक्षा मोठे असत्यवचन असूच शकत नाही. जेव्हा त्यांनी संपूर्ण राज्यात ज्योती ग्राम योजनेची अंमलबजावणी केली तेव्हा कोणताही विशिष्ट विभाग किंवा विशिष्ट समाजाची निवड न करता त्यांनी यामध्ये सर्वांना सामावून घेतले. जेव्हा त्यांनी संपूर्ण राज्यात गैस चे जाळे पसरविले तेव्हा त्यांनी समजतील विशिष्ट भागाची निवड नकरता सर्वसमावेशक विचार केला. विशेषतः वंचित लोकांचा विचार करून त्यांनी वनबंधू योजना, सागरखेडू योजना, गरीब समृद्धी योजना, उम्मीद यासारख्या महत्वपूर्ण योजना त्यांनी जाहीर केल्या परंतु या योजनांमधून राज्यातील इतर समाजातील कोणत्याही घटकाला वगळण्यात आले नव्हते. त्यांनी ५५ दशलक्ष गुजराती लोकांसाठी काम केले.
प्रशासन आणि विकासात लोकसहभाग:
लोकांमध्ये राहून काम केल्यामुळे त्यांचा हा ठाम विश्वास आहे की, लोक ही बदलांमधील खरे घटक असतात. ते नेहमी सांगतात की, कोणत्याही विकास कामाची फळे खऱ्या अर्थाने तेव्हाच मिळतील जेव्हा हा कार्यक्रम सरकारी विकास कार्यक्रम न राहता जनआंदोलनामध्ये परावर्तित होईल. ते म्हणतात की, जन्माष्टमीला मध्यरात्री मंदिरात जमा होण्यासाठी सरकारी आदेशाची गरज असते का?
आणि म्हणूनच, एक धोरण म्हणून ते लोकांना विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतात. राज्यभरात पाणी साठवणुकीच्या लाखो रचना, कृषी महोत्सव आणि मुलींच्या शिक्षणासाठी कन्या केलवानी यात्रा यासारख्या अनेक यशस्वी गाथा ह्या सरकारी योजनांना लोकसहभागातून लोकचळवळ बनवण्याच्या त्यांच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत.
शासन सुलभ, परिणामकारक आणि पारदर्शी बनविणे:
असे ते म्हणतात, “किमान शासन हे उत्तम शासन असते”. हेच उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी प्रशासकीय प्रक्रिया सुलभ आणि परिणामकारक करण्यासठी त्यांनी माहिती तंत्रज्ञानाच वापर केला. २००१ साली ज्या राज्याचे आयटीईएस आणि ई- गव्हर्नस मध्ये कुठेही नाव नव्हते त्याला सर्वोत्कृष्ट ई- प्रशासकीय राज्याचा दर्जा मिळाला आहे. यामुळे केवळ माहिती तंत्रज्ञान उद्योगालाच लाभ मिळणार नसून सरकारसोबत व्यवहार करताना सामान्य नागरिकांचे जीवन देखील आरामदायी होईल. राज्यातल्या बहुतांश महत्वपूर्ण कार्यालयांमध्ये एक दिवसीय प्रशासन केंद्र सुरु केले आहे, जिथे जलद गतीने कागदपत्रे आणि प्रशस्तीपत्रे दिली जातात. आता ते आणखी एक पाऊल पुढे जाऊन सर्व ग्राम पंचायतींचे संगणकीकरण करून त्यांना ब्रॉडबॅंडने जोडणार आहेत. या ई-गव्हर्नसमुळे अधिक पारदर्शकता येईल.
धोरणचलित प्रशासन:
नरेंद्र सांगतात की, “माझे सरकार कोणत्याही एका व्यक्तीच्या लहरीपणावर आणि इच्छेवर चालत नाही. आपला विकास हा सुधाराणांवर आधारित, आपल्या सुधारणा धोरणांवर आधारित आणि आपली धोरणं ही नागरिकांवर आधारित आहेत.” या दृष्टिकोनामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश मिळतात,योग्य आणि जलद निर्णय घेण्याचा विश्वास निर्माण होतो आणि प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि समानता येते.
तक्रारींचे निवारण:
सामान्य नागरिकांच्या तक्रारी अतिशय निष्ठेने सोडवल्या जातात. गुजरातच्या ‘स्वागत’ कार्यक्रमच्या माध्यमातून तक्रारींचे निवारण करण्याच्या त्यांच्या वैयक्तिक सहभागामुळे व्यवस्थेमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. प्रशासकीय यंत्रणा अशा तक्रारींचे निवारण वस्तुनिष्ठपणे आणि निष्ठेने करेल केवळ याचीच त्यांनी खात्री दिली नाही तर याच सर्व बाबी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देखील केल्या जातील असेही त्यांनी सांगितले. लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केवळ मुख्यमंत्रीच नाही तर संपूर्ण यंत्रणेने जबाबदारी घ्यावी हे त्यांनी अधोरेखित केले आहे.
नाविन्यपूर्ण दृष्टीकोन:
नागरिक आणि प्रशासनला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नरेंद्र मोदींनी नवीन मार्ग दाखविले ज्याचा इतक्या वर्षांमध्ये प्रशासन आणि व्यवस्थापनामधील तज्ञांनी विचार देखील केला नव्हता.
भूकंप झाल्यानंतर पुनर्रचना कार्यात लोकांच्या समितीला सहभागी करून घेणे आणि नियमांवर बोट ठेवून चालणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षाएक संवेदनशील व्यक्ति म्हणून या पुनर्रचना कार्यात अधिकाऱ्यांना सहभागी करून घेणे हे त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचे संपूर्ण राज्यासाठी पहिले उदाहरण आहे. इतर उदाहरणांमध्ये न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी न्यायालय आणि तुरुंगातील आरोपीं दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सारख्या आधुनिक माध्यमांचा वापर करणे, संध्याकाळची न्यायालये आणि नारी अदालतची स्थापना, पेयजल आणि सिंचनासाठी जल स्रोतांचे व्यवस्थापन करण्यासाठी लोकांची समिती स्थापन करणे, चिरंजीव योजना,(दारिद्रय रेषेखालील महिलांच्या प्रसुतीसाठी खाजगी स्त्रीरोग तज्ञांची मदत) रोमिंग शिधापत्रिका, मृदा कार्ड आदींचा समावेह आहे.
स्वत:साठी काहीच नाही:
नातेवाईकांना झुकते माप दिल्याचा आरोप नेहमीच सत्तेत असणाऱ्या लोकांवर केला जातो. या सगळ्या आरोपांपासून नरेंद्र मोदी खूप दूर आहेत. त्यांच्या स्वच्छ आणि एकाग्रता प्रतिमेमुळे ते वैयक्तिक आणि जवळील नातेवाईकांच्या आवडींचा आणि हिताच्या विचारापासून स्वतःला दूर ठेवू शकतात. सामान्य माणसासाठी कदाचित हा नकारात्मक गुण असेल परंतु मुत्सद्दी राजकारण्यासाठी हे समाजाप्रती योगदान आहे. त्यांचे विरोधक देखील हे मान्य करतात की राज्यातील भ्रष्टाचार कमी झाला आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांना ज्याकाही भेटवस्तू मिळाल्या होत्या त्या त्यांनी तोशखान्यामध्ये जमा केल्या, त्यानंतर त्या वस्तूंचा लिलाव करण्यात आला आणि प्राप्त रक्कम राज्याच्या खजिन्यात जमा करण्यात आली. एवढेच नाही तर ह्या निधीचा नाविन्यपूर्ण वापर करण्याचा मार्ग देखील त्यांनी दाखविला. मुलींच्या शिक्षणसाठी समर्पित असलेल्या कन्या केलवनी निधी मध्ये ही रक्कम जमा करण्यात आली. लोकांच्या आवडत्या नेत्याच्या या कृतीचा सकरात्मक परिणाम झाला आणि लोकांनी लाखो रुपयांचे धनादेश या निधीसाठी दिले.
गोष्टी वेगळेपणाने करणे:
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये प्रशासनाचे मॉडेल हे सुस्पष्टीकरणावर नाही तर कामगिरीच्या आधारावर विकसित केले. जेव्हा तर्कसंगत वीजदर आकारण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी विद्युत निमायक आयोगाच्या व्यावसायिक सल्ल्याचे त्यांनी पालन केले. सरकारी आंदोलनादरम्यान देखील ते वाकले नाहीत उलट त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले की, ते शेतकऱ्यांच्या गरजा समजू शकतात. त्यांना केवळ वीजच नाही तर पाण्याची देखील आवश्यकता आहे. नंतरच्या काही वर्षांमध्ये त्यांनी सुजालाम सुफलाम सारख्या योजना राबवल्या. भूजलपातळी वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी खूप कमी दरात पाणी उपलब्ध झाले आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटविण्यात आली. अनेक वीज चोरांना पकडून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. कोणतेही आंदोलन आणि रक्तपात नाही. लोकांना माहित आहे की हे त्यांच्यासाठी दीर्घकालीन फायद्याचे आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यांची निष्पक्षता आणि व्यावसायिकता, सामान्य नागरिकांप्रती असणारी त्यांची वैयक्तिक एकाग्रता आणि सहानभूती यासर्व बाबी त्यांना देशातील आणि जगातील इतर राजकीय नेत्यांपासून वेगळे करतात. त्यांची उद्देशांबद्दल असलेली खात्री आणि प्रामाणिकपणाने त्यांना गुजरात मध्येच नाही तर देशभरात लोकप्रिय केले आहे. गुजरातचे सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री पदावर कार्यरत असणारे आणि सलग ४ वर्षे देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांनी हे सिद्ध केले आहे की, “चांगले प्रशासन हे चांगले राजकारण देखील असते”.
ही काही अद्वितीय वैशिष्टय आहेत जी नरेंद्र मोदींचा वेगळेपणा दर्शवितात आणि भारत बदलाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहोत !