देशाला कचरामुक्त करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मोहिमेने देशातील कोट्यवधी नागरिकांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे.

     15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ला येथे आयोजित समारंभात स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पहिल्यांदा भारताच्या पंतप्रधानांनी स्वच्छतेसाठी आवाहन केले. त्याचवर्षी 2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांनी स्वत: केरसुणी उचलून स्वच्छ भारत मोहिमेत सक्रीयता दर्शवली. त्यांनी वारंवार स्वच्छतेबाबत सार्वजनिक आवाहन केले. कार्यक्रम अधिकृत असो अथवा राजकीय, प्रत्येक वेळी त्यांनी स्वच्छतेबाबत आग्रह धरला.

     या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व स्तरातील नागरिकांनी स्वच्छ भारत योजनेला पाठींबा दर्शवला यात आश्चर्य नाही. प्रसार माध्यमांनी या चळवळीला पाठींबा दिला.

चंद्रकांत कुलकर्णी यांच्या उदाहरणांमधून स्वच्छ भारत मोहिम आणि पंतप्रधानांच्या शब्दांनी देशाला कशाप्रकारे प्रभावित केले आहे, ते दिसून येते.

चंद्रकांत कुलकर्णी हे मध्यमवर्गीय कुटुंबामधले सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असून, त्यांना दरमहा सोळा हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन प्राप्त होते. स्वच्छ भारत मोहिमेतून प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी या कामी दरमहा पाच हजार रुपये देण्याचे ठरवले. इतकेच नाही तर त्यांनी पुढच्या महिन्यांतील योग्य तारखा असलेले 52 मुदतपूर्व धनादेशही तयार ठेवले.

एका सेवानिवृत्त व्यक्तीने स्वच्छ भारतासाठी आपल्या उत्पन्नातील  जवळजवळ एक तृतीयांश भाग प्रदान केला. पंतप्रधानांच्या शब्दांमुळे लोकांच्या मनावर कशाप्रकारे परिणाम झाला आहे, आणि देशाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्यात नागरिकांचा एकात्म सहभाग किती परिणामकारक ठरू शकतो, हे जाणून घेतल्यानंतर निर्माण होणाऱ्या मनोवृत्तीचे हे बोलके उदाहरण आहे. स्वच्छ भारत घडवण्यासाठी कशाप्रकारे लोक एकत्र येत आहे, याबाबत पंतप्रधानांनी स्वत: अनेक किस्से सांगितले. मन की बात या त्यांच्या उपक्रमातील प्रत्येक भागात स्वच्छतेबाबतच्या किमान एका प्रसंगाचा समावेश असतो.

देशाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्क असणाऱ्या स्वच्छतेसाठी एक व्यापक चळवळ उभारण्यात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी निश्चितच यशस्वी ठरले आहेत.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry

Media Coverage

Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींचे हृद्य पत्र
December 03, 2024

दिव्यांग कलाकार दिया गोसाईसाठी, सर्जनशीलतेचा क्षण आयुष्य बदलणारा अनुभव ठरला. 29 ऑक्टोबर रोजी बडोद्यात पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू असताना, तिने रेखाटलेली त्यांची आणि स्पेन सरकारचे अध्यक्ष महामहीम. श्री. पेड्रो सांचेझ यांची रेखाचित्रे त्यांना भेट दिली. तिने अत्यंत मनापासून दिलेली ही भेट स्वीकारण्यासाठी दोन्ही नेते वाहनातून उतरून जातीने तिच्याजवळ त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

काही आठवड्यांनंतर, 6 नोव्हेंबर रोजी, दियाला तिच्या कलाकृतीची प्रशंसा करणारे पंतप्रधानांचे पत्र आले, त्यामध्ये त्यांनी महामहीम. श्री. सांचेझ यांनीही त्याचे कौतुक केल्याचे देखील कळवले होते. पीएम मोदींनी तिला ललित कलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याचे शिक्षण घेण्याच्या आवाहनाबरोबरच "विकसित भारत" घडवण्यातील तरुणांच्या भूमिकेवर विश्वासही व्यक्त केला होता. त्या पत्राला त्यांनी खास आपल्या पद्धतीची जोड देत तिच्या कुटुंबियांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या होत्या.

या पत्रामुळे आनंदाने भारावून, दियाने तिच्या पालकांना पत्र वाचून दाखवले असता तिने आपल्या कुटुंबाला इतका मोठा बहुमान मिळवून दिल्याचा त्यांनाही आनंद झाला. " आपल्या देशाचा एक छोटासा भाग असल्याचा मला अभिमान आहे. मोदीजी, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला दिल्याबद्दल धन्यवाद," असे म्हणत दियाने पंतप्रधानांच्या पत्रामुळे आपल्याला जीवनात धाडसी पावले उचलण्याची आणि इतरांनाही अशा प्रकारे सक्षम बनविण्याची प्रेरणा मिळाली, असेही नमूद केले.

पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून दिव्यांगांना सक्षम बनविण्याची आणि त्यांच्या योगदानाची यथोचित दखल घेण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते. सुगम्य भारत अभियानासारख्या अनेक उपक्रमांपासून ते दिया सारखीशी वैयक्तिक नाते प्रस्थापित करण्यापर्यंत, ते सातत्याने प्रेरणा देण्याचा आणि त्यांना वर आणण्याचे काम करून, प्रत्येक प्रयत्न चांगल्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध करत आहेत .