अभ्यासासाठी पहाट किंवा मध्यरात्र यापैकी सर्वात चांगली वेळ कोणती, असा प्रश्न परीक्षा पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना विचारला होता. यापैकी नेमक्या कुठल्या वेळी अभ्यास केल्याने फायदा होईल हे त्यांना जाणून घ्यायचे होते.
या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावर मुलांना सल्ला देण्याचा मला 50 टक्केच अधिकार आहे. कारण असे की, मला पहाटे लवकर उठण्याची सवय आहे, मात्र नियोजित कामांमुळे मला रात्री उशीरापर्यंत काम करावे लागते.
“ तरीही मी तुम्हाला सल्ला देईन की, तुम्ही सर्वांनी सकाळी लवकर उठावे. कारण यावेळी आपले मन ताजेतवाने असते, त्यामुळे त्यावेळात केलेला अभ्यास चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतो. पण प्रत्येकाच्या स्वतःच्या अशा निरनिराळ्या सवयी असतात. म्हणून त्यादृष्टीने आपल्याला जी वेळ चांगली वाटेल, ती शक्यतो निवडावी.”
या प्रश्नाचे उत्तर देताना, अभ्यासासाठी आईने आपल्याला सकाळी लवकर उठवावे, हे सांगताना मुलं आईला आपल्या आवडीचा पदार्थ करायला सांगणे वगैरे आपल्या मागण्याही पूर्ण करून घेत असतात हे देखील पंतप्रधानांनी गंमतीने त्यांना सांगितले.