पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत काम करत राहण्याचं जणू व्यसनचे आहे, हे आता सर्वांनाच माहिती आहे. अनेक वर्षापासून त्यांना ओळखणारे तसेच त्यांच्यासोबत काम केलेले सहकारी म्हणतात की पंतप्रधान मोदी अविरत काम करत असतात. सार्वजनिक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी एक दिवसही सुटी घेतलेली नाही. गुजरातमधील त्यांचे पक्षातील सहकारी केदार तांबे जी यांनी एकदा नरेंद्र मोदींना कामातून काही दिवस सुटी घ्यावी असे सुचविले होते तेव्हाची एक सांगितली आहे.
तांबे जी यांनी ते जेव्हा नरेंद्र मोदींना आपल्या मुलाच्या विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी गेले होते तेव्हा घ़डलेला प्रसंग सांगितला. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. “मोदीजींनी आमंत्रण स्वीकारून ते लग्नाला आले तेव्हा, मी त्यांना विचारले तुम्ही सुटी घेऊन काही दिवस विश्रांती कधी घेणार आहात? त्यावर - या जन्मीच्या आयुष्यात तरी नाही, कदाचित पुढल्या जन्मी मला त्यासाठी वेळ मिळेल, असे उत्तर मोदींजीनी दिले होते, ” असे केदार तांबे जी सांगतात.
आपल्याला देशासाठी अखंड काम करत राहायचे आहे हे मोदीजींना माहिती आहे, असे तांबेजी सांगतात. त्यांच्या उत्तराने मोदीजींची देशासाठी झोकून देऊन काम करण्याप्रती बांधिलकीची भावना आपल्याला उमगल्याचे तांबेजी म्हणाले.
#ModiStory
— Modi Story (@themodistory) April 9, 2022
That PM Narendra Modi is a workaholic is no secret.
Guess what Modi had to say when a friend asked,
"When do you plan on taking a break?"
Visit: https://t.co/9iulCar3rR
Follow: @themodistory pic.twitter.com/3c4E9CWdPs