ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पंतप्रधान मोदींच्या सहज वागण्याने भारावून गेला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी सर्व खेळाडूंना आणि सहाय्यक कर्मचार्यांना अल्पोपहारासाठी आमंत्रित केले होते तेव्हा पंतप्रधानांसोबत झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण सांगताना तो म्हणतो की, आम्ही पंतप्रधानांशी बोलत आहोत असे आम्हाला एकदाही वाटले नाही. पंतप्रधान मोदी तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी अत्यंत आपुलकीने वागत होते, असेही तो म्हणतो.
नीरज म्हणाला की, पंतप्रधान मोदींना प्रत्येक खेळाडूबद्दल वैयक्तिक तपशीलवार माहिती तर होतीच शिवाय ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी कोणी काय सांगितले होते, तेही ठाऊक होते., पंतप्रधान मोदींची अशी साधेपणाची वागणूक अतिशय आनंददायी आणि नैसर्गिक वाटली. भारतीय क्रीडा विश्वात होत असलेल्या परिवर्तनांबद्दलही ते बोलले.
तो पुढे म्हणतो, “नरेंद्र मोदी सर पंतप्रधान झाल्यानंतर भारताच्या क्रीडाक्षेत्रात खेलो इंडिया सारखे अनेक बदल झाले आहेत.. कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी आम्हाला त्यांच्याकडून खूप पाठिंबा मिळतो. ते नागरिकांना आम्हाला प्रोत्साहन द्यायला सांगतात. यावेळी ऑलिम्पिकमध्ये परिस्थिती खूप वेगळी होती. स्पर्धेहून परतल्यानंतर, कुणी पदक जिंकले असले किंवा नसले तरी सर्व खेळाडूंना सारखाच मान देण्यात आला. पदकांची स्थिती कशीही असली तरी, ते प्रत्येक खेळाडूला भेटले, ही गोष्ट खूप समाधानाची होती.”
#ModiStory
— Modi Story (@themodistory) March 26, 2022
“We never felt like we were speaking with the Prime Minister of India. Such unpretentious behaviour is heartening.” Olympic gold medalist @Neeraj_chopra1 moved by Narendra Modi’s simplicity and affability!
Visit: https://t.co/9iulCar3rR
Follow: @themodistory pic.twitter.com/DYizzpqUyL