77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात, येत्या काही महिन्यांत, विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशात विश्वकर्मा योजना सुरू केली जाईल. अशी घोषणा केली. ही योजना, पारंपरिक कौशल्ये असलेल्या कारागिरांसाठी, म्हणजे जे कारागीर आपली साधने आणि हातांनी काम करतात, असा मुख्यत्वे इतर मागासवर्गीय समुदायासाठी असेल. यात सुतार, सोनार, पाथरवट, धोबी, न्हावी, अशा व्यावसायिकांसाठी असेल. ही योजना या कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देईल. 13 ते 15 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीतून ही योजना सुरू केली जाईल.
आने वाली विश्वकर्मा जयंती पर हाथ से काम करने वाले ज्यादातर ओबीसी समुदाय को सशक्त बनाने के लिए 13000- 15000 हजार करोड़ रुपए के परिव्यय के साथ विश्वकर्मा योजना शुरू करेगे : नरेन्द्र मोदी@ लाल किला #हर_घर_तिरंगा @PIB_India @MSJEGOI pic.twitter.com/XM09iV9cQY
— PIB-SJ&E (@pib_MoSJE) August 15, 2023
लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दिव्यांगांसाठी सुगम भारत निर्माण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. पॅरालिम्पिकमध्येही भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी आम्ही दिव्यांगांना सक्षम बनवत आहोत, असे ते म्हणाले. त्यासाठी खेळाडूंना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
आज भारतात लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता आहे, असं सांगत, लोकसंख्या, लोकशाही आणि विविधतेच्या या त्रिमूर्तीमध्ये भारताचे प्रत्येक स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे. असं पंतप्रधान म्हणाले.
Let's celebrate 🫡 Independence Day🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
— PIB-SJ&E (@pib_MoSJE) August 15, 2023
We have demography, diversity , and democracy . It means we have a powerful 'TRIVENI' .#HarGharTiranga#BharatInternetUtsav@MSJEGOI @PIB_India pic.twitter.com/QkuKlaEDt3