अबू धाबीचे युवराज  शेख खलिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान  हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 9-10 सप्टेंबर 2024 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.युवराज म्हणून त्यांचा  हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. काल त्यांचे नवी दिल्ली येथे आगमन झाल्यावर  वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. त्यांच्यासोबत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि मोठे व्यापारी शिष्टमंडळ आहे.

अबूधाबीच्या युवराजांनी आज पंतप्रधानांबरोबर द्विपक्षीय चर्चा केली.पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष  महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान  यांना हार्दिक शुभेच्छा  दिल्या.भारत-यूएई सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले आणि द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये भागीदारी अधिक विस्तारण्याच्या  आणि अधिक दृढ करण्याच्या संधींबाबत  चर्चा केली.सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराचे यश आणि द्विपक्षीय गुंतवणूक करार लागू झाल्यामुळे दोन्ही देशांमधील मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारीला आणखी चालना मिळेल असे त्यांनी नमूद केले.विशेषत: अणुऊर्जा, महत्वपूर्ण  खनिजे, हरित हायड्रोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातील दुर्लक्षित  क्षमतेच्या नवीन क्षेत्रांचा शोध घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या भेटीदरम्यान खालील करारांवर /सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामुळे पारंपरिक तसेच सहकार्याच्या नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

  • न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NNPCIL) आणि एमिरेट्स न्यूक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशन (ENEC) यांच्यात अणुऊर्जा  सहकार्यावर सामंजस्य करार
  • अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात दीर्घकालीन एलएनजी पुरवठ्यासाठी करार
  • अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) आणि इंडिया स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड (ISPRL) यांच्यात सामंजस्य करार
  • उर्जा भारत आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) यांच्यात  अबु धाबी ऑनशोर ब्लॉक 1 साठी उत्पादन सवलत करार.
  • गुजरात सरकार आणि अबू धाबी डेव्हलपमेंटल होल्डिंग कंपनी PJSC (ADQ) यांच्यात भारतात फूड पार्क्सच्या विकासाबाबत  सामंजस्य करार

आण्विक सहकार्यावरील सामंजस्य करारामुळे अणुऊर्जा प्रकल्पांचे संचालन आणि देखभाल, भारताकडून आण्विक वस्तू आणि सेवा घेणे , परस्पर गुंतवणुकीच्या संधींचा शोध आणि क्षमता निर्मितीसाठी सहकार्य वाढणे अपेक्षित आहे.

एलएनजीच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठीचा करार वार्षिक 1 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटीपीए) साठी आहे आणि केवळ वर्षभरात  स्वाक्षरी केलेला हा तिसरा करार आहे. आयओसीएल  आणि जीएआयएल या दोघांनी यापूर्वी एडीएनओसी   बरोबर अनुक्रमे 1.2 MMTPA आणि 0.5 MMTPA साठी दीर्घकालीन करार केले होते. या करारांमुळे एलएनजी  स्त्रोतांमध्ये विविधता येऊन भारतातील ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे.

एडीएनओसी आणि आयएसपीआरएल मधील सामंजस्य करार, इतर गोष्टींबरोबरच, एडीएनओसीच्या भारतातील कच्‍च्या तेलाच्‍या  साठवणुकीसाठी अतिरिक्त संधी शोधण्यासाठी आणि त्यांच्या गोदामांच्या व्यवस्थापन कराराचे नूतनीकरण परस्पर स्वीकार्य अटी तसेच  शर्तींवर करण्याची तरतूद करते. हा सामंजस्य करार एडीएनओसीच्या 2018 पासून आयएसपीआरएल च्या मंगलोर केव्हर्न येथे  कच्‍चे तेल साठवणुकीमधील विद्यमान सहभागावर आधारित आहे.

उर्जा  भारत (आयओसीएल  आणि भारत पेट्रो रिसोर्सेस लि.चा संयुक्‍त प्रकल्प) आणि एडीएनओसी  यांच्यातील अबू धाबी ऑनशोर ब्लॉक 1 साठी उत्पादन सवलत करार करण्‍यात आला. संयुक्‍त अरब अमिरातमध्ये कार्यरत असलेल्या कोणत्याही भारतीय कंपनीसाठी हा पहिला सवलत करार आहे. या सवलतीमुळे उर्जा  भारतला भारतात कच्चे तेल आणण्याचा अधिकार मिळणार  आहे. यामुळे देशाला  ऊर्जा सुरक्षा प्रदान करण्यास मदत होणार आहे.  

फूड पार्क्सविषयी सामंजस्य करार झाल्यामुळे एडीक्यूच्या गुंडनपारा, बावला, अहमदाबादला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एक अत्यंत आशादायक स्थान म्हणून विकसित करण्यात स्वारस्य व्यक्त केले आहे. फूड पार्क प्रकल्प वर्ष  2025 मध्ये दुस-या तिमाहीत सुरू करण्याच्या दृष्टीकोनातून गुजरात सरकार एडीक्‍यू आणि एडी बंदरांना साइटसंबंधी तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी आणि आवश्यक परवानग्या मिळविण्यात मदत करण्यासाठी सुविधा देणार आहे.

सन्माननीय महोदय  शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी आज  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या भेटीच्‍या वेळी द्रौपदी मुर्मू आणि अबू धाबीचे युवराज  यांनी दोन्ही देशांमधील सौहार्दपूर्ण,  ऐतिहासिक आणि सर्वसमावेशक संबंध आणि अलिकडच्या वर्षांत उभय देशांनी राबवलेल्या  अनेक उपक्रमांवर चर्चा केली.  राष्ट्रपती मुर्मू यांनी 3.5 दशलक्षाहून अधिक भारतीयांचे यजमानपद भूषवून त्यांची काळजी घेत असल्याबद्दल यूएईच्या नेतृत्वाचे आभार व्यक्त केले.

अबू धाबीच्या युवराजांनी आज राजघाट येथे  भेट देऊन महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. विशेष म्हणजे 1992 मध्ये यूएईचे तत्कालीन अध्यक्ष  शेख झायेद बिन सुलतान अल नाह्यान आणि 2016 मधले यूएई चे तत्कालीन अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्‍यानंतर  राजघाट येथे रोपटे लावणारे ते  यूएईमधील तिसऱ्या पिढीचे नेते ठरले. हा एक अनोखा आणि दुर्मिळ प्रसंग होता.  यावरून दोन्ही देशांमधील मजबूत नातेसंबंधातील पिढ्यानपिढ्यातील निरंतरता दिसून येते. राजघाटाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या तीन पिढ्यांतील नेत्यांनी महात्माजींच्या सन्मानार्थ  वृक्षारोपण केले आहे.

युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान उद्या मुंबईला भेट देणार आहेत. येथे ते भारत-यूएई बिझनेस फोरममध्ये सहभागी होतील. हा मंच दोन्ही बाजूंच्या व्यावसायिक नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना देशांमधील विविध क्षेत्रातील भविष्यातील सहकार्यावर विचारमंथन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.भारत-यूएई व्हर्च्युअल ट्रेड कॉरिडॉर (व्‍हीटीसी) आणि एमएआयटीआरआय –मैत्री इंटरफेस,सुविधा सुरू करण्‍यासाठी युवराज मुंबईला भेट देणार आहेत.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'

Media Coverage

'India Delivers': UN Climate Chief Simon Stiell Hails India As A 'Solar Superpower'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 फेब्रुवारी 2025
February 16, 2025

Appreciation for PM Modi’s Steps for Transformative Governance and Administrative Simplification