नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 मे 2022 रोजी बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर लुंबिनीला अधिकृत भेट देतील. 2014 पासून पंतप्रधानांचा हा पाचवा नेपाळ दौरा असेल.
लुंबिनी येथे पंतप्रधान पवित्र मायादेवी मंदिरात जाऊन प्रार्थना करतील. नेपाळ सरकारच्या नेतृत्वाखाली लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या बुद्ध जयंती कार्यक्रमातही पंतप्रधान संबोधित करतील. स्वतंत्रपणे, लुंबिनी मोनास्टिक झोनमध्ये नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या (IBC) मालकीच्या भूखंडामध्ये बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या बांधकामासाठी "शिलान्यास" समारंभात पंतप्रधान सहभागी होतील. द्विपक्षीय बैठकीत दोन्ही पंतप्रधान सहभागी होतील.
आमच्या शेजारी प्रथम या धोरणाला पुढे नेत पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने भारत आणि नेपाळदरम्यान नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाण करण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. हे दोन्ही देशांतील लोकांचा सामायिक सभ्यता वारसा अधोरेखित करते.