पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन यांची 16 मार्च 2021 ला दूरदृश्य प्रणाली द्वारे शिखर परिषद होणार आहे.
लोकशाही, स्वातंत्र्य आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था या सामायिक मुल्यांवर आधारित भारत आणि फिनलंड यांच्यामध्ये स्न्हेहपूर्ण संबंध आहेत. व्यापार आणि गुंतवणूक, शिक्षण, नवोन्मेश, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच संशोधन आणि विकास या क्षेत्रात दोन्ही देशात घनिष्ट संबंध आहेत.
सामाजिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करत क्वांटम कॉम्प्युटरचा संयुक्त विकास करण्यात दोन्ही देशांनी सहकार्य केले आहे. टेलीकॉम, लिफ्ट, यंत्र सामग्री, नविकरणीय ऊर्जेसह उर्जा अशा विविध क्षेत्रात फिनलंडच्या सुमारे 100 कंपन्या भारतात कार्यरत आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान, वाहन क्षेत्राशी संबंधित भाग बनवणे आणि आदरातिथ्य क्षेत्रात सुमारे 30 भारतीय कंपन्या फिनलंड मध्ये कार्यरत आहेत.
या शिखर परिषदेत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांवर सांगोपांग चर्चा करण्याबरोबरच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही चर्चा करतील. आभासी माध्यमातून होणारी ही चर्चा भविष्यात भारत-फिनलंड भागीदारीचा विस्तार आणि त्यात वैविध्य आणण्यासाठी पथदर्शी आराखडा पुरवेल.