उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसद भवनाच्या मुख्य कमिटी रूम मध्ये 15 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता संसद टीव्हीचे संयुक्तपणे उद्घाटन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी, संसद टीव्हीचे उद्घाटन होणार आहे.
संसद टीव्ही विषयी
लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही विलीनीकरणाचा निर्णय फेब्रुवारी 2021 मधेच घेण्यात आला होता. मार्च 2021 मध्ये संसद टीव्ही च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. संसद टीव्हीच्या कार्यक्रमांची प्रामुख्याने 4 वर्गात विभागणी करण्यात येणार आहे- संसद आणि लोकशाही संस्थांचे कामकाज, प्रशासन आणि योजना/धोरणे यांची अंमलबजावणी, इतिहास आणि भारताची संस्कृती आणि चालू घडामोडी.