1. उझबेकिस्तानात समरकंद इथे 16 सप्टेंबर 2022 रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्र प्रमुखांच्या 22 व्या बैठकीत वाराणसी शहराचे 2022-2023 या कालावधीकरीता पहिली-वहिली एससीओ पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून नामांकन करण्यात आले आहे. या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
2. एससीओ पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून वाराणसीचे झालेले नामांकन, भारत आणि एससीओ सदस्य देशांमधील पर्यटन, सांस्कृतिक आणि मानवतावादी देवाणघेवाणीला चालना देईल. हे एससीओच्या सदस्य राष्ट्रांशी, विशेषत: मध्य आशियाई देशांबरोबरचे भारताचे प्राचीन संस्कृती संबंध अधोरेखित करते.
3. प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आराखड्यांतर्गत, वाराणसीमध्ये 2022-23 दरम्यान अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. यासाठी एससीओ सदस्य राष्ट्रांमधून पाहुण्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हे कार्यक्रम भारताचा अभ्यास करणारे, अभ्यासक, लेखक, संगीतकार आणि कलाकार, फोटो पत्रकार, ट्रॅव्हल ब्लॉगर आणि इतर आमंत्रित अतिथींना आकर्षित करतील अशी अपेक्षा आहे.
4. एससीओ पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी नामांकनासाठीचे नियम 2021 मध्ये दुशान्बे एससीओ परिषदेत एससीओ सदस्य राष्ट्रांमध्ये संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने स्वीकारण्यात आले होते.
Kashi: The first-ever SCO Tourism and Cultural Capital https://t.co/gZ1VNVtdhs pic.twitter.com/OiGhgeWxgn
— Arindam Bagchi (@MEAIndia) September 16, 2022