अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
गेल्यावर्षी जूनमध्ये अमेरिका भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या विस्तृत आणि फलदायी चर्चेचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी केले. भारत-अमेरिका यांच्यातील दृढ धोरणात्मक भागिदारी आणखी विकसित करण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीदरम्यान घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणी विषयी मॅटिस यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. .
शांतता, स्थैर्य आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक वाढत्या सहकार्याबाबतही मॅटिस यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली.
परस्पर संबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांबाबत, उभय देशातल्या वाढत्या सहकार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.