अलीकडे रेल्वेच्या मुलभूत सुविधांच्या विकासात उपयुक्त ठरलेला बदलता दृष्टीकोन पंतप्रधानांनी आज अधोरेखित केला. हा बदल भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या विकासाच्या दृष्टीने अभूतपूर्व होता. गुजरातमधील केवडिया हे देशातील विविध भागांशी जोडणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांना रवाना करण्यासाठी हिरवा कंदील दाखवून राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्धाटन करताना ते बोलत होते.
याआधी पूर्वीच्या मूलभूत सोयी सुरू ठेवणे येथपर्यंतच लक्ष्य मर्यादित होते आणि नवा विचार वा नवे तंत्रज्ञान याकडे अतिशय नगण्य लक्ष दिले जात असे. हा दृष्टीकोन बदलणे आवश्यक होते. गेल्या काही वर्षांत एकंदरील रेल्वे व्यवस्थेच्या मूलगामी परिवर्तनाच्या दृष्टीने काम झाले आणि ते फक्त निधीची व्यवस्था वा नवी रेल्वे गाड्यांची घोषणा एवढेच मर्यादित नव्ह्ते. अनेक आघाड्यांवर बदल घडवले गेले. केवडियाला जोडणारा नवा प्रकल्प जेथे बहुआयामी लक्ष्य या धोरणामुळे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले.
आधीच्या काळातील दृष्टीकोनाचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे उदाहरण दिले. नुकतेच पंतप्रधानांनी पूर्व आणि पश्चिमी डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉरचे लोकार्पण केले. प्रकल्पावर 2006 पासून 2014 पर्यंत फक्त कागदांवरच काम झाले होते आणि एक किलोमीटर अंतराचा ही रुळ टाकला गेला नव्हता. आता पुढील काही महिन्यांतच 1100 किलोमीटरचे काम पूर्ण होत आहे.