केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी आज राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वायू प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या रविवारपासून करण्यात आलेल्या व्यवस्थेतील प्रगतीचा आढावा घेतला.
यात असे आढळून आले की पंजाब आणि हरियाणा मध्ये पिकांच्या कापणी पश्चात उर्वरित टाकाऊ पदार्थ अजूनही जाळले जात आहेत आणि यासंदर्भात अधिक व्यापक कारवाई करण्याची गरज आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य दंड आकारण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या संख्येने देखरेख पथके तैनात करण्याचे निर्देश आता या राज्यांना देण्यात आले आहेत.
राजधानीतील स्थितीबाबतही चर्चा करण्यात आली जिथे विविध संस्था समन्वयाने काम करत आहेत.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
भविष्यात कुठल्याही प्रकारची आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत.