पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना आपल्या सुटकेच्या प्रसंगाचे अनुभव सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघात हे संभाषण झाले. आपल्या देशाच्या नागरिकांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी सध्या राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन गंगा या मोहिमेबद्दल विद्यार्थ्यांनी भारत सरकार, भारतीय दूतावासांचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले. या विद्यार्थ्यांनी भारतीय तिरंग्याच्या सामर्थ्याविषयी समाधानही व्यक्त केले.
अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यात सरकार प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडत नसल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले तसेच बाकीच्या विद्यार्थ्यांची लवकरात लवकर तिथून सुटकी व्हावी यासाठी भारत सरकारच्यावतीने पूर्णपणे मदत करण्याचे आश्र्वासनही त्यांनी दिले.