अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तवार्ता संचालक तुलसी गॅबार्ड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी गॅबार्ड यांच्यासोबत पूर्वी झालेल्या संवादाला उजाळा दिला. या चर्चेत द्विपक्षीय गुप्तचर सहकार्य वृद्धिंगत करण्यावर, विशेषतः दहशतवाद प्रतिबंध, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख धोके आणि धोरणात्मक गुप्तवार्ता यांचे सामायिकरण यावर चर्चा झाली. त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर देखील विचारांचे आदानप्रदान केले आणि सुरक्षित, स्थिर व नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी वचनबद्धतेची पुष्टी केली.
Met USA’s Director of National Intelligence, @TulsiGabbard in Washington DC. Congratulated her on her confirmation. Discussed various aspects of the India-USA friendship, of which she’s always been a strong votary. pic.twitter.com/w2bhsh8CKF
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2025