Quoteएकेकाळी अंबाजी मंदिरात भीक मागणारी बालके पंतप्रधानांच्या प्रोत्साहनानंतर केवडिया येथे सादरीकरण करणार
Quoteयापूर्वी 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या अंबाजी दौऱ्यातही या वाद्यवृंदाने सादरीकरण केले होते

केवडिया येथे बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी शहरातील आदिवासी बालकांचा संगीत वाद्यवृंद येत्या 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांसमोर आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधान केवडियाला भेट देणार आहेत.

पंतप्रधानांसमोर सादरीकरण करण्याची ही या वाद्यवृंदाची पहिलीच वेळ नाही. 30 सप्टेंबर 2022 रोजी, पंतप्रधानांनी गुजरातमध्ये अंबाजी येथे भेट दिली होती आणि 7200 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले होते, त्यावेळी आयोजित समारंभासाठी पंतप्रधानांचे आगमन होत असताना या वाद्यवृंदाने त्यांचे स्वागत केले होते.

या युवा वाद्यवृंदाचे पंतप्रधानांनी कौतुक केले होते आणि त्यांच्या सादरीकरणाचा आनंदही घेतला होता. इतकेच नाही तर समारंभाला सुरूवात होण्यापूर्वी त्यांनी या वाद्यवृंदाशी वैयक्तिक संवादही साधला होता. आपल्या या युवा मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत छायाचित्रही काढून घेतले होते.

उत्कृष्ट संगीत कौशल्य आत्मसात करणाऱ्या या आदिवासी बालकांची कहाणी जाणून घेण्यासारखी आहे. ही मुले एकेकाळी आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आणि शिक्षणाच्या संधीसाठी संघर्ष करत होती. त्यासाठी अंबाजी मंदिराजवळ पाहुण्यांसमोर भीक मागताना ही मुले सतत दिसत. अंबाजी येथील श्री शक्ती सेवा केंद्र नावाच्या स्थानिक स्वयंसेवी संस्थेने या मुलांना मदतीचा हात दिला. त्यांना शिक्षण दिले आणि त्यांची कौशल्येही जाणून घेतली. श्री शक्ती सेवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेने या आदिवासी मुलांना वाद्यवृंदासाठी उपयुक्त असे संगीताचे शिक्षणही दिले आहे.

पंतप्रधानांनी या युवा वाद्यवृंदाच्या सादरीकरणाचा आनंद घेतला, त्यांचे कौतुक केले आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर रोजी या वाद्यवृंदाला केवडिया येथे आमंत्रितही केले आहे, जेणेकरून त्यांनाही या ऐतिहासिक दिवशी आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन सादरीकरण करता येईल.

31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान केवडियाला भेट देणार असून सरदार पटेल यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहणार आहेत. एकता दिनानिमित्त आयोजित संचलनातही पंतप्रधान सहभागी होणार असून लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये विविध नागरी सेवांशी संबंधित अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत.

 

  • Umang Jivrajbhai Sarvaiya October 29, 2022

    nice
  • harish sharma October 29, 2022

    जय हो ✌🙏🇮🇳👌👌👌
  • raj tadvi October 29, 2022

    एक प्रधान मंत्री जी की इस तरह की सोच और देखनेका नजरिया आज तक ना किसीने के देखा न सुना ।मोदीजी जैसा न कोई था ना होगा ।
  • Narendra Dev October 28, 2022

    जय हो
  • Krishan Kumar Parashar October 28, 2022

    केवड़िया पीएम
  • अनन्त राम मिश्र October 28, 2022

    बहुत खूब अति सुन्दर जय हो सादर प्रणाम
  • Sanjay Zala October 28, 2022

    👨‍🔧👩‍🔧👨‍🔧 Likely On A Make In A Best Wishes Of A Over All In A. 'TRIBELS' _ Children On A _ Banshkadha ( Gujarat ) Band _ Partys. On A Function & Show. Likly Faces 02 Faces Of A. 'Hon Ble PRADHAN SEVAK In A. Octo / 31 / Be Were A. 👩‍🔧👨‍🔧👩‍🔧
  • Gangadhar Rao Uppalapati October 28, 2022

    Jai Bharat.
  • Markandey Nath Singh October 28, 2022

    वन्देमातरम
  • Akash Gupta BJP October 28, 2022

    Tribal children’s musical band to perform in front of Prime Minister in Kevadia on 31st October
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How India is upgrading its ‘first responder’ status with ‘Operation Brahma’ after Myanmar quake

Media Coverage

How India is upgrading its ‘first responder’ status with ‘Operation Brahma’ after Myanmar quake
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM reflects on the immense peace that fills the mind with worship of Devi Maa in Navratri
April 01, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi today reflected on the immense peace that fills the mind with worship of Devi Maa in Navratri. He also shared a Bhajan by Pandit Bhimsen Joshi.

He wrote in a post on X:

“नवरात्रि पर देवी मां की आराधना मन को असीम शांति से भर देती है। माता को समर्पित पंडित भीमसेन जोशी जी का यह भावपूर्ण भजन मंत्रमुग्ध कर देने वाला है…”