Quoteजम्मू आणि काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान
Quoteमतदारसंघांची पुनर्रचना जलदगतीने झाली पाहिजे, जेणेकरून जम्मू आणि काश्मीरला एक निर्वाचित सरकार मिळेल : पंतप्रधान

“जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय नेत्यांबरोबरची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल होय. अशा प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वांगीण प्रगतीचा आलेख पुढे नेता येईल" अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवली आहे.

या बैठकीनंतर जारी केलेल्या ट्विटर संदेशांचा माध्यमातून पंतप्रधान म्हणतात, 

“जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय नेत्यांबरोबरची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे पाऊल होय. अशा प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वांगीण प्रगतीचा आलेख पुढे नेता येईल.

|

जम्मू आणि काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही रुजवून ती बळकट करणे याला आमच्या दृष्टीने सर्वोच्च प्राधान्य आहे. मतदारसंघांची पुनर्रचना जलदगतीने झाली पाहिजे, जेणेकरून निवडणुका घेता येतील आणि विकासाच्या कक्षेला बळकटी देणारे एक निर्वाचित सरकार जम्मू आणि काश्मीरला मिळेल.

|

परस्परभिन्न मतप्रवाहही समोरासमोर बसून आपापल्या दृष्टिकोनांबद्दल चर्चा करू शकतात, हेच आपल्या लोकशाहीचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. मी जम्मू आणि काश्मीरच्या नेत्यांना सांगितले की, जम्मू काश्मीरला जनतेने- विशेषतः तरुणाईने राजकीय नेतृत्व दिले पाहिजे आणि आशा-आकांक्षांची पूर्तता होण्याची काळजी घेतली पाहिजे."

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Thai epic based on Ramayana staged for PM Modi

Media Coverage

Thai epic based on Ramayana staged for PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 एप्रिल 2025
April 04, 2025

Appreciation for PM Modi’s Bharat: Blending Tradition with Transformation