QuoteHer address encapsulates the vision for an India where youth have the best opportunities to flourish: PM

माननीय राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेल्या अभिभाषणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. त्यांच्या भाषणातून विकसित भारताच्या उभारणीच्या दिशेने होणाऱ्या भारताच्या वाटचालीची  सर्वसमावेशक दृष्टि प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

राष्ट्रपतींनी विविध क्षेत्रातील प्रमुख उपक्रमांवर प्रकाश टाकला आणि सर्वांगीण तसेच भविष्यकालीन विकासाचे महत्त्व अधोरेखित केल्याचे मोदी म्हणाले.

तरुणांच्या उत्कर्षासाठी उत्तम संधी उपलब्ध असलेल्या भारताची संकल्पना राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून स्पष्ट झाली असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात गेल्या दशकातील आपल्या राष्ट्राच्या सामूहिक कामगिरीचाही सुंदर मागोवा घेतला आहे आणि आपल्या भावी आकांक्षांचाही त्यात समावेश होता, असेही श्री मोदी यांनी म्हटले आहे.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे ;

“राष्ट्रपतीजींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना केलेले आजचे अभिभाषण हे विकसित भारत निर्माण करण्याच्या दिशेने आपल्या देशाच्या वाटचालीचा होत असलेला प्रतिध्वनी होता. त्यांनी विविध क्षेत्रात होत असलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला आणि सर्वांगीण तसेच भविष्यकालीन विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

जिथे तरुणांना उत्कर्षाच्या सर्वोत्तम संधी आहेत,अशा भारताची दृष्टि त्यांच्या संबोधनात अंतर्भूत केली‌ आहे. एकता आणि दृढनिश्चयाच्या भावनेने आम्ही ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रेरणादायी कृति दिशानिर्देश  देखील यात  समाविष्ट आहेत.

“माननीय राष्ट्रपतींच्या भाषणात गेल्या दशकातील आपल्या राष्ट्राच्या सामूहिक कामगिरीचा सुरेख मागोवा घेतला आहे  आणि भविष्यातील आशाआकांक्षाना समाविष्ट केले आहे.  यात  आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिक आरोग्यसेवा, शिक्षण, अक्षय ऊर्जा, ग्रामीण विकास, उद्योजकता, अवकाश आणि बरेच काही समाविष्ट आहे.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
From 'Kavach' Train To Made-In-India Semiconductor Chip: Ashwini Vaishnaw Charts India’s Tech Future

Media Coverage

From 'Kavach' Train To Made-In-India Semiconductor Chip: Ashwini Vaishnaw Charts India’s Tech Future
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 एप्रिल 2025
April 11, 2025

Citizens Appreciate PM Modi's Vision: Transforming India into a Global Manufacturing Powerhouse