पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 मार्चला, सोमवारी रात्री, आपण सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यू-ट्यूब ही खाती सोडण्याच्या विचारात असल्याचे ट्विट करून नेटिझन्सना आश्चर्याचा धक्का दिला होता.
पंतप्रधानांच्या ट्विटच्या अनुषंगाने, त्यांनी सोशल मीडिया सोडून जाऊ नये अशा आशयाच्या लोकांच्या प्रतिक्रियांचा ट्विटरवर वर्षाव झाला.
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी 3 मार्चला आपल्या ट्विटमुळे निर्माण झालेली उत्कंठा दूर करीत, ज्या महिलांचे आयुष्य आणि कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, अशा महिलांना आपली सोशल मीडिया अकाऊंट सोपवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारी, 8 मार्चला महिला दिन असल्यामुळे ते आपली अकाऊंटस् महिलांकडे सोपविणार आहेत
या निर्णयामुळे लाखो महिलांमध्ये स्फूर्तीची ज्योत प्रज्वलित होईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
जगाला प्रेरणादायी ठरेल असे कर्तृत्व असलेली महिला तुम्ही स्वतःच असाल किंवा स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणलेल्या महिला तुम्हाला ठाऊक असतील तर त्या महिलांच्या कर्तबगारीच्या कहाण्या #SheInspiresUs या हॅशटॅगने शेअर करा. निवडक महिलांना @narendramodi's सोशल मीडिया खाती सांभाळण्याची संधी मिळेल.
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2020
This Women's Day, I will give away my social media accounts to women whose life & work inspire us. This will help them ignite motivation in millions.
— Narendra Modi (@narendramodi) March 3, 2020
Are you such a woman or do you know such inspiring women? Share such stories using #SheInspiresUs. pic.twitter.com/CnuvmFAKEu