भारताची वैभवशाली परंपरा असलेल्या ‘योग’ने संपूर्ण जगाला जोडता येते, हे दाखवून दिले आहे. सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभे मध्ये बोलताना आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राने भारताच्या या प्रस्तावाला मान्यता दिली, 177 देशांनी दरवर्षी 21जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव मान्य केला. संपूर्ण जगभरातील, वेेगवेगळ्या खंडातील देश आता योगदिनामुळे जोडले गेले आहेत.
21 जून हा ‘आंतर राष्ट्रीय योगदिन’ म्हणून जाहीर झाल्यामुळे भारतीय योगाचा प्रसार आता जगभरात होत आहे. अनेक मार्गांनी योग लोकप्रिय होत आहे. पंतप्रधान स्वतः नियमित योगासने करतात. ज्ञान, कर्म आणि भक्ती यांची मनाशी उत्तम सांगड घालून ‘रोग मुक्ती’ आणि ‘भोग मुक्ती’ साधणे योगासनांमुळे श्शक्य होते, असे ते सांगतात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी योग विद्यापिठाची स्थापना करून युवकांमध्ये ‘योग’ लोकप्रिय बनवला.