योगाने जोडले जगाला

Published By : Admin | May 26, 2015 | 15:00 IST

भारताची वैभवशाली परंपरा असलेल्या ‘योग’ने संपूर्ण जगाला जोडता येते, हे दाखवून दिले आहे. सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभे मध्ये बोलताना आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.



डिसेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राने भारताच्या या प्रस्तावाला मान्यता दिली, 177 देशांनी दरवर्षी 21जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव मान्य केला. संपूर्ण जगभरातील, वेेगवेगळ्या खंडातील देश आता योगदिनामुळे जोडले गेले आहेत.



21 जून हा ‘आंतर राष्ट्रीय योगदिन’ म्हणून जाहीर झाल्यामुळे भारतीय योगाचा प्रसार आता जगभरात होत आहे. अनेक मार्गांनी योग लोकप्रिय होत आहे. पंतप्रधान स्वतः नियमित योगासने करतात. ज्ञान, कर्म आणि भक्ती यांची मनाशी उत्तम सांगड घालून ‘रोग मुक्ती’ आणि ‘भोग मुक्ती’ साधणे योगासनांमुळे श्शक्य होते, असे ते सांगतात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी योग विद्यापिठाची स्थापना करून युवकांमध्ये ‘योग’ लोकप्रिय बनवला.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry

Media Coverage

Annual malaria cases at 2 mn in 2023, down 97% since 1947: Health ministry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

5 मे 2017 हा दिवस दक्षिण आशिया सहकार्याला मोठी चालना मिळाल्याचा दिवस आहे. याच दिवशी दक्षिण आशिया उपग्रह यशस्वीपणे अंतराळांत सोडून; 2 वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यांत आले. 

दक्षिण आशिया उपग्रह यशस्वीपणे अंतराळांत प्रक्षेपित झाल्यामुळे दक्षिण आशियाई देशांचे सहकार्य अंतराळात पोचले. 

या इतिहासाची निर्मिती बघण्यासाठी, भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंकेच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात भाग घेतला.

कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आशिया उपग्रहाची संपूर्ण  क्षमता सादर केली.

ते म्हणाले की, हा उपग्रह उत्तम प्रशासन, प्रभावी संभाषण, दुर्गम भागामध्ये चांगले बँकिंग आणि शिक्षणाची खात्री देतील, योग्य हवामान अंदाजपत्रक तसेच टेली-मेडिसिन द्वारे लोकांना जोडून  उत्तम उपचार प्रदान करेल.

श्री मोदी यांनी स्पष्ट केले की जेव्हा आम्ही एकत्रित रित्या काम करतो तेव्हा ज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाची फळे आम्ही आदानप्रदान करू शकतो, आम्ही आमचा विकास आणि प्रगती वेगवान करू शकतो.