जगातील सर्वात विशाल मोफत लसीकरण असो किंवा वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विकास असो, आरोग्याच्या क्षेत्रात भारत नवे मानदंड प्रस्थापित करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 130 कोटी नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत दाखवलेली संकल्पशक्ती ही नव्या भारताच्या सामर्थ्याचे द्योतक आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
ट्वीट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"कोरोनाविरोधी लढाईत 130 करोड देशवासियांनी ज्या संकल्पशक्तीची ओळख करून दिली आहे, ती नवीन भारताच्या सामर्थ्यशक्तीची ओळख आहे. स्वदेशी लसनिर्मिती करत विश्वातील सर्वात विशाल मोफत लसीकरण अभियान, अथवा वैद्यकीय सेवासुविधांचा विकास भारत आरोग्याच्या क्षेत्रात नित्य नूतन मानदंड प्रस्थापित करत आहे."
कोरोना से लड़ाई में 130 करोड़ देशवासियों ने जिस संकल्प शक्ति का परिचय दिया है, वो नए भारत के सामर्थ्य की पहचान है। स्वदेशी टीकों के साथ विश्व का सबसे बड़ा मुफ्त वैक्सीनेशन अभियान हो या मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर का विकास, स्वास्थ्य के क्षेत्र में देश नित नए मानदंड स्थापित कर रहा है। pic.twitter.com/E92ZC9UxcA
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2022