संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात महात्मा गांधींचा अर्धपुतळा पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात महात्मा गांधींचा अर्धपुतळा पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. गांधीवादी विचार आणि आदर्श आपल्या विश्वाला अधिक समृद्ध करू दे आणि अधिक शाश्वत विकासाकडे नेऊ दे."
It makes every Indian proud to see the bust of Mahatma Gandhi at the @UN HQ. May the Gandhian thoughts and ideals make our planet more prosperous and further sustainable development. https://t.co/kU6Juw96WU
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2022