1. माझ्या प्रिय 140 कोटी कुटुंबियांनो, जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि आता लोकसंख्येच्या दृष्टीकोनातूनही आपण पहिल्या क्रमांकावर आहोत असे अनेकांचे मत आहे. एवढा मोठा देश, 140 कोटी देशवासीय, माझे बंधू-भगिनी, माझे कुटुंबीय आज स्वातंत्र्याचा सण साजरा करत आहेत. भारतावर प्रेम करणारे, भारताचा आदर करणारे, भारताचा अभिमान बाळगणाऱ्या या देश-विदेशातील कोट्यवधी लोकांना स्वातंत्र्याच्या या महान पवित्र सणानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो.
  2. पूज्य बापूंच्या नेतृत्वाखाली असहकाराची चळवळ, सत्याग्रहाची चळवळ आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा असंख्य वीरांचे बलिदान यामुळे त्या पिढीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान न देणारी व्यक्ती क्वचितच असेल. आज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी योगदान दिले, बलिदान दिले, तपश्चर्या केली त्या सर्वांना मी आदरपूर्वक नमन करतो, त्यांचे मी अभिनंदन करतो.
  3. महान क्रांतिकारक आणि आध्यात्मिक जीवनाचे प्रणेते श्री अरविंद यांची आज, 15 ऑगस्ट रोजी 150 वी जयंती साजरी होत आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 150 व्या जयंतीचे हे वर्ष आहे. राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जयंतीचा हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे, जो संपूर्ण देश मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे. भक्ती योगाच्या प्रमुख मीराबाईंचा 525 वर्षांचा शुभ प्रसंगही यावर्षी आहे.
  4. यावर्षी 26 जानेवारीला आपण आपल्या प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. त्यात अनेक प्रकारे संधी असतील, अनेक शक्यता असतील, प्रत्येक क्षणी नवी प्रेरणा, क्षणोक्षणी नवी जाणीव, स्वप्ने, संकल्प, राष्ट्रउभारणीत योगदानाची संधी असेल, कदाचित यापेक्षा मोठी संधी असूच शकत नाही.
  5. ईशान्य भारतात, विशेषत: मणिपूरमध्ये आणि भारताच्या इतर काही भागात, विशेषत: मणिपूरमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले, माता-मुलींच्या सन्मानाशी खेळ केला गेला. आता गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शांतता प्रस्थापित होत असल्याच्या बातम्या येत आहेत, देश मणिपूरच्या लोकांसोबत आहे. मणिपूरच्या जनतेने गेल्या काही दिवसांपासून जपलेला शांततेचा काळ देशाने पुढे नेला पाहिजे आणि शांततेतूनच तोडगा निघेल. राज्य आणि केंद्र सरकार मिळून त्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि यापुढेही करत राहू.
  6. अमृतकालाचे हे पहिलेच वर्ष आहे, या काळात आपण काय करणार, कोणती पावले उचलणार, त्याग करू, कोणती तपश्चर्या करणार यावर देशाचा पुढील एक हजार वर्षांच्या सुवर्ण इतिहासाची पहाट उगवणार आहे. 
  7. भारतमाता जागृत झाली आहे आणि मला स्पष्ट दिसत आहे मित्रांनो, हा काळ आपण गेल्या 9-10 वर्षांत अनुभवला आहे, एक नवीन आकर्षण, एक नवा विश्वास, नवी उमेद जगभर भारताच्या चैतन्याकडे, भारताच्या क्षमतेकडे निर्माण झाली आहे आणि भारतातून उगवलेल्या या प्रकाशकिरणाकडे जग स्वतःसाठी प्रकाश म्हणून पाहत आहे.
  8. लोकसंख्या, लोकशाही आणि विविधतेच्या या त्रिसूत्रीमध्ये भारताचे प्रत्येक स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे. आज आपली 30 वर्षांखालील लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. 30 वर्षांखालील तरुणांमध्ये माझ्या देशात लाखो आयुधे, लाखो मेंदू, लाखो स्वप्ने, लाखो निर्धार आहेत, ज्याच्या जोरावर माझे बंधू-भगिनी, माझे कुटुंबीय इच्छित परिणाम साध्य करू शकतात.
  9. आज माझ्या तरुणांनी भारताला जगातील पहिल्या तीन स्टार्ट-अप इको-सिस्टीममध्ये स्थान दिले आहे. भारताची ही ताकद पाहून जगातील तरुण वर्ग आश्चर्यचकित झाला आहे. आज जग तंत्रज्ञानाधारित आहे आणि येणारे युग तंत्रज्ञानाने प्रभावित होणार आहे आणि मग तंत्रज्ञानातील भारताची प्रतिभा एक नवी भूमिका बजावणार आहे.
  10. नुकताच मी जी-20 परिषदेसाठी बालीला गेलो होतो आणि बाली मध्ये जगातील सर्वात समृद्ध देश, त्यांचे नेते, तसेच जगातील विकसित देश भारताच्या डिजिटल इंडियाचे यश, त्यातील बारकावे माझ्याकडून जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. हा प्रश्न प्रत्येकजण विचारत असे आणि जेव्हा मी त्यांना म्हणायचो की भारताने जे चमत्कार केले आहेत ते केवळ दिल्ली, मुंबई, चेन्नई पुरते मर्यादित नाहीत, भारत जे चमत्कार करत आहे, अगदी माझ्या टियर-2, टियर-3 शहरांतील तरुणही आज माझ्या देशाचे भवितव्य घडवत आहेत.
  11. झोपडपट्टीतून बाहेर पडलेली मुले आज क्रीडा विश्वात ताकद दाखवत आहेत. छोट्या गावांतील, छोट्या शहरांतील युवक, मुले-मुली आज चमत्कार दाखवत आहेत. माझ्या देशात 100 शाळा आहेत जिथे मुले उपग्रह तयार करुन ते सोडण्याची तयारी करत आहेत. आज हजारो अटल टिंकरिंग लॅब नवीन शास्त्रज्ञांची निर्मिती करत आहेत, लाखो मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देत आहेत.
  12. गेल्या वर्षभरात भारताच्या कानाकोपऱ्यात ज्या प्रकारे जी-20 परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे देशातील सामान्य माणसाच्या क्षमतेची जाणीव जगाला झाली आहे. भारतातील विविधतेची ओळख करून त्यांना देण्यात आली आहे.
  13. आज भारताची निर्यात झपाट्याने वाढत असून विविध निकषांच्या आधारे जगातील तज्ज्ञ म्हणत आहेत की, आता भारत थांबणार नाही. जगातील कोणतीही रेटिंग एजन्सी भारताची मान उंचावत असेल.
  14. कोरोनानंतर नवी वैश्विक व्यवस्था, नवी जागतिक व्यवस्था, नवे भू-राजकीय समीकरण अतिशय वेगाने पुढे येत असल्याचे मला स्पष्ट दिसत आहे. भूराजकीय समीकरणाचे सर्व अर्थ बदलत आहेत, व्याख्या बदलत आहेत. आज माझ्या 140 कोटी देशवासियांनो, बदलत्या जगाला आकार देण्याची तुमची क्षमता दिसून येते. तुम्ही एका वळणावर उभे आहात आणि कोरोना काळात भारताने ज्या प्रकारे देशाला पुढे नेले आहे, त्याची क्षमता जगाने अनुभवली आहे.
  15. आज भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनत चालला आहे. भारताची समृद्धी आणि वारसा आज जगासाठी एक संधी बनत चालला आहे. आता चेंडू आपल्या कोर्टात आहे, आपण ती संधी सोडू नये, संधी गमावू नये. मी भारतातील माझ्या देशवासियांचेही अभिनंदन करतो कारण माझ्या देशवासीयांमध्ये समस्यांचे मूळ समजून घेण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच 2014 मध्ये, 30 वर्षांच्या अनुभवानंतर, माझ्या देशवासियांनी मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
  16. 2014 मध्ये आणि 2019 मध्ये जेव्हा तुम्ही सरकार स्थापन केले तेव्हा मोदींना सुधारणा करण्याचे धाडस मिळाले. जेव्हा मोदींनी एकापाठोपाठ एक सुधारणा केल्या, तेव्हा भारताच्या कानाकोपऱ्यात सरकारचा भाग म्हणून काम करणाऱ्या माझ्या नोकरशाहीतील लोकांनी, माझ्या लाखो हात आणि पायाने नोकरशाहीत बदल घडवून आणण्याचे काम केले. म्हणूनच सुधारणेचा, कामगिरीचा, परिवर्तनाचा हा कालखंड आता भारताचे भवितव्य घडवत आहे.
  17. आम्ही स्वतंत्र कौशल्य मंत्रालयाची निर्मिती केली आहे, त्यातून भारताच्या गरजा तर पूर्ण होतीलच, शिवाय जगाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमताही यात असेल. आपल्या देशातील प्रत्येक देशवासीयांपर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचावे, पर्यावरण रक्षणासाठी जलसंवेदनशील यंत्रणा विकसित करावी, यावर भर देणारे जलशक्ती मंत्रालय आम्ही निर्माण केले. सर्वांगीण आरोग्य सेवा ही काळाची गरज आहे. आपण स्वतंत्र आयुष मंत्रालयाची निर्मिती केली आणि आज योग आणि आयुष जगात ज्वलंत उदाहरणे बनली आहेत.
  18. आपले कोट्यवधी मच्छीमार बंधू-भगिनी, त्यांचे कल्याणही आपल्या हृदयात आहे आणि म्हणूनच मागे राहिलेल्या समाजातील लोकांना इच्छित आधार मिळावा यासाठी आम्ही स्वतंत्र मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाची निर्मिती केली आहे.
  19. सहकार चळवळ हा समाजाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे, तो बळकट करण्यासाठी, त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात लोकशाहीचे सर्वात मोठे युनिट मजबूत करण्यासाठी आम्ही स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. सहकार्यातून समृद्धीचा मार्ग स्वीकारला आहे.
  20. 2014 मध्ये सत्तेत आलो तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत आपण 10 व्या क्रमांकावर होतो आणि आज 140 कोटी देशवासियांच्या प्रयत्नांना फळ आले आहे आणि आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. आम्ही गळती थांबवली, मजबूत अर्थव्यवस्था निर्माण केली, गरिबांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याचा प्रयत्न केला.
  21. मी लाल किल्ल्याला साक्षी ठेऊन, तिरंगा समोर ठेऊन माझ्या देशवासियांना 10 वर्षांचा लेखाजोखा देत आहे.
    • दहा वर्षांपूर्वी भारत सरकारकडून 30 लाख कोटी रुपये राज्यांना जात होते. गेल्या 9 वर्षांत हा आकडा 100 लाख कोटींवर पोहोचला आहे.
    • पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीतून 70 हजार कोटी रुपये खर्च केले जात होते, आज ते 3 लाख कोटींपेक्षा जास्त आहेत.
    • पूर्वी गरिबांची घरे बांधण्यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्च केले जात होते, आज त्यात 4 पटीने वाढ झाली असून गरिबांची घरे बांधण्यासाठी 4 लाख कोटींहून अधिक खर्च केला जात आहे.
    • जगातील काही बाजारपेठांमध्ये युरियाच्या ज्या पिशव्या तीन हजार रुपयांना विकल्या गेल्या, त्या युरियाच्या पिशव्या माझ्या शेतकऱ्यांना 300 रुपयांना मिळाल्या, त्यासाठी देशातील सरकार 10 लाख कोटी रुपयांचे अनुदान देत आहे.
    • माझ्या देशातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी 20 लाख कोटी रुपये दिले आहेत. मुद्रा योजनेचा लाभ घेतलेल्या 8 कोटी नागरिकांना 8-10 कोटी नवीन लोकांना रोजगार देण्याची क्षमता मिळाली आहे.
    • एमएसएमईंना अधिक बळकट करण्यासाठी आम्ही त्यांना सुमारे साडेतीन लाख कोटी रुपये दिले.
    • वन रँक, वन पेन्शन ही माझ्या देशातील सैनिकांच्या सन्मानाची बाब होती, आज भारताच्या तिजोरीतून माझ्या निवृत्त लष्करी वीरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना 70 हजार कोटी रुपये पोहोचले आहेत.
  22. आम्ही केलेल्या सर्व प्रयत्नांचे फळ म्हणजे आज माझे 13.5 कोटी गरीब बंधू-भगिनी गरिबीची साखळी तोडून नव्या मध्यमवर्गाच्या रूपाने बाहेर आले आहेत. आयुष्यात यापेक्षा मोठं समाधान दुसरं असूच शकत नाही.
  23. पीएम स्वनिधीतून फेरीवाल्यांसाठी 50 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत आगामी विश्वकर्मा जयंतीला आणखी एक कार्यक्रम राबवणार आहोत. पारंपारिक कौशल्याने जगणाऱ्या, साधनांनी आणि स्वत:च्या हाताने काम करणाऱ्या, प्रामुख्याने ओबीसी समाजातील लोकांना या विश्वकर्मा जयंतीला आम्ही सुमारे 13-15 हजार कोटी रुपये देणार आहोत.
  24. आम्ही पीएम किसान सन्मान निधीमधून 2.5 लाख कोटी रुपये थेट माझ्या देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. घरोघरी शुद्ध पाणी पोहोचावे यासाठी जलजीवन अभियानांतर्गत आम्ही दोन लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.
  25. गरिबांची आजारपणाच्या काळात रुग्णालयात सहन कराव्या लागणाऱ्या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून आम्ही आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. त्यांना औषधे मिळावीत, त्याच्यावर उपचार व्हावेत, ऑपरेशन सर्वोत्तम रुग्णालयात व्हावे, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आम्ही 70 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.
  26. देशाला आठवत असेल कोरोना लसीवर आपण 40 हजार कोटी रुपये खर्च केले, तर जनावरांना वाचवण्यासाठी त्यांच्या लसीकरणासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.
  27. जनऔषधी केंद्रातून बाजारात 100 रुपयांना मिळणारी औषधे आम्ही 10, 15, 20 रुपयांना दिल्याने या औषधांची गरज असलेल्या लोकांचे सुमारे 20 कोटी रुपये वाचले. आता देशातील 10 हजार जनऔषधी केंद्रांवरून येत्या काळात 25 हजार जनऔषधी केंद्रांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.
  28. शहरात राहणाऱ्या, पण भाड्याच्या घरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, चाळीत, अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी आम्ही गेल्या काही वर्षांत एक योजना आणली. माझ्या कुटुंबातील सदस्यांना स्वत:चे घर बांधायचे असेल तर त्यांना बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजामध्ये सवलत देऊन त्यांना लाखो रुपयांची मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
  29. माझ्या मध्यमवर्गीय कुटुंबाची आयकराची मर्यादा दोन लाखांवरून सात लाखांपर्यंत वाढवली तर सर्वात मोठा फायदा पगारदार वर्गाला, माझ्या मध्यमवर्गाला होतो. 2014 पूर्वी इंटरनेट डेटा खूप महाग होता. आता जगातील सर्वात स्वस्त इंटरनेटमुळे प्रत्येक कुटुंबाचे पैसे वाचत आहेत.
  30. आज देश अनेक क्षमतांसह पुढे जात आहे, अक्षय ऊर्जेवर, हरित हायड्रोजनवर सक्षमपणे काम करत आहे, देशाची अंतराळातील क्षमता वाढत आहे तसेच खोल समुद्र मोहिमेत देश यशस्वीपणे पुढे जात आहे. देशात रेल्वे आधुनिक होत आहे, वंदे भारत, बुलेट ट्रेनही आज देशात कार्यरत आहे. आज इंटरनेट गावोगावी पोहोचत आहे, त्यामुळे क्वांटम कॉम्प्युटरसाठीही देश निर्णय घेतो. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीवर काम सुरू आहे. दुसरीकडे सेंद्रिय शेतीवरही आम्ही भर देत आहोत. आम्हाला सेमीकंडक्टरही तयार करायचे आहेत.
  31. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात 75 हजार अमृतसरोवर बनवण्याचा संकल्प आम्ही केला होता. आज सुमारे 75 हजार अमृतसरोवर बांधण्याचे काम सुरू आहे. हे एक मोठं काम आहे. ही जनशक्ती आणि जलशक्ती (जलसंपदा) भारताच्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहेत. 18 हजार गावांमध्ये वीज पोहोचविणे, जनतेची बँक खाती उघडणे, मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधणे, ही सर्व उद्दिष्टे वेळेपूर्वी पूर्ण ताकदीनिशी पूर्ण करण्यात आली आहेत.
  32. जगाला हे जाणून आश्चर्य वाटले की भारताने कोविड दरम्यान 200 कोटी लसीचे डोस दिले. माझ्या देशातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य सेविका यांनी हे शक्य करून दाखवले आहे. माझा देश 5जी सुरू करणारा जगातील सर्वात जलद देश आहे. आम्ही आतापर्यंत 700 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पोहोचलो आहोत आणि आता आम्ही 6जी ची ही तयारी करत आहोत.
  33. 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेसाठी आम्ही जे उद्दिष्ट ठेवले होते ते 21-22 मध्ये पूर्ण झाले. इथेनॉलमध्ये 20 टक्के मिश्रण करण्याबाबत आम्ही बोललो होतो, तोही आम्ही वेळेच्या पाच वर्षे आधीच साध्य केला. आम्ही 500 अब्ज डॉलरच्या निर्यातीबद्दल बोललो होतो, तेही वेळेपूर्वीच साध्य झाले आणि तो 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात झाली.
  34. 25 वर्षांपासून आपल्या देशात चर्चा सुरू होती की, देशात नवी संसद असावी, आम्ही ठरवले आणि मोदींनी नवीन संसद वेळेआधी बनवली आहे, माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो.
  35. आज देश सुरक्षित वाटत आहे. आज देशात दहशतवादी हल्ल्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. नक्षलग्रस्त भागातही मोठा बदल झाला आहे, मोठ्या बदलाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  36. पुढची 25 वर्षे आपण एकच मंत्र पाळला पाहिजे, हाच आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा कळस असावा, तो म्हणजे एकतेचा संदेश. भारताची एकता आपल्याला बळ देते, मग ते उत्तर असो, दक्षिण असो, पूर्व असो, पश्चिम असो, गाव असो, शहर असो, पुरुष असो, स्त्री असो; 2047 मध्ये आपला देश विकसित भारत म्हणून हवा असेल तर आपल्याला एक भारत श्रेष्ठ भारतचा मंत्र जगायचा आहे, याचा अंमल केला पाहिजे.
  37. देशात पुढे जाण्यासाठी एका अतिरिक्त शक्तीची क्षमता भारताला पुढे घेऊन जाणार आहे आणि ती म्हणजे महिलांच्या नेतृत्वाखालील विकास. मी जी20 मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे विषय पुढे नेले आहेत, संपूर्ण जी20 गट त्याचे महत्त्व मान्य करत आहे.
  38. आज भारत अभिमानाने सांगू शकतो की, जगात हवाई वाहतूक क्षेत्रात जर कोणत्या एका देशात सर्वाधिक महिला पायलट असतील तर माझ्या देशात आहेत. आज चांद्रयानाचा वेग असो, चंद्र मोहिमेचा असो, माझ्या महिला-शास्त्रज्ञ त्याचे नेतृत्व करत आहेत.
  39. आज 10 कोटी स्त्रिया महिला बचत गटाच्या कामात गुंतलेल्या आहेत आणि महिला बचत गटासह गावात गेलात तर बँकेत दीदी सापडतील, अंगणवाडीसह दीदी सापडतील, औषधे देणाऱ्या दीदी सापडतील आणि आता माझे स्वप्न 2 कोटी लखपती दीदी (वर्षाला एक लाख कमावणाऱ्या स्त्रिया) बनविण्याचे आहे.
  40. आज देश आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. महामार्ग असो, रेल्वे असो, वायुमार्ग असो, आय-वे (माहिती मार्ग), जलमार्ग असो, असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात देश प्रगतीच्या दिशेने काम करत नाही. गेल्या 9 वर्षात आम्ही किनारी भागात, आदिवासी भागात, आपल्या डोंगराळ भागात विकासावर खूप भर दिला आहे.
  41. आम्ही आपल्या देशातील सीमावर्ती गावांमध्ये व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेजचा कार्यक्रम सुरू केला आहे आणि आतापर्यंत व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेज हे देशातील शेवटचे गाव समजले जात होते आम्ही संपूर्ण विचार बदलला आहे. हे देशातलं शेवटचं गाव नाही, सीमेवर दिसणारं गाव हे माझ्या देशातलं पहिलं गाव आहे.
  42. आपल्याला देशाला इतके मजबूत बनवायचे आहे की तो जगाच्या कल्याणासाठी आपली भूमिका बजावू शकेल. आज कोरोनानंतर मी पाहत आहे, संकटाच्या काळात देशाने जगाला ज्या प्रकारे मदत केली, त्याचा परिणाम म्हणजे आज आपल्या देशाकडे जगाचा मित्र म्हणून पाहिले जाते. जगाचा अविभाज्य साथीदार म्हणून, आज आपल्या देशाला नवी ओळख प्राप्त झाली आहे.
  43. स्वप्ने अनेक आहेत, संकल्प स्पष्ट आहे, धोरणे स्पष्ट आहेत. माझ्या नियतीवर (हेतूवर) कोणतेही प्रश्नचिन्ह नाही. पण आपल्याला काही वास्तव स्वीकारावे लागते आणि ते सोडविण्यासाठी माझ्या प्रिय कुटुंबियांनो, आज मी लाल किल्ल्यावरून तुमची मदत मागण्यासाठी आलो आहे, मी लाल किल्ल्यावरून तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.
  44. अमृतकालात 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करणार आहे, त्यावेळी जगात भारताचा तिरंगा हा विकसित भारताचा तिरंगा ध्वज असावा. आपण थांबू नये, संकोच करू नये आणि त्यासाठी पारदर्शकता आणि निष्पक्षता ही पहिली भक्कम गरज आहे.
  45. स्वप्ने पूर्ण करायची असतील, संकल्प साध्य करायचे असतील, तर तिन्ही अनिष्टांशी सर्व पातळ्यांवर निर्णायक लढा देणे ही काळाची गरज आहे. भ्रष्टाचार, परिवर्तनवाद आणि तुष्टीकरण हे तीन अनिष्ट प्रकार आहेत.
  46. मला भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा पुढे न्यायचा आहे. न्यायालयात दाखल होणाऱ्या दोषारोपपत्रांची संख्या पूर्वीपेक्षा बरीच जास्त आहे आणि जामीन मिळणेही अवघड झाले आहे, आम्ही अशा पक्क्या व्यवस्थेसह पुढे जात आहोत, कारण आम्ही प्रामाणिकपणे भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहोत.
  47. घराणेशाही हा प्रतिभेचा शत्रू आहे, तो क्षमता नाकारतो आणि क्षमता स्वीकारत नाही. आणि म्हणूनच या देशाच्या लोकशाहीच्या बळकटतेसाठी घराणेशाहीपासून मुक्ती आवश्यक आहे. सर्वांना त्यांचे हक्क मिळावेत आणि सामाजिक न्याय मिळावा यासाठी सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय यांनाही महत्त्व आहे.
  48. तुष्टीकरणाचे विचार, तुष्टीकरणाचे राजकारण, तुष्टीकरणाच्या सरकारी योजना यामुळे सामाजिक न्यायाची हत्या झाली आहे. आणि म्हणूनच तुष्टीकरण आणि भ्रष्टाचार हे विकासाचे सर्वात मोठे शत्रू आपल्याला दिसतात. देशाला विकास हवा असेल, देशाला 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर देशातील भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणे आवश्यक आहे.
  49. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि हा अमृतकाल म्हणजे कर्तव्यकाळ. आपण आपल्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही, पूज्य बापूंचे स्वप्न असलेला भारत घडवायचा आहे, स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न असलेला भारत घडवायचा आहे, जो भारत आपल्या हुतात्म्यांचा होता, ज्यांनी मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली, तो भारत घडवायचा आहे.
  50. हा अमृतकाळ आपल्या सर्वांसाठी कर्तव्याचा काळ आहे. हा अमृतकाळ म्हणजे आपल्या सर्वांनी भारत मातेसाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. 140 कोटी देशवासीयांच्या संकल्पाचे रूपांतर कर्तृत्वात करायचे आहे आणि 2047 मध्ये जेव्हा तिरंगा फडकवला जाईल तेव्हा जग विकसित भारताचे कौतुक करेल. या विश्वासाने, या निर्धाराने मी तुम्हा सर्वांना अनेक, अनेक शुभेच्छा देतो. खूप खूप अभिनंदन.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"