पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम भारतातील या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम हे स्टार्ट-अप्स आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या युवकांना मोठ्या प्रमाणात मदत करतील असे ते म्हणाले.
याविषयीच्या ट्विट मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
"ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम भारतातील या क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. हे नियम विश्वास आणि स्वयं-प्रमाणीकरणाच्या पायाभूत तत्वावर आधारित आहेत. मंजुरी, अनुपालन आवश्यकता आणि प्रवेशातील अडथळे यात लक्षणीयरीत्या घट झाली आहे.
ड्रोन वापरासंबंधीचे नवीन नियम स्टार्ट-अप्स आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या युवकांना मोठी मदत करतील. अभिनवता आणि उद्योगांसाठी ते नव्या संधी खुल्या करतील. भारताला ड्रोन हब बनवण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधन , तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीतील भारताच्या सामर्थ्याचा लाभ मिळवण्यास ते मदत करेल. ”
The new Drone Rules will tremendously help start-ups and our youth working in this sector. It will open up new possibilities for innovation & business. It will help leverage India’s strengths in innovation, technology & engineering to make India a drone hub.
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2021
The new Drone Rules usher in a landmark moment for this sector in India. The rules are based on the premise of trust and self-certification. Approvals, compliance requirements and entry barriers have been significantly reduced. https://t.co/Z3OfOAuJmp
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2021