सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन बदलण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भर दिला.
जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालक डॉ. नगोजी ओकोंजो-इवेला यांच्या पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी नमूद केले :
“तुमचे समर्थन आणि मौल्यवान सूचनांबद्दल धन्यवाद. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा , कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापनावर भर ही सर्वसमावेशक विकास साध्य करण्याची आणि जागतिक स्तरावर जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे:. @NOIweala”
Thank you for your support and valuable insights. The emphasis on Digital Public Infrastructure, AI and data for governance is key to achieving inclusive growth and transforming lives globally. @NOIweala https://t.co/gdfID6oZza
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2024