झारखंडमधील रांची येथील 9400 कोटी रुपये खर्चाच्या 21 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल खासदार संजय सेठ यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
उपरोक्त प्रकल्पाबद्दल खासदार संजय सेठ यांनी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“राज्यांच्या विकासातच देशाचा विकास सामावलेला आहे. या राष्ट्रीय प्रकल्पांमुळे झारखंडसह संपूर्ण देशाच्या प्रगतीला नवी चालना मिळेल.”
राज्यों के विकास में ही देश का विकास निहित है। इन राष्ट्रीय परियोजनाओं से झारखंड सहित पूरे देश की प्रगति को नई गति मिलेगी। https://t.co/mCpQ5B5wxy
— Narendra Modi (@narendramodi) March 25, 2023