उत्तर प्रदेशातील खजानी विधानसभा मतदारसंघातील बेलघाट ते सिक्रीगंज या 8 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी परिसरातील जनतेचे अभिनंदन केले आहे. संत कबीर नगरचे खासदार प्रवीण निषाद यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान बोलत होते. या रस्त्याच्या रुंदीकरणाची माहिती निषाद यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली होती.
देशाची समृद्धी ही कनेक्टिव्हिटीमध्ये आहे आणि ती आमच्या प्राधान्यक्रमात सगळ्यात वरच्या स्थानी आहे, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी केलेले ट्विट
“खूप खूप अभिनंदन. कनेक्टिविटी मध्येच देशाची भरभराट आहे आणि तीच आमच्या प्राधान्यक्रमात अव्वलस्थानी आहे.
बहुत-बहुत बधाई। कनेक्टिविटी में ही देश की समृद्धि निहित है और ये हमारी प्राथमिकताओं में सबसे ऊपर है। https://t.co/tHDv53h5j9
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2023