"वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या माध्यमांतून पुढे जाणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या अमर यात्रेचा, हा संयुक्त उत्सव प्रतीक"
"आपली ऊर्जा केंद्रे ही केवळ तीर्थक्षेत्रे नाहीत, ती केवळ श्रद्धेची केंद्रे नाहीत, ती आहेत 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेची जागृत संस्था"
"भारतात, आपल्या ऋषीमुनींनी आणि गुरुंनी नेहमी आपल्या विचारांचे शुद्धिकरण करत आचरणात बदल घडवून आणला"
“श्री नारायण गुरूंनी जातीयवादाच्या नावाखाली चालणाऱ्या भेदभावाविरुद्ध तर्कशुध्द थेट लढा दिला. नारायण गुरुजींच्या त्याच प्रेरणेने आज देश मागास, गरीब, दलितांची सेवा करत आहे आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देत आहे.“
"श्री नारायण गुरु हे प्रखर विचारवंत आणि निर्भीड सुधारक होते"
“आपण समाज सुधारणेच्या मार्गावर चालतो, तेव्हा समाजात आत्मसुधारणेची शक्तीही जागृत होते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे त्याचेच उदाहरण“

तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार !

श्री नारायण धर्म संघम न्यासाचे अध्यक्ष स्वामी सच्चिदानंद जी, सरचिटणीस स्वामी ऋतंभरानंद जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, केरळचे सुपुत्र व्ही. मुरलीधरन जी, राजीव चंद्रशेखर जी, श्री नारायण गुरु धर्म संघम न्यासाचे इतर सर्व पदाधिकारी, देश-विदेशातून आलेले सर्व भाविक, महोदय आणि महोदया,

जेव्हा संतांचे पाय माझ्या घराला लागले, आज तुम्ही कल्पना करू शकत नाही, माझ्यासाठी किती आनंदाचा क्षण आहे.

एल्ला प्रियपट्टअ मलयालि-गल्कुम्, एन्डे, विनीतमाया नमस्कारम्। भारतत्तिन्डे, आध्यात्मिक, चैतन्यमाण, श्रीनारायण गुरुदेवन्। अद्देहत्तिन्डे, जन्मत्ताल्, धन्य-मागपट्टअ, पुण्यभूमि आण केरलम्॥

संतांच्या कृपेने आणि श्री नारायण गुरूंच्या आशीर्वादाने तुम्हा सगळ्यांमध्ये येण्याची संधी मला यापूर्वीही मिळाली आहे. शिवगिरीला येऊन तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला मिळाले आहे. आणि जेव्हा जेव्हा मी तिथे आलो तेव्हा मला नेहमीच त्या आध्यात्मिक भूमीच्या ऊर्जेची अनुभूती मिळाली आहे. मला आनंद आहे की, तुम्हा सर्वांनी मला आज शिवगिरी तीर्थ उत्सवात आणि ब्रह्म विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या आयोजनात पुण्य कार्य करण्याची संधी दिली आहे. मला माहीत नाही की, तुमच्यासोबत माझे नाते कोणत्या प्रकारचे आहे, मात्र कधी कधी मी अनुभवतो आणि मी ते कधीच विसरू शकत नाही, जेव्हा केदारनाथ जी येथे मोठा अपघात झाला तेव्हा देशभरातील प्रवाशांची जीवन मृत्यूशी झुंज सुरु होती.

उत्तराखंड आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि केरळचेच अँटनी संरक्षण मंत्री होते, असे असतानाही, मी  गुजरातचा मुख्यमंत्री असताना अहमदाबादमध्ये शिवगिरी मठातून दूरध्वनी आला की, आमचे सर्व संत अडकले आहेत, त्यांच्याशी संपर्क नाही, ते कुठे आहेत, त्यांची स्थिती काय आहे, काहीही माहिती नाही. मोदीजी तुम्हाला हे काम करायचे आहे. मी आजही कल्पना करू शकत नाही की, इतकी मोठी मोठी सरकारे असतानाही मला हे काम करण्याचा आदेश शिवगिरी मठातून मिळाला. आणि ही गुरु महाराजांचीच कृपा होती की, गुजरातमध्ये माझ्याकडे तितकी संसाधनेही नव्हती, तरीही मला या पुण्य कार्याची संधी मिळाली. आणि सर्व संतांना सुखरूप परत आणून शिवगिरी मठात पोहोचवण्यात आले. तो दूरध्वनी माझ्यासाठी खरोखरच हृदयस्पर्शी प्रसंग होता की, असा कोणता गुरु महाराजांचा आशीर्वाद असेल, या पवित्र कार्यासाठी तुम्ही माझी निवड केली. आजचा दिवस देखील एक शुभ प्रसंग आहे, या प्रसंगी मला तुमच्यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. तीर्थदानमचा 90 वर्षांचा प्रवास आणि ब्रह्म विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव हा केवळ एका संस्थेचा प्रवास नाही. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या माध्यमांतून भारताच्या त्या विचारांचा हा अजरामर प्रवास पुढे वाटचाल करत आहे. भारताचे तत्वज्ञान जिवंत ठेवण्यात केरळने भारताच्या या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक विकास प्रवासात नेहमीच महत्त्वाचे योगदान दिले आहे. आणि आवश्यकतेनुसार नेतृत्वही केले आहे. 'वर्कला'ला शतकानुशतकांपासून दक्षिणेची काशी म्हटले जाते. काशी उत्तरेला असो की दक्षिणेत! वाराणसीतील शिवाचे शहर असो, किंवा वर्कलामधील शिवगिरी असो, भारताच्या उर्जेच्या प्रत्येक केंद्राचे आपल्या सर्व भारतीयांच्या जीवनात विशेष स्थान आहे. ही स्थळे केवळ तीर्थक्षेत्रे नाहीत, ती केवळ श्रद्धेची केंद्रे नाहीत, ती एक प्रकारची 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेची जागृत प्रतिष्ठाने आहेत. या प्रसंगी मी श्री नारायण धर्म संघम न्यासाचे, स्वामी सच्चिदानंद जी, स्वामी ऋतंबरानंद जी आणि स्वामी गुरुप्रसाद जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तीर्थदानम आणि ब्रह्म विद्यालयाच्या या सुवर्ण प्रवासात आयोजनात लाखो कोटी अनुयायांच्या अखंड श्रद्धा आणि अथक परिश्रमाचाही समावेश आहे. मी श्री नारायण गुरूंच्या सर्व अनुयायांना आणि सर्व भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हा सर्व संत आणि सत्पुरुषांमध्ये आज जेव्हा मी बोलत आहे, भारताची खासियत अशी आहे की, जेव्हा जेव्हा समाजाची चेतना क्षीण होऊ लागते, अंधार वाढतो तेव्हा कोणीतरी महान परमात्मा नवीन प्रकाश घेऊन प्रकट होतो. जगातील अनेक देश, अनेक संस्कृती आपल्या धर्मापासून दूर गेल्या, तेव्हा तिथे अध्यात्माचे स्थान भौतिकवादाने घेतले. ते रिकामे तर राहू शकत नाही, भौतिकवादाने ते भरले आहे. पण, भारत खूप वेगळा आहे. भारताच्या ऋषींनी, भारताच्या मुनींनी, भारताच्या संतांनी, भारताच्या गुरूंनी नेहमीच विचार आणि आचरणाचे निरंतर शुद्धीकरण केले, सुधारणा केली आणि संवर्धन केले आहे. श्रीनारायण गुरूंनी आधुनिकतेचे भाष्य केले! मात्र त्याचबरोबर भारतीय संस्कृती आणि मूल्ये समृद्ध करण्याचे कामही त्यांनी अविरतपणे केले. त्यांनी शिक्षण आणि विज्ञानाबद्दल सांगितले. पण त्याचबरोबर आपल्या हजारो वर्ष जुन्या धर्म आणि श्रद्धेच्या परंपरेचा गौरव करण्यात कधीही मागे राहिले नाही. येथे शिवगिरी तीर्थाच्या माध्यमातून वैज्ञानिक विचाराचा नवा प्रवाहही उदयाला येतो आणि शारदा मठात देवी सरस्वतीचीही पूजा केली जाते. नारायण गुरुजींनी धर्मात सुधारणा केली, कालानुरूप बदलही केले, कालबाह्य गोष्टी सोडून दिल्या. त्यांनी रूढीवादी आणि वाईट गोष्टींविरुद्ध मोहीम चालवली आणि भारताला त्याच्या वास्तवाची जाणीव करून दिली. आणि तो काळ सामान्य नव्हता, रुढीवादाच्या विरोधात उभे राहणे हे छोटे मोठे काम नव्हते. आज आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. पण नारायण गुरुजींनी ते करून दाखवले. जातीवादाच्या नावाखाली चालणाऱ्या उच्च-नीच भेदभावाविरुद्ध त्यांनी तार्किक आणि व्यावहारिक लढा दिला. नारायण गुरुजींच्या त्याच प्रेरणेने आज देश गरीब, दलित, मागासलेल्यांची सेवा करत आहे, त्यांना त्यांचे जे हक्क आहेत ते मिळाले पाहिजेत, जे अधिकार आहेत ते मिळाले पाहिजेत, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणे हे आमचे प्राधान्य राहिले आहे. आणि म्हणूनच 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' या मंत्राने आज देश पुढे जात आहे.'.

मित्रांनो,

श्री नारायण गुरु जी हे आध्यात्मिक चेतनेचे अंश तर होतेच आणि आध्यात्मिक प्रेरणेचा प्रकाशपुंजही होते. पण हे तितकेच खरे आहे की, श्री नारायण गुरु जी हे समाजसुधारक, विचारवंत आणि द्रष्टेही होते. ते त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते, त्यांना खूप दूरदृष्टी होती. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे पुरोगामी विचारवंत तसेच व्यावहारिक सुधारक होते. ते म्हणायचे की, इथे आम्ही जबरदस्तीने वाद घालून जिंकण्यासाठी आलो नाही, तर जाणून घेण्यासाठी, शिकण्यासाठी आलो आहोत. समाजाला वादविवादात अडकवून सुधारता येत नाही, हे त्यांना माहिती होते जेव्हा लोकांसोबत काम करताना त्यांच्या भावना समजून घेतल्या जातात आणि लोकांना त्यांच्या भावनांची जाणीव करून दिली जाते तेव्हा समाज सुधारतो. 

 

 

ज्याक्षणी आपण एखाद्याशी वाद घालू लागतो, त्याच क्षणी समोरची व्यक्ती आपली बाजू मांडताना तर्क-वितर्क-कुतर्क हे सगळे शोधून आपल्याला नामोहरम करते. मात्र जेव्हा आपण एखाद्याला समजवायला सुरुवात करतो, समोरची व्यक्ती आपल्याला समजून घ्यायला लागते.  नारायण गुरू जी यांनीही नेहमी या परंपरेचे, या मर्यादेचे पालन केले. ते दुसऱ्यांच्या भावना समजून घ्यायचे. आणि मग आपले म्हणणे समजावण्याचा प्रयत्न करायचे.  त्यांना समाजात असे  वातावरण  निर्माण करायचे होते , ज्यात  समाज स्वतःच योग्य तर्कांसह स्वतःच सुधारणा प्रक्रियेत सहभागी होईल. जेव्हा आपण समाजात सुधारणेच्या या मार्गावरून वाटचाल करतो तेव्हा समाजात आपोआप स्वयं सुधारणेची  एक शक्ती  जागृत होते. आता जसे आमच्या सरकारने बेटी-बचाओ-बेटी पढ़ाओ अभियान सुरु केले. कायदे तर पूर्वीही होते, मात्र मुलींच्या संख्येत सुधारणा अलिकडच्या काही वर्षांमध्येच होऊ शकली आहे. असे यामुळे झाले कारण आमच्या  सरकारने समाजाला योग्य गोष्टीसाठी  प्रेरित केले, योग्य वातावरण निर्माण केले. लोकांनाही जेव्हा वाटते  की सरकार योग्य करत आहे , तेव्हा परिस्थितीत वेगाने सुधारणा व्हायला लागते. आणि खऱ्या अर्थाने सब का प्रयास, त्याचे परिणाम दिसून येतात. समाजात सुधारणा घडवून आणण्याची हीच पद्धत आहे.आणि हा  मार्ग आपण जितके  श्री नारायण गुरू यांच्याबद्दल वाचतो, त्यांना जाणून घेतो, तेवढेच ते स्पष्ट होत जाते.

मित्रांनो ,

 श्री नारायण गुरु यांनी आपल्याला मंत्र दिला होता -

“औरु जाथि

औरु मथम

औरु दैवं मनुष्यानु”।

त्यांनी एक जात, एक धर्म , एक ईश्वर याचे आवाहन केले होते. जर आपण नारायण गुरू जी यांचे हे आवाहन बारकाईने जाणून घेतले , त्यात दडलेला संदेश समजून घेतला तर आढळून येईल की या संदेशातून आत्मनिर्भर भारताचा देखील  मार्ग निघतो. आपणा सर्वांची एकच जात आहे - भारतीयत्व , आपल्या सर्वांचा एकच  धर्म आहे - सेवाधर्म, आपल्या कर्तव्यांचे पालन. आपल्या सर्वांचा एकच देव आहे - भारत मातेची  130 कोटींहून अधिक लेकरे. श्री नारायण गुरू जी यांचे एक जात, एक धर्म , एक ईश्वरचे आवाहन आपल्या  राष्ट्रभक्तीला एक अध्यात्मिक उंची देते. आपली राष्ट्रभक्ती , शक्ती प्रदर्शन नव्हे तर आपली  राष्ट्रभक्ती भारतमातेची आराधना, कोट्यवधी देशवासियांची सेवा साधना आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवून आपण पुढील वाटचाल करायला हवी. श्री नारायण गुरू जी यांच्या संदेशांचे पालन केले तर जगातील कुठलीही शक्ती आपल्या भारतीयांमध्ये  मतभेद निर्माण करू शकत नाही. आणि हे आपण सर्वजण जाणतो की   एकजुट झालेल्या  भारतीयांसाठी जगातील कुठलेही लक्ष्य अशक्य नाही.

मित्रांनो ,

श्री नारायण गुरु यांनी स्वातंत्र्यापूर्वी तीर्थदानम्  परंपरा सुरु केली होती. देश देखील सध्या आपल्या स्वातंत्र्याचा  75 वर्षांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. अशा वेळी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की  आपला  स्वातंत्र्य लढा केवळ  विरोध प्रदर्शन आणि राजनैतिक रणनीति पुरता सीमित नव्हता. ही गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याची लढाई तर होतीच , मात्र त्याचबरोबर एक स्वतंत्र देश म्हणून आपण असू, कसे असू  याचा विचार देखील बरोबरीने सुरु होता.कारण, आपण कुठल्या गोष्टीच्या विरुद्ध आहोत, केवळ एवढेच  महत्वपूर्ण नसते. आपण कुठल्या विचारासाठी एकत्र आहोत, हे देखील खूप जास्त  महत्वपूर्ण असते.  म्हणूनच , आपल्या स्वातंत्र्य लढ्यातून एवढी महान विचारांची  परंपरा सुरु झाली. प्रत्येक कालखंडात नवे विचारवंत आपल्याला मिळाले.

भारतासाठी एवढ्या संकल्पना, इतकी स्वप्ने एकाच वेळी पुढे आली. देशातील वेगवेगळ्या प्रांतातून  नेता आणि  महान लोक एकमेकांना भेटत होते, एकमेकांकडून शिकत होते. आज तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला हे सगळे खूप सोपे वाटते. मात्र , त्या काळात या सुविधा , हे  सोशल मीडिया आणि मोबाइलचे युग नव्हते. मात्र तरीही हे लोकनायक, हे नेते एकत्रितपणे  मंथन करायचे , आधुनिक भारताची रूपरेषा तयार करायचे. तुम्ही पहा,  1922 मध्ये देशाच्या पूर्वेकडील भागातून  गुरुदेव रबीन्द्रनाथ टैगोर,इथे दक्षिणेत येऊन  नारायण गुरु यांना भेटतात. तेव्हा गुरूंना भेटल्यानंतर गुरुदेव म्हणाले होते - “मी  आज पर्यंत नारायण गुरु यांच्याहून  महान आध्यात्मिक व्यक्तिमत्व पाहिलेले नाही . ” 1925 मध्ये  महात्मा गांधी जी, गुजरातमधून  साबरमती किनाऱ्यावरून , देशाच्या पश्चिम भागातून चालत इथे आले होते ,  श्री नारायण गुरु यांना भेटले होते. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेने  गांधीजींवर खूप खोलवर प्रभाव पडला होता. स्वामी विवेकानंद जी स्वतः नारायण गुरु यांना भेटायला गेले होते. अशा कितीतरी महान विभूति नारायण गुरु यांच्या चरणी बसून सत्संग करत होती. किती  विचार मंथन व्हायचे. हे विचार शेकडो वर्षांच्या गुलामगिरी नंतर एक राष्ट्र म्हणून भारताच्या  पुनर्निर्माणाच्या बीजाप्रमाणे होते. असे कितीतरी  सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक लोक एकत्र आले आणि त्यांनी देशात चेतना जागवली, देशाला  प्रेरणा दिली, देशाला दिशा देण्याचे  काम केले. आज आपण जो भारत पाहत आहोत, स्वातंत्र्याच्या या  75 वर्षांचा जो प्रवास आपण पाहिला आहे, हा त्या महापुरुषांच्या मंथन चिंतन विचारांचा परिणाम आहे, जो  आज फलस्वरूप आपल्या समोर आहे.

 मित्रांनो ,

स्वातंत्र्याच्या काळात आपल्या विद्वानांनी जो मार्ग दाखवला होता , आज भारत त्या उद्दिष्टांच्या जवळ पोहचत आहे. आता आपल्याला नवीन  लक्ष्य निश्चित करायची आहेत, नवे संकल्प घ्यायचे आहेत. पुढील 25 वर्षांनंतर  देश आपल्या स्वातंत्र्याची  100 वर्षे साजरी करेल, आणि दहा वर्षांनंतर आपण तीर्थदानमचा  100 वर्षांचा प्रवास , त्याचाही उत्सव साजरा करू. या शंभर वर्षांच्या प्रवासात आपल्या उपलब्धी  वैश्विक असायला हव्यात आणि यासाठी आपली दूरदृष्टी देखीक वैश्विक असायला हवी.

बंधू आणि भगिनींनो

आज जगासमोर अनेक सामायिक आव्हाने आहेत, सामायिक संकटे आहेत. कोरोना महामारी काळात याची एक झलक आपण पाहिली आहे. मानवतेसमोर उभ्या ठाकलेल्या भविष्यातील प्रश्नांची उत्तरे , भारताचे अनुभव आणि भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्यातूनच मिळू शकतील. यात आपली आध्यात्मिक गुरु या महान परंपरेला एक खूप मोठी भूमिका बजावायची आहे.  तीर्थदानमची बौद्धिक चर्चा आणि प्रयत्नांतून आपल्या नव्या पिढीला खूप काही शिकायला मिळते. मला पूर्ण विश्वास आहे की शिवगिरी तीर्थदानमचा हा प्रवास असाच निरंतर सुरु राहील. कल्याण आणि एकतेचे प्रतीक आणि गतिशीलतेचे प्रतीक तीर्थयात्रा भारताला त्याच्या ध्येयापर्यंत पोहचवण्याचे एक सशक्त माध्यम बनेल. याच भावनेसह, मी पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण इथे आलात, मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणि मला विश्वास आहे की आपण सर्वजण मिळून जी स्वप्ने पाहिली आहेत, जे संकल्प तुम्ही केले आहेत, मलाही एक सत्संगी म्हणून, एक भक्त म्हणून तुमच्या या संकल्पांमध्ये सहभागी होणे हे माझे परमभाग्य असेल, माझ्यासाठी गौरव असेल. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage