माननीय पंतप्रधान किशिदा दोन्ही देशातील श्रेष्ठ मंडळ आणि प्रसार माध्यमातील सहकारी
नमस्कार!
सर्वात प्रथम मी पंतप्रधान कीशिदा आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करतो. गेल्या वर्षभरात पंतप्रधान कीशिदा आणि माझी अनेकदा भेट झाली आहे. प्रत्येक भेटीत भारत जपान संबंधाबाबत त्यांची सकारात्मकता आणि कटिबद्धता मला जाणवली आहे त्यामुळेच आज त्यांची भेट आमच्या सहकार्याचा वेग कायम राखण्यासाठी उपयुक्त ठरेल.
मित्रहो,
आणखी एका कारणासाठी आमची आजची भेट विशेष आहे यावर्षी भारत G20 चे अध्यक्ष पद भूषवत आहे आणि जपान G7 च्या अध्यक्षपदी आहे. त्यामुळे आमच्या प्राधान्यक्रमावर काम करताना काम करण्याची मिळालेले संधी महत्त्वपूर्ण आहे.
भारताच्या G20 अध्यक्ष पदामागील प्राधान्यक्रम मीआज पंतप्रधान कीशिदा यांना विस्तृतपणे सांगितला. समग्र दक्षिणचा प्राधान्यक्रम मांडणे हा आमच्या G20 अध्यक्षपदाचा प्रमुख भाग आहे. आम्ही हा पुढाकार घेतला कारण वसुधैव कुटुम्बकम यावर आमची संस्कृती विश्वास ठेवते आणि म्हणूनच प्रत्येकाला बरोबर घेते.
मित्र हो,
भारत जपान विशेष धोरणात्मक आणि समग्र भागीदारी ही आमच्या सामायिक लोकशाही मूल्यांच्या आणि कायद्याच्या अधिकाराला आधार देण्याच्या वृत्तीवर आधारलेली आहे.
ही भागीदारी बळकट करणे हे आमच्या दोन्ही देशांसाठीच नव्हे तर भारतीय प्रशांत प्रदेशात शांतता, समृद्धी आणि स्थैर्य वाढीला लावण्यासाठी महत्त्वाची आहे.आज आमच्या संभाषणात या आमच्या द्विपक्षीय संबंधाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला संरक्षण साधने आणि तंत्रज्ञान सहकार्य ,व्यापार , आरोग्य आणि डिजिटल भागीदारी यावर आम्ही विचारांची देवाणघेवाण केली. सेमी कंडक्टर आणि इतर महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची मदार विश्वासार्ह पुरवठा साखळीवर अवलंबून आहे आम्ही आज चर्चा केली. गेल्या वर्षी पाच ट्रिलियन येन जपानी गुंतवणूक भारतात होईल असे लक्ष्य आम्ही ठेवले होते. ही रक्कम तीन लाख वीस हजार कोटी रुपये एवढी होते. या दिशेने चांगली प्रगती आहे ही एक समाधानाची गोष्ट आहे.
2019 या वर्षात आम्ही भारत जपान औद्योगिक स्पर्धात्मक भागीदारीचा पाया घातला. या अंतर्गत वाहतूक अन्नप्रक्रिया सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कापड उद्योग मशिनरी आणि पोलाद या क्षेत्रात भारतीय उद्योगांमध्ये स्पर्धात्मकता आपण वाढीला लावत आहोत. ही भागीदारी अजून कार्यरत असल्याबद्दल आम्ही दोघांनी आनंद व्यक्त केला. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे आम्ही वेगाने काम करत आहोत. 2023 हे वर्ष पर्यटन आदान प्रदान वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत ही आनंदाची गोष्ट आहे.
यासाठी हिमालय आणि माउंट फुजी यांची भेट अशी संकल्पना आम्ही निवडली आहे.
मित्रहो,
पंतप्रधान किशिदा यांनी मे महिन्यात हिरोशिमा येथे होणार असलेल्या G7 गटातील नेत्यांच्या परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मला दिले आहे.
मी त्यांना याबद्दल मनापासून धन्यवाद देतो सप्टेंबर मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान यांना G20 नेत्यांच्या परिषदेला येणार असलेल्या कीशिदा यांचे स्वागत करणाचे भाग्य मला लाभणार आहे.
आमचे संभाषण आणि संपर्क अशाच प्रकारे सुरू राहील आणि भारत जपान संबंध नवीन उंचीवर जातील या सदिच्छासह मी माझ्या भाषणाचा समारोप करतो.
धन्यवाद.