Quoteमहतारी वंदना योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याचे झाले वितरण
Quoteछत्तीसगडमध्ये राज्यातील पात्र विवाहित महिलांना प्रति महिना 1000 रुपये आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात प्रदान करण्यासाठी योजना

नमस्कार, 

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय जी, राज्य सरकारचे सर्व मंत्री, आमदार, उपस्थित इतर मान्यवर, जय-जोहार !

 

|

माता दंतेश्वरी,माता बमलेश्वरी आणि माता महामाया यांना मी आदरपूर्वक नमन करतो. छत्तीसगडच्या माता भगिनींना माझा नमस्कार . दोन आठवड्यांपूर्वी मी छत्तीसगडमध्ये 35 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण  केले होते.आणि आज मला नारी शक्तीच्या सक्षमीकरणासाठी महतारी वंदन योजनेचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लाभले आहे. महतारी वंदन योजनेंतर्गत, छत्तीसगडमधील 70 लाखांहून अधिक माता-भगिनींना दरमहा एक हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. भाजप सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आहे. आज महतारी वंदन योजनेअंतर्गत 655 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला आहे.

आणि मी पडद्यावर पाहतोय, लाखो भगिनी दिसत आहेत, इतक्या मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र जमलेल्या तुम्हा सर्व भगिनींना पाहणे, तुमचे आशीर्वाद घेणे हे देखील आमचे भाग्य आहे. खरं तर आजचा हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा आहे की  मी छत्तीसगडमध्ये तुमच्याबरोबर असायला हवे होते. पण मी इथे उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आलो  आहे. आणि माता भगिनींनो, मी आत्ता काशीतून बोलत आहे. आणि काल रात्री बाबा विश्वनाथांना नमन करून त्यांची पूजा केली आणि सर्व देशवासीयांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. आणि आज बघा, मला बाबा विश्वनाथांच्या भूमीतून, काशीच्या पवित्र नगरीतून तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी मिळाली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला  शुभेच्छा देत आहेच , बाबा विश्वनाथ देखील तुम्हा सर्वांना आशिर्वाद देत आहेत.  महाशिवरात्री परवा होती, त्यामुळे शिवरात्रीमुळे  8 मार्च रोजी महिला दिनी हा कार्यक्रम आयोजित करणे शक्य नव्हते.

 

|

तर एक प्रकारे 8 मार्च हा महिला दिन, शिवरात्रीचा दिवस आणि आज भोले बाबा  यांच्या नगरीतून भोलेबाबांचा आशिर्वाद 1000 रुपये तर पोहोचत आहेत, मात्र त्याहून शक्तिशाली भोलेबाबांचा आशिर्वाद देखील पोहचत आहे. आणि मी प्रत्येक महतारीला सांगतो ... हे पैसे आता दर महिन्याला तुमच्या खात्यात कोणत्याही अडचणीशिवाय येत राहतील. आणि हा माझा छत्तीसगडच्या भाजप सरकारवर विश्वास आहे आणि म्हणूनच मी ही हमी देत आहे.

 

|

माता -भगिनींनो,

जेव्हा माता-भगिनी सक्षम  होतात, तेव्हा संपूर्ण कुटुंब सक्षम  होते. म्हणूनच आपल्या माता-भगिनींच्या कल्याणाला डबल इंजिन सरकारचे प्राधान्य आहे. आज कुटुंबाला पक्के घर मिळत आहे – आणि तेही महिलांच्या नावावर ! उज्ज्वलाचे स्वस्त गॅस सिलिंडर मिळत आहे - तेही महिलांच्या नावावर!  50 टक्क्यांहून अधिक जनधन खाती - तीही आमच्या माता-भगिनींच्या नावावर ! जे मुद्रा कर्ज मिळत आहे , त्यामध्येही 65 टक्क्यांहून अधिक आपल्या महिला- भगिनी, माता-भगिनी, विशेषत: तरुण मुलींनी पाऊल उचलले आणि पुढे आल्या.  आणि हे कर्ज घेऊन आपले काम सुरु केले आहे.  गेल्या 10 वर्षांत आमच्या सरकारने बचत गटांच्या 10 कोटींहून अधिक महिलांचे जीवन बदलले आहे. आमच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आत्तापर्यंत देशभरात 1 कोटीहून अधिक लखपती दीदी तयार झाल्या आहेत. एक कोटीहून अधिक लखपती  दीदी तयार होणे आणि प्रत्येक गावात ही किती मोठी आर्थिक शक्ती तयार झाली आहे.आणि हे यश पाहून आम्ही एक खूप मोठी झेप घेण्याचे ठरवले आहे. देशाच्या 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आम्ही साध्य करून दाखवण्याचा संकल्प केला आहे. नमो ड्रोन दीदी योजनेने महिला सक्षमीकरणाचे नवीन मार्गही खुले केले आहेत.

 

|

आणि माता -भगिनींनो,

मी उद्याच नमो ड्रोन दीदीचा एक मोठा कार्यक्रम करणार आहे. तुम्ही सकाळी 10-11 वाजता दूरचित्रवाणीवरून माझ्याबरोबर सहभागी व्हा. पहा नमो ड्रोन दीदी काय कमाल करत आहेत. तुम्हालाही ते बघायला मिळेल आणि भविष्यात तुम्हीही त्यात उत्साहाने सहभागी व्हाल. आणि ‘नमो ड्रोन दीदी’ या योजनेअंतर्गत भाजप सरकार भगिनींना ड्रोन पुरवणार असून ड्रोन पायलटचे  प्रशिक्षणही देणार आहे.आणि मी एका ताईंची मुलाखत पाहिली होती. ती म्हणाली की मला सायकल कशी चालवायची हे देखील माहित नव्हते आणि आज मी ड्रोन दीदी पायलट बनले आहे. बघा, यामुळे शेतीचे आधुनिकीकरण होईल आणि भगिनींनाही अतिरिक्त उत्पन्न मिळेल. मी उद्या दिल्लीहून ही योजना सुरू करणार आहे. आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझ्यासोबत सहभागी होण्याची विनंती करतो.

माता-भगिनींनो,

कुटुंब समृद्ध  तेव्हाच होते, जेव्हा कुटुंब निरोगी असते . आणि कुटुंब निरोगी तेव्हाच असते जेव्हा घरातील स्त्रिया निरोगी असतील . पूर्वी गरोदरपणात आई आणि बाळाचा मृत्यू ही चिंतेची बाब होती. आम्ही गरोदर महिलांना मोफत लसीकरण आणि गरोदरपणात गरोदर महिलांना 5 हजार रुपयांची मदत देण्याची योजना आखली.  आशा आणि अंगणवाडी सेविकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा देण्यात आली आहे. पूर्वी घरात शौचालय नसल्यामुळे भगिनी -मुलींना त्रास आणि अपमान सहन करावा लागत होता. आज प्रत्येक घरात माता-भगिनींसाठी शौचालय आहे. यामुळे त्यांच्या समस्या कमी झाल्या आहेत आणि आजारांपासूनही मुक्ती मिळाली आहे.

माता-भगिनींनो, 

निवडणुकीपूर्वी अनेक पक्ष मोठमोठी आश्वासने देतात. आकाशातून सर्व तारे तुमच्या चरणी आणून ठेवण्याच्या गप्पा करतात. परंतु, भाजपसारखा स्वच्छ हेतू असलेला पक्षच आपली आश्वासने पूर्ण करतो. त्यामुळेच भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर  इतक्या कमी कालावधीत महतारी वंदन योजनेचे हे आश्वासन पूर्ण झाले आहे. आणि म्हणूनच मी आमचे मुख्यमंत्री विष्णुदेव जी यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आणि छत्तीसगड सरकारचे जितके अभिनंदन करू तितके कमी आहे. आणि यामुळेच लोक म्हणतात – मोदींची हमी म्हणजे आश्वासन पूर्ततेची हमी ! निवडणुकीच्या वेळी छत्तीसगडच्या समृद्धीसाठी आम्ही जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्यासाठी भाजपा  सरकार निरंतर काम करत आहे. मी आश्वासन दिले होते  की छत्तीसगडमध्ये आम्ही 18 लाख ,  हा आकडा खूप मोठा आहे, 18 लाख पक्की घरे बांधू . सरकार स्थापनेनंतर दुसऱ्याच दिवशी आमचे विष्णुदेव  जी यांनी, त्यांच्या मंत्रिमंडळाने , छत्तीसगड सरकारने याबाबत निर्णय घेऊन कामाला सुरुवात केली.

मी आश्वासन दिले होते की छत्तीसगडमधील धान उत्पादक शेतकऱ्यांना 2 वर्षांचा थकित बोनस दिला जाईल. अटलजींच्या जन्मदिनी  छत्तीसगड सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हजार 700  कोटी रुपयांचा बोनस जमा केला. आमचे सरकार इथे 3100 रुपये प्रतिक्विंटल दराने धान खरेदी करेल, असे आश्वासन मी दिले होते. मला आनंद आहे की आमच्या सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले आणि 145 लाख टन धान खरेदी करून नवीन विक्रम केला. याशिवाय कृषक उन्नती योजना सुरू झाली  आहे. या योजनेअंतर्गत यावर्षी खरेदी केलेल्या धानाची फरकाची रक्कम लवकरच शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे. पुढील 5  वर्षात लोककल्याणाची ही कामे निर्णायक पद्धतीने पुढे नेली जातील. यामध्ये तुम्हा सर्व माता भगिनींचा मोठा सहभाग असणार आहे. मला विश्वास आहे की छत्तीसगडचे डबल इंजिन सरकार अशीच तुमची सेवा करत राहील आणि सर्व आश्वासने पूर्ण करत राहील. आणि पुन्हा एकदा उन्हाळा सुरू झाला आहे. आणि मला माझ्यासमोर लाखो भगिनी दिसत आहेत. हे दृश्य अभूतपूर्व आहे, संस्मरणीय दृश्य आहे. मनातून वाटत आहे की आज मी तुमच्यामध्ये असायला हवे होते. पण तुम्ही सर्वांनी मला माफ करा,  मी बाबा विश्वनाथ धाम इथून बोलत आहे, मी काशीतून बोलत आहे. त्यामुळे मी  बाबांचे आशीर्वाद देखील सोबत पाठवत  आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि खूप-खूप शुभेच्छा.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India Eyes Rs 3 Lakh Crore Defence Production By 2025 After 174% Surge In 10 Years

Media Coverage

India Eyes Rs 3 Lakh Crore Defence Production By 2025 After 174% Surge In 10 Years
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 मार्च 2025
March 26, 2025

Empowering Every Indian: PM Modi's Self-Reliance Mission