“युवा शक्ती हा विकसित भारताचा पाया आहे”
“महादेवाच्या आशीर्वादाने, गेल्या 10 वर्षांपासून काशीमध्ये ‘विकासाचा डमरू’निनादत आहे”
“काशी हे केवळ आपले श्रद्धेय तीर्थस्थान नाही, तर भारताच्या चिरंतन जाणिवेचे स्फूर्तीदायक केंद्र आहे”
“विश्वनाथ धाम एक निर्णायक दिशा देईल आणि भारताला उज्ज्वल भविष्याकडे नेईल”
“नूतन काशी नव्या भारतासाठी एक प्रेरणास्थानाच्या रुपात उदयाला आली आहे”
“भारत ही एक संकल्पना आहे आणि संस्कृत ही त्याची मुख्य अभिव्यक्ती आहे. भारत हा एक प्रवास आहे,संस्कृत हा त्याच्या इतिहासातील मुख्य अध्याय आहे. भारत ही विविधतेत एकता असलेली भूमी आहे आणि संस्कृत हे त्याचे उगमस्थान आहे”
“वारसा आणि विकास यांचा उत्तम नमुना म्हणून आज काशीकडे बघितले जाते. परंपरा आणि अध्यात्मिकता यांच्या सभोवताली आधुनिकता कशा प्रकारे विस्तारते हे आज संपूर्ण जग बघत आहे”
“काशी आणि कांची येथील वेदपठण म्हणजे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचे सूर आहेत”

नमः पार्वती पतये.., हर हर महादेव!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, काशी विद्वत परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर वशिष्ठ त्रिपाठी जी, काशी विश्वनाथ विश्वस्त परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर नागेंद्र जी, राज्य सरकारचे मंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी, आदरणीय विद्वान, सहभागी मित्र, महिला आण सभ्य जन ,

तुमच्या कुटुंबातील सर्वांना  माझा नमस्कार ! महामनाच्या या  प्रांगणात सर्व विद्वान आणि विशेषत: तरुण विद्वानांमध्ये येऊन ज्ञानाच्या गंगेत न्हाऊन निघावे असे वाटते. जी काशी कालातीत आहे, जी काळापेक्षा जुनी आहे, ज्याची ओळख आपली आधुनिक तरुण पिढी जबाबदारीने दृढ करत आहे. हे दृश्य मनाला समाधान देते, अभिमानाची भावनाही देते आणि अमृतकाळामध्ये तुम्ही सर्व तरुण देशाला नव्या उंचीवर घेऊन जाल असा विश्वासही यामुळे निर्माण होतो.  काशी ही सर्व ज्ञानाची राजधानी आहे. आज काशीचे ते  सामर्थ्य  आणि काशीचे ते रूप पुन्हा प्रकट होत आहे. ही संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे. आता मला काशी संसद संस्कृत स्पर्धा, काशी संसद ज्ञान स्पर्धा आणि काशी संसद छायाचित्रण  स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्याची संधी मिळाली आहे. मी सर्व विजेत्यांचे त्यांच्या मेहनतीबद्दल, त्यांच्या प्रतिभेबद्दल अभिनंदन करतो. मी त्यांच्या कुटुंबियांचे आणि त्यांच्या शिक्षकांचेही अभिनंदन करतो. काही तरुण असे असतील जे यशापासून काही पावले दूर असतील तर काही जण चौकटीत अडकले असतील. त्याचेही मी अभिनंदन करतो. तुम्ही काशीच्या ज्ञानपरंपरेचा एक भाग झालात आणि त्याच्या स्पर्धेतही सहभागी झालात. हा स्वतःचा मोठा अभिमान आहे. तुमच्यापैकी कोणीही काही गमावले नाही किंवा कोणीही मागे राहिले नाही. या सहभागातून तुम्ही अनेक नवीन गोष्टी शिकून अनेक पावले पुढे आला आहात. त्यामुळे या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला प्रत्येकजण अभिनंदनास पात्र आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी श्री काशी विश्वनाथ मंदिर विश्वस्त, काशी विद्वत परिषद आणि सर्व विद्वानांचे देखील आदरपूर्वक आभार मानतो. काशीचे खासदार या नात्याने माझी दृष्टी साकार करण्यात तुम्ही खूप मोठी भूमिका बजावली आहे आणि अभूतपूर्व सहकार्य केले आहे. काशीमध्ये गेल्या 10 वर्षात झालेले विकास काम आणि काशीची संपूर्ण माहिती देणारी अशी अपेक्षा आहेत का दोन पुस्तके आज येथे प्रकाशित करण्यात आली. काशीने गेल्या 10 वर्षात केलेला विकासाचा प्रवास, त्यातील प्रत्येक टप्पा आणि इथल्या संस्कृतीचे वर्णनही या कॉफी टेबल बुकमध्ये केले आहे. याशिवाय काशी येथे होणाऱ्या सर्व खासदार स्पर्धांवर छोटी पुस्तकेही  प्रकाशित  करण्यात आली आहेत. यासाठी मी सर्व काशीवासीयांचे अभिनंदन करतो.

 

पण मित्रांनो,

आपण सर्व फक्त साधने आहोत हे देखील आपल्याला माहित आहे. काशीमध्ये करणारे फक्त महादेव आणि त्यांचे अनुयायी आहेत. जिथे जिथे महादेव आशीर्वाद देतात तिथे पृथ्वी समृद्ध होते, यावेळी महादेव खूप आनंदात असतात, महादेव खूप प्रसन्न असतात. त्यामुळेच महादेवाच्या आशीर्वादाने गेल्या 10 वर्षांत काशीत सर्वत्र विकासाचा डमरू वाजला आहे. आज पुन्हा एकदा... काशीतील आमच्या कुटुंबातील लोकांसाठी करोडो रुपयांच्या योजनेचे उद्घाटन होत आहे. शिवरात्री आणि रंगभरी एकादशीपूर्वी आज काशीमध्ये विकासाचा उत्सव साजरा केला जात आहे. मंचावर येण्यापूर्वी मी काशी एमपी फोटोग्राफी स्पर्धेच्या गॅलरीकडे पाहत होतो. गेल्या 10 वर्षात विकासाच्या गंगेने काशीला सिंचित केले आहे, काशी किती झपाट्याने बदलली हे तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष पाहिले असेल. मी बरोबर बोलतोय ना ? हे तुम्ही मला सांगितले तर मला कळेल. मी जे बोलतोय ते बरोबर आहे, बदल झाला आहे, मी समाधानी आहे. पण लहान मुलांनी पूर्वीची काशी पाहिली नसावी; ते सामान्य, अद्भुत काशी पाहत असतील. हेच माझ्या काशीचे सामर्थ्य आहे, आणि हीच काशीवासीयांची आदरांजली आहे, हीच महादेवाच्या कृपेची शक्ती आहे. बाबा जाने चाह जालन, ठीक के रोक पावेल? म्हणूनच बनारसमध्ये जेव्हा जेव्हा काही शुभ घडते! लोक हात वर करून म्हणतात – नमः पार्वती पतये, हर-हर महादेव!

मित्रांनो,

काशी हे केवळ आपल्या श्रद्धेचे तीर्थक्षेत्र नाही तर ते भारताच्या चिरंतन चेतनेचे जागृत केंद्र आहे. एक काळ असा होता की भारताच्या समृद्धीची कथा जगभर ऐकली जायची. यामागे केवळ भारताची आर्थिक ताकद होती असे नाही. यामागे आपली सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समृद्धीही होती. आपली काशीसारखी तीर्थक्षेत्रे आणि विश्वनाथधामसारखी आपली मंदिरे राष्ट्राच्या प्रगतीसाठी यज्ञस्थळे असायची. येथे साधनाही केली जात होती आणि शास्त्रेही वापरली जात होती. इथे संवाद आणि संशोधन होते. येथे संस्कृतीचे स्त्रोत होते, साहित्य आणि संगीताचे प्रवाह देखील होते. म्हणूनच, भारताने दिलेल्या सर्व नवीन कल्पना आणि नवीन शास्त्रे कोणत्या ना कोणत्या सांस्कृतिक केंद्राशी संबंधित आहेत हे तुम्ही पाहता. काशीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. काशी ही शिवाचीही नगरी आहे, ती बुद्धाच्या शिकवणुकीचीही भूमी आहे. काशी हे जैन तीर्थंकरांचे जन्मस्थानही आहे आणि आदि शंकराचार्यांनीही येथूनच आत्मज्ञान प्राप्त केले. देशभरातून आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक ज्ञान, संशोधन आणि शांतीच्या शोधात काशीला येतात. प्रत्येक प्रांतातून, प्रत्येक भाषेतून, प्रत्येक बोलीभाषेतून, प्रत्येक प्रथेतील लोक काशीत येऊन स्थायिक झाले आहेत. ज्या ठिकाणी एवढी विविधता असते, तिथे नवनवीन कल्पना जन्म घेतात आणि जिथे नवीन कल्पना फुलतात तिथे प्रगतीच्या शक्यता फुलतात.

म्हणूनच बंधू आणि भगिनींनो,

विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी मी म्हणालो होतो....त्यावेळी मी काय बोललो ते लक्षात ठेवा, त्यावेळी मी म्हणालो होतो – “विश्वनाथ धाम भारताला निर्णायक दिशा देईल, भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल”. आज तो दिसतोय की नाही, घडतोय की नाही. विश्वनाथ धाम आपल्या भव्य स्वरुपात भारताला निर्णायक भविष्याकडे नेण्यात पुन्हा एकदा राष्ट्रीय भूमिका बजावत आहे. आज विश्वनाथ धाम संकुलात देशभरातील विद्वानांचे ‘विद्वान परिसंवाद’ होत आहेत. विश्वनाथ मंदिर विश्वस्त संस्थासुद्धा शास्त्रार्थाची परंपरा पुनरुज्जीवित करत आहे. शास्त्रीय आवाजाबरोबरच शास्त्रांवर आधारित संवादही काशीत गुंजत आहेत. यामुळे देशभरातील विद्वानांमध्ये वैचारिक देवाणघेवाण वाढेल. यामुळे प्राचीन ज्ञानाचे जतन होईल आणि नवीन कल्पनाही निर्माण होतील. काशी संसद संस्कृत स्पर्धा आणि काशी संसद ज्ञान स्पर्धा हा देखील याच प्रयत्नाचा एक भाग आहे. संस्कृत शिकणाऱ्या हजारो तरुणांना पुस्तके, कपडे आणि इतर आवश्यक साधनांसह शिष्यवृत्ती दिली जात आहे. शिक्षकांनाही मदत केली जात आहे. एवढेच नाही तर काशी तमिळ संगम आणि गंगा पुष्करुलु महोत्सव यांसारख्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत' मोहिमेचाही विश्वनाथ धाम भाग बनला आहे. आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हे श्रद्धास्थान सामाजिक समावेशाचा संकल्प अधिक दृढ करत आहे. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीकोनातून प्राचीन ज्ञानावर काशीतील विद्वान आणि विद्वत परिषदेकडूनही नवीन संशोधन केले जात आहे. मला सांगण्यात आले आहे की लवकरच मंदिराचे विश्वस्त शहरात अनेक ठिकाणी मोफत भोजनाची व्यवस्था सुरू करणार आहे.

 

अन्नपूर्णा मातेच्या या  नगरीत कोणीही उपाशी राहणार नाही याची खातरजमा हे मंदिर करेल. म्हणजेच श्रद्धेचे केंद्र सामाजिक आणि राष्ट्रीय संकल्पांसाठी ऊर्जा केंद्र कशाप्रकारे बनू शकते , नवी काशी नव्या भारताची प्रेरणा म्हणून उदयास आली आहे. मला आशा आहे की,  येथून बाहेर पडणारे तरुण जगभरात भारतीय ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीचे ध्वजवाहक बनतील. बाबा विश्वनाथांची ही भूमी त्यांच्या विश्वकल्याणाच्या संकल्पाची साक्षीदार ठरली.

मित्रांनो,

आपल्या ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माच्या उत्थानात  ज्या भाषांनी सर्वात मोठे योगदान दिले आहे, त्यात संस्कृत ही सर्वात प्रमुख आहे. भारत हा  एक विचार आहे, संस्कृत ही त्याची मुख्य अभिव्यक्ती आहे.भारत एक प्रवास आहे, संस्कृत हा त्याच्या इतिहासाचा मुख्य अध्याय आहे. भारत ही  विविधतेत एकता असलेली  भूमी आहे, संस्कृत हे त्याचे मूळ  आहे. म्हणूनच आपल्या इथे म्हटले देखील आहे- “भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतम् संस्कृति-स्तथा”॥  म्हणजेच भारताच्या प्रतिष्ठेत संस्कृतचा मोठा वाटा आहे.एक काळ असा होता की,  आपल्या देशात संस्कृत ही वैज्ञानिक संशोधनाची भाषा होती आणि शास्त्रीय आकलनाची भाषाही संस्कृत  होती. खगोलशास्त्रातील सूर्यसिद्धांत सारखे ग्रंथ असो , गणितातील आर्यभट आणि लीलावती असो , वैद्यकशास्त्रातील चरक आणि सुश्रुत संहिता असो किंवा बृहत संहितासारखे ग्रंथ असोत, हे सर्व संस्कृतमध्ये लिहिले गेले आहे .यासोबतच अनेक साहित्य, संगीत, कला या प्रकारांचाही उगम संस्कृत भाषेतून झाला आहे. या शैलींतून भारताला ओळख मिळाली आहे. ज्या वेदांचे  काशीमध्ये पठण केले जाते , तेच वेद पठण  त्याच संस्कृतमध्ये  आपल्याला कांचीमध्ये ऐकायला मिळते. ज्यांनी हजारो वर्षांपासून भारताला एक राष्ट्र म्हणून अखंड ठेवले आहे. त्या   ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चा  हा चिरंतन स्वर आहे.

 

मित्रांनो,

आज काशीकडे वारसा आणि विकासाचे मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. परंपरा आणि अध्यात्माभोवती आधुनिकता कशाप्रकारे विस्तारते आहे, हे आज जग पाहत आहे.रामलला त्यांच्या नव्या  भव्य मंदिरात विराजमान  झाल्यानंतर, आता अयोध्या देखील त्याच प्रकारे तेजोमय झाली  आहे.देशात भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणी आधुनिक पायाभूत सुविधा आणिसोई  सुविधाही निर्माण केल्या   जात आहेत. कुशीनगरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लाभ उत्तर प्रदेशाला मिळाला आहे.अशी अनेक कामे आज देशात होत आहेत. येत्या  5 वर्षात या आत्मविश्वासाने देश विकासाला नवी गती देईल आणि यशाचे नवे प्रतिमान  देश निर्माण करेल. आणि ही मोदींची हमी आहे.आणि मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी हे देखील  तुम्हाला माहीत आहे.आता मी खासदार तर आहे पण प्रत्येक वेळी काही ना काही  काही काम घेऊन येतो... माझ्यासाठी आणि तुमच्यासाठीही .. करणार ना तुम्ही ? बघा, मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी इथल्या लोकांनी अगदी चपखलपणे उचलून धरल्या, सगळेजण त्यामध्ये सहभागी झाले आणि नवीन पिढीमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झाले. या स्पर्धा सामान्य नाहीत.जी माझे सबका प्रयासचे उद्दिष्ट आहे ना हा सबका प्रयासचा यशस्वी प्रयोग आहे. प्रत्येक पर्यटन  स्थळी काय होते  हे येत्या काही दिवसांत मला पाहायचे आहे ,  लोक पोस्ट कार्ड छापतात, पुढे  त्या ठिकाणाचे खास चित्र असते आणि मागे 2 ओळी लिहायला जागा असते. मला असे वाटते की जी छायाचित्र स्पर्धा झाली आहे , या स्पर्धेतील  सर्वोत्कृष्ट चित्रांसाठी  काशीमध्ये मतदान व्हावे, लोकांनी मतदान करावे आणि मतदानाने निवडलेल्या   10 सर्वोत्कृष्ट चित्रांची पोस्टकार्ड छापून त्याची पर्यटकांना विक्री करण्याचा  कार्यक्रम आखला जावा.आणि दरवर्षी ही छायाचित्र स्पर्धा असेल, दरवर्षी 10 नवीन छायाचित्रे  येतील. पण ते मतदानातून व्हायला हवे, ही छयाचित्र  पुढे आणण्यासाठी काशीतील जनतेने मतदान केले पाहिजे. सर्व छायाचित्र आल्यानंतर त्याची एक  ऑनलाइन स्पर्धा व्हावी करू शकतो का ? चला.

दुसरे काम  - ज्या प्रमाणे छायाचित्र काढण्यात आली , काही लोकांनी ती  त्यांच्या मोबाईलवरूनही काढली असतील आणि स्पर्धेत भाग घेतला असेल.आता आपण एक कार्यक्रम आयोजित करूया ज्यामध्ये लोक ठिकठिकाणी आपल्या मर्जीने बसतील आणि कागदाचा आकार निश्चित केला पाहिजे त्यावर चित्र काढावे , चित्र तयार करावे. आणि त्यात उत्तम चित्र काढणाऱ्याला  बक्षिसेही द्यायला हवीत आणि नंतर जी चित्र रेखाटली जातील त्यांची सर्वोत्कृष्ट 10 पोस्टकार्डेही काढली पाहिजेत , कराल ना ? आवाज का कमी झाला.

 

तिसरे काम - बघा आता कोट्यवधी लोक आले काशीला येतात , गाईडची  नितांत गरज आहे, कोणीतरी समजावून सांगावे  असे लोकांना  वाटते.खूप मेहनतीने  येणारा प्रवासी काशीच्या प्रभावाने प्रभावित व्हावा, काशी त्याच्या हृदयातून आणि मनातून दूर जाऊ नये, यासाठी  चांगल्या गाईडची गरज आहे.आणि म्हणूनच मी म्हटले आहे की सर्वोत्कृष्ट गाईडची  स्पर्धा असावी,  प्रत्येकाने येऊन गाईड म्हणून काम करून दाखवावे आणि त्यातील उत्कृष्ट गाईड्सना  बक्षीस देण्यात यावे आणि प्रमाणपत्र देण्यात यावे. भविष्यात ते गाईड  म्हणून आपला उदरनिर्वाह देखील करू शकतात. नवीन क्षेत्र विकसित होईल,तर कराल का ? तुम्ही अजिबात नकार देत नाही आहात मग  परीक्षा वॆगरे द्यायची आहे की नाही ? मग तुमचे शिक्षक म्हणतील की खासदार असा आहे की आमच्या मुलांकडून शिक्षणाऐवजी इतर कामे करून घेतात. बघा, आपल्यात जितकी कौशल्ये विकसित होऊ शकतात तितकी कौशल्ये व्हायला  पाहिजेत.प्रतिभेला विकसित करण्याची प्रत्येक संधी दिली पाहिजे. देवाने प्रत्येकाला प्रत्येक प्रकारची शक्ती दिली आहे, काही लोक तिचा वापर करतात , काही लोक ती तशीच थंड ठेवतात.  

 

काशी तर सुधारणार आहे, पूलही बांधले जाणार  आहेत, रस्तेही तयार होणार  आहेत, इमारतीही बांधल्या जाणार आहेत. पण मला इथल्या लोकांची देखभाल करायची आहे,प्रत्येक मनाला जपायचे आहे ,  सेवक बनून जोपासना करायची आहे ,सोबती बनून सांभाळायचे आहे बोट धरून चालताना ध्येयापर्यंत  पोहोचायचे  आहे, ध्येय गाठायचे आहे.  आणि म्हणून मी सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला कार्यक्रमासाठी उशीर होत असला तरी हा कार्यक्रम असा आहे की   तुम्हा लोकांसोबत  अधिकाधिक वेळ घालवावासा मला वाटत आहे . मी पाहिले आहे की अनेकांना माझ्यासोबत छायाचित्र काढायचे असते पण मला तुमच्यासोबत छायाचित्र काढायचे आहे. मग तुम्ही मला मदत कराल का?...बघा, मी सांगेन त्याचे पालन कराल  तरच मदत होईल.  जोपर्यंत मी इथून निघत नाही तोपर्यंत कोणीही उभे राहणार नाही...ठीक आहे. मी इथून मागे येईन आणि प्रत्येक कक्षामध्ये उभा राहीन आणि सर्व छायाचित्रकार मंचावर  येतील, ते इथून छायाचित्र  काढतील… ठीक आहे. पण हे छायाचित्र मी माझ्यासोबत घेऊन जाईन तुमचे  काय होणार...  काय होणार तुमचे  ? यावर उपाय आहे,   तुम्हाला सांगू. तुम्ही तुमच्या मोबाईलवरील  नमो ॲपवर जा नमो ॲप डाउनलोड करा, त्यात एक छायाचित्र  विभाग आहे, स्वतःचा एक सेल्फी घ्या आणि त्यात टाका आणि तुम्ही एखादे बटण दाबले तर, माझ्यासोबत, कुठेही काढलेले तुमचे सर्व फोटो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतील.तर आपल्या काशीत संस्कृतही असेल आणि विज्ञानही असेल.  तर तुम्ही मला नक्कीच मदत कराल...   बसून राहाल,ना ? कुणीही  उभे  राहायचे नाही, बसल्या बसल्या डोके वर करा म्हणजे सगळ्यांचे छायाचित्र येईल. आणि माझ्याकडे असा कॅमेरा आहे की जो हसतो त्याचेच छायाचित्र काढले जाते.

हर हर महादेव!

तर मग मी खाली येत आहे, हे लोक इथेच बसतील, तुम्ही लोक तिथे बसा. कॅमेरा असलेल्या प्रत्येकाने वरती यावे.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
5 Days, 31 World Leaders & 31 Bilaterals: Decoding PM Modi's Diplomatic Blitzkrieg

Media Coverage

5 Days, 31 World Leaders & 31 Bilaterals: Decoding PM Modi's Diplomatic Blitzkrieg
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister urges the Indian Diaspora to participate in Bharat Ko Janiye Quiz
November 23, 2024

The Prime Minister Shri Narendra Modi today urged the Indian Diaspora and friends from other countries to participate in Bharat Ko Janiye (Know India) Quiz. He remarked that the quiz deepens the connect between India and its diaspora worldwide and was also a wonderful way to rediscover our rich heritage and vibrant culture.

He posted a message on X:

“Strengthening the bond with our diaspora!

Urge Indian community abroad and friends from other countries  to take part in the #BharatKoJaniye Quiz!

bkjquiz.com

This quiz deepens the connect between India and its diaspora worldwide. It’s also a wonderful way to rediscover our rich heritage and vibrant culture.

The winners will get an opportunity to experience the wonders of #IncredibleIndia.”