पश्चिम बंगाल आपल्या देशासाठी, देशातल्या अनेक राज्यांसाठी पूर्वेकडील द्वार म्हणून काम करीत आहे. पूर्वेकडे या द्वारातून प्रगतीच्या अमर्याद संधीचा प्रवेश होऊ शकतो. यासाठीच, पश्चिम बंगाल मध्ये आपले सरकार रेल्वे मार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्गाच्या आधुनिक संपर्क व्यवस्थेसाठी काम करीत आहे. आजसुद्धा मी फरक्का ते रायगंजच्या मध्ये राष्ट्रीय महामार्ग-12 चे उद्घाटन केले आहे. NH-12 चे उद्घाटन केले आहे. यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. या महामार्गामुळे बंगालच्या जनतेचा प्रवासाचा वेग वाढेल. फरक्का ते रायगंज पर्यंतचा जो पूर्ण प्रवास आहे त्यात चार तासांवरून कपात होऊन तो निम्म्यावर येईल. त्याचबरोबर, यामुळे कालियाचक, सुजापुर, मालदा टाउन इत्यादी शहरी भागातल्या दळणवळण स्थितीतही सुधारणा होईल. जेव्हा वाहतुकीचा वेग वाढेल तेव्हा औद्योगिक क्रियान्वयन देखील वेगाने होईल. यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल.
मित्र हो
पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून रेल्वे पश्चिम बंगालच्या गौरवस्पद इतिहासाचा भाग आहे. मात्र, इतिहासाची जी आघाडी बंगालला प्राप्त झाली होती ती स्वातंत्र्यानंतर योग्य प्रकारे वाढवता आली नाही, हेच कारण आहे की एवढ्या संधी मिळूनही बंगालची पीछेहाट होत गेली. गेल्या दहा वर्षात आम्ही ही दरी भरून काढण्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर खूप भर दिला आहे. आज आपले सरकार बंगाल मधील रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी आधीच्या तुलनेत दुपटीने जास्त निधी खर्च करत आहे. आज सुद्धा मी इथे एकत्रितरीत्या भारत सरकारचे 4-4 रेल्वे प्रकल्प बंगालला समर्पित करीत आहे, ही सर्व विकास कार्य आधुनिक आणि विकसित बंगालची आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील. या समारंभात मी आता आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. कारण बाहेर 10 मिनिटांच्या अंतरावर बंगालची जनता जनार्दन या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भव्य संख्येने उपस्थित आहे. ते माझी वाट पाहत आहेत आणि मी सुद्धा तिथे मोकळ्या मनाने मनःपूर्वक खूप काही सांगू इच्छितो; आणि यामुळेच मी सर्व गोष्टी तिथेच बोललो तर बरे होईल. इथल्यासाठी बास एवढंच पुरेसं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा देत आहे.
धन्यवाद.