पण ईश्वर स्वरूप जनता जनार्दनाचे आशीर्वाद माझ्या सोबतीला आहेत. काँग्रेसच्या प्रत्येक कट कारस्थानासमोर जनता जनार्दन ढाल बनून समोर उभे राहतात. काँग्रेस जीतक्या जास्त प्रमाणात कारस्थाने रचते तितक्याच जास्त ताकदीनिशी जनता मला मजबूत बनवते, आपले आशीर्वाद देते. यावेळीही काँग्रेसने माझ्या विरोधात सर्व आघाड्या खुल्या केल्या आहेत. मात्र माझ्या देशातील जनतेने प्रदान केलेले सुरक्षा कवच.. आणि, जेव्हा जनतेचे सुरक्षा कवच मिळालेले असते, जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळालेला असतो, माता भगिनी ढाल बनून समोर उभ्या असतात तेव्हा आपण संकटावर मात करून पुढे जाऊ शकतो. आणि देशालाही पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणूनच, तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने हिंदुस्तानाच्या कानाकोपऱ्यात मला हा अनुभव येत आहे. म्हणूनच लोक म्हणत आहेत - एनडीए सरकार, 400 पार. एनडीए सरकार, 400 पार. एनडीए सरकार, 400 पार. एनडीए सरकार, 400 पार.
मित्रांनो,
काँग्रेस एकाच परिवाराच्या मोहात गुंतली आहे, हरियाणामध्ये देखील तीच परिस्थिती आहे, काँग्रेस आज आपल्या इतिहासातील सर्वात दयनीय परिस्थितीतून जात आहे. त्यांचे नेते आपला एक स्टार्ट अप सांभाळू शकत नाही, आणि हे लोक देश सांभाळण्याची स्वप्ने पाहत आहेत. ज्यांनी कधी काळी त्यांना साथ देण्याचा मानस बनवला होता ते देखील यांच्यापासून दूर निघून जात आहेत. आज अशी परिस्थिती आहे की काँग्रेस जवळ आपले असे कार्यकर्तेच शिल्लक राहिलेले नाहीत. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार तिथे हे आपले सरकार देखील सांभाळू शकत नाहीत. आज हिमाचल प्रदेशात लोकांना वेतन आणि निवृत्तीवेतन मिळण्यात देखील अनंत अडचणी येत आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार विकास योजनांवर देखील काम करण्यात असमर्थ ठरत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
एका बाजूला काँग्रेसचे कुशासन आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपाचे सुशासन आहे. येथे दहा वर्षांपासून डबल इंजिनचे सरकार आहे. म्हणूनच गरिबांच्या कल्याणासाठी मोदीने ज्या कोणत्या योजना तयार केल्या आहेत, त्यांच्या शंभर टक्के अंमलबजावणीत हरियाणा अव्वल स्थानावर आहे. हरियाणा कृषी क्षेत्रात देखील अभूतपूर्व प्रगती करत आहे आणि येथे उद्योग क्षेत्राच्या कक्षा निरंतर रुंदावत आहेत. ज्या दक्षिण हरियाणाला विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते आज तोच प्रदेश अत्यंत जलद गतीने प्रगती करत आहे. देशात रस्ते असो, रेल्वे असो, मेट्रो असो किंवा यांच्याशी संबंधित ज्या कोणत्या मोठ्या योजना बनवल्या जात आहे त्या सर्व याच प्रदेशातून जात आहेत. दिल्ली - मुंबई द्रूतगती मार्गाच्या दिल्ली - दौसा - लालसोट विभागाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे. देशातील सर्वात लांब द्रूतगती मार्ग हरियाणाच्या गुरुग्राम, पलवल आणि नूंह या जिल्ह्यांमधून जात आहे.
मित्रांनो,
2014 च्या पूर्वी हरियाणा मध्ये रेल्वेच्या विकासासाठी दरवर्षी सर्वसाधारणपणे 300 कोटी रुपयांचा संकल्प सादर जात असे, केवळ 300 कोटी रुपये! यावर्षी हरियाणामधील रेल्वेसाठी जवळपास 3 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मग तुम्हीच पहा, 300 कोटी रुपये कुठे आणि 3 हजार कोटी रुपये कुठे ! आणि हा बदल गेल्या दहा वर्षात झाला आहे. रोहतक - महम - हांसी, जिंद - सोनीपत यासारखे नवीन रेल्वे मार्ग आणि अंबाला कॅंट - दप्पर सारख्या मार्गाचे दुहेरीकरण यामुळे लाखो लोकांना लाभ झाला आहे. जेव्हा अशा सुविधांची निर्मिती होते तेव्हा जीवन सुकर बनते आणि व्यवसाय उद्योग देखील सुलभ बनतात.
बंधू आणि भगिनींनो,
या क्षेत्रात शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. राज्य सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी कौतुकास्पद काम केले आहे. जगातील शेकडो मोठ्या कंपन्या आज हरियाणामध्ये कार्यरत आहे. या कंपन्यांमध्ये युवकांना खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे.
मित्रांनो,
हरियाणा कपडा आणि तयार कपड्यांच्या उद्योगात आपले नाव नव्या उंचीवर घेऊन जात आहे. देशातून निर्यात होत असलेले 35 टक्क्यांहून अधिक गालिचे, जवळपास 20 टक्के तयार कपडे हरियाणामध्ये तयार होतात. हरियाणाच्या कापड उद्योगाला आपले लघुउद्योग पुढे घेऊन जात आहेत. पानिपत हातमाग उत्पादनांसाठी, फरीदाबाद कापड उत्पादनासाठी, गुरूग्राम तयार कपड्यांसाठी, सोनीपत कपडा उद्योगातील तंत्रज्ञानासाठी तर भिवानी हे शहर कापड उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी आज प्रसिद्ध झाले आहेत. मागच्या दहा वर्षात केंद्र सरकारने सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी तसेच लघु उद्योगांसाठी लाखो कोटी रुपये मदतीच्या स्वरूपात दिले आहेत. यामुळे जुने लघु उद्योग, कुटीर उद्योग तर मजबूत झाले आहेतच, हरियाणा मध्ये हजारो नवीन उद्योग देखील सुरू झाले आहेत.
मित्रांनो,
रेवाडी हे शहर तर विश्वकर्मा बंधूंच्या कारागिरीसाठी देखील ओळखले जाते. येथील पितळ धातूवर केली जाणारी कारागिरी आणि हस्तकला खूपच प्रसिद्ध आहे. 18 व्यवसायांशी संबंधित, अशा पारंपरिक कारागिरांसाठी प्रथमच आम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा नावाने एक मोठी योजना सुरू केली आहे. देशभरातील लाखो लाभार्थी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेशी जोडले जात आहेत. भाजपा सरकार या योजनेवर 13,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. ही योजना आपल्या या पारंपरिक कारागिरांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात परिवर्तन करणारी आहे.
बंधू आणि भगिनींनो,
मोदीची हमी त्यांच्याच बरोबर असते ज्यांच्याजवळ हमी देण्यासाठी काहीही नसते. देशातील छोट्या शेतकऱ्यांजवळ बँकेला हमी देण्यासाठी काहीही नव्हते. मोदीने त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना द्वारे हमी दिली आहे. देशातील गरीब, दलित, मागास आणि इतर मागास प्रवर्गाच्या कुटुंबातील मुला मुलींजवळ बँकेला हमी देण्यासाठी काहीही नव्हते. देशात अनेक जण हातगाडा आणि रस्त्यावर छोटा - मोठा व्यवसाय करत आले आहेत. आपले हे साथी अनेक दशकांपासून शहरांमध्ये हे काम करत आले आहेत. यांच्या जवळ देखील हमी देण्यासाठी काहीही नव्हते. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेद्वारे यांची हमी मोदीने घेतली आहे.
मित्रांनो,
छोट्या गावातील आपल्या भगिनींची स्थिती दहा वर्षांपूर्वीपर्यंत कशी होती. आपल्या भगिनींचा जास्तीत जास्त वेळ पाण्याची सोय करण्यात, स्वयंपाक करण्यासाठी लागणारे जळाऊ लाकूड गोळा करण्यात किंवा यासारख्या इतर सोयी करण्यातच जात होता. मोदी मोफत गॅस कनेक्शन घेऊन आला आहे, नळाद्वारे घरापर्यंत पाणी घेऊन आला आहे. आज हरियाणाच्या गावांमध्ये माझ्या भगिनींना अनेक सुविधा मिळत असल्यामुळे त्यांच्या वेळेची बचत होत आहे. केवळ हेच नाही तर, या वाचलेल्या वेळेचा उपयोग या भगिनी आपली कमाई वाढवण्यासाठी करू शकतील, याचीही सोय करण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात देशभरातील 10 कोटी भगिनींना आम्ही बचत गटांशी जोडले आहे. यामध्ये हरियाणाच्या लाखो भगिनींचा समावेश आहे. भगिनींच्या या गटांना लाखो कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. जास्तीत जास्त भगिनींना लखपती दीदी बनवू शकू, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत एक कोटी भगिनी लखपती दिदी बनल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये 3 कोटी भगिनींना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आणि नमो ड्रोन दीदी योजना देखील सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भगिनींच्या समूहांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि सोबतच ड्रोन देखील देण्यात येणार आहेत. हे ड्रोन शेतीच्या कामासाठी वापरता येतील आणि यामुळे भगिनींना अधिक पैसे कमावता येतील.
मित्रांनो,
हरियाणा अद्भुत संभावनांचे राज्य आहे. मी हरियाणाच्या फर्स्ट टाइम वोटर्स ना, जे प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत, जे 18 - 20 - 22 वर्ष वयाचे आहेत, त्यांना विशेष रुपाने सांगू इच्छितो की तुमचे भविष्य खुपच उज्ज्वल असणार आहे. डबल इंजिनचे सरकार तुमच्यासाठी विकसित हरियाणा तयार करण्याच्या कामात मग्न आहे. तंत्रज्ञानापासून कापड उद्योगापर्यंत, पर्यटनापासून व्यापारापर्यंत प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. संपूर्ण जग आज भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे. आणि गुंतवणूक करण्यासाठी हरियाणा एक उत्तम राज्य म्हणून उदयाला आले आहे. आणि, गुंतवणूक वाढली याचाच अर्थ असा आहे की रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होत आहेत. म्हणूनच डबल इंजिनच्या सरकारला आपणा सर्वांचे आशीर्वाद असेच मिळत राहोत, हे आवश्यक आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एम्स साठी, हजारो कोटी रुपये खर्चाच्या योजनांसाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा. माझ्यासोबत म्हणा -
भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
खुप खुप धन्यवाद!