प्राचार्य: नमस्ते सर!

मोदीजी: नमस्ते!

मोदीजी: तुम्हा सर्वांना मी डिस्टर्ब तर केलं नाही ना? तुम्ही सर्वजण मजेत बोलत होता ना? तुम्ही ऑनलाईन कॅलरी बर्न’ करीत होता.

प्राचार्य: नमस्कार सर आणि तुम्ही आमच्यामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल खूप-खूप आभार सर! मी आत्ताच या सर्वांना सांगितलं होतं, आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी विशेष पाहुणे येणार आहेत, सर. तुम्ही याल असा, या सर्वांनी विचारही केला नसेल. तुम्ही येण्याआधी तुमच्याविषयी अनेक गोष्टी सर्वजण बोलत होते. इथं सगळेजण तुमचे चाहते आहेत.

मोदीजी: बरं, मी तर अगदी अचानक तुमच्यामध्ये सहभागी झालो आहे. मात्र  तुम्हा मंडळींना ‘डिस्टर्ब’ करावं, असं मला काही वाटत नाही. कारण तुम्ही अतिशय हसत-मजेत अगदी खेळकर वातावरण अनुभवत आहात आणि मला वाटायला लागलंय की, तुम्हा लोकांना परीक्षेचा तणाव आता अजिबातच नाहीए. त्यामुळंही तुमच्या आनंदाला पारावार उरलेला नाही, असंही दिसून येत होतं. दुसरं म्हणजे घरामध्ये बंद  असल्यामुळे ऑनलाईन कॅलरी बर्न कशा प्रकारे करता येतात, हेही तुम्ही शिकला आहात.

मोदीजी: अच्छा, कसे आहात तुम्ही सगळेजण?

विद्यार्थी: ठीक आहोत सर! खूप चांगले आहोत सर!

मोदीजी: तुम्ही सगळेजण आरोग्यदायी, स्वस्थ आहात?

विद्यार्थी:  हो सर, अगदी स्वस्थ आहोत.

मोदीजी: तुमच्या कुटुंबातले सर्व सदस्य आरोग्यपूर्ण, स्वस्थ आहेत?

विद्यार्थी: हो सर!

मोदीजी: बरं, परवा ज्यावेळी तुम्ही बातमी ऐकली, त्याच्याआधी तणाव होता आणि आता तणाब गायब झालाय, असं काही तुम्हाला वाटतं का?

विद्यार्थी: हो सर, अगदी तसंच वाटतंय सर!

मोदीजी: याचा अर्थ तुम्हाला परीक्षेचा तणाव वाटत असतो ना?

विद्यार्थी: हो सर? खूप वाटत असतो.

मोदीजी: मग तर माझं पुस्तक लेखन पूर्ण वाया गेलं, मी ‘एक्झाम वॉरियर’ -परीक्षा योद्धामध्ये म्हटलं आहे की, कधीही तणाव येवू देवू नका. तरीही तुम्ही तणाव का बरं घेत होता?

विद्यार्थी: सर, आम्ही रोज अभ्यास, तयारी करीत होतो, त्यावेळी तणाव नावाची गोष्टच नव्हती.

मोदीजी: मग, तणाच कधी निर्माण होतो?

विद्यार्थी: सर तणाव असा काही नव्हता सर, आणि युवकांच्या दृष्टीने आरोग्य जास्त गरजेचं आहे, म्हणूनच इतका चांगला निर्णय घेतला गेलाय. त्यासाठी आम्ही सर्वजण आजीवन तुमचे आभारी असणार आहे.

मोदीजी: तरीही, तुम्ही एक, गोष्ट सांगावी, तुमचं नाव काय आहे?

विद्यार्थी: सर, हितेश्वर शर्मा, मी पंचकुला इथला आहे.

मोदीजी: हितेश्वर शर्माजी! पंचकुलामध्ये वास्तव्य करता ना तुम्ही?

विद्यार्थी: हो सर!

मोदीजी: कोणत्या सेक्टरमध्ये?

विद्यार्थी: सेक्टर दहामध्ये सर!

 

मोदीजी: मी सातमध्ये रहात होतो. तिथं बरीच वर्षे राहिलो आहे.

विद्यार्थी: सर, मला आजच हे समजलं.

मोदीजी: हो, मी तिथं रहात होतो.

विद्यार्थी: जी सर, सर तुमचं समर्थन करणारे अनेक लोक इथं आहेत, त्यांना तुम्हाला इथं पुन्हा एकदा आलेलं पाहण्याची खूप इच्छा आहे.

मोदीजी: अच्छा, तुम्ही तर दहावीला अव्वल क्रमांक मिळवला आहे, म्हणजे आता बारावीलाही असाच प्रथम क्रमांक मिळणार, अशी घरातल्या लोकांची अपेक्षाही असणार. आता परीक्षाच रद्द झाल्या आहेत, म्हणजे तुमच्यादृष्टीनं तर सगळंच थांबल का? याविषयी थोडं  सांगणार का?

विद्यार्थी: सर, मी तेच सांगत होतो की, अपेक्षा नक्कीच असणार. तरीही मला आत्ता छान वाटतंय. कारण जर मी परीक्षा देणार असतो तर तो दबाव वाढत जात होतं. एक सॅच्युरेशन स्थिती - उच्चतम बिंदूपर्यंत हा तणाव येवून पोहोचला होता आणि बाहेर पाहिल्यानंतर आम्हाला जाणवत होतं की, सगळं काही खूप सुरक्षित नाही. त्यामुळं तुम्ही अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. आणि सर मला वाटतं की, ज्यांचा अव्वल क्रमांक आहे, जे परिश्रम करता, त्यांचे परिश्रम कधीच वाया जात नाहीत. घेतलेलं ज्ञान नेहमी बरोबरच तर राहणार आहे. आणि जे निरंतर अभ्यास करीत आहेत, ज्यांचे अभ्यासामध्ये सातत्य आहे, सर, जो काही निकष लावला जाईल, जो काही तुम्ही निर्णय घ्याल त्यामध्ये तर ते अव्वलच असणार आहेत. अशावेळी त्यांना चिंता करण्याची गरज नाही. काही लोक म्हणताहेत की, अशा स्थितीत अव्वल क्रमांक मिळवणारे निराश आहेत. आणि तसं पाहिलं तर आम्ही दुस-यांदा परीक्षा देवू शकतो, अशी सुविधा तर तुम्ही ठेवली आहेच की! त्यामुळेच हा अतिशय योग्य प्रकारे, परिस्थिती जाणून घेवून घेतलेला निर्णय आहे, असे मला वाटते. आणि यासाठी आम्ही आजीवन तुमचे आभारी असणार आहोत.

मोदीजी: बरं, मुलांनो, आता ज्यावेळी काही लोक बोलत असता, मोठे तर स्वतःला खूप शौर्यवान समजत असतात. स्वतः जणू पैलवानच आहोत, असं त्यांना वाटत असतं आणि ते म्हणतात की, मी मास्क लावणार नाही, मी या नियमांचं पालन करणार नाही, मी अमूक करणार नाही. हे ऐकल्यावर तुम्हा मंडळींना काय वाटतं?

विद्यार्थी: सर, हे सगळे नियम तर पाळावेच लागतील सर.... तर जे काही आत्ता तुम्ही बोलला की, ज्यावेळी लोक मास्क लावणार नाही किंवा कोविड मार्गदर्शक तत्वांचं पालन करणार नाही, असं बोलतात, हे आम्ही ऐकतो, त्यावेळी खूप निराश झाल्यासारखं वाटतं. कारण आपल्या सरकारनं या आजाराविषयी इतकी जागरूकता निर्माण केली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटना, संस्थाही महामारीविषयी काय दक्षता घ्यावी याविषयी जागरूकता निर्माण करीत आहेत . तरीही लोकांना याचं गांभीर्य समजत नाही, हे पाहून तर खूप वाईट वाटतं सर! आणखी एक गोष्ट आपल्याबरोबर बोलताना सामायिक करू इच्छितो सर, आम्ही म्हणजे आपल्या समाजातल्या काही मुलांनी मिळून एक जागरूकता अभियानच काही महिन्यांपूर्वी सुरू केले होते. ज्यावेळी अनलाॅक झाले होते, त्यावेळी ही मोहीम राबविली होती. आणि आम्ही पथनाट्य तयार केले, त्याव्दारे कोविडयोग्य मार्गदर्शन तत्वांचं कसं पालन केलं पाहिजे, हे ठिकठिकाणी जावून सांगत होतो. समाजातल्या प्रत्येक घटकाने स्वतःच्या हितासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे आणि सामाजिक अंतर राखणे, असे कोविडयोग्य वर्तन करण्याची किती आवश्यकता आहे, या गोष्टींचे किती महत्व आहे, असे सांगून हे नियम पाळण्यास सांगत होतो. मला वाटतं की जर आपण स्वतःच्या पातळीवर अशा प्रकारे पुढाकार घेवून काही गोष्टी केल्या आणि स्वतःच जबाबदारीने वर्तन केले तर खूप मोठा बदल घडून येऊ शकतो.

मोदीजी: अरेव्वा, बरं, मला जाणून घेण्याची इच्छा आहे की, तुमच्या परिवारामध्ये, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये बारावीच्या वर्गात पाल्य आहे, त्यांच्या डोक्यात, आणि घरातही ‘पुढे काय?’ पुढे काय?’ असाच प्रश्न येत असेल आणि घरातही याच्याविषयीच चर्चा होत असेल. अगदी परवापर्यंत म्हणजे एक तारखेच्या सकाळपर्यंत तर तुम्ही आज, या विषयाचा इतका अभ्यास करू, उद्या हा विषय अभ्यासून पूर्ण करू, सकाळी लवकर पाच वाजता उठूया, चार वाजता उठूया, आता हे करू, ते करू, असा सगळा विचार तुम्ही करीत असणार. अगदी सर्वांनी वेळापत्रकही तयार केलं असणार. आणि आता अचानक सगळं काही बदलून गेलंय. एक पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटत असेल, ती पोकळी तुम्ही लोक कशी भरून काढणार आहे?

विद्यार्थिनी: नमस्कार सर, मी विधी चैधरी. गुवाहाटीच्या राॅयल नोबल शाळेची विद्यार्थिनी आहे.

मोदीजी: गुवाहाटीच्या आहात?

विद्यार्थिनी: हो सर!

विद्यार्थिनी: सर, मी इतकंच सांगू इच्छिते, तुम्ही ज्या पद्धतीने आत्ता सांगितलं की, अचानक एका सकाळपर्यंत सर्वांच्या मनामध्ये इतक्या सर्वकाही गोष्टी होत्या. सर, तुम्ही याविषयी बोलणं सुरू केलं होतं, तुम्ही आपल्या एक्झाम वॉरियर्सविषयी आम्हाला सांगितलं होतं. म्हणून मी एक गोष्ट सांगू इच्छिते, इथल्या सर्वजणांनाच सांगते की, मी दहावीत ज्यावेळी होते, म्हणजे ज्यावेळी माझी दहावीची परीक्षा होणार होती, त्यावेळी मी कोलकात्यावरून इथे आले होते. इथे आल्यावर माझी दहावीची परीक्षा होती. माझा हा स्वानुभव सांगतेय.. सर, मी एक महिना रोज ते पुस्तक वाचत होते आणि सर, तुम्ही या पुस्तकाचा प्रारंभच असा केला आहे की, परीक्षा एखाद्या सणासारखी साजरी करावी. मग सर, सण, उत्सव साजरा करताना घाबरण्याची काय गरज आहे? याचा अर्थ सणासाठी तर आपण तयारी करीत असतो. सण अधिक चांगला साजरा व्हावा असं आपल्याला वाटतं, म्हणून तयारीही करतो. आणि सर, तुम्ही सर्वात मोठा मंत्र जो योग करण्याचा दिला आहे. पुस्तकाचा शेवटच तुम्ही योग करण्याच्या मंत्रानं केली आहे. योग मंत्राने पुस्तकाचा शेवट का केला, त्याचा अर्थही लक्षात घेतला पाहिजे. तर सर, या दोन गोष्टी आहेत, त्या मनामध्ये सातत्याने घोळत होत्या. समजतंय की, परिस्थिती काही चांगली नाही. सर्व काही आहे, मात्र या काही भावनेने आम्ही परीक्षेची तयारी केली. मी बारावीमध्ये ज्या पद्धतीने तयारी केली, सर, त्यासाठी मी आपल्यालाच धन्यवाद देते. त्या पुस्तक वाया गेलं, असं मात्र बिलकुल झालेलं नाही.

मोदीजी: ठीक आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर तर राहून गेलं. आणि एक नवयुवक सारखा हात उंचावतोय. त्याला संधी मिळाली नाही. तुमचं शुभनाव काय आहे?

विद्यार्थी: सर, माझं नाव नंदन हेगडे आहे.

 

मोदीजी: नंदन हेगडे कर्नाटकचे आहात काय?

विद्यार्थी: हो सर! कर्नाटकातल्या बंगलुरूचा आहे.

मोदीजी: बरं, बोला, सांगा.

विद्यार्थी: सर, मी विचार केला की, ही परीक्षा काही माझ्या आयुष्यातली शेवटची परीक्षा नाही. पुढे तर अनेक परीक्षा द्यायच्या आहेत सर. आत्ता आम्हाला आमचे आरोग्य सांभाळले पाहिजे आणि आगामी काळात येणा-या परीक्षेला सामोरं जायचं आहे.

मोदीजी: अच्छा, आता परीक्षेतून मुक्त झाले आहात, मग काय आयपीएल पाहण्यासाठी वेळ द्यावा, असं मनामध्ये आलं की चॅम्पीयन लीग अंतिम सामना पाहणार की फ्रेंच ओपन पाहण्यासाठी डोकं वापरणार किंवा जुलैमध्ये आता ऑलिम्पिक सुरू होणार आहेत, त्या ऑलिम्पिकमध्ये मन गुंतवणार. भारताच्यावतीनं ऑलिम्पिकसाठी कोण कोण जात आहे? त्यांची पाश्र्वभूमी काय आहे? यामध्ये मन गुंतवणार नाहीतर 21 तारखेला योग दिवस आहे. त्यामध्ये गुंतून जाणार? काय करणार?

विद्यार्थी: सर्व गोष्टींमध्ये मन लागेल सर.

मोदीजी: ही चश्मेवाली कन्या काही तरी सांगू इच्छितेय. किती वेळ झाला, तिला संधी मिळत नाहीए.

विद्यार्थिनी: नमस्कार सर! सर तुम्ही आमची परीक्षा रद्द करून टाकल्याची माहिती जशी समजली त्यावेळी आधी तर खूप आनंद झाला. कारण अखेर आता एक तणाव कमी झाला होता. आता आम्हाला माहिती आहे की, आम्हाला फक्त स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे. आधी काय होतं. की बोर्डाच्या परीक्षेची तयारी करायची होती. आणि नंतर आम्ही स्पर्धा परीक्षेचीही तयारी करत होतो. आता आमच्याकडे भरपूर वेळ उपलब्ध झाला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची खूप चांगल्या पद्धतीनं तयारी करू शकणार आहे. त्यामुळे सर परीक्षा रद्द केल्याबद्दल मी तुमचे खूप आभार व्यक्त करते.

मोदीजी: म्हणजे डोक्यातून परीक्षा जात नाही तर?

विद्यार्थिनी: हो सर, बिलकुल नाही जात सर.

मोदीजी: तुम्ही आत्ता घरामध्ये आहात, त्यामुळे तुमचे आई-वडील सगळं काही ऐकत असतील ना आत्ता?

विद्यार्थिनी: होय सर!

मोदीजी: कुठं आहेत, ते दाखवा बरं !

विद्यार्थिनी: सर, मी त्यांना बोलावते सर.

मोदीजी: कुठं आहेत, ते दाखवा बरं !

विद्यार्थिनी: नमस्ते जी!

पालक: नमस्कार सर!

 

मोदीजी: मग तुम्हाला काय वाटलं, कन्या परीक्षेतून मुक्त झाली असं वाटलं?

पालक: सर, चांगला निर्णय आहे. कारण संपूर्ण देशात खूप वाईट स्थिती आहे आणि या मुलांवर असलेला एक ताण आता संपलाय. आणि पुढच्या करियरसाठी ही मुलं तयारी करू शकतात. या निर्णयानं आम्हाला खूप चांगलं वाटलं.

मोदीजी: चला, तुम्ही ही गोष्ट सकारात्मकतेनं घेतली हे पाहून मला चांगलं वाटलं. हं आणखी काही मुलांना काही बोलण्याची इच्छा आहे का?

विद्यार्थी: नमस्कार सर! बंगलुरूच्या केंद्रीय विद्यालयातून बोलतोय सर. सर, मी आपला खूप चाहता आहे, सर.

मोदीजी: आभारी आहे.

विद्यार्थी: सर, तुम्ही घेतलेला निर्णय खूप चांगला आहे. कारण ‘‘सर सलामत तो पगडी पचास ’’ मग हे डोक, शरीर सांभाळून ठेवलं पाहिजे.

मोदीजी: सुदृढ आरोग्य ही संपत्ती आहे, असं आपल्याकडं म्हणतातच ना?

विद्यार्थी: हो सर. सर आमचे प्रेरणास्थान तुम्हीच आहात.

मोदीजी: बरं, ‘सर सलामत तो पगडी हजार’ हे बरोबरच आहे, परंतु ‘सर’चा अर्थ फक्त डोकं सांभाळलं पाहिजे की संपूर्ण शरीरही सांभाळलं पाहिजे असा घेत आहात?

विद्यार्थी: संपूर्ण शरीर या अर्थानं घेतोय सर.

मोदीजी: बरं, मग शारीरिक तंदुरूस्तीसाठी किती वेळ देता आणि काय करता?

विद्यार्थी: मी रोज सकाळी उठून तीस मिनिटे योग करतो सर, योग आणि व्यायाम करतो सर. मी आणि माझा भाऊ दोघे मिळून करतो. माझा लहान भाऊ आहे.

मोदीजी: तुमच्या घरातली मंडळी ऐकताहेत पहा. मी त्यांना विचारेन, नाहीतर पकडले जाणार आहात.

विद्यार्थी: नाही सर! तीस मिनिटे दररोज करतो सर. मी आणि माझा भाऊ मिळून करतो सर. रोज योग करतो आणि दररोज आपल्या मनाला ताजंतवानं करण्यासाठी मी तबला वाजवतो सर. एक वर्षापासून मी तबला शिकतोय. त्यामुळं मी रोज तबला वाजवतो. तबला वाजवण्यामुळं माझं मन अगदी ताजं राहतं सर.

 

मोदीजी: संगीताची गोडी तुमच्या कुटुंबातल्या सर्वांनाच स्वभावतःच  आहे का?

विद्यार्थी: हो- हो. माझी आई सतार वाजवत होती सर आणि तानपूरा वाजवत होती.

 

मोदीजी: म्हणूनच घरामध्ये संगीताचं वातावरण आहे.

मोदीजी: अच्छा, आणखी कोणाला आत्तापर्यंत माझ्याशी बोलण्याची संधी मिळाली नाही, त्या सर्वांना आता संधी देतो. आत्ता एक कन्येने- जिने पांढरे इयरफोन लावले आहेत, ती माझ्या समोर आहे ती, ती  काहीतरी सांगू इच्छितेय.

विद्यार्थिनी: नमस्ते सर!  माझं नाव कशिश नेगी आहे. मी हिमाचल प्रदेशातल्या सोलन इथल्या  एमआरएडीएव्ही पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. सर, तुमच्याशी बोलण्याची संधी मिळेल, असा कधी मी विचारही केला नव्हता. तुमच्याशी बोलण्याचं माझं स्वप्न सत्यात आलंय, असं मला वाटतं आणि सर, मला तुमचे आभार मानण्याची इच्छा आहे. तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे, तो एकदम योग्य घेतलाय. कारण दीड वर्ष झालं आमच्यासारख्या बारावीच्या मुलांच्या दृष्टीनं बारावीमध्ये जणू जीवन थांबल्यासारखं झालं होतं. काहीही प्रगती होत नव्हती आणि त्यातून काही निष्पन्न होत नाही म्हणजे आमची प्रगती खुंटल्यासारखी झाली होती. त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे, त्यामुळं मी खूप आनंदात आहे. सर तुम्हाला धन्यवाद देवू इच्छिते सर. थ्यँक्यू!!

मोदीजी: ज्या कन्येनं हात उंचावला आहे, बेटा जरा बोल बरं!

विद्यार्थिनी: नमस्कार सर! मी राजस्थानातल्या जयपूरच्या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये बारावीत शिकते. माझं नाव जन्नत साक्षी आहे. बारावी बोर्ड परीक्षेविषयी तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे, त्याचं मी स्वागत करते. सध्याची परिस्थिती पाहिली तर, हा निर्णय अतिशय योग्य आहे. कारण मुलांची सुरक्षा आणि त्यांचं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे. आमचा सीबीएसईवर अतूट विश्वास आहे. शिक्षण मंडळ मूल्यांकनासाठी जे काही मापदंड निश्चित करेल, त्यामागे आमच्या हिताचा विचार असेल, याची खात्री आहे. आम्ही घेतलेल्या परिश्रमाचे संपूर्ण फळ मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद सर!

मोदीजी : अच्‍छा, जेवढे पालक आहेत त्या सर्वांनी स्क्रीनवर या, बोलवा आपल्या आईवडिलांना जर आसपास असतील तर, कारण सगळ्यांची इच्छा असेल आणि माझ्यासाठीही चांगले होईल कारण तुम्हाला सगळ्यांना खरे बोलावे लागेल. मला समोर काही तरुण दिसत आहेत, सांगा, पांढरा शर्ट घातलेले गृहस्थ काही बोलत आहेत.

विद्यार्थी 1 : सर, आई इथे नाही, मात्र ती आणि मी जेव्हा एकत्र बसतो तेव्हा ती सांगत असते,  मोदीजी करून दाखवतील, मोदीजी करतील, चिंता करू नको आणि जसजसे लॉकडाउन मध्ये राहत होतो तेव्हा दाढी देखील वाढायची, तेव्हा आई म्हणायची अशी वाढवून काय करणार, मी म्हटले की आई, तसाही मी मोदीजींचा चाहता आहे त्यामुळे अशीच दाढी वाढवून ठेवेन.

विद्यार्थी  2 : सर , माझे नाव शिवांजलि अग्रवाल आहे, सर मी केंद्रीय विद्यालय, जेएनयू, नवी दिल्‍लीची विद्यर्थिनी आहे. सर, मला हे सांगायचे आहे की परीक्षा आता रद्द झाल्या आहेत, त्यामुळे आम्हाला जेवढा अतिरिक्त वेळ मिळाला आहे त्याचा उपयोग मी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी, आपल्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी करेन आणि सर, परीक्षा रद्द केल्याबद्दल तुमचे खूप-खूप धन्‍यवाद.

मोदीजी : अच्‍छा तुम्ही सगळे असे करा, एका कागदावर नंबर लिहून बसा, म्हणजे मी जेव्हा एखादा नंबर बोलेन, तेव्हा त्या नंबरला मी लगेच बोलवेन. नाहीतर काय होतंय कि मला तुमचे नाव माहित नाही कारण मी अचानक आलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला असाच त्रास देत आहे.

पालक  : नमस्कार सर ! मी तुमचा फार मोठा चाहता आहे. तुम्ही जो काही निर्णय घ्याल, तो मुलांच्या हितासाठीच असेल. आम्ही तुमच्यासोबत आहोत सर, कायम तुमच्याबरोबर राहू.

मोदीजी : नंबर एक ?

पालक  : नमस्‍कार सर! तुम्हाला खूप-खूप धन्यवाद. आमच्या मुलांसाठी तुमचा निर्णय खूपच चांगला होता, आता त्यांच्याकडे ...

 

मोदीजी : मी आताच सगळ्यांना सांगितले की तुम्ही या निर्णयातून बाहेर पडा, परीक्षांमधून बाहेर पडा. दुसरे वेगळे काही बोलू शकतो का ?

पालक  : नक्कीच  सर, ! आणि छान बोलायचे तर शाहरूख खानला भेटून एवढा आनंद झाला नाही जेवढा आज तुम्हाला भेटून झाला, सर. माझे स्वप्न साकार झाले. आणि ते खूप छान होते सर, तुम्ही सर्वोत्तम आहात आणि आता आमच्या मुलांसाठी जो आगामी काळ आहे त्यासाठी आमची हीच इच्छा असेल की त्यांनी वेळेचा  सदुपयोग करावा आणि चांगल्या रीतीने भविष्यात आपली कारकीर्द घडवावी.

मोदीजी : 26

विद्यार्थी   : सर, एक नृत्यांगना म्हणून मला वाटते की मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी मी नृत्य करते. तर मी कथ्थक नृत्य करते. जेव्हा सायकल चालवावीशी वाटते तेव्हा सायकल चालवते आणि तुमचा  निर्णय आल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट मी केली ती म्हणजे मी बारा वाजेपर्यंत झोपले कारण परीक्षांमुळे सकाळी आठ वाजता उठावे लागत होते, त्यामुळे मी त्या दिवशी बारा वाजेपर्यंत झोपले होते सर.

विद्यार्थी  : सर माझे नाव .....मी तामिळनाडूचा आहे सर ! सर, मला माहित होते की बोर्डाची परीक्षा रद्द होईल, त्यामुळे मी खूप कमी अभ्यास करत होतो. तसे पाहिले तर आम्ही राजस्‍थानचे आहोत मात्र तामिळनाडूमध्ये राहतो.

 

मोदीजी : म्हणजे तुम्ही ज्योतिषशास्त्र देखील शिकता, तुम्हाला समजते ज्योतिषशास्त्र ? मग हे कसे कळले की असे होणार आहे ?

विद्यार्थी  : हो सर! असाच अंदाज बांधला होता आणि चांगला निर्णय होता ... कुटुंबियांबरोबर छान वेळ घालवता आला लॉकडाउनमुळे.

 

मोदीजी : आठवड्याभरात घरातले सगळे नाराज होतील बघा. तू हे करत नाहीस, तू लवकर उठत नाहीस, चल अंघोळ कर, तू आंघोळ करत नाहीस, तुझे बाबा यायची वेळ झाली, आता चांगला ओरडा पडणार आहे, बघ.

विद्यार्थी  : नमस्कार  सर ! माझे नाव तमन्‍ना आहे, मी डीएवी मॉडल स्‍कूल, प. बंगाल मधील आहे. जसे तुम्ही सांगितले आमच्याकडे खूप वेळ आहे, तर मी आणि माझ्या मैत्रिणीने लॉकडाउन काळात एक youtube channel सुरु केले होते, त्याकडेही लक्ष देऊ शकतो. आणि त्याचबरोबर मी ...

मोदीजी : काय नाव आहे ? Youtube channel चे नाव काय आहे ?

विदयार्थी  : tamannasharmilee… त्यावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकतो. आम्ही एक छोटीशी कविता केली होती, त्यावर देखील व्हिडिओ टाकला आहे.  एक लघुपट आहे, तो देखील टाकला आहे.

मोदीजी : 21, हां, बोल  बेटा!

विद्यार्थी  : सर , माझी आजी आणि माझे बाबा माझ्यासोबत आहेत.

पालक  : सर,  तुम्ही देशासाठी जे काही केले आहे त्याबद्दल तुमचे खूप-खूप धन्यवाद . माझ्याकडे आणखी काही बोलायला शब्द नाहीत. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात जे काही केले त्यासाठी खूप-खूप आभार.

विद्यार्थी  : सर, माझ्यापेक्षा माझी आजी नेहमी सगळ्या घडामोडींबाबत अवगत असते. तुमची प्रत्येक बातमी पाहते आणि मला सांगत असते की आज ही घोषणा झाली, आज असे झाले. ती तुमची खूप मोठी चाहती आहे .

मोदीजी : अच्‍छा , आजीला राजकारणातले सगळे माहित आहे ?

विद्यार्थी  : हो सर! आजीला राजकारणातले सगळे समजते. तिला राजकारणासंबंधी सगळ्या बातम्या माहित असतात.

 

मोदीजी : अच्‍छा , यंदा स्वातंत्र्य प्राप्तीचे पंचाहत्तरावे वर्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता तिथे काय घटना घडली होती ? स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी काय घडले होते ? यावर तुम्ही एक खूप छान निबंध लिहू शकाल का ?

विद्यार्थी  : हो  सर! नक्कीच लिहू शकतो.

 

मोदीजी : संशोधन कराल ?

विद्यार्थी  : हो सर !

 

मोदीजी : नक्की ?

विदयार्थी  :  हो सर !

 

मोदीजी : चला खूप छान !

पालक  : सर, मी तुमची खूप मोठी चाहती आहे.  सर , तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो खूप योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. तुम्ही सर्व मुलांचा विचार केलात हे खूप आवडले सर. तुम्ही काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केले होते , ते देखील खूप आवडले होते , सर , खूप छान निर्णय होता तो.

 

मोदीजी : धन्‍यवादजी!

विद्यार्थी  : सर , हे माझे आई वडील आहेत.

 

मोदीजी : त्यांना सर्वांना समजले की तुम्ही मला काय-काय सांगितले आहे, आता तुमच्याकडून जाणून घ्यावे लागेल.

पालक  : सर , मला काही सांगायचे आहे.  सर , तुमच्या सगळ्या गुणांचा खूप आदर करतो, मात्र तुमचा प्रामाणिकपणा सर्वात जास्त भावतो.  सर , एक विनंती आहे तुम्हाला, अजूनही आपल्या भारत देशात जे प्रामाणिकपणे काम करू इच्छितात त्यांचे खूप शोषण होते  सर. यासाठी असे काही धोरण बनवा जेणेकरून त्या लोकांना सन्मान मिळेल आणि त्यांचा प्रामाणिकपणा पाहून मुले त्यांचे अनुकरण करतील, इतर लोक अनुकरण करतील.

 

मोदीजी : धोरण तर बनत असतात मात्र काही लोकांचा हेतू यात अडथळा निर्माण करतो. आपण सर्वांनी मिळून जर  वातावरण तयार केले तर नक्की होईल. सगळे चांगले होऊ शकते.

मोदीजी : 31?

विद्यार्थी  : जय हिंद सर!

 

मोदीजी : जय हिंद ! हं , बोल  बेटा , तुला काय सांगायचे आहे ?

विद्यार्थी  : सर , माझे नाव अरनी सामले आहे, मी  Annie Besant School, इंदूर येथील आहे.  सर , आता जो निर्णय तुम्ही घेतला तो चांगलाच होता, त्याशिवाय देखील ...

 

मोदीजी : तुमचे इंदूर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

विद्यार्थी  : Cleanliness स्‍वच्‍छता !

 

मोदीजी :  इंदूरने ज्याप्रकारे स्वच्छतेच्या बाबतीत  कमाल केली आहे त्याची सगळीकडे खरंच चर्चा होत आहे. हा नंबर पूर्ण दिसत नाही बेटा, तुझा नंबर पाच आहे का ?

विद्यार्थी  : नमस्‍कार सर ! सर , मी जवाहर नवोदय विद्यालय, मंडी, हिमाचल प्रदेश मधील आहे.  सर , माझे बाबा तुमचे खूप मोठे चाहते आहेत.

 

मोदीजी : हे तुमचे गाव कुठे येते ?

पालक  : हिमाचल प्रदेशजवळ मंडी जिल्हा आहे. मंडी पासून जवळ आहे , आठ-नऊ किलोमीटर... आणि कसे आहात ?

 

मोदीजी : मी ठीक आहे.  पूर्वी मला तुमच्याकडची सेवबाडी खायला मिळायची.

चला तर मग, मला खूप छान वाटले, तुम्हा सगळ्यांशी बोलण्याची मला संधी मिळाली आणि माझा हा विश्‍वास आणखी दृढ झाला की भारताचा युवक सकारात्मक देखील आहे आणि व्यावहारिक देखील आहे. नकारात्मक विचारांऐवजी तुम्ही लोक प्रत्येक संकट आणि आव्हान यांनाही आपली ताकद बनवता. हे आपल्या देशातील युवकांचे वैशिष्ट्य आहे.  घरी राहून तुम्ही सर्व युवकांनी जे नावीन्यपूर्ण संशोधन केले आहे , जितक्या नवनवीन गोष्टी शिकल्या आहेत , त्यातून तुमच्यामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आणि मी पाहत होतो , आज तर मी अचानक आलो, तुम्हाला तर माहीतच नव्हते , मात्र तरीही तुम्ही बोलताना अजिबात अडखळला नाहीत , जसे तुम्ही रोज तुमच्या शिक्षकांशी , तुमच्या पालकांशी रोज बोलता , तसेच माझ्याशीही बोललात. हा जो आपलेपणा आहे ना , तो माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. माझ्यासाठी हा अनुभव खूप आनंददायी आहे की माझ्या देशातील कानाकोपऱ्यात बसलेल्या या मुलांबरोबर मी इतक्या सहजतेने गप्पा मारू शकतो. नाहीतर कधीकधी काय होते , ती एकदम घाबरून जातात, अरे तुम्ही आहात , मग ती बोलतच नाहीत. मात्र मी पाहत आहे की तुम्ही सगळे काहीही न विसरता मोठ्या विश्वासाने बोलत आहात. माझ्यासाठी हा खूप छान अनुभव आहे.

 

मित्रांनो,

तुमचे अनुभव आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तुमच्या खूप उपयोगी पडणार आहेत. जर सर्वात कठीण काळ असेल, तर तो पुन्हा-पुन्हा आठवून रडण्या -ओरडण्यामध्ये वेळ घालवू नका , कठीण संकटातूनही काही तरी शिकला असाल, त्यातून शिकत पुढे वाटचाल सुरु ठेवा, तुम्हाला मोठे बळ मिळेल. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात जाल, तिथे खूप काही नवे करून दाखवू शकाल. तुम्ही पाहिले असेल, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्यें आपल्याला संघभावनेबाबत वेळोवेळी सांगितले जाते, शिकवले जाते. एकीच्या बळाचे संदर्भ आपल्याला दिले जातात. मात्र कोरोना संकटाच्या काळात आपल्याला हे संदर्भ जवळून पाहण्याची, समजण्याची, जगण्याची एक प्रकारे संधी मिळाली आहे. कशा प्रकारे आपल्या समाजात प्रत्येकाने एकमेकांना साथ दिली, कशा प्रकारे देशाने एवढ्या मोठ्या आव्हानाचा सामना केला, हे सगळे आपण अनुभवले आहे. लोक सहभाग आणि सांघिक कृतीचा हा अनुभव तुम्हालाही एक नवी ताकद देईल असा मला पक्का विश्वास आहे.

 

मित्रांनो,

अत्यंत कठीण काळातही जेवढे आपल्या देशाचे, आपण  इतिहास पाहिला तर लक्षात येईल, यावेळीही, मी जेव्हा जेव्हा कुणाशी बोलतो, जसे आता एक मुलगी सांगत होती की तिने तिच्या कुटुंबातील दोन सदस्य गमावले आहेत. ही आयुष्यातील छोटी गोष्ट नाही. मात्र तरीही तिच्या डोळ्यात  एक विश्‍वास दिसत होता. सगळ्यांना वाटत आहे, ठीक आहे, संकट आले आहे, मात्र आपण नक्कीच विजयी होऊन बाहेर पडू. प्रत्येक भारतीयाच्या तोंडून हाच आवाज निघत आहे, ही जागतिक महामारी आहे, संपूर्ण शतकात कधीही असे संकट आले नाही, मागच्या चार-पाच पिढ्यांमध्ये कुणीही ऐकलेले नाही, कुणीही पाहिलेले नाही, असे आपल्या कालखंडात घडले आहे. मात्र तरीही प्रत्येक भारतीयाच्या तोंडून एकच आवाज बाहेर पडतो, आपण यावरही मात करू, आपण यातूनही बाहेर पडू आणि नव्या ऊर्जेने देशाला पुढे घेऊन जाऊ आणि एकत्रितपणे पुढे जाणे हाच तर आपला संकल्प आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही यापुढे जिथे कुठे जाल याचप्रमाणे एकमेकांच्या बरोबरीने पुढे जाल आणि देशाला नव्या उंचीवर घेऊन जाल.

आणि जसे मी म्हटले, पाच जून पर्यावरण दिन आहे, पर्यावरणासाठी काही ना काही करा कारण या पृथ्‍वीचे, पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे एकवीस जून, आठवतंय ना आंतरराष्ट्रीय  योग दिन आहे आणि संयुक्त राष्ट्रात हे जेवढे निर्णय झाले आहेत ना, हा योग दिन असा आहे ज्याला जगातील सर्वाधिक देशांनी पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रात बहुतेक सर्व देशांनी याचे समर्थन केले, पूर्वी कधी असे घडले नव्हते. तर या योगदिनी तुम्ही देखील तुमच्या कुटुंबियांबरोबर अवश्य योगाभ्यास करा. क्रीडा क्षेत्रात खूप सामने होणार आहेत, ऑलिम्पिक आहे, आपल्या देशातील कोणते नवोदित खेळाडू यावेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत ते जाणून घ्या.  ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी किती मेहनत केली आहे, कशा कठीण परिस्थितीतून ते पुढे आले आहेत हे जाणून घेतल्यावर आपल्याला एक नवी प्रेरणा मिळते,  एक नवी ताकद  मिळते. आणि म्हणूनच मला विश्‍वास आहे की तुम्ही सर्व युवक या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग कराल.

या कोरोना काळात लसीकरण करायचे आहे, तुमच्या कुटुंबात देखील काही लोक असतील, त्यांची नोंदणी करण्याचे काम तुम्ही करू शकता. आजूबाजूच्या लोकांची नोंदणी करून द्या. आणि जसजशी लस उपलब्ध होईल तसतसे लोकांचे लसीकरण केले जाईल. तर सेवाभावनेतून कुठल्या ना कुठल्या कामाशी अवश्य जोडून घ्या.  तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप शुभेच्छा. तुमच्या आईवडिलांचा तुमच्यावर आशीर्वाद कायम राहो. तुम्ही तुमची स्वप्ने घेऊन जगा आणि ती स्वप्ने पूर्ण होताना तुमच्या आईवडिलांना तुमचा अभिमान वाटेल असा मला पूर्ण विश्‍वास आहे. मला खूप छान वाटले, मी अचानक तुमच्यामध्ये सामील झालो. तुम्ही हसतखेळत गप्पा मारत होतात, विनोद सांगत होतात, मात्र मी मध्येच येऊन तुम्हाला थोडे थांबवले. मात्र मला खूप छान वाटले. मी तुमचा खूप  आभारी आहे.

खूप-खूप  धन्‍यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi

Media Coverage

Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government