“Rashtrapati Ji's address emphasized India's burgeoning confidence, promising future and immense potential of its people”
“India has come out of the days of Fragile Five and Policy Paralysis to the days of being among the top 5 economies”
“Last 10 years will be known for the historic decisions of the government”
“Sabka Saath, Sabka Vikas is not a slogan. It is Modi's guarantee”
“Modi 3.0 will leave no stone unturned to strengthen the foundations of Viksit Bharat”

माननीय सभापती,

माननीय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होण्यासाठी मी येथे उपस्थित आहे. आणि मी आदरणीय राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणाबद्दल त्यांचे आदरपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो.

माननीय सभापती,

यंदाचा 75 वा प्रजासत्ताक दिन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, आणि राज्यघटनेच्या प्रवासातील या महत्त्वाच्या टप्प्यावरील राष्ट्रपतींच्या भाषणालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि आपल्या भाषणात त्या भारताच्या आत्मविश्वासाबाबत बोलल्या आहेत, भारताच्या उज्ज्वल भविष्याप्रति  विश्वास व्यक्त केला आहे आणि भारतातील कोट्यवधी लोकांची क्षमता अगदी मोजक्या शब्दात, परंतु अतिशय प्रभावी पद्धतीने देशासमोर सदनाच्या माध्यमातून मांडली आहे. या प्रेरणादायी भाषणाबद्दल आणि देशाला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि विकसित भारताचा संकल्प आणखी बळकट केल्याबद्दल मी राष्ट्रपतींचे मनःपूर्वक आभार मानतो.

चर्चेदरम्यान अनेक सन्माननीय सदस्यांनी आपले विचार मांडले आणि आपापल्या परीने चर्चेत मोलाची भर घालण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी ही चर्चा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व आदरणीय सहकाऱ्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. टीका करणे आणि कडवट बोलणे हा, काही सहकाऱ्यांचा नाईलाज होता, त्यांच्याबद्दलही मी सद्भावना व्यक्त करतो. त्यादिवशी मी सांगू शकलो नाही, पण मी खर्गेजींचे विशेष आभार मानतो. मी खर्गेजींचे म्हणणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होतो आणि मला जो आनंद वाटत होता, तसा आनंद फार कमी वेळा अनुभवायला मिळतो. कधी-कधी लोकसभेत मिळतो, पण हल्ली ते इतर कामात व्यस्त असल्यामुळे करमणूक कमी होते. पण त्या दिवशी लोकसभेत ज्या मनोरंजनाची उणीव भासली होती ती तुम्ही पूर्ण केलीत. आणि मला आनंद वाटतो, की माननीय खर्गेजी खूप वेळ बोलत होते, अगदी निवांतपणे, शांतपणे आणि आनंदाने, त्यांना पुरेसा वेळही मिळाला होता. तेव्हा मला प्रश्न पडत होता की हे स्वातंत्र्य कसे मिळाले, इतके बोलण्याचे स्वातंत्र्य कसे मिळाले? मी याबद्दल विचार करत होतो, पण नंतर माझ्या मनात आले की दोन खास कमांडर असतात, ते त्या दिवशी नव्हते, सध्या ते नाहीत. आणि म्हणूनच आदरणीय खर्गेजींनी स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेतला. आणि मला वाटते, खर्गेजींनी सिनेमामधील एक गाणे ऐकले असेल, ऐसा मौका फिर कहां मिलेगा.. आता खर्गे जी एम्पायरही नाहीत, ते कमांडोही नाहीत, त्यामुळे चौकार-षटकार मारण्यात मजा येत होती. पण एका गोष्टीचा आनंद वाटतो, तो म्हणजे त्यांनी एनडीएच्या 400 जागांसाठी आशीर्वाद दिले होते, आणि मी खरगेजींचा हा आशीर्वाद शिरोधार्य मानतो. आता जर तुम्हाला आशीर्वाद परत घ्यायचे असतील तर तुम्ही ते परत घेऊ शकता कारण आम्ही तर आलेलो आहोत

माननीय सभापती,

गेल्या वर्षीचा तो प्रसंग मला चांगला लक्षात आहे, आपण त्या सदनात बसायचो, त्यावेळी देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आवाज बंद करण्याचा मोठा प्रयत्न केला गेला होता. आम्ही मोठ्या धैर्याने, मोठ्या नम्रतेने तुमचा एकेक शब्द ऐकत राहिलो. आणि आजही तुम्ही न ऐकण्याच्या तयारीने आले आहात, तुम्ही न ऐकण्याच्या तयारीने आले आहात, पण माझा आवाज बंद करू शकणार नाही. देशाच्या जनतेने या आवाजाला ताकद दिली आहे. देशाच्या जनतेच्या आशीर्वादाने हा आवाज ऐकू येत आहे आणि म्हणूनच या वेळी मीही मोठ्या तयारीने आलो आहे. मी विचार केला होता की, तुमच्यासारखी व्यक्ती या सदनात आली आहे, तर मर्यादांचे पालन करेल, पण दीड-पावणे दोन तास तुम्ही सर्वांनी माझ्यावर केवढा घणाघात केला होता. पण त्या नंतरही मी मर्यादा सोडून एकही शब्द उच्चारला नाही.

माननीय सभापती,

माझी एक विनंती आहे. तुम्ही विनंती करू शकता, मी तर करतच असतो. पश्चिम बंगालमधून तुम्हाला मिळालेले आव्हान म्हणजे, काँग्रेस चाळीशी पार करू शकणार नाही. मी प्रार्थना करतो की तुम्ही 40 जागा तरी वाचवाव्यात.  

माननीय सभापती,

आम्हाला नेहमीच ऐकून घ्यावे लागले आहे. लोकशाहीत आपल्याला बोलायचा अधिकार आहे आणि आपली ऐकण्याची जबाबदारीही आहे. आणि आज जे काही घडले आहे ते मी देशासमोर ठेवले पाहिजे आणि म्हणूनच मी तो प्रयत्न करत आहे.

माननीय सभापती,

जेव्हा मी हे ऐकतो, तिथे ऐकतो, इथेही ऐकतो, तेव्हा पक्ष, विचारांनीही कालबाह्य झाल्याचा माझा विश्वास पक्का होतो. आणि विचार जुना झाला आहे, तेव्हा त्यांनी आपले कामही  इतरांकडून करून घ्यायला सुरुवात केली आहे. बघता बघता एवढा मोठा पक्ष, एवढी दशके देशावर राज्य करणारा पक्ष, एवढे अधःपतन, एवढी घसरण, आम्हाला याचा खेद वाटतो, आमची तुम्हाला सहानुभूती आहे. पण यावर डॉक्टर काय करणार, रुग्णच जर.. आणखी काय बोलू.

माननीय सभापती,

ही गोष्ट खरी आहे की, आज मोठमोठ्या गोष्टी बोलल्या जातात, आपण ऐकण्याची क्षमताही गमावली आहे, पण देशासमोर या गोष्टी मांडण्यासाठी मी जरुर बोलेन. ज्या कॉंग्रेसने सत्तेच्या लालसेमध्ये उघडपणे लोकशाहीचा गळा घोटला, ज्या काँग्रेसने कित्येकदा लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे एका रात्रीत बरखास्त करून टाकली, ज्या काँग्रेसने देशाचे संविधान आणि लोकशाहीची प्रतिष्ठा तुरुंगात कोंडली... ज्या काँग्रेसने वृत्तपत्रांनाही टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला होता, त्या काँग्रेसने आता देश तोडण्यासाठी कथानके रचण्याचा नवा छंद जोपासला आहे. हेही कमी नाही, आता उत्तर-दक्षिण फूट पाडण्याची विधाने केली जात आहेत? आणि ही काँग्रेस आपल्याला लोकशाही आणि संघराज्य यावर व्याख्याने देत आहे?

माननीय अध्यक्ष महोदय,

ज्या काँग्रेसने जातपात आणि भाषेच्या नावावर देशाचे विभाजन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, ज्या काँग्रेसने स्वत:च्या हितासाठी दहशतवाद आणि फुटीरतावाद वाढू दिला, ज्या काँग्रेसने ईशान्य भारताला हिंसाचार, फुटीरपणा आणि मागासलेपणाच्या खाईत लोटले, ज्या काँग्रेसच्या राजवटीत नक्षलवादाने देशाला मोठे आव्हान दिले, ज्या काँग्रेसने देशाचा प्रचंड भूभाग शत्रूंच्या हाती बहाल केला, ज्या काँग्रेसने देशाच्या लष्कराचे आधुनिकीकरण थांबवले, ती काँग्रेस आज राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षेवर आमच्या समोर भाषणे ठोकत आहे ?  उद्योग आवश्यक की शेती आवश्यक या संभ्रमात असलेली काँग्रेस स्वातंत्र्यानंतरही त्याच संभ्रमात राहिली.  राष्ट्रीयीकरण करायचे की खाजगीकरण हे ठरवू न शकणाऱ्या काँग्रेसचा गोंधळ उडत राहिला.  ज्या काँग्रेसने 10 वर्षात अर्थव्यवस्था 12 व्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर आणली,  10 वर्षात 12 व्या क्रमांकावरून 11 व्या क्रमांकावर!  आणि 12 वरून 11पर्यंत येण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही, तुम्ही जसजशी प्रगती कराल तशी मेहनत वाढत जाईल, आम्ही 10 वर्षात 5 व्या क्रमांकावर आलो, आणि ही काँग्रेस इथे आर्थिक धोरणांवर लांबलचक भाषणे देत आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

ज्या काँग्रेसने ओबीसींना संपूर्ण आरक्षण दिले नाही, ज्या काँग्रेसने सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना कधीही आरक्षण दिले नाही, ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न देण्याच्या योग्यतेचे मानले नाही, त्या काँग्रेसने बाबासाहेबांऐवजी आपल्याच कुटुंबाला भारतरत्न दिले.  ज्या काँग्रेसने देशातील रस्त्यांवर, गल्लोगल्ली, चौकाचौकात स्वत:च्याच कुटुंबाच्या नावाने उद्याने उभारली, ती काँग्रेस आम्हाला उपदेश करत आहे?हे आम्हाला सामाजिक न्यायाचे धडे देत आहेत?

माननीय अध्यक्ष महोदय,

आपल्या नेत्याची हमी नसलेली आणि धोरणाची हमी नसलेली काँग्रेस मोदींच्या हमीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

येथे एक तक्रार होती आणि त्यांना वाटते की आम्ही असे का म्हणतो, आम्ही असे का पहात आहोत.  त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाकडे देश आणि जगाने असे का पाहिले, देश का नाराज झाला, देश इतका संतप्त का झाला, आदरणीय अध्यक्ष महोदय, सर्व काही आमच्या बोलण्याने झालेले नाही, स्वतःच्या कृतीचे फळ आता तर समोर दिसत आहे.  इतर कोणत्याही जन्मात नाही, तर  याच जन्मात बघायचे आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

आम्ही कुणाला वाईट बोलत नाही, वाईट का बोलू, लोकांनी त्यांनाच खूप काही सांगितले असेल तर मला सांगायची काय गरज आहे.  मी एक प्रकारे एक विधान सभागृहासमोर मांडू इच्छित आहे.  मी पहिला उद्गार वाचत आहे – सदस्यांना माहीत आहे, हे एक अवतरण आहे, सदस्यांना माहीत आहे की आपली वाढ मंदावली आहे आणि वित्तीय तूट वाढली आहे, गेल्या 2 वर्षांपासून महागाईचा दर सतत वाढत आहे.  चालू खात्यातील तूट आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे.  मी हे अवतरण वाचले आहे.  हे कोणत्याही भाजपा नेत्याचे  नाही. हे  माझे देखील नाही.

माननीय अध्यक्ष महोदय,

यूपीए सरकारच्या 10 व्या वर्षपूर्तीवर  आदरणीय तत्कालीन पंतप्रधान श्री मनमोहन सिंगजी यांनी असे सांगितले होते आणि आपल्याच कार्यकाळात सांगितले होते.  ही स्थिती होती, त्यांनी वर्णन केले होते.

माननीय अध्यक्ष महोदय,

आता मी दुसरे अवतरण वाचतो, दुसरे अवतरण वाचतो – देशात मोठ्या प्रमाणावर संताप आहे, सार्वजनिक पदाच्या गैरवापराबद्दल प्रचंड संताप आहे, संस्थांचा कसा दुरुपयोग झाला,  त्यावेळीही मी हे सांगितले नाही,   देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सांगत होते.  त्यावेळी भ्रष्टाचाराबाबत संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता, प्रत्येक गल्लीबोळात आंदोलने सुरू होती.  आता मी तिसरे अवतरण वाचणार आहे - एका सुधारणेच्या अनुषंगाने काही ओळी आहेत, हे देखील ऐका - कर संकलनात भ्रष्टाचार आहे, यासाठी जीएसटी आणला पाहिजे, रेशन योजनेत अपहार आहे, यामुळे देशातील गरिबातील गरिबांना याचा सर्वाधिक त्रास होतो, हे थांबवण्यासाठी उपाय शोधावे लागतील.  सरकारी कंत्राटे ज्या पद्धतीने दिली जात आहेत, त्याबाबत शंका आहे. हे सुध्दा तत्कालीन पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी यांनीच सांगितले होते.  आणि त्याआधी दुसऱ्या पंतप्रधानांनी सांगितले होते की दिल्लीतून एक रुपया जातो आणि तिथे लोकांपर्यंत 15 पैसे पोहोचतात.  सुधारणा करायची होती, रोग माहीत होता, सुधारण्याची मात्र तयारी नव्हती आणि आज मोठमोठ्या गोष्टी बोलल्या जात आहेत.  काँग्रेसचा 10 वर्षांचा इतिहास बघा, जगातील पाच तोळामासा अर्थव्यवस्थांमध्ये भारत असे म्हटले जात होते…., मी नाही, जग म्हणत होते….पाच दुबळ्या अर्थव्यवस्था. धोरणाचा पांगुळगाडा  ही तर त्यांची ओळख बनली होती.  आणि आमची 10 वर्षे पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये स्थान बाळगून आहेत.  ही 10 वर्षे आमच्या मोठ्या आणि निर्णायक निर्णयांसाठी लक्षात राहतील.

माननीय अध्यक्ष महोदय,

खूप मेहनतीने आणि विचारपूर्वक देशाला त्या कठीण काळातून बाहेर काढले आहे.  हा देश काही असा उगाच आशीर्वाद देत नाही.

माननीय अध्यक्ष महोदय,

इथे सभागृहात इंग्रजांची आठवण काढली गेली.  आता राजे-महाराजांचे त्याकाळी इंग्रजांशी घट्ट नाते होते, त्यामुळे आता मला विचारायचे आहे की इंग्रजांकडून प्रेरणा कुणी घेतली होती? मी असे तर नाही विचारणार  की  काँग्रेस पक्ष कुणी जन्माला घातला…..  मी नाही विचारणार हे! स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता कुणी वाढवली? जर तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता, तर तुम्ही इंग्रजांनी बनवलेल्या दंड संहितेत का बदल केला नाही?

माननीय अध्यक्ष महोदय,

जर तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर मग ब्रिटीशकालीन शेकडो कायदे का सुरुच राहिले?  तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर इतक्या दशकांनंतरही लाल दिव्याची संस्कृती का सुरू राहिली?  जर तुमच्यावर ब्रिटीशांचा प्रभाव नव्हता तर भारताचा अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता का यायचा… कारण त्याच वेळी इंग्लंडमध्ये सकाळची वेळ असायची आणि ब्रिटिश संसदेचे कामकाज तेव्हाच सुरु व्हायचे म्हणून?  ब्रिटनच्या संसदेला साजेशी वेळ म्हणून संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा का सुरू ठेवली?

इंग्रजांपासून कोण प्रेरित होते. जर तुम्ही इंग्रजांपासून प्रेरित नव्हतात तर आपल्या सेनादलांच्या ध्वजांवर आजपर्यंत गुलामीची प्रतीके का मिरवत राहिली होती? आम्ही अशा प्रतीकांना एकामागून एक काढून टाकत आहोत. जर तुम्ही इंग्रजांपासून प्रेरित नव्हतात तर राजपथाला कर्तव्य पथात रुपांतरीत करण्यासाठी देशाला मोदींची वाट का पहावी लागली.

आदरणीय सभापति महोदय,

जर तुम्ही इंग्रजांपासून प्रेरित नव्हतात तर अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांवर आज देखील इंग्रजी सत्तेच्या खुणा का राहिल्या आहेत?

आदरणीय सभापति महोदय,

जर तुम्ही इंग्रजांपासून प्रेरित नव्हतात तर या देशाच्या सेनेचे सैनिक देशासाठी प्राणांचे बलिदान देत राहिले पण देशाच्या त्या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी तुम्ही एक युध्द स्मारक देखील उभारू शकला नाहीत, का नाही उभारू शकलात? जर तुम्ही इंग्रजांपासून प्रेरित नव्हतात तर भारतीय भाषांना कमी दर्जाच्या का लेखल्यात? स्थानिक भाषांप्रती तुम्ही इतके उदासीन का होतात?

आदरणीय सभापति महोदय,

जर तुम्ही इंग्रजांपासून प्रेरित नव्हतात तर भारताला लोकशाहीची जननी म्हणून संबोधण्यापासून तुम्हाला कोण थांबवू शकत होते? तुम्हाला हे कधीच का जाणवले नाही की जगात आपला देश महान आहे. आदरणीय सभापति महोदय, मी शेकडो उदाहरणे देऊ शकतो की हे लोक कोणाच्या प्रभावाखाली काम करत होते, आणि देशातील जनतेला हे ऐकताना ह्या सर्व गोष्टींचे स्मरण होणार आहे.

आदरणीय सभापति महोदय,

मी आणखी एक उदाहरण देऊ इच्छितो. काँग्रेसने अशा अनेक कथा पसरवल्या आणि त्यांचा परिणाम काय झाला, तर भारतीय संस्कृती आणि संस्कार महत्त्वाचे मानणाऱ्या लोकांकडे अत्यंत तुच्छतेने पाहिले जाऊ लागले, तसेच या लोकांना पुराणमतवादी मानले जाऊ लागले. आणि अशा प्रकारे आपल्या भूतकाळावर अन्याय होऊ लागण्याची वेळ आली. तुम्ही तुमच्या श्रद्धांना नावे ठेवत असाल, तुमच्या चांगल्या परंपरांना वाईट म्हणत असाल तरच तुम्ही पुरोगामी आहात अशा पद्धतीच्या गोष्टींचा प्रसार देशात होऊ लागला. आणि याचा उगम कुठे होता हे तर जग चांगल्या प्रकारे जाणते. अनेक गोष्टी परदेशातून आयात करणे, अशा गोष्टींचा अभिमान बाळगणे आणि भारतात एखादी गोष्ट तयार झाली असेल तर ती कमी दर्जाची आहे असे मानणारे वातावरण निर्माण करून ठेवले होते. मेड इन फॉरीन म्हणजेच परदेशात निर्मित वस्तू वापरणे हा स्टेटस सिम्बॉल करून टाकला होता. हे लोक आजही व्होकल फॉर लोकलची बाजू घेत नाहीत, खरेतर ही माझ्या देशातील गरिबांच्या हिताची संकल्पना आहे. आज आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेबद्दल या लोकांच्या तोंडातून शब्द फुटत नाही. आज कोणी मेक इन इंडियाचे नाव काढले तर यांच्या पोटात गोळा येतो.

आदरणीय सभापति महोदय,

देश हा सर्व प्रकार पाहत आहे आणि देशाला सर्व कळून चुकले आहे आणि त्याचे परिणाम आज तुम्ही भोगत देखील आहात.

आदरणीय सभापति महोदय,

राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात केवळ चार सर्वात मोठ्या जातींविषयी आपल्या सर्वांना संबोधित केले, युवक, महिला, गरीब आणि आपले अन्नदाते शेतकरी. आपणा सर्वांना हे माहित आहे या चारही वर्गांच्या समस्या बहुतांश समान आहेत, त्यांची स्वप्ने देखील एकसमान आहेत आणि त्यांची पूर्तता करायची असेल तर, थोड्या बहुत फरकाने या चारही वर्गांच्या कल्याणाचे मार्ग देखील एकच प्रकारचे आहेत. आणि म्हणूनच राष्ट्रपतींनी देशाला अत्यंत उपयुक्त  मार्गदर्शन केले आहे की हे चार स्तंभ सशक्त करा, म्हणजे देश विकसित भारताच्या उभारणीच्या दिशेने जलदगतीने वाटचाल करेल.

आदरणीय सभापति महोदय,

आपण जर एकविसाव्या शतकात असू आणि विकसित भारताच्या स्वप्नांना आपण याच शतकात 2047 पर्यंत पूर्ण करू इच्छित असू तर विसाव्या शतकातील विचार चालणार नाहीत. विसाव्या शतकातील स्वार्थी विचारसरणी, ‘मी आणि माझे’ची जी पद्धत आहे ती एकविसाव्या शतकात देशाला समृध्द, विकसित भारत म्हणून घडवू शकत नाही. गेल्या काही दिवसांत जातीची बरीच चर्चा सुरु आहे, काँग्रेसला अशी गरज का भासते आहे हे मला तरी समजत नाही. पण त्यांना जर गरज लागलीच आहे तर त्यांनी आधी जरा स्वतःकडेच डोळे उघडून पहावे म्हणजे त्यांना कळेल की त्यांनी काय केले आहे. काँग्रेसवाले तर मुळापासून दलित, मागासलेले आणि आदिवासी यांचे सर्वात मोठे विरोधक आहेत आणि मला तर कधीकधी असे वाटते की जर बाबासाहेब नसते तर या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना आरक्षण मिळाले असते की नसते, हा प्रश्न  माझ्या मनात उभा राहतो.  

आदरणीय सभापति महोदय,

आणि मी असे म्हणतोय त्याला कारण माझ्याकडे पुरावा आहे. या लोकांचे हे विचार आजचे नाहीत, बऱ्याच काळापासूनचे आहेत याचा पुरावा आहे माझ्याकडे. आणि आदरणीय सभापति महोदय, आज मी येथे पुराव्याशिवाय काहीही बोलायला आलेलो नाही. आणि जर ते काही गोष्टी बोलणार असतील तर त्यांनी काही गोष्टी ऐकून घ्यायची देखील तयारी ठेवली पाहिजे आणि माझी तर या सगळ्याशी गेल्या दहा वर्षांत चांगलीच ओळख झाली आहे. मी गेल्या काही दिवसांमध्ये नेहरुजींची सतत आठवण काढत असतो कारण आमच्या सहकाऱ्यांची अशी अपेक्षा असते जरा त्यांना देखील सांगा कधी-कधी काही तरी बोला. आता असं बघा, एकदा नेहरुजींनी एक पत्र लिहिले होते.हे पत्र त्यांनी देशातील मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, मी त्याचे भाषांतर वाचून दाखवतो, त्यांनी लिहिले होते, या देशाचे पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यातर्फे त्या काळी देशातील मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेले पत्र आहे हे, अधिकृतरीत्या जाहीर झालेले पत्र आहे, मी त्याचे भाषांतर वाचून दाखवतो- मी कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला पसंती देत नाही आणि विशेष करून नोकऱ्यांमध्ये आरक्षण  देणे तर मला अजिबातच आवडत नाही. मी अशा कोणत्याही पद्धतीच्या विरुद्ध आहे जी अकुशलतेला प्रोत्साहन देते, दुय्यम दर्जाकडे घेऊन जाते. पंडित नेहरूंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे. आणि म्हणून मी म्हणतो की हे जन्मापासूनच आरक्षणाचे विरोधक आहेत. नेहरू म्हणत असत की जर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले गेले तर सरकारी कारभाराची पातळी खालावेल. आणि आज हे लोक जी आकडेवारी मांडतात ना, की इतके येथे आहेत, इतके तेथे आहेत, त्याचा उगम यात आहे. कारण त्यावेळी तर त्यांनी विरोध केला होता, भर्ती करूच नका. जर त्या वेळी सरकारमध्ये भर्ती झाली असती आणि ते पदोन्नती घेत घेत पुढे गेले असते तर आज येथे पोहोचले असते.

सभापति महोदय,

मी जो उतारा वाचून दाखवत आहे त्याची तुम्ही पडताळणी करून घेऊ शकता. मी पंडित नेहरू यांचे विचार वाचून दाखवत आहे.

आदरणीय सभापति महोदय,

तुम्हाला तर माहितच आहे की नेहरुजी जे म्हणतात ते काँग्रेससाठी नेहमीच काळ्या दगडावरची रेघ असते. नेहरूजी म्हणाले म्हणजे त्यांच्यासाठी ब्रह्मवाक्य. दिखावा करण्यासाठी तुम्ही काहीही म्हणा, पण तुमची ही विचार पद्धती अशा अनेक उदाहरणांनी सिद्ध होते. मला असंख्य उदाहरणे दिसत आहेत, पण मी तुम्हांला एक उदाहरण नक्की देऊ इच्छितो आणि ते उदाहरण मी जम्मू-काश्मीरचे देणार आहे.

काँग्रेसने जम्मू-काश्मीरमधल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना गेली सात दशके त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले. आम्ही किती जिंकणार त्याविषयी मी बोलत नाही आहे. कलम 370 रद्दबातल केले, तेव्हा कुठे जाऊन इतक्या दशकांनंतर एससी, एसटी, ओबीसींना ते अधिकार मिळाले, जे देशातील इतर लोकांना अनेक वर्षांपासून मिळाले होते. जम्मू काश्मीरमध्ये प्रिव्हेंशन ऑफ अॅट्रोसिटीज अॅक्ट नव्हता. आम्ही कलम 370 हटवून हे अधिकार त्यांना दिले. आपल्या एससी समुदायातही सर्वात मागे कोण राहिले असेल तर तो आपला वाल्मिकी समाज आहे. सात-सात दशके लोकांची सेवा करत जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या या समाजातील कुटुंबांनाही डोमिसाइलचा अधिकार देण्यात आला नाही. हे असे आहे. आज मला देशाला हीदेखील माहिती द्यायची आहे की स्थानिक शासन संस्थांमध्ये, इतर मागासवर्गीय आरक्षणाचे विधेयक काल 6 फेब्रुवारीला लोकसभेतही संमत झाले आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

एससी, एसटी, ओबीसी यांच्या मोठ्या भागीदारीचा काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांना नेहमीच त्रास झाला आहे. बाबासाहेबांच्या राजकारणाला, बाबासाहेबांच्या विचारांना संपवण्यासाठी यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. त्यासंबंधीचे

वक्तव्य उपलब्ध आहे, निवडणुकीत काय काय बोलले गेले ते देखील उपलब्ध आहे. त्यांना तर भारतरत्न देण्याची देखील यांची तयारी नव्हती. भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाले तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न मिळाले. इतकेच नव्हे, सीताराम केसरी या अतिमागास जातीतील काँग्रेस अध्यक्षांना फूटपाथवर फेकून देण्यात आले. सीताराम केसरी यांच्या बाबतीत काय झाले, तो व्हिडिओ उपलब्ध आहे. सगळ्या देशाने तो पाहिला आहे.

आणि आदरणीय अध्यक्ष महोदय,

यांचे एक मार्गदर्शक अमेरिकेत बसले आहेत. गेल्या निवडणुकीत जे झाले त्यासाठी ते फेसम झाले होते. काँग्रेसशी या कुटुंबाशी फारच जवळीक आहे. त्यांनी नुकताच संविधान निर्माते बाबा साहब आंबेडकर यांचे योगदान कमी लेखण्याचा बराच प्रयत्न केला.

आणि आदरणीय सभापती महोदय,

देशात पहिल्यांदाच एनडीएने एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवण्यासाठी प्रस्ताव दिला. त्यांना उमेदवार बनवले. तुमचे आमच्याबरोबर वैचारिक मतभेद असतील... खरेतर वैचारिक मतभेद ही एक गोष्ट झाली. तसे आमच्यासोबत खरेच वैचारिक मतभेद असते आणि तुम्ही आमच्यासमोर उमेदवार उभा केला असता, तर मी समजू शकत होतो, पण वैचारिक विरोध नव्हता, कारण आमच्याकडून गेलेली व्यक्ती तुम्ही उमेदवार म्हणून उभी केली. म्हणजेच वैचारिक विरोध नव्हता. तुमचा विरोध एका आदिवासी महिलेला होता आणि म्हणूनच हे संगमा महोदय निवडणूक लढवत होते. ते देखील उत्तर पूर्वेकडचे आदिवासी होते. त्यांच्यासोबतही हेच करण्यात आले. आणि आजपर्यंत अध्यक्ष महोदय, राष्ट्रपतींचा अपमान करण्याच्या प्रकारांमध्ये घट झालेली नाही. पहिल्यांदाच या देशात असे झाले आहे. त्यांच्या जबाबदार लोकांच्या तोंडून अशा एकेक गोष्टी बाहेर पडल्या आहेत, राष्ट्रपतींच्या बाबतीत अशी भाषा बोलली गेली आहे, की शरमेने मान खाली गेली पाहिजे. मनातली खदखद अशी ना तशी बाहेर पडत राहते. एनडीएमध्ये आम्हाला 10 वर्षे काम करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा दलितांना आणि आता आदिवासींना... आम्ही नेहमीच आमचे प्राधान्य कशाला आहे याची ओळख करून दिली आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

मी आमच्या सरकारच्या परफॉर्मन्स विषयी बोलतो. एनडीएच्या गरीब कल्‍याणाच्या धोरणांविषयी बोलतो. तुम्हालाही गरिबांबद्दल माहीत असेल. हे कोणत्या समाजाचे लाभार्थी आहेत? कोण आहेत? झोपडपट्ट्यांमध्ये कोणाला आयुष्य घालवावे लागत आहे? हे कोणत्या समाजातील लोक आहेत? ज्यांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे, व्यवस्थांपासून वंचित रहावे लागत आहे, असा हा कोणता समाज आहे? आम्ही जितके काम केले आहे ना, ते एससी, एसटी आणि ओबीसी तसेच आदिवासी याच समाजातील आहेत. कच्च्या घरांच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांपैकी कुणाला पक्के घर मिळाले असेल, तर ते माझ्या या समाजातील बंधूंना मिळाले आहे. त्यांना स्वच्छतेअभावी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत होते. त्यांना स्वच्छ भारत अभियानाचा लाभ देण्याचे काम अध्यक्ष महोदय आमच्या योजनांअंतर्गत मिळाले आहे, जेणेकरून त्यांना चांगले जीवन जगण्याची संधी मिळू शकेल. याच कुटुंबातील आमच्या माता-भगिनी धुरामध्ये स्वयंपाक करून करून आपल्या आरोग्याच्या संकटाचा सामना करत होत्या. आम्ही त्यांना उज्ज्वला गॅस दिला. त्या याच कुटुंबातील आहेत. मोफत रेशन असो, मोफत उपचार असोत, याचे लाभार्थी माझी हीच कुटुंबे आहेत. समाजाच्या या वर्गातील माझे जे कुटुंबीय आहेत, ज्यांच्यासाठी आमच्या सर्व योजना काम करत आहेत.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या ठिकाणी असे काही कथ्यकथन करण्यात आले.  वस्तुस्थिती अशा प्रकारे नाकारण्यामुळे कोणाचे भले होणार आहे? तुम्ही असे करून विश्वासार्हता,  प्रतिष्ठा गमावत आहात.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

येथे शिक्षणाची भ्रामक आकड़ेवारी मांडण्यात आली. दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. एससी, एसटी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत गेल्या 10 वर्षात वाढ झाली आहे. या 10 वर्षात शाळांमध्ये, उच्च शिक्षणात, नामांकनाच्या संख्येत देखील वाढ झाली आहे आणि शाळागळती अतिशय वेगाने कमी झाली आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

10 वर्षांपूर्वी 120 एकलव्‍य आदर्श शाळा होत्या, आदरणीय सभापती महोदय आज 400 एकलव्‍य आदर्श शाळा आहेत. या गोष्टी तुम्ही का नाकारत आहात? असे का करत आहात? मला ही गोष्टच कळत नाही.

अध्यक्ष महोदय,

पूर्वी 1 सेंट्रल ट्राइबल युनिवर्सिटी होती, आज 2 सेंट्रल ट्राइबल युनिवर्सिटी आहेत. आदरणीय अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे की प्रदीर्घ काळ दलित, मागास, आदिवासी मुले-मुली महाविद्यालयाचा दरवाजादेखील पाहू शकत नव्हते. मला आठवते की मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा चकित करणारे विश्लेषण माझ्यासमोर आले. गुजरातमध्ये उमरगांवचा संपूर्ण अम्‍बाजी पट्टा आदिवासी बहुल क्षेत्र आहे. आमच्या दिग्विजय सिंहजींचे जावई त्याच भागातील आहेत.  त्या संपूर्ण भागात विज्ञान शाखेची एक देखील शाळा नव्हती.  मी तिथे गेलो होतो. माझ्या आदिवासी बालकांसाठी विज्ञान शाखेची शाळा नसेल तर इंजिनिअरिंग, डॉक्टरकीचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा किमान गोष्टी नव्हत्या आणि इथे काय भाषणे दिली जात होती.

आदरणीय सभापति जी,

आणि मी सांगू इच्छितो सदनालाही गर्व वाटेल आपण ज्या सदनामध्ये बसलेलो आहोत,  तिथे एक अशी सरकार आपल्या बरोबर चर्चा करत आहे, की अशी सरकार नेतृत्व करत आहे जिथे एवढे मोठे परिवर्तन पाहायला मिळत आहे. आपण त्या समाजाचा विश्वास वाढवावा, त्यांचा आत्मविश्वास आणखी मजबूत करावा, ते देशाच्या मुख्य प्रवाहात वेगाने पुढे जाऊ शकतील. यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवा, एकत्रित प्रयत्न करा.

आपण बघा, आदिवासी आणि आपल्या एससी एसटी विद्यार्थ्यांचे नामांकन, मी यासंदर्भात काही आकडे सांगू इच्छितो उच्च शिक्षणात एससी विद्यार्थ्यांचे नामांकन 44% ने वाढलेले आहे, उच्च शिक्षणामध्ये एसटी विद्यार्थ्यांचे नामांकन 65% ने वाढले आहे, उच्च शिक्षणामध्ये ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांचे नामांकन 45% ने वाढलेले आहे आणि जेव्हा माझे गरीब, दलित, मागास, आदिवासी, दुर्लक्षित  परिवारातले मुले उच्च शिक्षणामध्ये प्रगती करतील, डॉक्टर बनतील, इंजिनिअर बनतील तर त्या समाजाच्या मध्ये एक नवीन वातावरण निर्माण होईल आणि त्या दिशेने… आमचा हाच प्रयत्न राहिला आहे की मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काही कालावधी लागेल परंतु ते काम पूर्ण ताकदीने झाले पाहिजे आणि यासाठीच आम्ही शिक्षणाच्या बाबतीत याप्रकारे बळ देऊन काम केलेले आहे. कृपा करून माहितीचा अभाव आहे तर असे सांगा आम्ही आपल्याला यासंबंधी माहिती देऊ आपल्याला. परंतु अशाचप्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नका जेणेकरून आपली प्रतिष्ठा सुद्धा कमी होईल आणि आपल्या शब्दांची ताकद सुद्धा कमी होईल आपल्यावरती मला किव येते कधी कधी.

आदरणीय सभापति जी,

सबका साथ सबका विकास हा काही नारा नाही आहे, ही मोदींची गॅरंटी आहे. आणि जेव्हा एवढे सारे काम करतो आहोत तेव्हा ते मान्य केले पाहिजे. कोणीतरी कविता लिहून पाठवली होती, कविता तर मोठी लांबलचक आहे परंतु त्यामध्ये एक वाक्य आहे-

मोदींच्या गॅरंटीचा हा कार्यकाळ आहे,

नव्या भारताची ही पहाट…

आऊट ऑफ वॉरंटी चालत आहे दुकाने,

आऊट ऑफ वॉरंटी चालत आहेत दुकाने..

शोधा आपले स्थान ( संधी)

आदरणीय सभापति जी,

अशाप्रकारे देशांमध्ये निराशा पसरवण्याचा प्रयत्न होताना पाहतो तेव्हा मी तर हे समजून जातो की, जे लोक एवढ्या निराशेच्या गर्तेमध्ये बुडालेले आहेत. तसे पाहता निराशा पसरवण्याची त्यांच्यात ताकद सुद्धा शिल्लक नाही आहे. ती पण ताकत राहिलेली नसताना आशा अपेक्षांचा प्रसार तर ते करू शकत नाहीत. जे स्वतःच निराशेमध्ये बुडालेले आहेत त्यांच्याकडून अपेक्षा..परंतु देशांमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे बसावे तेथे निराशा, निराशा, निराशा..पसरवण्याचा हा जो खेळ सुरू आहे आणि ते पण सत्य नाकारून हे होत आहे. ते तर स्वतःचे सुद्धा काही कल्याण करू शकणार नाहीत आणि देशाचे सुद्धा काही कल्याण करू शकणार नाहीत.

आदरणीय सभापति जी,

प्रत्येक वेळेला एकच गाणे गायले जाते. समाजातल्या काही  वर्गाला भडकवण्यासाठी सत्यता न तपासता अशा प्रकारची भाषा बोलली जाते. मी जरा देशाच्या पुढे काही सत्यता सांगू इच्छितो आणि मला पूर्ण विश्वास आहे की माध्यमे सुद्धा अशा विषयांवर जरा चर्चा करतील जेणेकरून यातली सत्यता माहिती होईल.

आदरणीय सभापति जी,

इथे सरकारी कंपन्यांना घेऊन आमच्या वरती अनेक प्रकारचे आरोप ठेवले गेले. काय काय आरोप लावले जात आहेत.ज्या आरोपांना डोके पाय धड काहीच नाही आहे फक्त आरोप लावत चला. आता पहा देशाला आठवत असेल की मारुती कंपनीच्या समभागांबाबत काय खेळ चालला होता. त्या काळात याबाबत हेडलाईन्स (मथळे) होत्या. मारुती शेअर अर्थात समभागांबाबत काय खेळ चालला होता. मी त्या विषयाच्या संदर्भात खोलात जाऊ इच्छित नाही, नाहीतर त्यांच्या तिथे तेवढ्यापर्यंत पाणी पोहोचेल की त्यामुळे इथे आपल्याला करंट लागू शकतो आणि यासाठीच मी तिथपर्यंत जाऊ इच्छित नाही.

आदरणीय सभापति जी,

देशाला हे माहिती होणं गरजेचे आहे.

आदरणीय सभापति जी,

मी तर स्वतंत्र भारतात जन्म घेतलेला आहे. माझे विचार सुद्धा स्वतंत्र आहेत आणि माझे स्वप्न सुद्धा स्वतंत्र आहेत. जे गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये जगत आहेत त्यांच्याजवळ आणखी काही गोष्टी बोलण्यासाठी नाही आहेत तेच जुने कागद घेऊन घेऊन ते इकडे तिकडे फिरत असतात.

आदरणीय सभापति जी,

काँग्रेसने म्हटले की आम्ही पीएसयु विकून टाकले, पीएसयु  बुडवून टाकले. वेगवेगळ्या प्रकारची चर्चा इथे होत असते आणि याबाबत ज्येष्ठ लोकांच्या तोंडून त्या गोष्टी मी ऐकत होतो. लक्षात घ्या की बीएसएनएल, एमटीएनएल या कंपन्यांना संपवणारे लोक कोण होते? तो कोणता कार्यकाळ होता जेव्हा बीएसएनएल , एमटीएनएल उध्वस्त झाले होते. जराशी आठवण करावी एचएएल या कंपनीची कशाप्रकारे  दूर्दशा करून ठेवली होती पूर्णपणे उध्वस्त? आणि जाऊन कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ भाषणे ठोकून 2019 च्या निवडणुका लढण्यासाठीचा अजेंडा निश्चित केला जात होता, याच एचएएल कंपनीच्या नावावर. ज्यांनी एचएएल कंपनीला उध्वस्त करून टाकले तेच लोक एचएएल कंपनीच्या प्रवेश द्वारावर जाऊन भाषण ठोकत होते.

आदरणीय सभापति जी,

एअर इंडियाला कोणी उध्वस्त करून टाकले, कोणी त्या कंपनीला संपवून टाकले. अशा प्रकारची परिस्थिती कोणी निर्माण केली होती. काँग्रेस पार्टी आणि युपीए यांच्या या दहा वर्षांच्या काळात झालेल्या नुकसानीपासून हे लोक आपले तोंड लपवू शकत नाहीत. संपूर्ण देश अगदी चांगल्या प्रकारे ओळखून आहे. आणि आता मी आपल्या कार्यकाळातल्या यशाबाबत थोड्या गोष्टी इथे सांगू इच्छितो..

आदरणीय सभापति जी,

आज ज्या बीएसएनएल कंपनीला आपण उध्वस्त करून सोडून दिले होते तीच बीएसएनएल आज मेड इन इंडिया बनून 4 जी 5 जी च्या यशाकडे मार्गक्रमण करत आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करत आहे.

आदरणीय सभापति जी,

एचएएल कंपनी संदर्भात ही अशाच प्रकारे अनेक अफवा पसरवल्या गेल्या, आज हीच एचएएल कंपनी विक्रमी उत्पादन करत आहे, यातून एचएएल कंपनी विक्रमी महसूल मिळवून देत आहे. ज्या कंपनी संदर्भात एवढे आरोप केले गेले आणि कर्नाटकामध्ये आशियातली सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्माण करणारे कंपनी म्हणून एचएएल नावारूपाला आली. कुठे सोडले होते आणि आम्ही कुठपर्यंत घेऊन गेलो.

आदरणीय सभापति जी,

एक कमांडो जो इथे नाही आहे एलआयसी कंपनीला घेऊन सुद्धा माहिती नाही कसले कसले मोठ्या विद्वत्तेने भाषण देत होते. एलआयसी चे असे झाले, एलआयसीचे तसेच झाले, एलआयसीचे असे होणार. जेवढी एलआयसीच्या बाबतीत चुकीची विधाने करायची होती ती केलीत आणि हीच पद्धती आहे. कुणालातरी उध्वस्त करण्यासाठी अफवा पसरवायच्या चुकीच्या गोष्टी पसरवायच्या,भ्रम निर्माण करायचे आणि तंत्रज्ञानसुद्धा तीच आहे. गावामध्ये कोणाचातरी मोठा बंगला असावा तो बंगला विकत घेण्याची मनीषा असावी परंतु तो विकत घेण्याची कुवत नसते तर मग त्या संदर्भात हवा पसरवायची की हा भूत बंगला आहे..इथे जो जातो अशाप्रकारे हवा पसरविली जाते कोणी सुद्धा विकत घ्यायला तयार होत नाही आणि मग वेळ बघून तो बंगला बळकवायचा एलआयसी एलआयसी काय चालवले आहे?

आदरणीय अध्यक्ष महाराज,

मी आज अभिमानाने सांगू इच्छितो, मान उंचावून सांगू इच्छितो. आज एलआयसीचे समभाग विक्रमी स्तरावर ट्रेड करत आहेत. का ?

आदरणीय अध्यक्ष महाराज,

सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम बंद झाले आहेत, सार्वजनिक असा आता प्रचार केला जात आहे. त्यांना तर आठवतही नसेल काय आहे ते. कोणीतरी सांगितले, बोला... बोला. 2014 मध्ये युपीएच्या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये देशात 234 सार्वजनिक उपक्रम होते. तर आज 254 आहेत. आता विकले म्हणून सांगताना ते कोणते गणित ते जाणतात? विकल्यानंतर 254 झाले? काय करताय काय तुम्ही लोक ?

आदरणीय अध्यक्ष महाराज,

आज बहुतांश सार्वजनिक उपक्रम विक्रमी परतावा देत आहेत आणि गुंतवणूकदारांचा सार्वजनिक उपक्रमाप्रती विश्वास वाढत आहे. शेअर बाजाराचे थोडे ज्ञान असलेल्यांनाही हे समजते. नसेल समजत तर कोणालाही विचारा. अध्यक्ष महाराज, बीएसई पीएसयु निर्देशांकात गेल्या एक वर्षाच्या काळात दुप्पट उसळी दिसून आली आहे.

आदरणीय अध्यक्ष महाराज,

10 वर्षांपूर्वीच्या म्हणजे 2004 ते 2014 दरम्यानच्या काळाबाबत मी बोलतो आहे. सार्वजनिक उपक्रमांचा निव्वळ नफा सुमारे सव्वा लाख कोटी होता आणि नंतरच्या दहा वर्षात सार्वजनिक उपक्रमांचा निव्वळ नफा अडीच लाख कोटी रुपये आहे. दहा वर्षात, आमच्या दहा वर्षात सार्वजनिक उपक्रमांचे निव्वळ मूल्य 9.5 लाख कोटी वरून वाढून 17 लाख कोटी झाले आहे. 

आदरणीय अध्यक्ष महाराज,

यांचा हात जिथे लागतो ते बुडीत जाणार हे निश्चित होते. देशाची अशी दशा करून त्यांनी सोडली होती, आम्ही मेहनतीने या परिस्थितीतून बाहेर काढले. इतकी प्रतिष्ठा वाढली आहे, तुम्हाला आनंद झाला पाहिजे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, बाजारात अशी हवा निर्माण करू नका की ज्यामुळे देशातल्या सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या मनात साशंकता निर्माण होईल. आपण असे करू शकत नाही.   

आदरणीय अध्यक्ष महाराज,

या लोकांनी आता त्यांच्या युवराजांना एक स्टार्ट अप दिला आहे. सध्या तो नॉन स्टार्टर आहे, तो ना झेप घेत आहे, ना चालत आहे.

आदरणीय अध्यक्ष महाराज,

मागच्या वेळेसही हे इतके शांत राहिले असते तर किती छान झाले असते.

आदरणीय अध्यक्ष महाराज,

अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन, सर्वांचे अभिनंदन.

आदरणीय अध्यक्ष महाराज,

एका राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने दीर्घ काळ देशाची आणि जनतेची सेवा करण्याची संधी मला लाभली होती हे माझे भाग्य आहे. म्हणूच प्रादेशिक आकांक्षा मी उत्तम जाणतो. कारण मी या प्रक्रियेतून गेलो आहे. जसे आपले दिग्विजयजी आहेत, एका राज्यासाठी काय असते हे ते उत्तम जाणतात. आम्ही त्याच विश्वातून आलो होतो. आम्हाला अनुभव आहे, शरदरावजी यांना आहे, तर असे काही लोक इथे आहेत ज्यांना या सर्व बाबी माहित आहेत. देवेगौडा साहेब आहेत, तर या लोकांना या सर्व बाबी माहित आहेत. त्याचे महत्व आम्ही जाणतो. आम्हाला यासाठी पुस्तके वाचावी लागत नाही, आम्ही हे अनुभवले आहे. ही सत्य परिस्थिती आहे. दहा वर्षे युपीएची संपूर्ण ताकद गुजरातमध्ये कशात गुंतली होती, आपण कल्पना करू शकणार नाही. मात्र मी रडत बसणार नाही, रडत बसायची मला सवय नाही. मात्र तेव्हाही इतकी संकटे होती. अन्याय सहन करून कितीतरी समस्या झेलल्या. इथे कोणत्याही मंत्र्यांची मला अपॉइंटमेंट मिळत नसे. ते म्हणत की तुम्हाला माहित आहे, आपली मैत्री आहे, मी फोनवर बोलेन पण फोटो-बीटो निघाला तर... ही भीती त्यांना असे. मंत्र्यांना ही भीती असे. जाऊ दे, त्यांची अडचण मी समजू शकत होतो. तिथे एकदा मोठी नैसर्गिक आपत्ती आली. मी त्या वेळी पंतप्रधानांना विनंती केली की आपण एकदा भेट द्या आणि इथली परिस्थिती बघा. त्यांचा कार्यक्रम ठरला. त्यासंबंधी एक सल्लागार समिती नेमली होती ना, कदाचित तिथून आदेश आला असावा, तर साहेबांनी ठरलेला कार्यक्रम बदलून दक्षिणेकडच्या राज्याचा दौरा केला, कुठल्या राज्याचा ते मला आता आठवत नाही. म्हणाले आम्ही गुजरातमध्ये येणार नाही, विमानातून हवाई पाहणी करू. मी सुरतला पोहोचलो होतो, ते येणार होते. काय झाले असेल, मी मसजू शकतो. आपणही कल्पना करू शकता, नैसर्गिक आपत्तीतही मी अशा समस्यांना तोंड दिले आहे. मात्र तरी त्या वेळीही माझा मंत्र होता आणि आताही आहे की देशाच्या विकासासाठी राज्याचा विकास. भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास. आपण सर्वांनी याच मार्गावरून वाटचाल केली पाहिजे. राज्यांच्या विकासातूनच आपण राष्ट्राचा विकास साध्य करू शकतो. यावर चर्चेचे कारणच नाही. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला खात्री देतो की राज्याने एक पाऊल पुढे टाकले तर दोन पावले चालण्याचे सामर्थ्य देण्यासाठी मी तयार आहे. सहकार्यात्मक संघीयवाद काय असतो ? मी तर नेहमीच म्हटले आहे की आज देशाला स्पर्धात्मक, सहकार्यात्मक संघीयवादाची आवश्यकता आहे. आपल्या राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असावी ज्यायोगे आपण वेगाने पुढे जाऊ. एक सकारात्मक मानसिकता घेऊन आपल्याला वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. मी राज्यात काम करत होतो तेव्हाही हाच विचार घेऊन काम करत होतो. म्हणूनच शांतपणे सहन करत होतो. 

आदरणीय अध्यक्ष महाराज,

कोविडचेच उदाहरण आहे. जगावर इतके मोठे संकट आले. अशा कालखंडात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत 20 बैठका होत. एका-एका गोष्टीवर विचार-विमर्श करत परस्परांच्या समवेत वाटचाल केली. सर्व राज्यांचा सहयोग घेऊन, एक टीम बनून केंद्र आणि राज्यांनी काम केले. जग जे संकट पेलू शकले नाही, ते आपण सर्वांनी एकजुटीने केले. कोणा एकाला याचे श्रेय मी देऊ इच्छित नाही. आपण सर्वांनी मिळून देश वाचवण्यासाठी जे शक्य होते ते केले. राज्यांनाही याचे श्रेय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. हाच विचार घेऊन आम्ही काम केले.

 

आदरणीय अध्यक्ष महाराज,

आम्ही दिल्लीपुरते जी-20 चे आयोजन करू शकलो असतो. दिल्लीत या मोठ्या नेत्यांमध्ये आपण काय करू शकत नाही? हे आपण यापूर्वीही पाहिले आहे. आम्ही तसे केले नाही. जी-20 चे सर्व यश आम्ही राज्यांना दिले. दिल्लीत एक बैठक झाली, तर राज्यांमध्ये 200 झाल्या. प्रत्येक राज्याला जगासमोर आणले. हे अपघाताने घडले नाही, ठरवून केले. कोणाचे सरकार आहे, त्यानुसार मी देश चालवत नाही, आपण सर्वांनी मिळून देशाला पुढे न्यायचे आहे, या भूमिकेतून मी काम केले आहे.

आदरणीय अध्यक्ष महाराज,

आपल्या देशात परदेशी पाहुणे याआधीही यायचे. ते मी आल्यानंतर येत आहेत असे थोडेच आहे? आज परदेशी पाहुणे आले की तुम्ही एक दिवस कुठल्यातरी राज्याला भेट द्या, असा माझा आग्रह असतो. मी त्यांना राज्यांमध्ये घेऊन जातो, जेणेकरून त्यांना कळेल की फक्त दिल्ली म्हणजे माझा देश नाही. माझा देश चेन्नईतही आहे. माझा देशही बेंगळूरुमध्ये आहे. माझा देश हैदराबादमध्येही आहे, माझा देश पुरीतही आहे, माझा देश भुवनेश्वरमध्येही आहे, माझा देश कोलकात्यातही आहे, माझा देश गुवाहाटीतही आहे. संपूर्ण जगाला माझ्या देशाच्या कानाकोपऱ्याबद्दल माहिती मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तिथल्या सरकारचा सहकार वा असहकार या तराजूत आम्ही या गोष्टी तोलत नाही. या देशाच्या भवितव्यासाठी, संपूर्ण जगाला माझा भारत कळावा, यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. 26 जानेवारीला किती काम असते, हे सर्वांना माहीत आहे. तरीही 25 तारखेला मी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन राजस्थानच्या गल्लीबोळात फिरत होतो. कारण हेच की जगाला कळू दे, की माझे राजस्थान असे आहे.

आदरणीय अध्यक्ष महाराज,

आम्ही आकांक्षी जिल्हे हा एक मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे, ज्याची जगभरात एक मॉडेल म्हणून चर्चा होत आहे. आकांक्षी जिल्हा या कार्यक्रमाचे 80 टक्के यश राज्यांच्या सहकार्यामुळे आहे. राज्यांनी यासाठी चांगले सहकार्य दिले कारण त्यांना आकांक्षी जिल्हा या कार्यक्रमामागची माझी भावना समजली आहे. आकांक्षित जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी आज मला राज्यांकडून 80 टक्के ताकद मिळते आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून मिळते आहे. आणि जी राज्ये राज्य सरासरीमध्येही सर्वात शेवटच्या स्थानावर होती, त्यांनी आज राष्ट्रीय सरासरीशी स्पर्धा सुरू केली आहे. हे जिल्हे एकेकाळी मागासलेले जिल्हे मानले जात होते. हे सर्व सहकार्यातून घडते. आणि म्हणूनच आमचे कार्यक्रम सर्वांना सोबत घेऊन देशाचे भविष्य घडवण्यासाठी तयार केलेले आहेत. आज देशाच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक कुटुंबाला विकासाची फळे मिळावीत, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्याच दिशेने वाटचाल करायची आहे. आम्हाला प्रत्येक राज्याला त्याचे पूर्ण अधिकार द्यायचे आहेत. पण आज मला एका महत्त्वाच्या मुद्द्यावर माझी व्यथा मांडायची आहे.

आदरणीय अध्यक्ष महाराज,

देश हा आपल्यासाठी फक्त जमिनीचा तुकडा नाही. आपल्या सर्वांसाठी ते एक प्रेरणादायी एकक आहे. जसे शरीर असते, शरीरात भावना असतात, पायात काटा रूतला तर पाय हे सांगत नाही, हात कधीच विचार करत नाही की मला काय करायचे आहे, पायात काटा असतो... पाय, पायाचे काम करेल. मी माझ्या पायाजवळ हात पोहोचवतो आणि काटा काढतो. पायात काटा रूततो, डोळा म्हणत नाही की मी अश्रू का ढाळू? डोळ्यातून अश्रू येतात. भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात वेदना असेल तर प्रत्येकाला वेदना जाणवल्या पाहिजेत. देशाच्या एका कोपऱ्यात, शरीराचा एक भाग काम करत नसेल तर संपूर्ण शरीरच अपंग मानले जाते. शरीराप्रमाणेच देशाचा कोणताही कोपरा, देशाचे कोणतेही क्षेत्र विकासापासून वंचित असेल तर देशाचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपण भारताकडे तुकड्यांमध्ये न पाहता संपूर्ण भारताकडे पाहिले पाहिजे. आजकाल ज्या प्रकारे भाषा बोलली जात आहे, देश तोडण्यासाठी राजकीय स्वार्थासाठी नवनवीन कथ्यकथन तयार केले जात आहे. एक संपूर्ण सरकार मैदानात उतरून अशी भाषा निर्माण करत आहे. देशासाठी यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते, तुम्हीच सांगा.

झारखंडमधला एखादा आदिवासी मुलगा ऑलिम्पिक स्पर्धेत जाऊन पदक आणतो, तर तो झारखंडचा मुलगा आहे, असे सारा देश म्हणतो का? ते आपल्या देशाचे मूल आहे. आपण झारखंडच्या मुलामध्ये प्रतिभा पाहतो आणि देश हजारो-लाखो रुपये खर्च करतो आणि त्याला चांगल्या प्रशिक्षणासाठी जगातील कोणत्याही देशात पाठवतो तेव्हा आपल्याला वाटते का की हा खर्च या देशासाठी नव्हे तर झारखंडसाठी होत आहे?  आपण काय करू लागलो आहोत? कोणती भाषा बोलू लागलो आहोत? यातून देशाला अभिमान वाटेल? इथे लस तयार झाली. देशातील कोट्यवधी लोकांना आपण म्हणू का, की ती लस त्या राज्यात बनवली होती, त्यामुळे तिच्यावर त्यांचाच हक्क आहे. ती देशाला मिळू शकत नाही, असा विचार आपण करू शकतो का? त्या शहरात ही लस तयार झाली, त्यामुळे देशाच्या इतर भागांना तिचा लाभ मिळणार नाही, असे म्हटले तर इतर देशवासियांना काय वाटेल? ही कसली विचारसरणी आहे?  आणि राष्ट्रीय पक्षातून अशी विचारसरणी येणे हे अतिशय खेदजनक आहे.

मला विचारायचे आहे, आदरणीय अध्यक्ष महाराज,

उद्या हिमालय म्हणू लागला, समजा उद्यापासून हिमालय म्हणू लागला, की या नद्या माझ्या जागेवरून वाहतात, मी तुम्हाला पाणी देऊ देणार नाही. पाण्यावर हक्क माझा आहे, तर देशाचे काय होणार? देश कुठे जाणार? ज्या राज्यांमध्ये कोळसा आहे, त्यांनी कोळसा  ही आमची संपत्ती आहे, ती तुम्हाला मिळणार नाही, तेव्हा तुम्ही जा आणि अंधारात राहा, असे म्हटले तर देश कसा चालणार?

सन्माननीय सभापती जी,

ऑक्सिजन कोविडच्या वेळी, आपल्याकडे पूर्वेकडील   उद्योगात ऑक्सिजनच्या शक्यता आहेत.संपूर्ण देशाला ऑक्सिजनची गरज होती, त्या वेळी जर पूर्वेकडील लोक  म्हणाले असते, आम्ही ऑक्सिजन देऊ शकत नाही, आमच्या लोकांना आवश्यक आहे. ते., देशाला काही मिळणार नाही, देशाचे काय झाले असते ?

संकट असतानाही त्यांनी देशाला ऑक्सिजन दिला.  देशांतर्गत ही भावना मोडीत काढण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत?  अशाप्रकारे आमचा कर, आमचा पैसा हे कोणत्या भाषेत बोलले जात आहे.  देशाच्या भवितव्याला नवा धोका निर्माण करणारी ही गोष्ट आहे .  देश तोडण्यासाठी नवनवीन असत्य कथने शोधणे थांबवा.  देशाला पुढे जायचे आहे, देशाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा.

सन्माननीय  सभापती  जी,

गेल्या 10 वर्षांची धोरणे आणि बांधणी ही नव्या भारताची नवी दिशा दाखवण्यासाठी आहे.  आम्ही ज्या दिशेने जात आहोत, गेल्या दशकात आम्ही जी निर्मिती कार्ये हाती घेतली आहेत, त्यात आमचे संपूर्ण लक्ष मूलभूत सुविधा पुरवण्यावर केंद्रित राहिले आहे.

सन्माननीय  सभापती  जी,

प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावले पाहिजे आणि जीवनमान सुलभता वाढली पाहिजे.  आता काळाची गरज आहे  - आपण त्याचे जीवनमान कसे सुधारू शकतो.  आगामी काळात, आपल्याला आपल्या सर्व शक्ती आणि क्षमतेसह  जीवनमान सुलभतेकडून एक पाऊल पुढे टाकून गुणवत्तापूर्ण जीवनाच्या दिशेने टाकायचे आहे.आम्ही त्या दिशेने वाटचाल करणार आहोत.

सन्माननीय  सभापती  जी,

येत्या 5 वर्षात गरीबीतून बाहेर पडलेल्या नवमध्यम वर्गाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी  विविध कार्यक्रम पोहोचवून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणूनच  सामाजिक न्यायाचे मोदी कवच आम्ही बळकट करणार आहोत आणि बळ देणार आहोत.

सन्माननीय  सभापती  जी,

आजकाल आपण म्हणतो की, 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत , तेव्हा असा कुतर्क मांडला जातो की, 25 कोटी बाहेर आले, तर 80 कोटी लोकांना अन्नधान्य का देता?

सन्माननीय  सभापती  जी,

आपल्याला माहीत आहे की, आजारी व्यक्ती दवाखान्यातून बाहेर आली तरी डॉक्टर त्याला काही दिवस अशीच काळजी घ्या, खाण्यापिण्याची काळजी घ्या, हे करा ते करा असे सांगतात. का तर .. पुन्हा त्या व्यक्तीला कधीही त्रास होऊ नये. जो गरिबीतून बाहेर आला आहे, त्याने अशी संकटे येऊ नयेत आणि तो पुन्हा गरिबीच्या खाईत लोटला जाऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे.आणि म्हणूनच त्यांना बळ वेळ दिला पाहिजे.  यावेळी आम्ही गरीबांना बळ दिले जेणेकरून ते पुन्हा गरिबीच्या नरकात परत जाऊ नयेत.  आयुष्मान अंतर्गत आम्ही 5 लाख रुपये देतो, हा त्यामागचा हेतू आहे. कुटुंबात एखादा आजार आला तर मध्यमवर्गीय माणूसही गरीब व्हायला वेळ लागत नाही.  आणि म्हणून गरिबीतून बाहेर पडणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपण चुकूनही गरिबीकडे सरकणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आम्ही धान्य देतो, धान्य देत राहू.  कुणाला वाईट वाटो वा न वाटो, 25 कोटी गरिबीतून बाहेर आले आहेत.  नवमध्यम वर्गामध्ये आले आहेत.पण मला समजते कारण मी त्या जगात राहिलो आहे.  त्यांची गरज अधिक आहे आणि त्यामुळे आमची ही योजना सुरूच राहणार आहे.

सन्माननीय  सभापती  जी,

देशाला माहित आहे आणि म्हणूनच मी हमी दिली आहे, माझी हमी आहे की ,5 लाख रुपयांपर्यंतची उपचार सुविधा भविष्यातही गरिबांना मिळत राहील.  माझ्याकडे हमी आहे, मोदींची हमी आहे. जी औषधे 80% सवलतीत उपलब्ध आहेत, ज्यांचा लाभ मध्यमवर्गीय गरिबांना मिळत आहे, तो यापुढेही मिळत राहील

सन्माननीय  सभापती  जी,

मोदींची हमी आहे की,शेतकऱ्यांना जो सन्मान निधी  मिळत आज तो सन्मान निधी मिळतच राहील जेणेकरून ते विकासाच्या प्रवासात ताकदीने सहभागी होतील.

सन्माननीय  सभापती  जी,

गरिबांना कायमस्वरूपी घरे देण्याची माझी मोहीम आहे. जर कुटुंब मोठे झाले तर नवीन कुटुंब तयार होते.  कायमस्वरूपी घरे देण्याचा माझा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. नळाद्वारे पाणी योजना, हा माझा ठाम इरादा आहे आणि नळाद्वारेच पाणी देऊ ही माझी हमी आहे. आपल्याला नवीन शौचालये बांधण्याची गरज लागेल, म्हणून माझी हमी  आहे, आम्ही पुढे हे सुरू ठेवू. ही सर्व कामे वेगाने होतील, कारण विकासाचा मार्ग, विकासाची जी दिशा आपण पकडली  आहे, ती कोणत्याही परिस्थितीत थोडीही धीमी होऊ द्यायची नाही.

सन्माननीय  सभापती  जी,

आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाही.  काही लोक याला मोदी 3.0 म्हणतात.  मोदी 3.0 विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावेल.

सन्माननीय  सभापती  जी,

पुढील पाच वर्षांत भारतातील डॉक्टरांची संख्या पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढेल.  वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढणार आहे.  या देशात उपचार खूप स्वस्त आणि सुलभ होतील.

सन्माननीय  सभापती  जी,

येत्या पाच वर्षात प्रत्येक गरीबाच्या घरात नळ जोडणी दिली जाईल.

सन्माननीय  सभापती  जी,

येत्या पाच वर्षात त्या गरीबांना पंतप्रधान आवास योजनेचे घर देण्यात येईल, एकही वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. येत्या पाच वर्षात सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज देयक शून्य होईल, देशातील कितीतरी नागरिकांना, कोट्यवधी नागरिकांना शून्य वीज देयक येईल आणि योग्य नियोजन केल्यास ते आपल्या घरी वीज निर्मिती करत विक्री करून कमाई करू शकतील पुढील पाच वर्षांसाठी हा कार्यक्रम आहे.

सन्माननीय  सभापती  जी,

पुढील पाच वर्षात देशभरात पाईपलाईनमधून गॅस जोडणी देण्यासाठी संपूर्ण देशभरात  जाळे निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

सभापती जी,

आगामी पाच वर्षात आपल्या युवा शक्तीचे सामर्थ्य संपूर्ण जग पाहील. तुम्ही बघा, आदरणीय सभापती जी, आपले युवा स्‍टार्टअप, युवकांचे यूनिकॉर्न, यांची संख्या लाखोंच्या वर असणार आहे. आणि एवढेच नाही, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरे नवनव्या स्टार्टअप्समुळे एक नवी ओळख घेऊन उदयाला येणार आहेत. हे पुढील पाच वर्षांचे चित्र मला दिसत आहे.

आदरणीय सभापती जी,

राखीव निधीचा वाढता प्रभाव तुम्ही पहाल, मागील सात दशकांमध्ये जितकी पेटंट्स नोंदणी झाली नाही, तेवढी विक्रमी पेटंट्स नोंदणी होण्याचा दिवस पुढील पाच वर्षात मला दिसत आहे.

आदरणीय सभापती जी,

आज माझ्या मध्यम वर्गातील लाखो मुले शिकण्यासाठी परदेशात जातात. मला अशी स्थिती निर्माण करायची आहे जिथे माझ्या मुलांचे लाखो रुपये वाचतील. माझ्या देशातील मध्यम वर्गाची स्वप्ने पूर्ण होतील. सर्वोत्तम विद्यापीठे माझ्या देशात असतील. या मुलांना उच्च शिक्षण माझ्या देशात मिळावे आणि माझ्या मुलांचे, त्यांच्या कुटुंबाच्या पैशांची बचत व्हावी यासाठी मी सांगत आहे.

आदरणीय सभापती जी,

तुम्ही पहा, पुढल्या पाच वर्षांमध्ये अशी कुठलीही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असणार नाही ज्यात ठिकठिकाणी भारताचे झेंडे फडकताना दिसणार नाहीत. पुढल्या पाच वर्षात क्रीडा विश्वात जगाला भारताच्या युवा शक्तीची ओळख झालेली मी पाहत आहे.

आदरणीय सभापती जी,

आगामी पाच वर्षांत भारतातील सार्वजनिक वाहतुकीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. पुढील पाच वर्षांत गरीब आणि मध्यमवर्गीयांना तेल आणि आरामदायी प्रवासाच्या सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत. जलद गतीने मिळणार आहेत, पूर्ण ताकदीनिशी अनेक सुविधा मिळणार आहेत. येत्या पाच वर्षांत देशाला बुलेट ट्रेनही दिसेल आणि वंदे भारत ट्रेनचा विस्तारही झालेला देशाला दिसेल.

आदरणीय सभापती जी,

पुढील पाच वर्षांमध्ये आत्मनिर्भर भारत अभियान नवी उंची गाठेल. प्रत्येक क्षेत्रात देश आत्मनिर्भर होताना  दिसेल.

आगामी  5 वर्षांमध्ये मेड इन इंडिया, सेमीकंडक्टर जगात आपला दबदबा निर्माण करतील. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये अशी चिप असेल, ज्यात कुठल्या ना कुठल्या भारतीयाने गाळलेला घाम असेल.

आदरणीय सभापती जी,

जागतिक इलेक्ट्रिक बाजारपेठेत एका नव्या गतीचे सामर्थ्य पुढील पाच वर्षात देशाला दिसेल.

आदरणीय सभापती जी,

आज देश लाखो कोटी रुपयांचे तेल आयात करतो. आपल्या ऊर्जा विषयक गरजांसाठी आपण जास्तीत जास्त आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने काम करू आणि मला विश्वास आहे की आपण ऊर्जा विषयक गरजा भागवण्यासाठी इतर देशांवरील अवलंबत्व कमी करण्यात यशस्वी होऊ. एवढेच नाही, आदरणीय सभापती जी, हरित हायड्रोजन अभियानाद्वारे आपण जागतिक बाजारपेठेला आसुसलेली बनवण्याच्या दिशेने पुढे मार्गक्रमणकरत आहोत. आपल्या हरित हायड्रोजनमध्ये ऊर्जा विषयक गरजा पूर्ण करण्याचे सामर्थ्य असेल. इथेनॉलच्या बाबतीत आपण वेगाने पुढे जात आहोत. आपण 20 टक्क्यांचे लक्ष्य प्राप्त करून आपल्या लोकांचा वाहतूक इंधनावरील खर्च कमी होईल याची व्यवस्था करू.

आदरणीय सभापती जी,

जेव्हा मी  20 टक्के इथेनॉल बद्दल बोलतो, तेव्हा त्याचा थेट लाभ माझ्या देशातील शेतकऱ्यांना होणार आहे, शेतकऱ्यांना एक नवीन प्रगतीचे साधन मिळणार आहे. देशाचे हजारो कोटी रुपये , आज खाद्य, आपला देश  कृषि प्रधान देश असल्याचे आपण म्हणतो , मात्र आजही हजारो कोटी रुपयांचे खाद्यतेल आपल्याला बाहेरून आणावे लागत आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांवर माझा विश्वास आहे आणि मला खात्री आहे की . खाद्यतेलामध्ये जी धोरणे आपण राबवत  आहोत,त्यामुळे लवकरच माझा देश 5 वर्षांमध्ये आत्मनिर्भर होईल.आणि जे पैसे वाचतील, माझ्या देशातील शेतकऱ्यांच्या खिशात जातील, जे आज परकीय बाजारपेठेत जात आहेत.

आदरणीय सभापती जी,

रासायनिक शेतीमुळे आपल्या धरतीमातेचे मोठे नुकसान होत आहे. पुढील पाच वर्षांमध्ये नैसर्गिक शेतीच्या दिशेने देशातील शेतकऱ्यांना घेऊन जाण्यात आपण यशस्वी होऊ. एका नवीन जागृतीचे काम होईल, आपल्या धरणीमातेचे संरक्षण देखील होईल.

आदरणीय सभापती जी,

नैसर्गिक शेती वाढल्यामुळे जागतिक बाजारपेठेत आपल्या उत्पादनांची ताकदही वाढणार आहे.

आदरणीय सभापती जी,

संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून मी भरड धान्याचे अभियान राबवले. श्री अन्न म्हणून आज आपण त्याला ओळख मिळवून दिली आहे. मला तो दिवस दूर दिसत नाही, जेव्हा आगामी पाच वर्षांमध्ये जागतिक बाजारपेठेत सुपर फूड म्हणून माझ्या गावातल्या छोट्याछोट्या घरांमध्ये पिकलेले भरड धान्य श्री अन्न ला जागतिक बाजारपेठेत त्याची प्रतिष्ठा मिळेल.  सुपरफूडला प्रतिष्ठा मिळेल.

आदरणीय सभापती जी,

ड्रोन शेतात  शेतकऱ्यांसाठी एक नवीन  शक्ती म्हणून उदयास येणार आहे.15 हजार  ड्रोनदीदींचा कार्यक्रम याआधीच आपण जाहीर केला आहे. ही फक्त सुरुवात आहे, पुढे बरेच यश दिसत आहे.

आदरणीय सभापती जी,

नैनो तंत्रज्ञान शेतीमध्ये आणण्याच्या प्रयोगात आतापर्यंत आपण यशस्वी झालो आहोत. नॅनो युरिया मध्येही आपण खूप मोठे यश संपादन केले आहे. नॅनो डीएपी च्या बाबतीतही यश मिळाले आहे. आणि आज एक गोणी खत घेऊन फिरणारा शेतकरी खताच्या एका बाटलीने काम भागवेल, तो दिवस दूर नाही.

आदरणीय सभापती जी,

सहकार क्षेत्रात आम्ही नवीन मंत्रालय स्थापन  केले आहे. सहकाराची संपूर्ण लोकचळवळ नव्या ताकदीनिशी पुढे यावी , एकविसाव्या शतकाच्या गरजेनुसार उभी राहावी आणि त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दोन लाख साठवणीचे काम , जे हाती घेतले आहे,  ते 5 वर्षाच्या आत पूर्ण होईल. छोट्या शेतकऱ्यांनाही त्यांचा माल साठवण्यासाठी जागा मिळेल. बाजारात कोणत्या भावाने विकायचे किंवा विकायचे नाही हे शेतकरी ठरवेल. उद्ध्वस्त होण्याची त्याची भीती दूर होईल, आणि  शेतकऱ्याची आर्थिक ताकद वाढेल.

मला खात्री आहे कि पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन क्षेत्र नवीन विक्रम प्रस्थापित करणार आहेत. आज आपल्याकडे पुष्कळ जनावरे आहेत मात्र दुग्धोत्पादन कमी आहे. ही परंपरा आपण बदलू. मासेमारी निर्यातीच्या जगात आपण खूप वेगाने विकसित होऊ असा माझा वैयक्तिक विश्वास आहे. आम्ही एफपीओ तयार करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. अनुभव खूप चांगला आहे. शेतकऱ्यांच्या नव्या संघटनेच्या सामर्थ्याचे आणि कृषी उत्पादनातील मूल्यबळाचे फायदे माझ्या देशातील शेतकऱ्यांना पाच वर्षांत नक्कीच मिळणार आहेत.

आदरणीय सभापती जी,

जी-20 च्या यशाने हे स्पष्ट झाले आहे. आणि कोविड नंतर जगात आलेल्या मोकळेपणाचा सर्वात मोठा फायदा आपण अनुभवला तो म्हणजे जगभरातील लोक भारताकडे आकृष्ट झाले आहेत आणि त्यामुळे येत्या काळात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणारे पर्यटनाचे एक मोठे क्षेत्र निर्माण होणार आहे. आज जगात असे अनेक देश आहेत, ज्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. भारतातही अशी अनेक राज्ये निर्माण होऊ शकतात, ज्यांच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा भाग पर्यटन असेल आणि तो दिवस दूर नाही, आपण ज्या धोरणांचा अवलंब करत आहोत, त्यामुळे भारत एक मोठे पर्यटन स्थळ बनणार आहे.

आदरणीय सभापती जी,

ज्याचा लेखाजोखा पूर्वी फार कमी असायचा, ज्याच्या कहाण्या ऐकून आपली चेष्टा केली जायची. जेव्हा मी डिजिटल इंडियाबद्दल चर्चा करायचो. जेव्हा मी फिनटेकबाबत बोलायचो तेव्हा लोकांना वाटायचे की मी कामाव्यतिरिक्त बोलत आहे. डेटा विचारवंतांसाठी क्षमतेचा अभाव होता. पण आदरणीय सभापती जी, मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो की, येत्या पाच वर्षांत भारत डिजिटल अर्थव्यवस्थेच्या जगावर अधिराज्य गाजवणार आहे. भारत एक नवी शक्ती बनणार आहे. आज डिजिटल प्रणाली भारताचे सामर्थ्य वाढवणार आहे. जगाचा असा विश्वास आहे की जर कोणत्याही देशामध्ये एआयचा सर्वाधिक वापर करण्याची क्षमता असेल तर तो भारत असेल. माझा देश सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल.

आदरणीय सभापती जी,

अंतराळविश्वात भारताचे नाव गाजत आहे. आपल्या शास्त्रज्ञांचा पराक्रम पहायला मिळणार आहे. आणि येत्या पाच वर्षांचा कार्यक्रम, तो आज शब्दात व्यक्त करावासा वाटत नाही. आपले शास्त्रज्ञ जगाला चकित करण्याच्या दिशेने भारताला अंतराळविश्वात नेतील, असा माझा ठाम विश्वास आहे.

आदरणीय सभापती जी,

तळागाळातील अर्थव्यवस्थेत मोठे परिवर्तन झाले आहे, स्वयंसहायता बचत गटात आपल्या 10 कोटी माता-भगिनी सहभागी झाल्या आहेत. आणि आमच्या तीन कोटी लखपती दीदी स्वतःच आमच्या कन्यांच्या प्रगतीची कहाणी लिहित आहेत.

आदरणीय सभापती जी,

भारतात एकेकाळी अनभिज्ञ असलेली अशी अनेक वैविध्यपूर्ण क्षेत्रे आहेत ज्यात मला आगामी पाच वर्षे स्पष्टपणे दिसत आहेत, तो एक सुवर्णकाळ होता, मला ते दिवस भविष्यात दिसत आहेत जेव्हा पाच वर्षांत मजबूत पाया रचला जाईल आणि आपण 2047 साल उजाडेपर्यंत, हा देश पुन्हा तो सुवर्णकाळ जगू लागेल. आदरणीय सभापती जी, या विश्वासाने सांगतो कि, विकसित भारत हा शब्दांचा खेळ नाही. ही आमची बांधिलकी आहे आणि आपण त्यासाठी समर्पित भावनेने, आपला प्रत्येक श्वास त्या कार्यासाठी आहे, आपला प्रत्येक क्षण त्या कार्यासाठी आहे, आपली विचारसरणी त्या कार्यासाठी समर्पित आहे. मी तुम्हाला खात्री देतो की त्याच भावनेने आम्ही पुढे गेलो, पुढे जात आहोत, पुढे जात राहू आणि देश प्रगती करत राहील. येणारी शतके हा सुवर्णकाळ इतिहासात कोरून ठेवतील. मला हा आत्मविश्वास आहे कारण देशातील लोकांची मनस्थिती मी चांगलीच जाणतो. देशाने दहा वर्षे परिवर्तन अनुभवले आहे. जो बदल एका क्षेत्रात दिसला आहे, तो झपाट्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होत आहे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवीन उंची आणि नवीन ताकद प्राप्त होणार आहे आणि प्रत्येक संकल्प सिद्धीस नेणे हा आमच्या कार्यशैलीचा भाग आहे.

आदरणीय सभापती जी,

या सभागृहात तुम्ही सर्वांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे मला पुन्हा एकदा सत्य देशासमोर मांडण्याची संधी मिळाली आहे आणि सत्य काय ते ठणकावून सांगण्याची संधी प्राप्त झाली आणि सभागृहाचे पावित्र्य राखून सत्य मांडण्याची संधी मिळाली आहे. संविधानाच्या पुराव्यांसमोर मते मांडण्याची संधी मिळाली. मला खात्री आहे की ज्यांची वॉरंटी संपली आहे त्यांचे म्हणणे देश ऐकून घेणार नाही. तर ज्यांच्या हमीची ताकद जोखली आहे, त्यांच्या संकल्पनांवर विश्वास ठेवून वाटचाल करेल.

आदरणीय सभापती जी, पुन्हा एकदा मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि आदरणीय राष्ट्रपतींचे त्यांच्या अभिभाषणाबद्दल आदरपूर्वक अभिनंदन आणि कृतज्ञता व्यक्त करून मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi