पंतप्रधान : 2047 पर्यंत देशाचे कोणते उद्दिष्ट आहे ?

विद्यार्थी: आपल्या देशाला विकसित बनवायचे आहे.

पंतप्रधान: नक्की?

विद्यार्थी: हो, सर

पंतप्रधान: 2047 का ठरविले आहे?

विद्यार्थी: तोपर्यंत आमची जी पिढी आहे, ती तयार होईल.

पंतप्रधान: एक, दुसरे?

विद्यार्थी: स्वातंत्र्याला 100 वर्षे होतील.

पंतप्रधान: शाब्बास

पंतप्रधान: साधारणतः घरातून किती वाजता निघता ?

विद्यार्थी: 7:00 वाजता

पंतप्रधान: मग जेवणाचा डबा सोबत बाळगता का ?

विद्यार्थी: नाही सर, नाही सर

पंतप्रधान: अरे मी खाणार नाही, सांगा तर खरे.

विद्यार्थी: सर आम्ही खाऊन आलोय.

पंतप्रधान: खाऊन आलात, घेऊन नाही आलात ? अच्छा तुम्हाला वाटले असेल की पंतप्रधानच खाऊन टाकतील.

 

|

विद्यार्थी: नाही सर

पंतप्रधान: अच्छा आज कोणता दिवस आहे?

विद्यार्थी: सर आज नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्मदिवस आहे.

पंतप्रधान: बरोबर

पंतप्रधान: त्यांचा जन्म कुठे झाला होता?

विद्यार्थी: ओडिशा

पंतप्रधान: ओडिशात कुठे?

विद्यार्थी: कटक

पंतप्रधान: म्हणूनच आज कटकमध्ये खूप मोठा समारंभ आहे.

पंतप्रधान: नेताजींची ती कोणती घोषणा आहे जी तुम्हाला प्रेरणादायी वाटते ?

विद्यार्थी: मैं तुम्हें आजादी दूंगा

पंतप्रधान: बघा, स्वातंत्र्य तर मिळाले. आता रक्त देण्याची गरज नाही तर मग काय द्याल ?

विद्यार्थी: सर, तरीही ते दर्शवते की ते कसे नेते होते आणि त्यांनी स्वतःपेक्षा देशाला कसे प्राधान्य दिले, त्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते.

पंतप्रधान: प्रेरणा मिळते पण कोणती-कोणती?

विद्यार्थी: सर, आपल्या एसडीजी आराखड्याद्वारे आम्हाला आमचा कार्बन फूटप्रिंट कमी करायचा आहे.

पंतप्रधान: बरं, भारतात काय चाललंय... कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी काय केलं जातंय?

 

|

विद्यार्थी: सर, इलेक्ट्रिक वाहने तर आलीच आहेत.

पंतप्रधान: इलेक्ट्रिक वाहने, शाब्बास! आणखी?

विद्यार्थी: सर, बसेसही आता इलेक्ट्रिक आहेत.

पंतप्रधान: इलेक्ट्रिक बस आली आहे, मग ?

विद्यार्थी: हो सर आणि आता…

पंतप्रधान: तुम्हाला माहिती आहे का भारत सरकारने दिल्लीत किती इलेक्ट्रिक बसेस दिल्या आहेत?

विद्यार्थी: सर, बऱ्याच आहेत.

पंतप्रधान: 1200 आणि आणखी द्यायच्या आहेत . देशभरात सुमारे 10 हजार बसेस, वेगवेगळ्या शहरांमध्ये

पंतप्रधान: तुम्हाला पंतप्रधान सूर्यघर योजना माहीत आहे का? कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या दिशेने. तुम्ही सर्वांना सांगता की मी तुम्हाला‌ सांगू?

विद्यार्थी: हो सर, सावकाश

पंतप्रधान: पहा, पंतप्रधान सूर्यघर योजना जी आहे,ती हवामान बदलाविरुद्धची जी लढाई आहे , तिचा एक भाग आहे, म्हणून प्रत्येक घरावर सौर पॅनेल आहे.

विद्यार्थी: हो सर, हो सर

पंतप्रधान: आणि सूर्याच्या उर्जेपासून आपल्याला घरी मिळणाऱ्या विजेमुळे काय होईल? कुटुंबाचे वीज बिल शून्य येईल. जर तुम्ही चार्जर बसवला असेल आणि इलेक्ट्रिक वाहन असेल तुमच्याकडे तर चार्जिंग तेथूनच सौरऊर्जेद्वारे होईल, त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनाचा खर्च, पेट्रोल-डिझेलचा खर्च येणार नाही, प्रदूषण होणार नाही.

 

|

विद्यार्थी: हो सर, हो सर

पंतप्रधान: आणि जर वापरानंतर वीज शिल्लक राहिली तर सरकार ती खरेदी करेल आणि तुम्हाला पैसे देईल. म्हणजे तुम्ही घरी वीज निर्माण करूनही पैसे कमवू शकता.

पंतप्रधान: जय हिंद

विद्यार्थी: जय हिंद

पंतप्रधान: जय हिंद

विद्यार्थी: जय हिंद

पंतप्रधान: जय हिंद

विद्यार्थी: जय हिंद

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Ayurveda Tourism: India’s Ancient Science Finds a Modern Global Audience

Media Coverage

Ayurveda Tourism: India’s Ancient Science Finds a Modern Global Audience
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा
May 06, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 25 मे रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही नाविन्यपूर्ण सूचना आणि विचार असतील तर ते प्रत्यक्ष पंतप्रधानांशी शेअर करण्याची आपल्यासाठी संधी आहे. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

आपली मते खाली दिलेल्या कमेंट्स विभागांत लिहा.