"जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी योगाबद्दल आज दाखवलेला उत्साह आणि बांधिलकीचे प्रदर्शन कायम लक्षात राहणारे आहे"
"योग नैसर्गिकरित्या जीवनाची एक सहज प्रवृत्ती बनला पाहिजे"
"ध्यानधारणा हे स्वतःत सुधारणा घडवून आणण्याचे एक उत्तम साधन आहे"
"योग समाजासाठी जितका महत्त्वाचा, उपयोगी आणि प्रभावी आहे तितकाच तो स्वतःसाठी देखील आहे"

मित्रहो,

आज हे जे दृश्य आहे, हे संपूर्ण जगाच्या मानस पटलावर कायम राहणारे दृश्‍य आहे. जर पाऊस पडला नसता तर कदाचित इतके लक्ष गेले नसते पाऊस असूनही आणि जेव्हा श्रीनगरमध्ये पाऊस पडतो तेव्हा थंडी देखील वाढते. मला देखील स्वेटर घालावे लागले. तुम्ही लोक तर इथलेच आहात, तुम्हाला सवय आहे, तुम्हाला याचा त्रास वाटत नाही. पण पावसामुळे थोडा उशीर झाला, आपल्याला याची दोन-तीन भागात विभागणी करावी लागली. तरीही जागतिक समुदायाला स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाचे महात्म्य काय आहे, योग जीवनातील नित्यक्रम कसा बनेल. जसे दात घासणे आपला नित्यक्रम बनतो, केस विंचरणे आपला नित्यक्रम बनतो, तितक्याच सहजतेने योग जीवनाशी जेव्हा जोडला जातो, एक नेहमीची क्रिया बनतो, तेव्हा प्रत्येक क्षणाला त्याचे लाभ देत राहतो.

कधी-कधी जेव्हा ध्यानाचा विषय येतो जो योगाचा एक भाग आहे तेव्हा बहुतेक लोकांच्या मनात असे येते ही कोणती तरी spiritual journey आहे. कोणता तरी अल्लाह ची प्राप्ती करण्याचा किंवा ईश्वराला प्राप्त करण्याचा किंवा गॉड ला प्राप्त करण्याचा, साक्षात्कार करण्याचा हा कार्यक्रम आहे. आणि मग जे आहे की लोक... अरे बाबा हे तर माझ्याच्याने होणार नाही, माझ्यामध्ये तर ती ताकदच नाही, तो थांबून राहतो.  पण अगदी सोप्या पद्धतीने ध्यानाविषयी समजून घ्यायचे असेल, जी बालके शाळेत शिकत असतील... आपण सुद्धा जेव्हा शाऴेत शिकत होतो, दिवसातून दहा वेळा आपले शिक्षक सांगत असायचे, बाबांनो जरा लक्ष द्या, जरा लक्ष देऊन पहा,  जरा लक्ष देऊन ऐका, अरे तुझे लक्ष कुठे आहे. हे जे लक्ष आहे ना ते आपले concentration, आपले गोष्टींवर किती प्रमाणात लक्ष केंद्रित आहे, आपले मन किती केंद्रित आहे, त्याच्याशी संबंधित विषय आहे.

 

तुम्ही पाहिले असेल बरेचसे लोक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, memory वाढवण्यासाठी एक तंत्र विकसित करतात, तंत्र शिकवतात. आणि जे लोक त्याचे योग्य प्रकारे अनुकरण करतात तर हळू-हळू त्यांची memory power वाढत जाते. तशाच प्रकारे ही कोणत्याही कामात मन लावण्याची सवय, ध्यान केंद्रित करण्याची सवय, फोकस-वे द्वारे काम करण्याची सवय उत्तमात उत्तम परिणाम देत असते, स्वतःचा उत्तमात उत्तम विकास करते आणि कमीत कमी थकव्यामुळे जास्त समाधान मिळते.

एक काम करताना दहा ठिकाणी ज्या प्रकारे मन भटकत असते, त्याचा थकवा येतो. आता म्हणूनच हे जे ध्यान आहे, spiritual journey ला आता सोडून द्या, जेव्हा त्याची वेळ येईल तेव्हा करा. आता तर आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, स्वतःला प्रशिक्षित करण्यासाठी योगाचा एक भाग आहे. जर इतक्या सहजतेने तुम्ही त्यामध्ये स्वतःला जोडाल, मला पक्की खात्री आहे मित्रांनो तुम्हाला खूपच फायदा होईल, तुमच्या विकासाच्या प्रवासाचा एक अतिशय मजबूत पैलू बनेल.

 

आणि म्हणूनच योग स्वतःसाठी जितका गरजेचा आहे, जितका उपयोगी आहे, जितकी ताकद देतो, त्याचा विस्तार समाजाला देखील फायदा करून देतो. आणि जेव्हा समाजाला लाभ होतो तेव्हा संपूर्ण मानवजातीला लाभ होतो, जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात लाभ होतो.

आताच दोन दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला, इजिप्तने एक competition organize केली आणि त्यांनी पर्यटनाशी संबंधित जी मानबिंदू केंद्रे होती, त्या ठिकाणी जो सर्वोत्तम योगाचे छायाचित्र काढेल, व्हिडियो तयार करेल त्याला पुरस्कार दिला. आणि मी जी छायाचित्रे पाहिली, इजिप्तचे सुपुत्र-सुपुत्री, सर्वजण त्यांचा मानबिंदू असलेल्या पिरॅमिड वगैरेच्या जवळ उभे राहून आपल्या योगाच्या मुद्रा करत होते. इतके आकर्षण निर्माण करत होते आणि काश्मीरच्या लोकांसाठी तर खूप मोठा रोजगाराचा पर्याय बनू शकतो. पर्यटनासाठी खूप मोठे आकर्षणाचे केंद्र बनू शकते.

 

तर मला आज खूप चांगले वाटले, थंडी वाढली, हवामानाने थोडी आव्हाने निर्माण केली, तरी देखील तुम्ही निर्धाराने उभे राहिलात. मी पाहात होतो आपल्या अनेक सुकन्या या दरीलाच आपली.... जी योगा मॅट होती तिचाच वापर पावसापासून बचाव करण्यासाठी करत होत्या. पण गेल्या नाहीत, ठामपणे थांबून राहिल्या. हा खरोखरच अतिशय मोठा दिलासा आहे.

मी तुमचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो.    

Thank You. 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi