माझ्या तरुण मित्रांनो,
तुम्ही माझी सर्वात मोठी प्राथमिकता आहात. तुमच्याकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते, ही वेळ आहे, हिच योग्य वेळ आहे. हा काळ तुमचा आहे. हाच तो काळ आहे जो तुमचे आणि देशाचे भविष्य ठरवेल. तुम्हाला तुमचे संकल्प बळकट करावे लागतील जेणेकरून विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येईल. तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा विस्तार करावा लागेल जेणेकरून भारताची प्रतिभा जगाला नवी दिशा देऊ शकेल. तुम्हाला तुमची क्षमता वाढवावी लागेल जेणेकरून भारत जगाची आव्हाने सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.
सरकार आपल्या तरुण सहकाऱ्यांसह खांद्याला खांदा लाऊन पुढे जात आहे. आज तुमच्यासाठी संधींचे नवे मार्ग खुले होत आहेत. आज तुमच्यासाठी नवीन क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होत आहेत. अंतराळ क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार केले जात आहेत. तुमच्यासाठी व्यवसाय करण्याच्या सुलभतेवर भर दिला जात आहे. संरक्षण क्षेत्रात तुमच्यासाठी खाजगी क्षेत्राची जागा निर्माण करण्यात आली आहे. तुमच्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. 21 व्या शतकात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या आधुनिक शिक्षणाची गरज भासेल यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा केल्या आहेत. आज तुम्हाला तुमच्या मातृभाषेतून उच्च शिक्षण घेण्याची संधी आहे. आज तुमच्या समोर कोणतीही शाखा किंवा विषयाचे बंधन नाही. तुम्ही कधीही तुमच्या आवडीचा विषय निवडू शकता आणि अभ्यास करू शकता. तुम्ही सर्वांनी अधिकाधिक संशोधन आणि नवोन्मेषात सक्रीय झाले पाहिजे. अटल टिंकरिंग लॅब्स सर्जनशीलता आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी खूप मदत करेल. लष्करात भरती होऊन कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठीही सरकारने नवीन संधी निर्माण केल्या आहेत. आता मुलीही विविध सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. तुम्हाला पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जायचे आहे. तुमचे प्रयत्न, तुमची ध्येयदृष्टी, तुमची ताकद भारताला नव्या उंचीवर घेऊन घेऊन जाईल.
मित्रांनो,
तुम्ही सर्व स्वयंसेवक आहात, मला आनंद आहे की तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवता आहात. तुम्ही त्याला कमी लेखता कामा नये. हा एखाद्याच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असू शकतो. ज्याच्याकडे शिस्त आहे, ज्याने देशात खूप प्रवास केला आहे, ज्याचे विविध प्रांत आणि भाषा जाणणारे मित्र आहेत, त्याचे व्यक्तिमत्व निखरुन येणे स्वाभाविक आहे. आणखी एक गोष्ट जी तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तंदुरुस्ती. मी बघतोय की तसे तर तुम्ही सगळेच तंदुरुस्त आहात. तंदुरुस्ती ही तुमची पहिली प्राथमिकता असली पाहिजे.
आणि तुमची शिस्त तंदुरुस्ती राखण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. असे होऊ शकते की प्रेरणा कधीकधी कमी असू शकते, परंतु शिस्तच तुम्हाला योग्य मार्गावर ठेवते. आणि जर तुम्ही शिस्त ही तुमची प्रेरणा बनवली, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिंकण्याची खात्री आहे.
मित्रांनो,
मी सुद्धा तुमच्यासारखाच एन. सी. सी. मध्ये होतो. मी एन. सी. सी. तूनच आलो आहे. तुमच्यापर्यंत मी त्याच मार्गाने आलो आहे. मला माहीत आहे की एन. सी. सी. , एन. एस. एस. सारख्या संस्था किंवा सांस्कृतिक शिबिरे युवकांना समाज आणि नागरी कर्तव्यांविषयी जागरूक करतात. त्याच धर्तीवर देशात आणखी एक संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेचे नाव ' माय युवा भारत " असे आहे. मी तुम्हा सर्वांना 'माय भारत’ स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंदणी करण्यास सांगेन. माय भारत या ऑनलाईन संकेतस्थळाला भेट द्या.
मित्रांनो,
या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवादरम्यान तुम्हाला अशा कार्यक्रमांना नियमितपणे भेट देण्याची संधी मिळणार आहे. संचलनात सहभागी होण्याव्यतिरिक्त, तुम्ही सर्वजण अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट द्याल आणि अनेक तज्ञांनाही भेटाल. हा एक असा अनुभव असेल जो तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल. दरवर्षी जेव्हा तुम्ही प्रजासत्ताक दिनाचे संचलन पहाल, तेव्हा तुम्हाला हे दिवस नक्कीच आठवतील ट, तुम्हाला हे देखील लक्षात राहील की मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या. यासाठी माझे एक काम नक्की करा. करणार ना? हात वर करून मला सांगा? मुलींचा आवाज मोठा आहे, मुलांचा आवाज कमी आहे. करणार ना? हां आता समान आहे. तुमचे अनुभव कुठल्या तरी रोजनिशीत कुठेतरी नक्की लिहा. आणि दुसरे म्हणजे, प्रजासत्ताक दिनी तुम्ही काय शिकलात, हे तुम्ही नमो अॅपवर लिहूनही किंवा एखादी चित्रफीत चित्रीत करून मला पाठवू शकता. तुम्ही पाठवाल ना? आवाज दबला. आजचे तरुण नमो एपच्या माध्यमातून माझ्याशी जोडलेले राहू शकतात. आणि जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या खिशात ठेवाल, तेव्हा तुम्ही जगाला सांगू शकता की मी नरेंद्र मोदींना माझ्या खिशात ठेवतो.
माझ्या युवा मित्रांनो,
मला तुमच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, तुमच्यावर विश्वास आहे. खूप अभ्यास करा, एक कर्तव्यनिष्ठ नागरिक बना, पर्यावरणाचे रक्षण करा, वाईट सवयींपासून दूर रहा आणि आपल्या वारसा तसेच संस्कृतीचा अभिमान बाळगा. तुमच्या सोबत देशाचे आशीर्वाद आहेत, माझ्या शुभेच्छा आहेत, संचलना दरम्यानही तुम्हा सर्वांची छाप राहिल, सर्वांची मने जिंका, माझी हीच मनोकामना आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. पूर्ण शक्तीनिशी माझ्या सोबत बोला, हात वर करुन –
भारत माता की- जय.
भारत माता की- जय.
भारत माता की- जय.
वंदे मातरम.
वंदे मातरम.
वंदे मातरम.
वंदे मातरम.
वंदे मातरम.
वंदे मातरम.
वंदे मातरम.
वंदे मातरम.
वंदे मातरम.
शाबाश!