“भारत @100 हा काळ नेहमीसारखा असू शकत नाही. या 25 वर्षांच्या कालावधीकडे एक एकक म्हणून पाहिले पाहिजे आणि आतापासूनच आपली तशी दृष्टी असायला हवी. यंदाचा उत्सव हा प्रवाहप्रपात असावा.”
"देशातील सर्वसामान्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, त्यांचे जीवन सुसह्य झाले पाहिजे आणि त्यांनाही ही सहजता अनुभवता आली पाहिजे"
"स्वप्न ते संकल्प ते सिद्धी या सामान्य माणसाच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर आपण सोबत असायला हवे "
“आपण जागतिक स्तरावरील घडामोडींकडे सजगतेने पाहिले नाही तर आपले प्राधान्यक्रम आणि लक्ष्यित क्षेत्र निश्चित करणे खूप कठीण होईल. हा दृष्टीकोन लक्षात घेऊन आपण आपल्या योजना आणि प्रशासन संरचना विकसित करणे आवश्यक आहे "
"समाजाच्या क्षमतेचे संगोपन करणे, त्यांना खुले करणे आणि त्यांचे समर्थन करणे हे सरकारी यंत्रणेचे कर्तव्य आहे"
"शासनातील सुधारणा ही आपली नैसर्गिक भूमिका असावी"
"'राष्ट्र प्रथम' द्वारे नेहमी आपल्या निर्णयांची माहिती दिली पाहिजे"
"टंचाईच्या काळात उद्भवलेल्या नियम आणि मानसिकतेने आपण ग्रसित होऊ नये, आपल्याकडे विपुलतेची वृत्ती असली पाहिजे"
"माझा स्वभाव राजकारणाचा नसून नैसर्गिकरीत्याच कल जननीतीकडे आहे"

मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ.जितेंद्र सिंग, पी.के.मिश्राजी, राजीव गौबाजी, व्ही. श्रीनिवासनजी आणि आज येथे उपस्थित असलेले नागरी सेवेतील सर्व सदस्य तसेच देशभरातून आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व सहकारी, माननीय स्त्री-पुरुष, नागरी सेवा दिनानिमित्त तुम्हा सर्व कर्मयोग्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. ज्या सहकाऱ्यांना आज पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्या संपूर्ण पथकाचे आणि त्या राज्याचे देखील माझ्याकडून अभिनंदन. मात्र माझी एक सवय थोडी विचित्र आहे, मी कोणाचेही मोफत अभिनंदन करत नाही. आपण काही गोष्टींना याच्याशी जोडून घेऊ शकतो का? अर्थात हे माझ्या मनात आलेले विचार आहेत पण तुम्ही मात्र ते असेच प्रत्यक्षात आणू नका, त्यांना तुमच्या प्रशासनिक यंत्रणेच्या चौकटीत बसवूनच अंमलात आणा. उदाहरणार्थ, आपल्याकडे नागरी सेवांशी संबंधित ज्या प्रशिक्षण संस्था आहेत, मग त्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीतील असो, पोलीस विभागाच्या अखत्यारीतील असो, मसुरीच्या असो व महसूल विभागाच्या असो, या संस्थाच्या कार्याचा विस्तार मोठा आहे. प्रत्येक आठवड्यात एक ते दीड तासासाठी या पुरस्कार विजेत्यांशी आभासी पद्धतीने बातचीत करता येईल का हे बघावे. त्यांनी त्यांच्या राज्यात काही कल्पना कशा सुरु केल्या, त्यात त्यांना काय अडचणी आल्या, त्याबद्दल हे पुरस्कार विजेते आभासी सादरीकरण करतील. त्याचा लाभ या संस्थांमधील प्रशिक्षणार्थींना होईल. या कार्यक्रमात प्रश्नोत्तरांचा देखील समावेश असावा. प्रत्येक आठवड्याला जर अशा दोन पुरस्कार विजेत्यांनी असा कार्यक्रम केला, विशेष चर्चा केली तर मला वाटते की येणाऱ्या नव्या पिढीला या चर्चेतून प्रात्यक्षिक अनुभवाचा लाभ मिळेल आणि ज्यांनी उत्तम कार्यासाठी हे पुरस्कार मिळवले आहेत त्यांना देखील त्यांच्या कामाशी जोडून घेतल्याचा आनंद मिळेल. हळूहळू त्यातही नवीन संशोधन होत राहील, या कार्यक्रमात नव्या गोष्टींची भर पडेल. अजून एक काम म्हणजे, आज ज्या 16 जणांना पुरस्कार मिळाले आहेत, त्यांना संपूर्ण देशातील सहकाऱ्यांकडून निमंत्रित केले जावे. या 16 पैकी तुम्ही कोणतीही एक योजना निवडा. तुमच्यातील एका व्यक्तीला त्या कामाची जबाबदारी द्या. आणि तुम्ही हा कार्यक्रम तीन महिने, सहा महिने कशा पद्धतीने राबविणार, त्यासाठी कोणती कामे हाती घेणार याचा आराखडा तयार करा. आणि समजा संपूर्ण देशातून 20 जिल्हे जर एकाच योजनेची निवड करत असतील तर त्या 20 जिल्ह्यांची एक आभासी बैठक घेऊन, त्यांच्यात चर्चा होऊ द्या. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीत सर्वात उत्तम काम कोण करत आहे याची नोंद ठेवा.  आणि या बाबीला संस्थात्मक करून त्यानुसार  जिल्ह्याचे स्वरूप बदलण्यासाठी काय करता येईल याचा विचार व्हायला हवा. संपूर्ण देशात ‘एक योजना, एक जिल्हा’ स्पर्धा राबवून आपण जिल्ह्याला पुढे आणू शकतो का? यावर विचार व्हायला हवा. आणि जेव्हा एका वर्षांनी सर्वजण पुन्हा भेटतील तेव्हा लगेच पुरस्कार देण्याची देखील गरज पडणार नाही. मात्र असा उल्लेख व्हायला हवा की, जी योजना 2022 मध्ये सन्मानित करण्यात आली होती त्यात आतापर्यंत इतकी-इतकी प्रगती झाली आहे. आणि मला वाटते की याचसाठी ही बाब संस्थात्मक व्हायला हवी. कारण मी बघितले आहे की, हा सरकारी यंत्रणेचा स्वभाव आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट कागदी चौकटीत बंदिस्त होत नाही तोवर त्या गोष्टीची प्रगती होत नाही. एखाद्या गोष्टीला संस्थात्मक करण्यासाठी आधी एक संस्था स्थापन करावी लागते. म्हणूनच आवश्यकता असेल तर ही यंत्रणा देखील उभारायला हवी. त्यामुळे काय होईल की, काही लोक तरी असे असतील की, जे मनात निश्चय करत असतील की, मला ही गोष्ट साध्य करायची आहे. आणि असा निश्चय केलेला असेल तर वर्षाचे 365 दिवस डोक्यात तोच ध्यास राहतो. सगळ्या गोष्टी त्या एका ध्येयाच्या प्राप्तीसाठी एकवटल्या जातात. आणि त्यापैकी काही जण हे ध्येय साध्य करून पुरस्कार देखील मिळवितात. काही जण मात्र या स्पर्धेत मागे पडतात. मात्र, आपण ही परिस्थिती निर्माण होऊ देता कामा नये. आपल्याला कोणालाही कमी लेखायचे नाही आहे, सर्वांमध्ये एक निरोगी स्पर्धा असायला हवी. आणि या दिशेने आपण विचार केला तर जो बदल आपल्याला घडवून आणायचा आहे त्या दिशेने काही काम करून आपण हा बदल घडवू शकू.

 

मित्रांनो,

तुमच्यासारख्या सहकाऱ्यांशी किंबहुना गेली 20-22 वर्षे मी अशा प्रकारे संवाद साधत आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री म्हणून अशी बातचीत करत होतो तेव्हा छोट्या परिघात ते काम होत असे. पंतप्रधान झाल्यानंतर या कामाची व्याप्ती वाढली आणि आता यात अनेक मोठी-मोठी माणसे सहभागी झाली आहेत. या सर्व प्रवासात मी तुमच्याकडून अनेकानेक नव्या गोष्टी शिकत असतो तसेच माझ्या मनातील काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. त्यामुळे आपल्यातील हा संवाद एका अर्थाने विचारांच्या आदानप्रदानाचे चांगले माध्यम झाले आहे, तसा प्रघात देखील पडून गेला आहे. मध्यंतरी, कोरोनाच्या काळात यामध्ये थोडा खंड पडला होता, नाहीतर मी तुम्हां सर्वांना भेटण्याचा, तुमच्याकडून शिकत राहण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तुमच्याकडून काही गोष्टी समजून घेऊन शक्य झाले तर त्यांना माझ्या व्यक्तिगत आयुष्यात आचरणात आणू, किंवा सरकारी प्रणालीत त्यांचा अंतर्भाव करण्यासारखा असेल तर तसे करू यासाठी मी प्रयत्नशील असतो. मात्र, ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्याला जीवनात पुढे घेऊन जाते. आपल्याला प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळत असते. प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येकाला देण्यासारखे काहीतरी निश्चितपणे असते आणि आपण जर त्या भावनेला जागृत केले तर स्वाभाविकपणे त्या गोष्टीचा स्वीकार करण्याची मनाची देखील तयारी होते.

 

मित्रांनो,

या वेळचा पारितोषिक वितरण समारंभ ही नेहमीची प्रक्रिया नाहीये. मी याला जरा विशेष समजतो. विशेष यासाठी की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवामध्ये जेव्हा देश स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे साजरी करत आहे त्या मुहूर्तावर आपण हा कार्यक्रम करत आहोत. आता आपण एक काम करू शकतो का? जीवनात काही गोष्टी अशा असतात की त्या सहजतेने आपल्या आजूबाजूला नवा उत्साह भरून टाकतात. समजा, तुम्ही ज्या जिल्ह्यात कार्यरत आहात त्या जिल्ह्यात गेल्या 75 वर्षांमध्ये गावप्रमुख म्हणून ज्या व्यक्तींनी काम केले आहे त्यांच्यापैकी काही आज या जगात असतील तर काही नसतील. मात्र त्यांच्यातील जे गावप्रमुख आज जिवंत आहेत त्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यामध्ये आमंत्रित करा. त्यांनी ज्या जागी महत्त्वाचे काम करत काही काळ घालविला तिथे 30-40 वर्षांनी परत आल्यावर  त्यांना देखील फार बरे वाटेल. तुम्ही जुन्या-जाणत्या लोकांची आठवण ठेवली म्हणून तुम्हालाही बरे वाटेल. त्यांच्यापैकी कोणी 30 वर्षांपूर्वी तर कोणी 40 वर्षांपूर्वी त्या जिल्ह्यात काम केले असेल. ते बाहेरून या जिल्ह्यात या निमित्ताने येतील ते जाताना येथून नवी उर्जा घेऊन जातील. आपल्या देशाचे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव एके काळी येथे होते. त्यांच्यासाठी देखील ही फार सुखावणारी बाब असेल. आपल्याला या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मला एक व्यक्ती आठवली, गोडबोले किंवा देशमुख होते बहुतेक. मी नाव विसरलो. ते एकेकाळी आपले केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचे जीवन रक्तपित्त रोगाने बाधित लोकांच्या सेवेला वाहून घेतले. एकदा ते रक्तपित्तसंबंधी कार्यक्रमानिमित्त गुजरातमध्ये आले होते. त्यावेळेस आमची भेट झाली. त्यांनी मला सांगितले की पूर्वी त्यांनी बनासकांठाच्या जिल्हाधिकारीपदावर काम केले आहे. त्या काळात संयुक्त मुंबई राज्य होते, महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे झालेले नव्हते. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर मी महाराष्ट्र कॅडरमध्ये गेलो. त्यानंतर मी भारत सरकारमध्ये गेलो. या त्यांच्या बोलण्याने लगेचच त्यांच्याशी माझी गट्टी झाली. मी त्यांना विचारले कि, बनासकांठा कॅडरमध्ये त्यांच्या काळात कशा पद्धतीने काम चालायचे? म्हणजेच, गोष्टी लहान असतात मात्र त्यांचे सामर्थ्य फार मोठे असते. आणि एखाद्या एकसुरी आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी सरकारी व्यवस्थेमध्ये चैतन्य निर्माण करणे आवश्यक असते. या प्रणाली सजीव असल्या पाहिजेत. पद्धती गतिमान असल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही ज्येष्ठ लोकांना भेटता तेव्हा त्यांच्या काळात सरकारी व्यवस्था अशी विकसित झाली हे जाणून घेतले पाहिजे. त्या काळाच्या पार्श्वभूमीची माहिती आपल्याला काही परंपरा सुरु ठेवायच्या की नाही, त्यामध्ये बदल करावे की न करावेत याची शिकवण देऊन जाते. माझी अशी इच्छा आहे की, स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात तुम्ही तुमच्या जिल्ह्यात पूर्वीच्या काळात जे जिल्हाधिकारी पदावर काम करत होते त्या सर्वांची भेट घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. तुमच्या संपूर्ण जिल्ह्यासाठी तो एक नवा अनुभव असेल. त्याच प्रकारे, राज्यांमध्ये जे अधिकारी मुख्य सचिवपदावर काम करत होते, त्यांना त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा भेटीसाठी आमंत्रण द्यावे. याच धर्तीवर, देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळ  सचिवपदी काम करून गेलेल्या सर्वांना पंतप्रधानांनी बोलावून घेऊन त्यांचे अनुभव ऐकावे. सरदार पटेल यांनी आपल्या देशाला नागरी सेवांचा अनमोल ठेवा दिला आहे, स्वातंत्र्याच्या अमृतकाळाचा 75 वर्षांचा प्रवास करताना भारताला पुढे नेण्यासाठी इतक्या वर्षांमध्ये नागरी सेवांची धुरा ज्यांनी वाहिली, त्यांच्यापैकी जे आज जिवंत आहेत त्यांनी देशाप्रती काही ना काही योगदान दिलेच असेल, तर त्याचे स्मरण या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात केले जावे. त्यांना सन्मानाने गौरविण्यात यावे. यातून नागरी सेवांच्या संपूर्ण प्रणालीचाच सन्मान होईल. देशाच्या 75 वर्षांच्या प्रवासाला आपण या सेवांप्रती समर्पित करू आणि एक नवे चैतन्य घेऊन पुढची वाटचाल करू. आपण या दिशेने प्रयत्न नक्कीच करू शकतो. 

 

मित्रांनो,

आपला हा अमृतकाळ केवळ गेल्या सात दशकांतील कामगिरीचा जयघोष करण्यासाठी नाहीये. मला वाटते आपण 70 व्या वर्षाकडून 75व्या वर्षाकडे गेलो असू, अगदी आपल्या दिनचर्येत फारसे बदल घडून आल्याविना हा बदल झाला असेल, 60 व्या वर्षाकडून 70 व्या वर्षाकडे गेलो, 70 व्या वर्षाकडून 75 व्या वर्षात प्रवेशलो. मात्र, 75 व्या वर्षापासून 2047 सालाकडे होणारे मार्गक्रमण, भारतीय स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षाकडे होणारी वाटचाल नेहमीची असूच शकत नाही. सध्याचा हा अमृतमहोत्सव म्हणजे एक पाणलोट क्षेत्रासारखा सलग असायला हवा. ज्याच्या छायेत आपल्याला पुढच्या 25 वर्षांच्या काळाला तुकड्या-तुकड्यात नव्हे तर एका संपूर्ण एककाच्या  स्वरुपात पाहायला हवे. इंडिया @100 म्हणजेच शतकमहोत्सवी वर्षातील भारत कसा असेल याचे संकल्पचित्र आपण दूरदर्शीपणे तयार करायला हवे. आणि त्या चित्रात माझा जिल्हा या 25 वर्षांमध्ये कुठे पोहोचेल, या जिल्ह्याच्या पटलावर मी कुठे असेन याची संकल्पना कागदावर मांडून तो तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लावून ठेवा. आपल्याला असे-असे साध्य करायचे आहे, येथे पोहोचायचे आहे ते त्यावर स्पष्ट लिहिलेले असेल. तुम्हांला दिसेल की, त्या कागदासोबत एक नवी प्रेरणा, नवा उत्साह निर्माण होईल. गुणोत्तरी उपक्रमांसह आपल्याला आपल्या जिल्ह्याला नव्या उंचीवर न्यायचे आहे आणि त्यासाठी केंद्रात आपले सरकार कार्यरत आहे. गेल्या 75 वर्षांमध्ये जी ध्येये आपण डोळ्यासमोर ठेवली, त्यांच्यासह आता इंडिया @100 साठी येत्या 25 वर्षांमध्ये आपण आपल्या जिल्ह्याला कोठे घेऊन जाणार आहोत हे देखील निश्चित झाले पाहिजे. संपूर्ण हिंदुस्तानात माझा जिल्हा प्रथम क्रमांकावर असेल यासाठी मी कठोर मेहनत करेन, कुठल्याही बाबतीत माझा जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा मागे पडणार नाही याची दक्षता मी घेईन. कितीही नैसर्गिक अडचणी असलेला जिल्हा असेल तरीही मी हे करून दाखवणारच, ही प्रेरणा, हे स्वप्न, हा निर्धार आणि त्यासाठी आवश्यक सातत्यपूर्ण प्रयत्नांचे पाठबळ असेल तर ह्या नागरी सेवा आपल्यासाठी नवे स्फूर्तीस्थान होऊन जातील.

 

मित्रांनो,

प्रत्येक भारतीय आज तुमच्याकडे ज्या आशा-आकांक्षेने बघतो आहे, त्या पूर्ण करण्यात आपल्या प्रयत्नात काहीही कमतरता राहू नये. त्यासाठी आज सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या सगळयांना प्रेरणा दिली आहे. जो संदेश दिला आणि ज्या संकल्पासाठी आपल्या सगळयांना प्रेरणा दिली, त्या संकल्पाचा आपण पुनरुच्चार करायला हवा. आपल्याला पुन्हा एकदा स्वतःलाच त्या संकल्पासाठी वचनबद्ध करावं लागेल. आणि इथूनच पाऊल पुढे टाकत आपल्याला या दिशेने जायचे आहे. आपण एका लोकशाही व्यवस्थेत राहतो, आणि आपल्यासमोर तीन उद्दिष्टे स्पष्टपणे असली पाहिजेत. आणि मला वाटतं की त्यात काहीही तडजोड व्हायला नको. आणि तीनच उद्दिष्टे असावीत, असे काही नाही, आणखीही अनेक गोष्टी असू शकतात. मात्र आज मी केवळ तीन उद्दिष्टे सांगतो आहे. पाहिले उद्दिष्ट आहे की आपण देशात ज्या काही व्यवस्था चालवत असतो, जे काही बजेट त्यासाठी वापरत असतो. जी काही पद प्रतिष्ठा आपण प्राप्त करतो, हे सगळं कशासाठी आणि कोणासाठी? हे सगळं का आहे? ही सगळी मेहनत आपण का करतो आहोत? हा सगळा थाटमाट कशासाठी आहे? आणि यासाठी मला असे सांगायचे आहे की आपले पाहिले उद्दिष्ट आहे, की देशातील सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडावा. त्याचे आयुष्य सुलभ व्हावे आणि त्याला त्याची जाणीव व्हावी. देशातीळ सर्वसामान्य नागरिकांना आता आपल्या सर्वसामान्य आयुष्यासाठी सरकार कडून जे काही हवे असते, त्यासाठी त्यालाच कष्ट करावे लागू नये. त्याला सहज सर्व उपलब्ध व्हावे, हे उद्दिष्ट कायम आपल्यासमोर असले पाहिजे. आपले प्रयत्न याच दिशेने व्हायला हवेत, की देशातील सर्वसामान्य माणसांची स्वप्ने आपण आपले संकल्प म्हणून पूर्ण करावेत. स्वप्नांपासून संकल्पापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे ही व्यवस्थेची जबाबदारी आहे आणि या व्यवस्थेचे नेतृत्व आपल्या सर्वांकडे आहे. आपल्याला हे ही बघायला हवं की देशातील नागरिक ज्यावेळी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठीचे संकल्प राबवत असतील, तर त्यांच्या या प्रवासात अडथळे येणार नाहीत, याची काळजी आपण घ्यायला हवी. जोपर्यंत संकल्प पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत त्यांना जिथे जिथे मदतीची गरज लागेल, त्या सर्व ठिकाणी आपण ती मदत करायची आहे. एखाद्या सहकाऱ्याप्रमाणे आपण त्यांना मदतीचा हात द्यायचा आहे. लोकांचे जीवनमान सुकर, सुखकर करण्यासाठी आपण जे काही करु शकतो, ते सगळं आपण  नक्की करायला हवं. आता दुसऱ्या उद्दिष्टाविषयी बोलायचं तर, आपण आज जागतिकीकरण हा शब्द गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने ऐकतो आहोत. एक काळ असा होता, जेव्हा भारत या सगळ्या गोष्टींकडे दुरून बघत असे. मात्र, आज भारताची परिस्थिती बदलली आहे. आणि अशा परिस्थितीत आपण जे काही करू त्याला जागतिक संदर्भ असायला हवा, ही काळाची गरज आहे. भारत जगात सर्वोच्च स्थानी कसा पोहचेल, जर जगात काय सुरु आहे हे समजलं नाही, आपण जाणून घेतलं नाही, तर आपल्याला कुठे जायचं आहे ते कसं समजणार आणि जर आपल्याल्या जगात सर्वोच्च स्थानावर जायचं असेल तर आपण कुठला मार्ग घ्यायला हवा, कुठल्या क्षेत्रात आपण जगाला मागे टाकू शकतो हे आपण ओळखायला हवं आणि त्यानुसार त्याचा तुलनात्मक अभ्यास करत आपल्याला पुढे जावंच लागेल. आपल्या योजना आहेत, आपलं प्रशासनाचं मॉडेल आहे जे आपल्याला या संकल्पानुरूप विकसित करायचे आहेत. आपण हा प्रयत्न देखील करायला हवा की यात सतत नाविन्य येत राहील, आधुनिकता येत राहील. आपण मागच्या शतकातले विचार, मागच्या शतकातले नियम येणाऱ्या शतकात लावून सुदृढतेचा संकल्प करू शकत नाही आणि म्हणूनच आपल्या व्यवस्थांमध्ये, आपल्या नियमांमध्ये, आपल्या परंपरांमध्ये बदल करण्यापूर्वी कदाचित 30 वर्ष 40 वर्ष लागले असते, तर चाललं असतं मात्र बदलत्या जगात आणि वेगानं बदलणाऱ्या जगात आपण क्षणाक्षणाचा विचार करून पावलं टाकली पाहिजेत असं माझं मत आहे. आणि आज मी तिसऱ्या ध्येयाविषयी बोलणार आहे, जी एकप्रकारे मी पुनरावृत्ती करतो आहे कारण ही गोष्ट मी सातत्यानं सांगत आलो आहे. सनदी सेवा अधिकाऱ्यांची सर्वात मोठी जबाबदारी ही आहे, की कधीही आपले ध्येय विसरता कामा नये. व्यवस्थेत आपण कुठे असाल, कुठल्याही पदावर असाल, मात्र ज्या व्यवस्थेतून आपण आलो आहोत, त्या व्यवस्थेत आपली सर्वोच्च जबाबदारी आहे आणि ती आहे देशाची एकता, देशाची अखंडता. याच्याशी आपण कुठलीच तडजोड करू शकत नाही. स्थानिक पातळीवर जेव्हा आपण कुठला निर्णय घेतो, तो निर्णय कितीही आकर्षक वाटत असला. प्रशंसा मिळवणारा असला, कितीही हवाहवासा वाटणारा असला. मात्र एकदा तो निर्णय त्या तराजूत सुद्धा तोलून घ्या की मी छोट्याशा गावात जो हा निर्णय घेतो आहे, यातून मी देशाच्या अखंडतेला तडा जाईल याचं बीज तर लावत नाही ना. आज तर चांगलं वाटत असेल. प्रेयस वाटत असेल तरीही श्रेयस करायला हवं आणि महात्मा गांधी श्रेयस आणि प्रेयस याविषयी नेहमी बोलत असत. आपण या गोष्टीविषयी आग्रही असायला हवं. आपण नकारात्मकता सोडून, हे देखील बघायला हवं की आपला कुठलाही निर्णय देशाची एकता अधिक दृढ करण्याच्या भावनेनं घ्यायला हवा. केवळ त्यामुळे एकता धोक्यात येत नाही, इतकंच पुरेसं नाही. त्या निर्णयामुळे एकता सुदृढ होते की नाही आणि वैविध्यपूर्ण भारतात आपण कायमच एकतेच्या मंत्राचा उपयोग करत रहावेच लागेल आणि हे पिढ्यानपिढ्या करत राहावं लागेल आणि त्याची चिंता आपल्याला काढून टाकावी लागेल आणि म्हणूनच मी पूर्वी देखील म्हणलो आहे, आज पुन्हा सांगतो आहे आणि भविष्यात देखील सांगत राहीन. आपल्या प्रत्येक कृतीची एक कसोटी असायला हवी, इंडिया फर्स्ट, नेशन फर्स्ट. माझं राष्ट्र सर्वोच्च आहे. आपल्याला जिथे पोचायचं आहे. लोकशाहीत सरकारी व्यवस्था वेगवेगळ्या राजकीय विचारांतून तयार झालेली असू शकते. आणि हे देखील लोकशाहीत गरजेचं आहे. मात्र प्रशासन व्यवस्थांचा उद्देश हाच असला पाहिजे की देशात एकता आणि अखंडता आणि कायमच भारताची एकता सुदृढ करण्याच्या मंत्रासह आपण पुढे जायला पाहिजे.

 

मित्रांनो,

आता ज्याप्रमाणे आपण जिल्हा पातळीवर काम करतो, राज्य स्तरावर काम करत असतो, किंवा भारत सरकारमध्ये काम करत असतो. याचं एखादं परिपत्रक निघायला पाहिजे का? की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून माझ्या जिल्ह्यासाठी कुठला लाभ मिळविता हेईल. त्यातून कुठल्या गोष्टी लागू करायच्या आहेत. या ऑलीम्पिक नंतर देशात क्रीडा क्षेत्राविषयी जी जागरूकता आली आहे. ते माझ्या जिल्ह्याच्या स्तरावर एक संस्थात्मक करून माझ्या जिल्ह्यातून देखील खेळाडू तयार व्हावे असे नेतृत्व कोण देईल? फक्त क्रीडा विभागानेच द्यावेत की चमूची पूर्ण जबाबदारी क्रीडा विभागाचीच आहे का? आता जर मी डिजिटल इंडिया बद्दल बोलायचं तर मी डिजिटल इंडियाची अंमलबजावणी माझ्या जिल्ह्यात एक चमू बनून करण्याविषयी विचार करतो आहोत का. आज मार्गदर्शन करायला काही करायला हवं अशी गरज नाही. आता ज्याप्रमाणे इथे दोन कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन झालं मात्र हे कुणीच विसरता कामा नये. ही कॉफी टेबल पुस्तकं हार्ड कॉपी नसून ई कॉपीज आहेत, मी पण माझ्या जिल्ह्याला हार्ड कॉपीच्या जंजाळातून बाहेर काढू शकतो का? कारण पुस्तकांच्या मोठ मोठ्या थप्प्या लागतील आणि नंतर कुणी घेणारा राहणार नाही. आपण करायला हवं, जर आज आपण बघितलं की इथे ई - कॉफी टेबल पुस्तक बनले आहे तर त्याचा अर्थ असा की आपण देखील अशी सवय लावून घ्यायला हवी की गरज पडल्यास आपण सुद्धा ई – कॉफी टेबल पुस्तक काढू. म्हणजे या गोष्टी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत घेऊन जाणे ही आपली जबाबदारी आहे, हे वेगळं सांगायची गरज पडायला नको. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आज जिल्ह्याला मार्गदर्शन करण्यासाठी जर कुठल्या व्यवस्थेची गरज पडावी अशी परिस्थिती नाही, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. जिल्ह्यात कुठली गोष्ट मिळवायला जर सगळा जिल्हा कामाला लागला आणि ती मिळवली तर बाकी गोष्टींवर आपोआपच सकारात्मक परिणाम यायला सुरवात होते.

 

मित्रांनो,

भारताच्या महान संस्कृतीचं वैशिष्ट्य हेच आहे. की आपला देश आणि मी ही गोष्ट पूर्ण जबाबदारीनं सांगतो आहे. आपल देश राज्य व्यवस्थेतून बनलेला नाही. आपला देश राजे महाराजांची मालमत्ता नव्हता आणि सिंहासनांमुळे देखील हा देश बनलेला नाही. हा देश शतकानुशतके, हजारो वर्षांच्या दीर्घ कालखंडात त्याची जी परंपरा आहे. सर्वसामान्य लोकांच्या सामर्थ्याला सोबत घेऊन चालण्याची जी परंपरा आहे. आज आपण जे काही मिळवलं आहे. ते लोकसहभागाच्या तपश्चर्येचं फळ आहे. लोकशक्तीच्या तपस्येचं फळ आहे आणि तेव्हा कुठे देश नवी शिखरं गाठू शकतो. पिढ्यानपिढ्यांच्या योगदानातून, काळाची जी गरज होती ती पूर्ण करत, त्या परिवर्तनांचा स्वीकार करत जे कालबाह्य होते ते टाकून देत, आम्ही तो समाज आहोत ज्यात चैतन्य आहे, ज्याने कालबाह्य परंपरा स्वतःच मोडून तोडून फेकून दिल्या आहेत. आपण डोळे झाकून त्याला कवटाळून जगणारे लोक नाही आहोत. कालानुरूप परिवर्तन करणारे लोक आहोत. जगात मी एक दिवस खूप पूर्वीची गोष्ट आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटशी मी बोलत होतो. तेव्हा मी राजकारणात माझी काही ओळख सुद्धा नव्हती. मी कोपऱ्यातला एक छोटासा कार्यकर्ता होतो. काही कारणांमुळे काही विषयांत माझा संबंध येत असे. तर तिथे माझ्यासोबत चर्चा झाली. मी म्हणालो जगात कुठलाही समाज आस्तिक असो, नास्तिक असो, हा धर्म मानणारा असो, त्या धर्माला मानणारा असो, मात्र मृत्यूनंतरच्या जगाबद्दल जे काही समज, मान्यता असतात. याविषयी ते जास्त परिवर्तन करण्याचं धाडस करत नाहीत. ते वैज्ञानिक आहे की नाही, उपयुक्त आहे की नाही. वेळेतच या गोष्टी टाकून द्याव्यात की नाही. असे धैर्य ते करत नाही. मृत्यूनंतरच्या जगाबद्दल जी मानसिकता तयार झाली आहे, परंपरा बनली आहे, ती जखडून ठेवते. मी म्हणालो हिंदू एक असा समाज आहे भारतातला, की जो मृत्यूनंतर गंगेच्या काठावर चंदनाच्या चितेवर जर अग्नी मिळाला तर असं वाटतं की आता माझं अंतिम कार्य परिपूर्ण झालं. तोच समुदाय आता फिरत-फिरत-फिरत विद्युत दाहिनीपर्यंत आला आहे, त्यात त्यांना काहीच संकोच वाटला नाही, या समाजाची ही परिवर्तनशीलतेची फार मोठ्या शक्तीचा याहून मोठा पुरावा आणखी कुठला नसेल. जगातला कितीही आधुनिक समाज असो, मृत्यूनंतर त्यांच्या ज्या धारणा असतात, त्या बदलण्याचं सामर्थ्य त्या समाजात नसतं. आम्ही त्या समाजाचे लोक आहोत, जे या धरतीची शक्ती आहेत की आम्ही मृत्यूनंतरच्या व्यवस्थेत देखील गरज पडल्यास आधुनिकतेचा स्वीकार करायला तयार असतो आणि म्हणूनच मी म्हणतो, हा देश नेहमीच नवीन, नेहमीच परिवर्तनशील, नवीन गोष्टींचा स्वीकार करणाऱ्या एका समाज व्यवस्थेचा परिणाम म्हणून आज त्या महान परंपरेला गती देणे आपली जबाबदारी आहे. पण ती गती देण्याचे काम करत आहोत का?

केवळ फायलींना गती देऊन आयुष्य बदलत नाही मित्रांनो, त्या एका सामाजिक व्यवस्थेअंतर्गत  शासन व्यवस्थाचे एक सामर्थ्य असते की मला संपूर्ण समाज जीवनाचे  नेतृत्व द्यायचे आहे, ही आपली जबाबदारी बनते आणि ते केवळ राजकीय नेत्याचे काम नाही.प्रत्येक क्षेत्रातील नागरी सेवेतील माझ्या सहकाऱ्यांना यात नेतृत्व करवे लागेल. आणि समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी नेतृत्व करण्यासाठी स्वतःला  सज्ज ठेवावे लागेल आणि तेव्हा कुठे आपण  परिवर्तन घडवून आणू शकू, मित्रांनो. आणि परिवर्तन घडवून आणण्याचे  सामर्थ्य आज देशात आहे,  आणि केवळ आपण विश्वास ठेवून जगत आहोत असे नाही . सम्पूर्ण जग मोठ्या आशेने आपल्याकडे पाहत आहे. त्यामुळे हे आपले कर्तव्य ठरते की त्या  कर्तव्यपूर्तीसाठी आपण स्वतःला सज्ज ठेवावे. आता जसे आपण नियम आणि कायद्यांच्या बंधनात असे अडकून पडतो, आणि असे करताना आपण आपल्यासमोर जो एक नवा वर्ग तयार झाला आहे युवकांचा, जी  युवा पिढी तयार होत आहे , तिच्या साहसाला, तिच्या सामर्थ्याला आपण या नियमांच्या कचाट्यात तर अडकवून ठेवत नाही ना?

त्यांचे  सामर्थ्‍य प्रभावित तर करत नाही  ना? जर हे करत असेन तर मग मी बहुधा काळानुसार चालण्याचे सामर्थ्य गमावले आहे. मी उज्वल भविष्यासाठी , भारताच्या उज्वल भविष्यासाठी , माझी स्वतःची पावले योग्य दिशेने योग्य सामर्थ्याने पडतील , हे कदाचित मी गमावले आहे. जर मी यातून बाहेर पडलो तर मी परिस्थिती बदलू शकतो.  आणि आपल्या देशाने आजही पाहिले असेल .  आता हे आयटी क्षेत्र , जगभरात भारताची प्रतिमा निर्माण करण्यात जर कुणी प्रारंभिक भूमिका पार पाडली असेल तर ती आपल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 20, 22, 25 वर्षांच्या युवकांनी केली आहे. मात्र जर मानले की जर आपणच लोकांनी त्यात अडथळे निर्माण केले असते, कायदे-नियमांमध्ये त्यांना अडकवले असते तर माझे हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र इतके समृद्ध झाले नसते ,आणि जगभरात त्याचा  डंका देखील वाजला नसता.,

 

मित्रांनो,

आपण नव्हतो तरी ते पुढे जाऊ शकले, त्यामुळे कधीकधी आपणही विचार करायला हवा की दूर राहून, टाळ्या वाजवून प्रोत्साहित करून देखील जगाला बदलता येते. आज आपण अभिमान बाळगू शकतो की स्‍टार्ट अप्‍स च्या बाबतीत,  2022 ची पहिली तिमाही नुकतीच संपली आहे , तर  2022 च्या पहिल्या तिमाहील्या छोट्याशा कालखंडात माझ्या देशाच्या युवकांनी  स्‍टार्ट अपच्या जगतात  14 यूनिकॉर्न चे स्थान प्राप्त केले आहे , मित्रांनो , ही खूप मोठी कामगिरी आहे.  जर माझ्या देशातील युवक केवळ  तीन महिन्यात  14 यूनिकॉर्न  साध्य करून नवी उंची गाठू शकतो, आपली काय  भूमिका आहे ? कधी-कधी तर आपल्याला माहीत देखील नसते की ,माझ्या जिल्ह्यातील युवक होता आणि 2 ऱ्या श्रेणीतील कोपऱ्यात बसून काम करत होता.  आणि वृत्तपत्रात आले तेव्हा समजले की तो तर इथे पोहचलेला आहे. याचा अर्थ असा की शासन व्यवस्थेच्या बाहेरही समाजाच्या सामर्थ्याची ताकद खूप मोठी असते.मी त्यासाठी पोषक आहे की नाही ?मी त्यांना  प्रोत्साहित करतो की नाही ? मी त्यांना मान्यता देतो की नाही? असे तर नाही की तू केलेस ते केलेस, मात्र आधी का नाही  भेटलास ? सरकारकडे का गेला नाहीस ? नाही आला, तुमचा वेळ वाया दवडायचा नव्हता, मात्र तुम्हाला खूप काही देऊन जात आहे, तुम्ही त्याची प्रशंसा करा.

 

मित्रांनो,

मी दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे, मात्र अशा अनेक गोष्टी आहेत , कृषी क्षेत्र आहे. तिथे मला दिसून येत आहे की आपल्या देशातील शेतकरी आधुनिकतेकडे वळत आहेत. कदाचित त्यांची संख्या कमी असेल. माझ्या बारीक नजरेत  ती स्थिर झाली आहे का ?

 

मित्रांनो,

आपण जर या गोष्टी केल्या तर मला वाटते की खूप मोठा बदल घडून येईल. मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे  , कधी-कधी मी पाहतो की केवळ खेळणे हा बहुतांश लोकांच्या स्वभावाचा भाग बनला आहे. अरे जाऊदे ना, आपल्याला कुठे जास्त दिवस रहायचे आहे, एका जिल्ह्यात दोन-तीन वर्षे खूप झाली.  पुढे जाऊ. काय झाले, मी कुणालाही दोष देत नाही, मात्र जेव्हा एक आश्वस्त व्यवस्था मिळते, आयुष्याची सुरक्षा पक्की होते. तेव्हा कधी- कधी स्पर्धेची भावना नसते. आता आपल्याकडे सगळे काही आहे, नवे संकट कशाला अंगावर ओढून घ्या, आयुष्य तर पुढे जातच राहणार आहे, मुले मोठी होतील, कुठे ना कुठे संधी मिळेलच, आपल्याला काय करायचे आहे ? आणि त्यातून स्वतःच्या   प्रति देखील  उदासीन होतात . व्यवस्था तर जाऊदे, स्वतःसाठीही  उदासीन बनतात . मित्रांनो , ही जगण्याची रीत नाही ,  स्वतःसाठी कधीही   उदासीन होऊ नये. जीवनाचा पुरेपूर आनंद लुटा. आणि काही ना काही करून दाखवण्याचा , प्रत्येक क्षणाचा हिशोब घेत राहिले पाहिजे.  तेव्हा कुठे जगण्याची मजा येते.   या निघून गेलेल्या क्षणामध्ये मी काय मिळवले?  या निघून गेलेल्या क्षणामध्ये मी काय दिले ? असा हिशोब मांडायचा  स्‍वभाव नसेल तर आयुष्य हळूहळू स्वतःलाच स्वतःपासून उदास बनवते आणि मग जगण्याचा उत्साह राहत नाही. मी तर कधी-कधी म्हणतो, की सतार  वादक आणि  एक टंकलेखक या दोघांमधील फरक कधी पाहिला आहे का ? एक कॉम्प्युटर  ऑपरेटर हाताच्या बोटांद्वारे  कामात गुंग असतो.  मात्र  45-50 वय झाल्यावर कधी भेटलात तर अगदी महत्प्रयासाने वर पाहतात. एकदोनदा सांगून तर ते ऐकतही  नाहीत. पुन्हा पुन्हा विचारले तर म्हणतात , हं साहेब, काय काम होते . अर्धमेले आयुष्य जगत आहे तो, आयुष्य ओझे बनले आहे. काम तर बोटांनी करायचे आहे.  टाइपराइटरवर बोटेच तर फिरवत असतो. आणि दुसरीकडे  एक सतार वादक , ते देखील बोटांद्वारे किमया दाखवतात. . मात्र त्यांना वयाच्या 80 व्या वर्षी भेटलात तरी चेहऱ्यावर तेज दिसते. आयुष्य जगल्याचे समाधान दिसते. मित्रांनो, स्वप्ने उराशी बाळगणारा माणूस दिसतो, दोघेही बोटांच्या सहाय्याने आपले कौशल्य दाखवतात , मात्र एक जगता-जगता मरणाधीन झाला आहे तर दुसरा उत्स्फूर्तपणे आयुष्य जगत आहे. या बदलामुळे आयुष्य मनापासून जगण्याचा आपला संकल्प असतो का , तेव्हाच आयुष्य बदलून जाते मित्रांनो, आणि म्हणूनच मी म्हणतो कीं देशभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात माझे लाखो सहकारी आहेत , त्यांच्या आयुष्यात चैतन्य असायला हवे,   सामर्थ्‍य असायला हवे, काही तरी करून दाखवण्याचा संकल्प असायला हवा, तेव्हाच आयुष्य जगल्याचा आनंद मिळतो, मित्रानो.  कधी-कधी लोक मला विचारतात  की साहेब तुम्ही थकत   नाही का ? बहुधा हेच कारण आहे जे मला थकू देत नाही. मला प्रत्येक क्षण जगायचा  आहे. मला प्रत्येक क्षण जगून इतरांसाठी जगायचे आहे.

 

मित्रांनो,

याचा परिणाम काय झाला आहे? परिणाम असा झाला आहे की जी चौकट बनली आहे, आपण जिथे कुठे जातो, स्वतःमध्ये त्यानुसार बदल करतो. आणि तसे बदल करून घेण्यात तर तुम्ही पटाईत आहात . काहींना हे चांगले वाटत असेल, मात्र मला वाटते की मित्रांनो, हे जगणे नाही, जिथे गरज आहे तिथे त्यानुसार स्वतःत बदल करा. ते देखील गरजेचे असते. आपण  सहजपणे प्रशासनात सुधारणा केल्या आहेत का , हा आपला स्वभाव बनला आहे का?  छोट्या छोट्या गोष्टींसाठी आयोग स्थापन करायला लागणे बरोबर नाही. खर्च कमी करायचा आहे , आयोग स्थापन करा. प्रशासनात बदल करायचा आहे, आयोग स्थापन करा. 6 महिने,  12 महिन्यानंतर अहवाल येणार, मग अहवाल पाहण्यासाठी आणखी एक समिती स्थापन करा. त्या समितीच्या अंमलबजावणीसाठी आणखी  एक आयोग स्थापन करा. आता हे जे आम्ही केले आहे, त्याचा मूळ स्‍वभाव आहे की आम्ही प्रशासनात सुधारणा केल्या, कालानुरूप बदल करणे खूप आवश्यक असते बरे का. कधी काळी युद्ध व्हायची तेव्हा हत्ती असायचे , हत्तीवाल्यानी हत्ती  सोडून  घोड़े पकड़ले, आणि आज ना हत्ती  चालतो,ना घोडा , दुसऱ्याच कशाची तरी गरज भासते. या सुधारणा सहजपणे होतात,  मात्र युद्धाचा दबाव आपल्याला सुधारणा करण्यासाठी प्रवृत्त करतो. देशाच्या आशा-आकांक्षा आपल्याला प्रवृत्त करतात की नाही , जोपर्यंत देशाच्या  आशा-आकांक्षा आपण समजून घेत नाही, तोवर आपण स्वतःहून प्रशासनात सुधारणा करू शकत नाही.  प्रशासनातील सुधारणा ही आपली नैसर्गिक प्रक्रिया असायला हवी, सहज प्रक्रिया असायला हवी आणि प्रयोगशील व्‍यवस्‍था असायला हवी . जर  प्रयोग यशस्वी झाला नाही तर तो सोडून जाण्याचे साहस असायला हवे. आपण स्वतः केलेली चूक मान्य करून नवीन काहीतरी स्वीकारण्याचे माझ्यात सामर्थ्‍य असायला हवे. तेव्हा कुठे बदल घडून येतो.  आता तुम्ही पहा, असे शेकडो कायदे होते जे देशाच्या नागरिकांसाठी ओझे बनले होते. मी जेव्हा  2013 मध्ये, प्रथमच पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून माझ्या पक्षाने माझे नाव घोषित केले,आणि मी भाषण देत होतो, तेव्हा दिल्‍ली मध्ये एका उद्योग समुदायाने मला बोलावले होते. 2014 मध्ये  निवडणुकीला अजून  4-6 महिने शिल्लक होते.तेव्हा त्यांनी मला विचारले काय करणार? मी म्हटले, मी रोज एक कायदा बंद करणार.नवीन कायदा बनवणार नाही. तेव्हा त्यांना  आश्चर्य वाटले. आणि मी सुरुवातीच्या  5 वर्षात  1500 कायदे रद्द केले होते. मला सांगा, मित्रांनो , एवढे कायदे घेउनपण का जगत होतो ?  आणि मला आजही … आजही माझे मत तेच आहे, अनेक कायदे असे आहेत जे विनाकारण प्रचलित आहेत.  तुम्ही पुढाकार घेऊन ते रद्द करा ना .  देशाला या जोखडातून बाहेर काढा. त्याच प्रकारे, अनुपालन, आपण नागरिकांकडून किती अपेक्षा करतो.  मला  कैबिनेट सचिव म्हणाले होते की जगातील अन्य देशांसाठी ते उपयुक्त असतील. तुम्ही ती जबाबदारी घ्या. या अनुपालनापासून देशाला मुक्त करा. नागरिकांना मुक्त करा. स्वातंत्र्य मिळून  75 वर्षे झाली, नागरिकांना या कचाट्यात का अडकवून ठेवले आहे .  आणि एका कार्यालयात  6 जण बसले असतील, प्रत्येक टेबलवर माहिती असेल, मात्र तरीही ते स्वतंत्रपणे मागणी करतील, शेजाऱ्याकडून  घेणार नाही. आपण नागरिकांकडून इतक्या गोष्टी वारंवार मागतो . आज तंत्रज्ञानाचे  युग आहे, आपण अशी व्यवस्था  विकसित का करू नये, आपण अनुपालन, दबाव यापासून देशाला मुक्त का करायचे नाही ? मी तर चकित झालो आहे. आता आमच्या कॅबिनेट सचिवांनी निर्धार केला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी  तुरुंगात पाठवतात, मी एक असा कायदा पाहिला आहे , जर कारखान्यात जी  शौचालये असतात,  त्यांना जर दर  6 महिन्यात  चुना लावला नसेल, तर तुम्ही तुरुंगात जाणार. आता सांगा . कसा देश चालवणार आहेत? आता या सर्व गोष्टींपासून आपल्याला मुक्ती हवी.  आता ही नैसर्गिक प्रक्रिया असायला हवी. यासाठी कुठलेही परिपत्रक काढण्याची गरज भासू नये. तुमच्या लक्षात  येतंय  का ,  राज्‍य सरकारच्या अखत्यारीतील हा प्रश्न आहे , राज्य सरकारला सांगा, भारत सरकारची जबाबदारी असेल तर त्यांना सांगा. संकोच करू नका. जेव्हढे आपण नागरिकांवरील भार हलका करू , तेवढे ते खुलून येतील. खूप मोठ्या ताकदीने खुलतील. आपल्याला थोडेसे ज्ञान असते , मोठ्या वृक्षाखाली कितीही  चांगले  फुलाचे रोपटे लावू इच्छिता ,मात्र मोठ्याच्या छायेचा एवढा दबाव असतो, की तो  फुलू  शकत नाही.तेच रोपटे जर मोकळ्या आभाळाखाली  लावले तर ते देखील ताकदीने उभे राहील, त्याला या दबावातून  बाहेर काढा.

 

मित्रांनो,

साधारणपणे  असे पाहण्यात येते की, ज्याप्रमाणे सर्व काही सुरू आहे, तसेच, त्याच व्यवस्थेमध्ये  म्हणजे मी आधी जसे म्हणालो, तसे करत रहावे. कसा-बसे जगत जावे, वेळ घालवण्याचा प्रयत्न करत रहायचे. गेल्या सात दशकांची जर आपण समीक्षा केली तर आपल्याला एक गोष्ट नक्कीच दिसेल. ज्यावेळी कोणतेही संकट आले, एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा कोणत्याही एखाद्या विशिष्ट प्रकारचे दडपण निर्माण झाले तर आपण काही बदल नक्कीच केले आहेत. कोरोना आला तर अवघ्या जगभरात होणारे परिवर्तन आपणही आपल्या हिताप्रमाणे करून घेतले. परंतु अशी गोष्ट बरोबर, योग्य मानता येईल काय? मोठा दबाव, दडपण आले म्हणून आपल्यामध्ये बदल करायचा ही काही पद्धत आहे का? मित्रांनो, आपण स्वतःला सज्ज का नाही करायचं? आणि म्हणूनच आपण केवळ संकटकाळामध्येच  मार्ग शोधणे बरोबर नाही .... आता एक काळ असा होता की, आपल्याकडे अनेक गोष्टींचा अभाव होता, त्यामध्येच आपण गुजराण करत होतो. त्याकाळामध्ये अशा अभावामध्ये कसे जगावे, याचा विचार करून सर्व नियम बनविले गेले होते. परंतु आता ज्यावेळी आपण अभावात्मक स्थितीतून जर बाहेर आलो आहोत, तर मग कायदे-नियम यांनाही अभावातून बाहेर काढले पाहिजे. विपुलतेमध्ये आता काय केले पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे. जर आपण विपुलतेच्या स्थितीविषयी विचार नाही केला तर सगळीच गडबड होईल. आपण कृषी क्षेत्रामध्ये पुढे जात आहोत, आणि जर आपण अशावेळी अन्न प्रक्रियेची व्यवस्था आधीच केली असती तर आज अधून-मधून शेतकरी बांधवांवर ज्या गोष्टींचे ओझे बनते आहे, ते ओझे कदाचित बनले नसते. आणि मी असे म्हणतो की, संकटामधून बाहेर पडण्याची कला, पद्धत सरकारने शिकली आहे. मात्र स्थायिभाव बनून कोणतीही व्यवस्था विकसित केली पाहिजे... आपल्या लोकांना, आणि आपल्याला नेमकी परिस्थिती  काय असणार आहे, काय होईल, याचे दृष्य आधीच दिसले पाहिजे. आपल्याला अमूक-अमूक समस्या येतात, या समस्या कशा संपुष्टात येतील, त्यासाठी कोणती उपाय योजना करता येईल, यावर काम केले पाहिजे. त्याच प्रकारे आपल्याला समस्यांच्यामागे नाइलाजाने, जबरदस्तीने धावावे लागेल, ही काही गोष्ट योग्य नाही. आपल्याला आव्हानांचा आधीच अंदाज घेला आला पाहिजे. जर तंत्रज्ञानाने दुनियेमध्ये परिवर्तन घडून येत असेल तर आपल्याला त्या प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाबरोबरच येणा-या  आव्हानांची जाणीव झाली पाहिजे. आपण स्वतःला त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज केले पाहिजे. आणि म्हणूनच मला असे वाटते की, प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणणे हे आपले नित्य कर्म असले पाहिजे. यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे आणि मी तर असे म्हणेन की, ज्यावेळी आपण सेवानिवृत्त होऊ त्यावेळी मनातून एक आवाज आला पाहिजे की, माझ्या कार्यकाळामध्ये मी प्रशासनामध्ये इतक्या-इतक्या सुधारणा केल्या. आणि अशा व्यवस्था विकसित केल्या त्या कदाचित आगामी 25-30 वर्षांपर्यंत देशाच्या उपयोगी पडतील. जर असे बदल होत असतील तर ते परिवर्तन असते.

 

मित्रांनो,

गेल्या आठ वर्षांच्या काळामध्ये देशामध्ये अनेक मोठी कामे झाली आहेत. यापैकी अनेक मोहिमा अशा आहेत, ज्यांच्या मुळाशी वर्तनशैलीमध्ये बदल घडवून आणणे आहे. असे काम अतिशय अवघड असते आणि राजकीय नेते तर असे बदल घडवून आणण्याच्या कामात हात घालण्याचे धाडसही करत नाहीत. परंतु मित्रांनो, राजकारणापेक्षा मी खूप  वेगळा विचार करतो. लोकशाहीमध्ये एक व्यवस्था असते, मला राज व्यवस्थेतून जावे लागले, ही गोष्ट वेगळी आहे. वास्तविक माझा मूळ स्वभाव राजकारण करण्याचा नाही. मी लोकनीती- जननीतीबरोबर जोडला गेलेला माणूस आहे. जनसामान्यांच्या आयुष्याबरोबर मी जोडला गेलेला माणूस आहे.

 

मित्रांनो,

म्हणूनच वर्तनशैलीत्मक परिवर्तन घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे, समाजातल्या मूलभूत गोष्टींमध्ये परिवर्तन आणण्याचा माझा  प्रयत्न आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडून  यावे अशी माझी आशा-आकांक्षा आहे ती, त्याचाच एक भाग आहे आणि ज्यावेळी मी समाजाविषयी बोलत असतो, त्यावेळी मला असे वाटते की, शासनामध्ये असलेले लोक काही वेगळे नाहीत. ते काही  दुस-या कोणत्याही किंवा परग्रहावरून आले आहेत, असे नाही. ते सुद्धा या व्यवस्थेचा भाग आहेत. आपण असे बदल घडवून आणण्याविषयी बोलतो, मी पाहतो, अनेक अधिकारी मला विवाहाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी येतात. आता माझा स्वभाव असा आहे की, मी कोणाला असेच सोडून देत नाही.  माझ्याकडे येतात तर ते खूप महागडी, खर्चिक निमंत्रण पत्रिका काही घेऊन येत नाहीत. अगदी स्वस्त, साधी निमंत्रण पत्रिका घेऊन येतात. त्यावर प्लास्टिकचे पारदर्शक कव्हर असते. ते पाहिल्यावर मी अगदी सहजतेने विचारतो की, एकदाच वापरता येणारे प्लास्टिक तुम्ही अजूनही वापरता? मग बिचारा अधिकाऱ्याला त्याची लाज वाटते. माझे इतकेच म्हणणे आहे की, आपण देशाकडून अपेक्षा करतो की, एकेरी वापराचे प्लास्टिक उपयोगात आणले जाऊ नये, आणि स्वतः मात्र वापरायचे. माझ्या कार्यालयात, मी जिथे आहे -तिथे, मी जिथे काम करत आहे -तिथे, अशा सगळीकडे माझ्या जीवनात बदल घडवून आणत आहे. माझ्या कार्यव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणत आहे. मी कोणत्याही गोष्टींमध्ये,  अगदी लहान लहान गोष्टींकडे खूप बारकाईने यासाठी लक्ष देतो.  आपण मोठ्या गोष्टींमध्ये हरवून जातो, मोठ्या गोष्टी करण्यात इतके व्यग्र होतो की,  लहान गोष्टींपासून आपण दूर निघून जातो. आणि मित्रांनो, ज्यावेळी लहान गोष्टींपासून आपण दूर जातो, त्यावेळी लहान लोकांच्या दृष्टीने त्यांच्या आणि आपल्यामध्ये एक भिंत तयार होत असते. मला अशा भिंती तोडून टाकायच्या आहेत. आता स्वच्छता मोहिमेचे पहा, मला प्रयत्न करावे लागतात. दर पंधरा दिवसांनी विभागांमध्ये काय चालले आहे, स्वच्छतेविषयी काही कार्य केले जात आहे की नाही, हे पहावे लागते. आता  वास्तविक  दोन वर्ष, तीन वर्ष, पाच वर्ष झाले आहेत मित्रांनो, मग आता आपल्या विभागाची स्वच्छता राखण्याचा स्वभाव बनला पाहिजे की, नाही बनला पाहिजे? जर तो स्वभाव बनला  नाही तर मग देशाच्या सामान्य नागरिकाकडून त्याचा स्वभाव बनावा, ही अपेक्षा करणे जास्तच होणार आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो, मित्रांनो आपण या व्यवस्थेचा स्वीकार केला पाहिजे. आता आपण डिजिटल भारताविषयी बोलतो. एका फिनटेकविषयी बोलतो. भारताने फिनटेकमध्ये जो वेग घेतला आहे, डिजिटल पेमेंटच्या दुनियेमध्ये जे पाऊल उचलले आहे, ते महत्वाचे आहे.  ज्यावेळी काशीच्या नवयुवकाला पारितोषिक मिळते, त्यावेळी आमच्या अधिका-याला टाळी वाजविण्याची इच्छा होते. कारण तो फेरीवाला- विक्रेता डिजिटल पेमेंटचे काम करत असतो. आणि आपल्याला ते छायाचित्र पाहून चांगले वाटते. परंतु इथल्या कार्यालयातला अधिकारी, तो काही डिजिटल पेमेंट करत नाही. जर माझ्या व्यवस्थेचा भाग असलेला व्यक्तीच  ते काम करत नाही, याचा अर्थ या लोकचळवळीमध्ये ते बाधा आणणारे आहेत. प्रशासकीय सेवा दिनी ज्या गोष्टींविषयी विवाद होऊ शकतात,  अशा विषयांवर बोलले नाही पाहिजे. तुम्ही तर दोन दिवस असणार आहात, त्यामुळे माझ्याही खटकणा-या गोष्टींविषयी बोलू शकता, टीका करू शकता, हे मला माहिती आहे. मात्र तरीही  मित्रांनो, मला सांगायचे आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात, ज्या गोष्टी समाजाने कराव्यात अशी आपण अपेक्षा करतो, त्या गोष्टींचा प्रारंभ कुठून तरी आपल्यापासूनच केला पाहिजे. आपल्यालाच  यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर आपण अशा गोष्टींचा प्रयत्न केला तर आपणच खूप मोठे परिवर्तन घडवून आणू शकणार आहे. बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आता जीईएम-जेम पोर्टल, यासाठी वारंवार परिपत्रक काढायची गरज आहे? आपण आपल्या विभागासाठी लागणारी खरेदी शंभर टक्के जेम पोर्टलच्या माध्यमातून करावी, यासाठी सारखे परिपत्रक काढावे लागणार का? मित्रांनो, हे एक सशक्त माध्यम बनले आहे. आपल्या यूपीआयचे विश्वस्तरावर कौतुक होत आहे. माझ्या मोबाइल फोनमध्ये यूपीआयची व्यवस्था आहे का? मला यूपीआयची सवय लागली आहे का? माझ्या परिवारातल्या सदस्यांनी यूपीआयचा वापर सुरू केला आहे का? आपल्या हातामध्ये खूप मोठे सामर्थ्य आहे. परंतु जर मी, आपल्या यूपीआयच्या व्यवस्थेचा स्वीकार करत नाही आणि मीच म्हणतो की, गुगल तर बाहेरचे आहे. मित्रांनो, जर आपल्या मनाने यूपीआयचा स्वीकार केला नाही आणि  यूपीआयविषयी  तुमच्या मनामध्ये आपुलकीचा भावच नसेल तर काय होणार? तुम्ही यूपीआयविषयी मनामध्‍ये आपुलकीचा भाव ठेवला तर युपीआयसुद्धा गुगलच्या पुढे जाऊ शकते, इतकी ताकद त्यामध्ये आहे. फिनटेकच्या  दुनियेमध्ये आपले नाव कायमच कोरू शकतो. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ते ‘फुल प्रुफ’ सिद्ध झाले आहे. जागतिक बँक त्याचे कौतुक करत आहे. आपल्या व्यवस्थेचा तो भाग का नाही बनू शकत? लोकांच्या मागे लागून त्याचा वापर करवून घ्यावा लागतो, असे मी पाहिले आहे. आपल्याकडे जितकी ‘युनिफॉर्म फोर्सेस’ म्हणजेच जितकी सैनिकी दले आहेत, त्यांनी आपल्या उपाहारगृहांमध्ये डिजिटल पेमेंट अनिवार्य केले आहे. ते डिजिटल पेमेंटचाच स्वीकार करतात. परंतु आजही आपल्या सचिवालयामधल्या उपाहारगृहामध्ये ही व्यवस्था नाही. असे परिवर्तन आम्ही घडवून आणू शकतो का? ही गोष्ट अतिशय लहान वाटत असेल, परंतु मित्रांनो, आपण प्रयत्न तरी केला पाहिजे, तरच आपण मोठ्या गोष्टी करू शकतो आणि आपल्याला अखेरच्या व्यक्तीपर्यंत योग्य ते लाभ पोहचविण्यसाठी सातत्याने , ‘परफेक्ट सीमलेस मेकॅनिझम’ तयार करत राहिले पाहिजे. आणि अशा प्रकारे यामध्ये आपण जितके जास्त मेकॅनिझम – यंत्रणा तयार करू-  तितके मला वाटते की, देशातल्या अखेरच्या व्यक्तीला सक्षम, सबल करण्याचे आपले जे मिशन आहे, ते मिशन अधिक चांगल्या पद्धतीने आपण पूर्ण करू शकणार आहे.

 

मित्रांनो,

तुम्हा मंडळींचा मी खूप वेळ घेतला आहे. अनेक विषयांवर मी आपल्याशी बोललो आहे. मात्र आपण सर्वांनी या विषयांमध्ये पुढे जाऊन कार्य करावे, असे मला वाटते. हा नागरी  सेवा दिन म्हणजे  आपल्यामध्ये एक नवीन चैतन्य, ऊर्जा भरण्याची संधी बनली पाहिजे. नवीन संकल्प घेण्याची एक संधी बनली पाहिजे. नव्या उत्साहाने आणि चैतन्याने जे नवीन लोग आपल्यामध्ये आले आहेत, त्यांच्याशी हस्तांदोलन करावे. त्यांनाही या व्यवस्थेचा भाग बनण्यासाठी चैतन्य वाटले पाहिजे. आपण स्वतःच मोठं मन, विशाल हृदय ठेवून जगताना आपल्या सहकारी मंडळींना पुढे करावे. अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांना अनेक -अनेक शुभेच्छा देतो. खूप-खूप धन्यवाद !! 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi extends Hanukkah greetings to Benjamin Netanyahu
December 25, 2024

The Prime Minister, Shri Narendra Modi has extended Hanukkah greetings to Benjamin Netanyahu, the Prime Minister of Israel and all the people across the world celebrating the festival.

The Prime Minister posted on X:

“Best wishes to PM @netanyahu and all the people across the world celebrating the festival of Hanukkah. May the radiance of Hanukkah illuminate everybody’s lives with hope, peace and strength. Hanukkah Sameach!"

מיטב האיחולים לראש הממשלה
@netanyahu
ולכל האנשים ברחבי העולם חוגגים את חג החנוכה. יהיה רצון שזוהר חנוכה יאיר את חיי כולם בתקווה, שלום וכוח. חג חנוכה שמח