PM dedicates IIIT Una to the nation
“Bulk Drug Park and Vande Bharat Train are symbols of our affection and dedication to Himachal Pradesh”
“The Double engine government is committed to improving railway connectivity across Himachal Pradesh”
“New India is overcoming challenges of the past and growing rapidly”
“Our government is fulfilling the aspirations of 21st century India”
“Earlier Himachal was valued less for its strength and more on the basis of the number of its Parliamentary seats”
“We are not only filling the gulf of development left by the previous governments but also building strong pillars of foundation for the state”
“The entire world has witnessed the strength of the medicines manufactured in Himachal Pradesh”
“ Himachal had to wait for the Double Engine government to get IIT, IIIT IIM, and AIIMS”
“I believe that the golden period of Himachal's development is about to begin in the Azadi Ka Amrit Mahotsav”

"भारत माता की – जय
भारत माता की – जय
भारत माता की – जय

होर भई ऊने आलियो! केमे हाल-चाल त्वाडा? ठीक-ठाक हो? मां चिंतपूर्णी, ते गुरू नानक देव जी, दे वंशजां दी, इश तरती नूँ, मेरा प्रणाम।

मित्रांनो, 

गुरु नानकजींचे स्मरण करत, गुरूंचे स्मरण करत, आज आई चिंतापूर्णीच्या चरणी नमन करत, धनत्रयोदशी आणि दीपावलीपूर्वी हिमाचलला हजारो कोटींची भेट देताना मला आनंद होत आहे. आज ऊना इथे, हिमाचल प्रदेशात दिवाळी वेळेच्या आधीच आली आहे. इथे इतक्या मोठ्या संख्येने देवी स्वरूप आपल्या माता-भगिनी आपल्याला आशीर्वाद द्यायला आल्या आहेत. आपणा सर्वांचे हे आशीर्वाद आमच्यासाठी एक फार मोठी ठेव आहे, फार मोठी शक्ती आहे. 

बंधू – भगिनींनो, 

मी इथे इतका मोठा काळ घालवला आहे, की जेव्हाही मी ऊनाला येतो, तेव्हा सगळया जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात. हे माझे सौभाग्य आहे की देवी आई चिंतापूर्णी देवीच्या चरणी डोकं टेकवण्याचे आणि आशीर्वाद घेण्याचे सौभाग्य मिळाले आहे. इथल्या ऊसाची आणि गंड्यालीची चव, कोण विसरू शकेल?

मित्रांनो, 

हिमाचलमध्ये राहत असताना मी नेहमी विचार करत असे, की या देवभूमीला निसर्गानं इतकं सुंदर वरदान दिलं आहे. नद्या, ओढे, सुपिक जमीन, शेतं, पहाड, पर्यटनाची इतकी शक्ती आहे, मात्र काही आव्हानं बघून त्याकाळात मला खूप वाईट वाटायचं, मन उदास व्हायचं. मी विचार करत असे की, या हिमाचलच्या या भूमीत जेव्हा संपर्क-दळणवळण व्यवस्था सुधारेल, हिमाचलमध्ये ज्या दिवशी उद्योग येणं वाढेल, ज्या दिवशी हिमाचलच्या मुलांना शिकण्यासाठी आपले आई-वडील, गाव, मित्र मंडळी सोडून बाहेर जावं लागणार नाही, त्या दिवशी हिमाचलचा कायापालट होईल. आणि आज बघा, आज मी इथे आलो आहे ते सगळे दळणवळणाशी संबंधित प्रकल्प आहेत, शिक्षणसंस्थांचे काम आणि औद्योगीकरण यासाठी देखील मोठ्या सेवाभावाने आम्ही भेट घेऊन आलो आहे. आज इथे ऊनामध्ये देशातल्या दुसऱ्या बल्क ड्रग पार्कचे काम सुरु झाले आहे. आता जरा हिमाचलच्या लोकांनी विचार करा, अडचणींनी ग्रासलेला हिमाचल, नैसर्गिक विविधतेने नटलेला हिमाचल आणि हिंदुस्तानात तीन बल्क ड्रग पार्क बनत आहेत आणि त्यातला एक हिमाचलच्या नशिबात यावा, याहून मोठी कुठली भेट असू शकते का मित्रांनो? याहून मोठा कुठला निर्णय असू शकतो का? हे हिमाचालवर जे प्रेम आहे, जे समर्पण आहे, त्याचा परिणाम आहे,

आणि आज बघा, आज मी इथे आलो आहे ते सगळे दळणवळणाशी संबंधित प्रकल्प आहेत, शिक्षणसंस्थांचे काम आणि औद्योगीकरण यासाठी देखील मोठ्या सेवाभावाने आम्ही भेट घेऊन आलो आहे. आज इथे ऊनामध्ये देशातल्या दुसऱ्या बल्क ड्रग पार्कचे काम सुरु झाले आहे. आता जरा हिमाचलच्या लोकांनी विचार करा, अडचणींनी ग्रासलेला हिमाचल, नैसर्गिक विविधतेने नटलेला हिमाचल आणि हिंदुस्तानात तीन बल्क ड्रग पार्क बनत आहेत आणि त्यातला एक हिमाचलच्या नशिबात यावा, याहून मोठी कुठली भेट असू शकते का मित्रांनो? याहून मोठा कुठला निर्णय असू शकतो का? हे हिमाचालवर जे प्रेम आहे, जे समर्पण आहे, त्याचा परिणाम आहे,

मित्रांनो. 

काही वेळापूर्वीच मला अंब – अंदौरा ते दिल्लीपर्यंतच्या भारताच्या चौथ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवायचे सौभाग्य प्राप्त झाले. हादेखील विचार करा, देशातली चौथी वंदे भारत ट्रेन, इतका मोठा भारत  इतकी मोठ-मोठी शहरं, पण, चौथी ट्रेन जर कुणाला मिळाली तर माझ्या हिमाचलला मिळाली, बंधुंनो. आणि मला माहित आहे मित्रांनो, आज जर अनेक कुटुंब तुम्हाला भेटतील, हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात भेटतील, ज्यांना असं वाटत असेल की जाऊन एकदा विमानतळ बघावं, विमानात बसण्याचा विचार तर नंतरचा आहे. पण हिमाचलमध्ये पहाडांत राहणाऱ्या लोकांना आपण विचारलं तर दोन – दोन, तीन – तीन, चार – चार पिढ्या ज्यांच्या हयात असतील, त्यांनी न कधी ट्रेन बघितली असेल, न कधी ट्रेननी प्रवास केला असेल. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील अशी परिस्थिती आहे. आज हिमाचलमध्ये केवळ ट्रेनच नाही, हिंदुस्तानची सर्वात आधुनिक ट्रेन येऊन उभी आहे, बंधुंनो, आणि इथंपर्यंत प्रगती झाली. 
आजच हिमाचलची आपली ट्रिपल आयआयटी (IIIT) ची कायमस्वरूपी इमारत, त्याचे देखील लोकार्पण झाले आहे. हे प्रकल्प याची झलक आहेत की डबल इंजिनचे सरकार हिमाचलला कुठल्या उंचीवर घेऊन जात आहे. हे प्रकल्प खासकरून हिमाचलच्या नव्या पिढीच्या, तरुण पिढीच्या स्वप्नांना पंख देणारे आहेत. ऊनाला, हिमाचल प्रदेशला या प्रकल्पांसाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा!

मित्रांनो,

आपण सर्व जाणतोच की गरजा आणि आशा - आकांक्षांमध्ये फरक असतो. हिमाचलमध्ये आधी जी सरकारे होती, आणि दिल्लीत देखील लोक बसून असायचे, ते लोक तुमच्या गरजा पूर्ण करण्याच्या बाबतीत उदासीन होते आणि तुमच्या आशा – आकांक्षा त्यांना कधी कळल्याच नाहीत, त्यांनी कधी त्याची पर्वाच केली नाही. यामुळे माझ्या हिमाचलचं खूप मोठं नुकसान झालं आहे, इथल्या तरुण पिढीचं नुकसान झालं आहे, इथल्या माता – भगिनींचं नुकसान झालं आहे.  
मात्र, आता काळ बदलला आहे. आमचं सरकार केवळ लोकांच्या गरजाच पूर्ण करत नाही, तर जनता – जनार्दनाच्या आशा – अपेक्षा, पूर्ण करण्यासाठी सर्व शक्ती एकवटून कामाला लागलं आहे. यासाठी, मला आठवतं, हिमाचलची परिस्थिती काय होती, विकास कुठेच दिसत नव्हता, जेव्हा मी इथे यायचो. चारही दिशांना अविश्वासाची दरी, निराशेचे पहाड, पुढे जाऊ शकणार, नाही जाऊ शकणार, विकासाच्या अपेक्षांची खूप मोठी दरी, एक प्रकारे खड्डेच खड्डे. त्यांनी विकासाला होण्यासाठी हे खड्डे भरायचा कधीच विचार केला नाही, ते तसेच सोडून दिले. आम्ही ते खड्डे तर भरलेच, पण आता हिमाचलमध्ये नव्या मजबूत इमारती देखील बांधत आहोत.

मित्रांनो, 

जगात असे अनेक देश आहेत ज्यांनी 20 व्या शतकातच, मागच्या शतकातच आपल्या नागरिकांना, भारतात देखील गुजरात सारखी अनेक राज्ये आहेत, ग्रामीण रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, शौचालय, आधुनिक रुग्णालये. या सुविधा पुरवल्या आहेत. मात्र भारतात काही सरकारं अशी होती, ज्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी या सुविधा मिळवणं कठीण करून ठेवलं होतं. आपल्या डोंगराळ भागांना याचा खूप मोठा फटका बसला आहे. मी तर इथे राहत असताना सर्व जवळून बघत होतो की कशा आमच्या गरोदर माता – भगिनींना रस्ते नसल्यामुळे रुग्णालयांत जायला देखील त्रास होत होता, कितीतरी वृद्ध लोक रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शेवटचा श्वास घेत असत. 

बंधू – भगिनींनो, 

डोंगरात राहणारे लोक समजू शकतात की रेल्वे संपर्कव्यवस्था  नसण्याचा, ती सोय नसण्याचा, यामुळे ते एक प्रकारे जगापासून तोडले जातात. ज्या क्षेत्रात अनेक ओढे आहेत, नद्या वाहत आहेत, तिथे पिण्याच्या पाण्यासाठी वाट बघावी लागते, तिथे नळाद्वारे पाणी येणं किती मोठं आव्हान होतं, याची कल्पना बाहेरच्या लोकांना कधीच येऊ शकत नाही. 

ज्या लोकांनी वर्षानुवर्षे इथे सरकारं चालवली, त्यांना हिमाचलच्या त्रासामुळे जणू काही फरकच पडत नव्हता. आता आजचा नवा भारत, या जुन्या सगळ्या आव्हानांवर वेगाने काम करत आहे. ज्या सुविधा गेल्या शतकातच लोकांपर्यंत पोहोचायला हव्या होत्या, त्या आता लोकांपर्यंत पोहोचत आहेत. 

पण आपण एवढ्यावरच थांबणार आहोत का? तुम्ही सांगा मित्रांनो, इतकं केलं, खूप चांगलं केलं, इतक्यावरच थांबून चालेल का? आणखी पुढे जायचं आहे की नाही जायचं? आणखी वेगाने पुढे जायचं आहे की नाही जायचं? हे काम कोण करेल बंधूनो? आम्ही आणि तुम्ही मिळून करू, बंधूनो. आम्ही 20 व्या शतकातल्या सुविधा देखील पोहोचवू आणि 21 व्या शतकातल्या आधुनिकतेशी माझ्या हिमाचलला जोडू. 
म्हणूनच आज हिमाचलमध्ये विकासाची अभूतपूर्व कामं होत आहेत. आज एकीकडे हिमाचलमध्ये दुप्पट वेगाने ग्रामीण रस्ते बनवले जात आहेत तर दुसरीकडे वेगाने ग्रामपंचायतींपर्यंत ब्रॉडबँड कनेक्टिविटी देखील पोहोचवली जात आहे. आज एकीकडे हिमाचलमध्ये हजारो शौचालये बांधली जात आहेत तर दुसरीकडे गावागावात विजेची व्यवस्था सुधारली जात आहे. आज एकीकडे हिमाचलमध्ये ड्रोनद्वारे गरजेच्या वस्तू दुर्गम भागांत पोहोचविण्यावर काम होत आहे, तर दुसरीकडे वंदे भारत सारख्या ट्रेनने दिल्ली पर्यंत वेगाने पोहोचण्याचा मार्ग बनविला जात आहे.

हिमाचलमध्ये आज एकीकडे नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे सरकारच्या अनेक सेवा, सामाईक सेवा पुरवठा केंद्राच्या (कॉमन सर्व्हिस सेंटर) माध्यमातून गावोगावी पोहोचवल्या जात आहेत. आम्ही लोकांच्या २० व्या शतकातील गरजा तर पूर्ण करत आहोतच,सोबत २१ व्या शतकातील आधुनिक सुविधाही हिमाचलच्या घराघरात पोहचवत आहोत.

मित्रहो,

आताच  हरोली इथे मोठ्या बल्क ड्रग पार्कची पायाभरणी करण्यात आली आहे.  जयरामजी काही दिवसांपूर्वी सांगत होते त्यानुसार,नालागड-बड्डी येथील मेडिकल डिव्हाईस पार्कचं कामही सुरू झालं आहे.  हे दोन्ही प्रकल्प देशासह जगभरात हिमाचल प्रदेशाचं नाव मोठं करणार आहेत.  सध्या या बल्क ड्रग पार्कवर, दुहेरी इंजिन सरकार( दोन्ही सरकारं भाजपाचीच) म्हणजेच केंद्र आणि राज्य सरकार मिळून सुमारे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.  हिमाचलसारख्या छोट्या राज्यात एका प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपये, म्हणजेच या गुंतवणुकीतून निर्माण होणाऱ्या  प्रकल्पातूनच येत्या काही वर्षांत इथे आणखी १० हजार कोटींहून अधिकच्या  गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात, नव्हे होणार आहेत.  हजारो कोटी रुपयांची ही गुंतवणूक उना, हिमाचलचा कायापालट करेल.  यामुळे   रोजगाराच्या (नोकरी) आणि स्वयंरोजगाराच्याही (व्यवसाय)हजारो संधी निर्माण होतील.

मित्रहो,

कोरोनाच्या काळात हिमाचल प्रदेशात निर्मिती झालेल्या औषधांचा गुण संपूर्ण जगानं अनुभवला आहे.  भारताला औषध उत्पादनात जगात अव्वल बनवण्यात हिमाचलची भूमिका आता आणखी व्यापक होणार आहे, योगदान वाढणार आहे.  आतापर्यंत औषधं बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाकरता परदेशावर अवलंबून रहावं लागत होतं.  आता  हिमाचलमध्येच कच्चा माल तयार होईल, औषधही हिमाचलमध्येच बनवली जातील, त्यामुळे साहजिकच औषध उद्योग भरभराटीला तर येईलच, सोबतच  औषधं स्वस्तही होतील.

आमचं सरकार आयुष्मान भारत योजने अंतर्गत, आज जनऔषधी केंद्रांमार्फत ५ लाख रुपयांपर्यंतचे  उपचार विनामूल्य देऊन गरिबांवरील चिंतेचा भार कमी करण्याचं काम करत आहे.  या बल्क ड्रग पार्कमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना माफक दरात चांगले उपचार देण्याच्या मोहिमेला आणखी बळ मिळेल.

मित्रांनो

शेती असो किंवा उद्योग, जोपर्यंत संपर्काच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत विकासाचा वेग वाढू शकत नाही. तुम्ही हिमाचलचे सर्व लोक या वस्तुस्थितीचे साक्षीदार आहात.  पूर्वीची सरकारं कशी कामं करायची याचं उदाहरण म्हणजे आपला नांगल धरण तलवाडी रेल्वे मार्ग.  चाळीस वर्षांपूर्वी…...विचार करा….चाळीस वर्षांपूर्वी एक छोटा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी, सरकारनं दिल्लीत बसून, काम सुरु करण्यासाठीचा शिक्का तर मारला, फाईलही बनवली, त्यावर सही सुद्धा केली. पण पुढे काय? पुढे काहीच झालं नाही. ४० वर्षांनंतरही कागदावरचं काम प्रत्यक्ष जमिनीवर अजिबात पुढे सरकलं नाही. फक्त निवडणुका समोर आल्या की या  रेल्वे मार्गाचं गाजर दाखवायचं आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करुन मतं मिळवायची, एवढंच काय ते काम झालं.  इतक्या वर्षांनंतर हळूहळू काहीतरी हालचाल दिसू लागली, अर्धवट स्वरुपात काही काम दिसू लागलं.  केंद्रात आमचं सरकार आल्यानंतर मात्र आता या रेल्वे मार्गाचं काम वेगानं सुरू आहे.  विचार करा, हे काम आधी झालं असतं तर उनाच्या जनतेलाही मोठा फायदा झाला असता.

मित्रहो,

आमचं दुहेरी इंजिन सरकार हिमाचलमधील रेल्वे सेवेचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी सतत कार्यरत आहे.  आज हिमाचलमध्ये तीन नवीन रेल्वे प्रकल्पांवर काम सुरू आहे.  आज संपूर्ण देशातली विविध ठिकाणं, वंदे भारत या मेड इन इंडिया (भारतात बनलेल्या) रेल्वेगाडीनं एकमेकांशी जोडली जात असताना, त्यातही  हिमाचल प्रदेश राज्याला सर्वात जास्त लाभ मिळत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे,  नैना देवी, चिंतपूर्णी, ज्वालादेवी, कांगडादेवी, अशा शक्तीपीठांसह आनंदपूर साहिब सारख्या पवित्र स्थळांचा  प्रवास करणही खूप सोपं आणि आरामदायी होणार आहे. गुरू नानक देवजींचे वंशज राहत असलेल्या उनासारख्या पवित्र शहरासाठी  तर ही दुहेरी भेट आहे.

आमच्या सरकारनं कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिलेल्या सेवेत ही वंदे भारत रेल्वगाडी आणखी भर घालेल. माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी वंदे भारत एक्सप्रेस पूर्वीपासूनच होती, आता या गाडीमुळे इतर  शक्तीपीठांचं दर्शनही सुलभ होणार आहे, कारण या शक्तीपीठांच्या ठिकाणी सुद्धा रेल्वेनं जाता येणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचा फायदा इतर शहरांमध्ये काम करणाऱ्या आपल्या देशबांधवांनाही कमी वेळेत ये-जा करण्यासाठी होणार आहे.

मित्रहो,

उच्च शिक्षणासाठी दुसरीकडे जावं न लागता,  आपल्या राज्यातच उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण व्हाव्यात हे हिमाचलमधील युवावर्गाचं पूर्वीपासूनचं स्वप्नं आहे.  तुमच्या या न्याय्य ईच्छेकडे पूर्वी जरा दुर्लक्षच झालं.  आम्ही मात्र पूर्वीचे  प्रघात बदलत आहोत. काम अडकलं, रखडलं, भरकटलं, विसरलं, हे प्रकार आमच्या कार्यपद्धतीत बसत नाहीत.  आम्ही ठरवतो, निर्णय घेतो, पूर्ण करतो आणि चांगली फलनिष्पत्तीही  दाखवतो. थोडक्यात आम्ही हाती घेतलेलं काम यशस्वीपणे पूर्ण होतच होतं! कुणी विचार केलाय, हिमाचलमधील तरुणांना उच्च शिक्षणासाठी, हिमाचल प्रदेशातच उच्च शिक्षण प्रदान करणाऱ्या प्रतिष्ठित संस्था का मिळाल्या नाहीत? का त्यांना यापासून दीर्घकाळ वंचित ठेवण्यात आलं?  इथल्या तरुणांना, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवसाय व्यवस्थापन, अगदी स्वतःच्या राज्यात औषधी वनस्पतींचं भांडार असताना औषधनिर्मितीशास्त्र शिकण्यासाठीही शेजारच्या राज्यात का जावं लागलं?

मित्रांनो,

आधीच्या सरकारांनी याकडे लक्ष दिलं नाही कारण सोईसुविधा पुरवण्यासाठी ते हिमाचलचं मूल्यमापन, हिमाचलच्या एकंदर क्षमतेच्या आधारावर नाही, तर संसदेतील हिमाचलच्या संख्याबळावर, म्हणजेच सत्तास्थापनेसाठी हिमाचलातून येणाऱ्या जागा किती आहेत आणि त्या कशा उपयोगी ठरु शकतात, या आधारावर करत असत.  त्यामुळे हिमाचलला आयआयटीसाठी(IIT-Indian Institute Of Technology अर्थात भारतीय तंत्र विज्ञान संस्था), ट्रिपल आयटीसाठी (IIIT-Indian Institute of information technology अर्थात भारतीय माहिती-तंत्रज्ञान संस्था), आयआयएमसाठी(IIM-Indian Institute of Management अर्थात भारतीय व्यवस्थापकीय शिक्षण संस्था), एम्ससाठी(AIIMS-All India Institute Of Medical Science अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था), दुहेरी इंजिन सरकारची वाट पाहावी लागली. आज उना इथे ट्रिपल आयटीची कायमस्वरूपी इमारत उभी राहिल्यानं, विद्यार्थ्यांना अधिक सुविधा मिळणार आहेत.  या इथल्याच शिक्षणसंस्थांमधून शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडलेली हिमाचलची मुलं(मुलं-मुली) हिमाचलमधील डिजिटल क्रांतीला बळ देतील.आणि मला आठवतंय, तुम्ही मला या ट्रिपल आयटी इमारतीची पायाभरणी करण्याची संधी दिली होती.  मी पा
याभरणी केली होती आणि आज तुम्ही मला उद्घाटनासाठीही बोलावलत. यालाच तर परिस्थितीमध्ये केलेला कायापालट म्हणतात. बंधुभगिनींनो,  आम्ही पायाभरणीही करतो, उद्घाटनही करतो. आणि दुहेरी इंजिनच्या सरकारच्या कामाची पद्धत हीच आहे. आमचं सरकार जो काही संकल्प करते, तो पूर्ण करून दाखवते.  ट्रिपल आयटीच्या निर्मितीत योगदान असणाऱ्या सर्व संबंधित  सहकाऱ्यांचं मी,  कोविडमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर सारत नेटानं आणि जलद गतीनं काम पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करतो.

मित्रहो,

युवावर्गाचं कौशल्य आणि क्षमता पारखणं, त्यांना वाव देणं, याला आज आमचं सर्वात मोठं प्राधान्य आहे.  त्यामुळेच नवोन्मेष आणि कौशल्याला वाव देणाऱ्या  संस्थांचा देशभर विस्तार केला जात आहे.  हिमाचलसाठी ही फक्त सुरुवात आहे.  हिमाचलच्या तरुणांनी लष्करात सेवा बजावताना, देशाच्या संरक्षणात नवे मापदंड तर निर्माण केले आहेतच.  आता वेगवेगळ्या प्रकारची कौशल्यं आत्मसात केली, तर त्यांना सैन्यात उच्च पदावर जायलाही मदत होईल.  हिमाचलच्या विकासासाठी दुहेरी  इंजिनचं सरकार सदैव तुमच्या पाठीशी आहे.

मित्रांनो,

जेव्हा स्वप्नं मोठी असतात, संकल्प मोठे असतात तेव्हा प्रयत्नही तेवढेच मोठे करावे लागतात,आणि तसे ते मोठ्या प्रमाणावर होतात ही! आज दुहेरी इंजिनचं सरकार असे प्रयत्न, सर्वत्र, सातत्यानं करताना दिसत आहे. त्यामुळे मला हेही माहीत आहे की हिमाचलच्या लोकांनीही आता जुनी प्रथा बदलण्याचा निश्चय केला आहे.  तुम्ही ठरवले आहे की नाही?  तुम्ही ठरवलय ना?  आता दुहेरी इंजिनचं सरकार नवा इतिहास रचणार आणि हिमाचलची जनता नवा पियंडा पाडणार आहे.

मला पूर्ण खात्री आहे की स्वातंत्र्याच्या अमृत काळात हिमाचलच्या विकासाचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. हा सुवर्णकाळ हिमाचलला विकासाच्या अशा शिखरावर  घेऊन जाईल, ज्याची तुम्ही सर्वजण अनेक दशकांपासून प्रतिक्षा करत आहात.  या सर्व प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. या प्रकल्पपूर्तीसाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सर्व महत्वाच्या सणांसाठीही मी तुम्हा सर्वांना मन:पूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो.

भारत मातेचा विजय असो

भारत मातेचा विजय असो

भारत  मातेचा विजय असो

धन्यवाद  !

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to attend Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 22, 2024
PM to interact with prominent leaders from the Christian community including Cardinals and Bishops
First such instance that a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India

Prime Minister Shri Narendra Modi will attend the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) at the CBCI Centre premises, New Delhi at 6:30 PM on 23rd December.

Prime Minister will interact with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent lay leaders of the Church.

This is the first time a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India.

Catholic Bishops' Conference of India (CBCI) was established in 1944 and is the body which works closest with all the Catholics across India.