“काळानुसार इंदूर शहरात बदल झाले, मात्र, देवी अहिल्याबाई यांची प्रेरणा हे शहर विसरलेले नाही आणि आज इंदूर स्वच्छता आणि नागरी कर्तव्याची देखील आठवण करून देते
“कचऱ्यातून गोबरधन, गोबर धनापासून स्वच्छ इंधन आणि स्वच्छ इंधनापासून ऊर्जा ही जीवन पोषक साखळी आहे”
“In coming two years Gober Dhan Bio CNG plants will be established in 75 big Municipal bodies”
“येत्या दोन वर्षांच्या काळात 75 मोठ्या महानगरपालिकांमध्ये गोबर धन जैव सीएनजी प्रकल्प स्थापन केले जातील”
“केंद्र सरकारने समस्यांवर तात्पुरते उपाय शोधण्यापेक्षा कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला”
“देशाची कचरा निर्मूलन क्षमता, 2014 पासून चारपटीने वाढली आहे. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपासून मुक्तीसाठी 1600 पेक्षा अधिक संस्थांना आज प्रक्रियेसाठी प्लॅस्टिक कचरा मिळत आहे”
“देशातील जास्तीत जास्त शहरात गरजेपेक्षा अधिक पाणीपुरवठा करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्पात यावर भर देण्यात आला आहे.”
“आपल्या सफाई कामगारांनी स्वच्छते साठी समर्पितपणे केलेल्या कार्यासाठी आपण कायम त्यांचे ऋणी आहोत.”

नमस्कार !

मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगू भाई पटेल , मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी हरदीप सिंह पुरी , डॉ वीरेन्द्र कुमार , कौशल किशोर , मध्य प्रदेश सरकारचे मंत्रिगण, खासदार -आमदार , इंदूर सह मध्य प्रदेशच्या अनेक शहरांमधील प्रिय बंधू आणि भगिनी, इतर मान्यवर देखील आज इथे उपस्थित आहेत.

आपण जेव्हा छोटे होतो, जेव्हा शिकत होतो , तेव्हा इंदूरचे नाव ऐकल्यावर सर्वप्रथम देवी अहिल्याबाई होळकर , माहेश्वर आणि त्यांचा सेवा भाव याचे आधी स्मरण व्हायचे. काळानुरुप इंदूर बदलले,अधिक चांगले होण्यासाठी बदलले. मात्र देवी अहिल्या यांची प्रेरणा इंदूरने कधीही हरवू दिली नाही. आज इंदूरचे नाव घेतल्यावर देवी अहिल्या यांच्याबरोबरच सर्वप्रथम मनात विचार येतो तिथल्या स्वच्छतेचा .इंदूरचे नाव घेतल्यावर मनात येते - नागरिक कर्तव्य, जितके चांगले इंदूरचे लोक आहेत , तेवढेच चांगले त्यांनी आपले शहर बनवले आहे. आणि तुम्ही केवळ सफरचंदाचे चाहते नाहीत , इंदूरच्या लोकांना आपल्या शहराची सेवा देखील करता येते.

आजचा दिवस स्वच्छतेसाठी इंदूरच्या अभियानाला एक नवी ताकद देणारा आहे. इंदूरला आज ओल्या कचऱ्यापासून गोबर सीएनजी बनवण्याचे जे गोवर्धन संयंत्र मिळाले आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन . मी शिवराजजी आणि त्यांच्या टीमची विशेष प्रशंसा करतो , ज्यांनी हे कार्य इतक्या कमी वेळेत शक्य करून दाखवले. मी आज सुमित्राताईंचे देखील आभार मानतो , ज्यांनी खासदार म्हणून इंदूरची ओळख नव्या उंचीवर पोहोचवली. इंदूरचे विद्यमान खासदार आणि माझे सहकारी शंकर लालवानी यांनी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, त्यांनी जो मार्ग ठरवला आहे , त्या मार्गावर इंदूरला पुढे नेण्यासाठी आणि अधिक उत्तम बनवण्यासाठी निरंतर काम करत आहेत.

आणि मित्रांनो,

आज जेव्हा मी इंदूरची एवढी प्रशंसा करत आहे तेव्हा माझ्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा देखील उल्लेख करतो. मला आनंद आहे की काशी विश्वनाथ धाममध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांची खूप सुंदर मूर्ती ठेवण्यात आली आहे. इंदूरचे लोक जेव्हा बाबा विश्वनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी जातील , तेव्हा त्यांना तिथे देवी अहिल्याबाई यांची मूर्ती देखील दर्शनासाठी दिसेल. तुम्हाला तुमच्या शहराचा अभिमान वाटेल.

मित्रांनो ,

आपल्या शहरांना प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आजचे हे प्रयत्न खूप महत्वपूर्ण आहेत . शहरांमध्ये घरातून निघालेला ओला कचरा असेल , गावांमध्ये पशु आणि शेतीमधून निघालेला कचरा असेल, हे सगळे एक प्रकारे गोबरधनच आहे. शहरातील कचरा आणि पशुधनापासून गोबरधन , मग गोबरधनापासून स्वच्छ इंधन, स्वच्छ इंधनापासून ऊर्जाधन ही मालिका जीवनधनची निर्मिती करते. या मालिकेतील प्रत्येक साखळी एकमेकांशी जोडलेली आहे . त्याचा पुरावा म्हणून इंदूरचे गोबरधन संयंत्र आताअन्य शहरांना देखील प्रेरणा देईल.

मला आनंद आहे की पुढील दोन वर्षांमध्ये देशातल्या 75 मोठ्या नगरपालिकांमध्ये अशा प्रकारचे गोबरधन जैव सीएनजी संयंत्र बनवण्याचे काम सुरु आहे. हे अभियान भारताच्या शहरांना स्वच्छ बनवण्यासाठी , प्रदूषण रहित बनवण्यासाठी स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने खूप मदत करेल . आणि आता तर शहरांमध्येच नाही तर देशातल्या गावांमध्येही हजारोंच्या संख्येने गोबरधन जैव संयंत्र बसविण्यात येत आहेत. यामुळे आपल्या पशुपालकांना शेणापासून अतिरिक्त उत्पन्न देखील मिळायला सुरुवात झाली आहे . आपल्या गावांमध्ये -खेड्यांमध्ये शेतकऱ्यांना निराधार प्राण्यांमुळे ज्या समस्या निर्माण होतात , त्या देखील अशा प्रकारच्या गोबरधन संयंत्रामुळे कमी होतील. हे सर्व प्रयत्न भारताची हवामान वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी मदत करतील .

मित्रांनो ,

गोबरधन योजना म्हणजेच कचऱ्यापासून सोने बनवण्याच्या आपल्या अभियानाचा जो परिणाम होत आहे , त्याची माहिती जेवढी जास्तीत जास्त लोकांना मिळेल , तेवढे चांगले आहे. गोबरधन जैव - सीएनजी संयंत्रामुळे इंदूरला दररोज 17ते 18 हजार किलो जैव - सीएनजी तर मिळेलच , त्याशिवाय 100 टन सेंद्रिय खत देखील इथे दररोज तयार होईल. सीएनजीमुळे प्रदूषण कमी होईल आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन सुलभता देखील वाढेल . अशा प्रकारे येथे जे सेंद्रिय खत तयार होईल , त्यातून आपल्या धरती मातेला देखील नवीन संजीवनी मिळेल. आपल्या जमिनीचा कायाकल्प होईल.

एक अंदाज आहे की या संयंत्रामधून जे सीएनजी तयार होईल, त्यातून इंदूर शहरात दररोज जवळपास 400 बसेस चालवता येऊ शकतील. या संयंत्रामुळे शेकडो युवकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात रोजगार देखील मिळणार आहे . म्हणजेच हरित रोजगार वाढवण्यात देखील ते उपयुक्त ठरेल.

बंधू आणि भगिनींनो ,

कोणत्याही आव्हानाचा सामना करण्याच्या दोन पद्धती असतात, पहिली पद्धत आहे की त्या आव्हानाचा तात्पुरता तोडगा शोधणे , आणि दुसरी पद्धत ही आहे की त्या आव्हानाचा अशाप्रकारे सामना करावा जेणेकरून सर्वांना कायमस्वरूपी उपाय मिळेल. गेल्या सात वर्षात आमच्या सरकारने ज्या योजना आखल्या आहेत , त्या योजना कायमस्वरूपी तोडगा देणाऱ्या आहेत. एकाच वेळी अनेक लक्ष्ये साधणाऱ्या आहेत .

स्वच्छ भारत अभियानाचे उदाहरण घ्या. यामुळे स्वच्छतेबरोबरच आपल्या भगिनींची प्रतिष्ठा जपणे, आजारांपासून बचाव , गाव शहरांना सुंदर बनवणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे अशी अनेक कामे एकाच वेळी झाली आहेत . आता घरातून, गल्ल्यांमधून निघालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, शहरांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून मुक्त करण्यावर आमचा भर आहे . यात देखील इंदूर हे उत्तम मॉडेल म्हणून उदयाला आले आहे . तुम्हालाही माहीत आहे की नवीन संयंत्र जिथे बसवण्यात आले आहे तिथे जवळच देवगुडरिया इथं कचऱ्याचा ढीग असायचा . प्रत्येक इंदूरवासियाला यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता इंदूर नगरपालिकेने शंभर एकर कचरा भूमीला हरित क्षेत्रात परिवर्तित केले आहे

मित्रांनो,

आज देशभरातल्या शहरांमध्ये लाखो टन कचरा गेल्या कित्येक दशकांपासून अशाच हजारो एकर जमिनीवर साचलेला आहे . शहरांसाठी वायु प्रदूषण आणि जलप्रदूषणामुळे उदभवणाऱ्या आजारांचे हे मोठं कारण आहे . म्हणूनच स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात या समस्येचा सामना करण्यासाठी काम केले जात आहे . आगामी दोन-तीन वर्षांत कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून आपल्या शहरांना मुक्ती मिळावी यासाठी त्यांना हरित झोनमध्ये परिवर्तीत करणे हे उद्दिष्ट आहे .

यासाठी राज्य सरकारांना शक्य ती सर्व मदत पुरवली जात आहे. ही देखील चांगली गोष्ट आहे की वर्ष 2014 च्या तुलनेत आता देशात शहरी कचऱ्याच्या विल्हेवाटीची क्षमता चार पटीने वाढली आहे. देशाला एकदा वापरायच्या प्लास्टिक पासून मुक्ती देण्यासाठी 1600 हून अधिक संस्थामध्ये मटेरिअल रिकव्हरी सुविधादेखील उभारली जात आहे . आमचा प्रयत्न आहे की येत्या काही वर्षांमध्ये देशातल्या प्रत्येक शहरात अशा प्रकारची व्यवस्था निर्माण व्हावी. अशा प्रकारच्या आधुनिक व्यवस्था भारताच्या शहरांमध्ये चक्रीय अर्थव्यवस्थेला देखील एक नवीन बळ देत आहेत.

मित्रांनो ,

स्वच्छ बनणाऱ्या शहरांमुळे आणखी एक संधी निर्माण होते, ही नवीन संधी आहे पर्यटनाची. आपल्या देशात असं कोणतंही शहर नाही , जिथे ऐतिहासिक स्थळ नाही, पवित्र स्थळ नाही, मात्र कमतरता आहे ती स्वच्छतेची. जेव्हा शहरे स्वच्छ होतात तेव्हा दुसऱ्या ठिकाणाहून येणाऱ्या लोकांची देखील तिथे यायची इच्छा होते , मोठ्या संख्येने लोक येतात. आता जसे, स्वच्छतेची काय कामे झाली आहेत जरा जाऊन बघू या तर खरं असा विचार करून कितीतरी लोक केवळ हे पाहण्यासाठी इंदूरला येतात . जिथे स्वच्छता असते , पर्यटनाला चालना मिळते , तिथे पूर्ण नवी अर्थव्यवस्था उदयाला येते.

मित्रांनो,

नजीकच्या काळातच इंदोर शहराने ‘वॉटर प्लस’चा दर्जा प्राप्त केला आहे. इतर शहरांना मार्ग दर्शन करणारे हे कार्य झाले आहे. जेव्हा एखाद्या शहरातील जल स्रोत स्वच्छ असतात, त्या स्त्रोतांमध्ये गटारांचे अस्वच्छ पाणी त्यात मिसळत नाही तेव्हा त्या शहरात एक वेगळ्याच प्रकारची चैतन्यमयी उर्जा सळसळत असते. भारतातील अधिकाधिक शहरे ‘वॉटर प्लस’चा दर्जा मिळवतील या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी स्वच्छ भारत अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे वेगाने करण्यावर भर दिला जात आहे. एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सुविधा वाढविण्यात येत आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

समस्या नेमकेपणाने ओळखून त्यांच्या सोडवणूकीसाठी जर प्रामाणिक प्रयत्न केले गेले तर नक्कीच बदल घडून येतो. आपल्याकडे तेलविहिरी नाहीत, पेट्रोलियम पदार्थांसाठी आपल्याला परदेशांवर अवलंबून राहावे लागते. पण आपल्याकडे जैव-इंधन, इथेनॉल बनविण्यासाठीची साधनसंपत्ती अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. या प्रक्रियेचे तंत्रज्ञान देखील अनेक वर्षांपूर्वीच उपलब्ध झालेले आहे. आमच्या सरकारने या तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिक भर दिला आहे. 7-8 वर्षांपूर्वी भारतात मोठ्या मुश्किलीने 1 टक्का, दीड टक्का किंवा जास्तीत जास्त 2 टक्के इथेनॉल मिश्रित इंधन तयार केले जात होते, हे प्रमाण त्यापेक्षा जास्त कधीच वाढले नाही. आजघडीला पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण 8 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये इंधनामध्ये मिश्रण करण्यासाठी होत असलेल्या इंधनाच्या पुरवठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
वर्ष 2014 पूर्वी देशात इंधनातील मिश्रणासाठी सुमारे 40 कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा होत असे. आता भारतात 300 कोटी लिटरहून अधिक इथेनॉलचा इंधन मिश्रणासाठी पुरवठा होत असतो. कुठे 40 कोटी लिटर आणि कुठे 300 कोटी लिटर!! यामुळे आपल्या साखर कारखान्यांची स्थिती सुधारली आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

मित्रांनो,
आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे पिकांचे खुंट अर्थात पिकांचे उरलेले अवशेष. यामुळे आपले शेतकरी देखील त्रासलेले आहेत आणि शहरात राहणारे लोकही. आम्ही या अर्थसंकल्पात या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोळशाच्या वापरातून वीजनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये देखील आता याचा वापर करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांची अडचण दूर होईलच आणि शेतातील कचऱ्यापासून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न देखील मिळेल.

त्याचप्रमाणे आपल्याला हे देखील माहित आहे की पूर्वी सौर उर्जेच्या बाबतीत देखील लोकांमध्ये केवढी उदासीनता होती.वर्ष 2014 नंतर आपल्या सरकारने संपूर्ण देशात सौर उर्जेचे उत्पादन वाढविण्यासाठी अभियान सुरु केले आणि म्हणूनच आज भारताने सौर उर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या पाच देशांमध्ये स्थान मिळविले आहे. याच सौर उर्जेच्या शक्तीने आपले सरकार शेतकऱ्यांना अन्नदात्यासोबतच उर्जादात्याचे देखील रूप देत आहे. अन्नदाते आता उर्जादाते झाले आहेत. देशभरातील शेतकऱ्यांना लाखो सौर पंप देखील देण्यात येत आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

आज भारत जी क्षितिजे गाठत आहे त्यामध्ये तंत्रज्ञान आणि अभिनव संशोधन यांसोबतच भारतीयांच्या मेहनतीचा देखील फार मोठा वाटा आहे. याच कारणामुळे, आज भारत हरित आणि स्वच्छ भविष्य निर्माण करण्यासंदर्भात मोठे लक्ष्य निश्चित करू शकत आहे. आमचे युवक, आमचा भगिनीवर्ग आणि आमच्या लाखो सफाई कर्मचाऱ्यांवर अतूट विश्वास ठेवत आम्ही भविष्यकाळाकडे मार्गक्रमण करत आहोत. भारतातील युवावर्ग नवे तंत्रज्ञान आणि नव्या संशोधनांसोबतच जनजागृती करण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

मला असे सांगण्यात आले आहे की इंदोरच्या जागरूक भगिनींनी कचऱ्याच्या व्यवस्थापनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. इंदोरमधील जनता त्यांच्याकडे निर्माण झालेल्या कचऱ्याची 6 विविध प्रकारांमध्ये विभागणी करते त्यामुळे, कचऱ्यावर प्रक्रिया आणि पुनर्प्रक्रिया योग्य प्रकारे करता येते. कोणत्याही शहरातील लोकांची हीच भावना, हेच प्रयत्न स्वच्छ भारत अभियानाला यशस्वी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. स्वच्छता करण्यासोबतच पुनर्वापर करण्याचे संस्कार लोकांच्या मनावर सशक्तपणे बिंबविणे हे देखील देशसेवेचे काम आहे. हाच तर लाईफ अर्थात पर्यावरणपूरक जीवन शैलीचा आविष्कार आहे. जीवन जगण्याची उत्तम पद्धत आहे.

मित्रांनो,

आजच्या या कार्यक्रमात इंदोर शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतच संपूर्ण देशातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आभार मी व्यक्त करु इच्छितो. पावसाळा असो की उन्हाळा, दररोज भल्या सकाळी तुम्ही तुमच्या शहराची स्वच्छता करण्याचे काम सुरु करता. कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत देखील तुम्ही ज्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडविले आहे त्यामुळे कितीतरी लोकांचे जीव वाचण्यासाठी मदत झाली आहे. हा देश आपल्या प्रत्येक सफाई कामगार बंधू भगिनींचा अत्यंत ऋणी आहे. आपल्या शहरामध्ये स्वच्छता राखून, घाणीचा प्रसार टाळून, नियमांचे पालन करत आपणही त्यांना मदत करू शकतो.

मला स्मरत आहे, प्रयागराज मधील कुंभ मेळ्यादरम्यान तुम्ही पाहिले असेल की प्रथमच भारतातील कुंभ मेळ्याला जगात एक वेगळी ओळख मिळाली. यापूर्वी, आपले साधू महात्मा हीच भारताच्या कुंभ मेळ्याची ओळख बनली होती. मेळ्याच्या काळात त्यांच्याबद्दलच चर्चा होत असत. मात्र योगीजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच प्रयागराज येथे जो कुंभ मेळा झाला तेव्हा स्वच्छ कुंभ म्हणून त्या मेळ्याचे रूप सर्वांनी पाहिले. संपूर्ण विश्वात याची चर्चा झाली. जगातील सर्व वर्तमानपत्रांनी या मेळ्याबद्दल काही ना काही लिखाण केले. माझ्या मनावर याचा फार सकारात्मक परिणाम झाला. मी जेव्हा कुंभ मेळ्यातील पवित्र स्नानासाठी गेलो तेव्हा स्नान करून आल्यावर माझ्या मनात या स्वच्छता कर्मचाऱ्यांबद्दल इतकी उपकाराची भावना उचंबळून आली की मी या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुतले, त्यांचा गौरव केला. त्यांच्याकडून मी आशीर्वाद घेतले.

आज मी दिल्लीहून, इंदोरच्या आपल्या प्रत्येक स्वच्छता कर्मचारी बंधू भगिनीला आदरपूर्वक नमस्कार करतो. त्यांना वंदन करतो. ह्या कोरोनाच्या काळात जर तुम्ही हे स्वच्छता अभियान सुरु ठेवले नसते तर आपल्याला किती नव्या समस्यांना तोंड द्यावे लागले असते, कोण जाणे. तुम्ही या देशातील सामान्य जनतेला वाचविण्यात, त्यांना सतत आरोग्यविषयक समस्यांसाठी डॉक्टरकडे जावे लागू नये म्हणून जी काळजी घेतली आहे त्याबद्दल मी तुम्हांला प्रणाम करतो.

बंधू भगिनींनो,

याबरोबरच मी माझे भाषण संपवितो.पुन्हा एकदा मी इंदोरच्या रहिवाशांचे, विशेषतः इंदोरच्या माझ्या माता-भगिनींचे आभार मानतो. या माता-भगिनी अनेकानेक अभिनंदनासाठी पात्र आहेत कारण त्यांनी या कामात जो पुढाकार घेतला आहे, कचरा बाहेर अजिबात न फेकता, त्याचे वर्गीकरण करण्याचे जे काम त्यांनी केले आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. तसेच घरातल्या कोणत्याही सदस्याला कचरा इतस्ततः फेकण्यास मज्जाव करणारी माझी बाल-सेना देखील तितक्याच कौतुकाला पात्र ठरते. या माझ्या बाल-सेनेने संपूर्ण हिंदुस्तानातील स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी फार मदत केली आहे. तीन-तीन, चार-चार वर्षाची मुले आपल्या आजोबांना कचरा इकडे-तिकडे फेकू नका म्हणून सांगतात. चॉकलेट खाल्ले तरी त्याची चांदी, कागद इकडेतिकडे असाच फेकायचा नाही याची खबरदारी या बालसेनेने घेतली आहे. ही गोष्ट देखील आपल्या भावी भारताचा पाया मजबूत करणारी बाब आहे. मी आज या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि जैव-सीएनजी संयंत्रासाठी तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा देतो.
खूप-खूप धन्यवाद! नमस्कार!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi