Quoteपंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी सैनिकांचा सत्कार
Quote"गोव्याच्या जनतेने मुक्तीसाठीच्या चळवळींची आणि स्वराज्य यावरील पकड ढीली पडू दिली नाही. त्यांनी भारताच्या इतिहासात स्वातंत्र्याची ज्योत प्रदीर्घ काळ तेवत ठेवली.
Quote"भारत ही एक भावना आहे जिथे राष्ट्राला 'स्वत्त्वापेक्षा' अधिक प्राधान्य आहे आणि ते सर्वोपरि आहे. तिथे एकच मंत्र आहे - राष्ट्र प्रथम. जिथे एकच संकल्प आहे - एक भारत, श्रेष्ठ भारत.
Quote"सरदार पटेल आणखी काही वर्षे जगले असते तर गोव्याला त्याच्या मुक्तीसाठी एवढी प्रतीक्षा करावी लागली नसती"
Quoteराज्याच्या कारभाराच्या प्रत्येक कामात अग्रभागी असणे ही गोव्याची नवी ओळख आहे . इतर ठिकणी , जेव्हा काम सुरू होते किंवा काम प्रगतीपथावर असते, तेव्हा गोव्याने ते पूर्ण केलेलं असते”
Quoteपंतप्रधानांनी पोप फ्रान्सिस यांच्याशी झालेल्या भेटीची आणि भारताची विविधता आणि चैतन्यदायी लोकशाहीबद्दलच्या त्यांच्या प्रेमाची आठवण सांगितली
Quoteदेशाने मनोहर पर्रीकर यांच्या रूपाने गोव्याच्या लोकांचा प्रामाणिकपणा, प्रति

भारत माता की जय, भारत माता की जय, समेस्त गोंयकार भावा-भयणींक, मायेमोगाचो येवकार! या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित गोव्याचे राज्यपाल श्री पी. एस. श्रीधरन पिल्लई जी, गोव्याचे ऊर्जावान मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कावलेकर जी, मनोहर आजगावकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळात माझे सहयोगी श्रीपाद नाईक जी, गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पटनेकर जी, गोवा सरकारचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी आणि गोव्याच्या माझ्या बंधू भगिनींनो! 

म्हज्या मोगाळ गोंयकारांनो, गोंय मुक्तीच्या, हिरक महोत्सवी वर्सा निमतान, तुमका सगळ्यांक, मना काळजासावन परबीं ! सैमान नटलेल्या, मोगाळ मनशांच्या, ह्या, भांगराळ्या गोंयांत,येवन म्हाका खूप खोस भोगता! गोव्याच्या धरतीला, गोव्याच्या हवेला, गोव्याच्या समुद्राला, निसर्गाचं अद्भुत वरदान मिळालं आहे. आणि आज सर्व, गोव्याच्या लोकांचा हा जोश, गोव्याच्या हवेत मुक्तीचा गौरव आणखी वाढवत आहे. आज आपल्या चेहऱ्यांवर गोव्याच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान बघून मी देखील आपल्या इतकाच खुश आहे, आनंदी आहे. मला सांगण्यात आलं की ही जागा फारच लहान पडली. म्हणून बाजूलाच दोन मोठे तंबू टाकले आहेत आणि सर्व लोक तिथे बसले आहेत.  

|

मित्रांनो, 

आज गोवा केवळ आपल्या मुक्तीचा हीरक महोत्सवच साजरा करत नाही तर, 60 वर्षांच्या या प्रवासाच्या आठवणी देखील आपल्या समोर आहेत. आपल्या समोर आज संघर्ष आणि बलिदानाची गाथा देखील आहे. आपल्या समोर गोवावासियांचे परिश्रम आणि चिकाटी आहे, ज्यामुळे आपण कमी वेळात फार लांबचा पल्ला गाठला आहे. आणि जेव्हा समोर इतकं सगळं अभिमानास्पद असेल तर भविष्यासाठीचे संकल्प आपोआप बनू लागतात. नवी स्वप्ने आपणहून समोर येऊ लागतात. हा देखील एक सुखद योगायोग आहे की गोवा मुक्तीचा हीरक महोत्सव, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातच आला आहे. म्हणून गोव्याची स्वप्ने आणि गोव्याचे संकल्प आज देशाला उर्जा देत आहेत. 

मित्रांनो,

आत्ता इथे येण्यापूर्वी आझाद मैदानात हुतात्मा स्मारकात मला हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्याचे सौभाग्य देखील मिळाले. हुतात्म्यांना नमन करून मी मिरामारमध्ये सेल परेड आणि फ्लाईट पास्ट देखील बघितली. इथे येऊन देखील ऑपरेशन विजयच्या वीरांना, सैन्यातील ज्येष्ठांना देशातर्फे सन्मानित करण्याची संधी मिळाली. इतक्या संधी, आनंद देणारे अनुभव गोव्याने आज एकत्र दिले आहेत. हाच तर आनंदी, उत्साही आणि सळसळत्या गोव्याचा स्वभाव आहे. हे प्रेम, हे आपलेपण यासाठी मी गोव्याच्या प्रत्येक नागरिकांचे आभार मानतो. 

मित्रांनो, 

आज आपण एकीकडे गोवा मुक्ती दिवस साजरा करत आहोत, तर दुसरीकडे गोव्याच्या विकासासाठी नवी पावलं देखील टाकत आहोत. आता इथे गोवा सरकारच्या विविध विभागांना, संस्थांना आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या कार्यक्रमांच्या सफल अंमलबजावणीसाठी पुरस्कार देण्यात आले. उत्तम काम करण्याऱ्या गोव्याच्या पंचायती, नगरपालिकांना देखील पुरस्कार देण्यात आले. सोबतच, आज पुनर्निर्मित किल्ला - अग्वादा कारागृह संग्रहालय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉक, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि डावोरलीमच्या गॅस इस्न्युलेटेड उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि मोपा विमानतळावर उड्डयन कौशल्य विकास केंद्र देखील आजपासूनच सुरु करण्यात आले आहे. या सर्व उपलब्धींसाठी, या विकास प्रकल्पांसाठी आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा देतो. 

|

मित्रांनो, 

अमृत महोत्सवात देशाने प्रत्येक देशवासियाला ‘सबका प्रयास’ हे आवाहन केले आहे. गोवा मुक्ती संग्राम या मंत्राचं एक मोठं उदाहरण आहे. आत्ताच मी आझाद मैदानात हुतात्मा स्मारक बघत होतो. हे चार हातांच्या आकृतीने बनलं आहे. गोवा मुक्ती संग्रामाला भारताच्या चारही कोपऱ्यातून कसा एकदम हातभार लागला होता, याचं ते प्रतीक आहे. आपण बघा, गोवा अशा काळात पोर्तुगालचा गुलाम होता जेव्हा देशाचे इतर मोठे भूभाग मुघलांच्या अधिपत्याखाली होते. त्यानंतर देशात कितीतरी राजकीय वादळे बघितली, सत्तेसाठी किती उलथापालथ झाली. मात्र वेळ आणि सत्तेसाठीचा आटापिटा यात शतकांचे अंतर असूनही, गोवा आपलं भारतीयत्व विसरला नाही, आणि भारत कधीच आपल्या गोव्याला विसरला नाही. हे एक असं नातं आहे जे काळासोबत आणखी दृढ होत गेलं आहे. गोवा मुक्ती संग्राम ही अशी अमर ज्योत आहे जी इतिहासातील अनेक वादळात देखील विझली नाही, डगमगली नाही. कुंकलली संग्राम असो की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नेतृत्वात वीर मराठ्यांचा संघर्ष असो, गोव्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले, सर्व बाजूंनी करण्यात आले. 

मित्रांनो, 

देश गोव्याआधी स्वतंत्र झाला होता. देशाच्या बहुतांश लोकांना त्यांचे अधिकार मिळाले होते. आता त्यांच्याकडे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ होता. त्यांच्याकडे शासनात सहभागी होण्यासाठी संघर्ष करायला, पद प्रतिष्ठा मिळवण्याचा पर्याय होता. मात्र कित्येक सेनानींनी तो मार्ग सोडून गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा आणि बलिदान देण्याचा मार्ग निवडला. गोव्याच्या लोकांनी देखील मुक्ती आणि स्वराज्यासाठी सुरु असलेली आंदोलने कधी थांबू दिली नाहीत. त्यांनी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा काळ स्वातंत्र्याची ज्योत पेटती ठेवली. असं यासाठी की भारत केवळ एक राजकीय सत्ता नाही. भारत मानवतेच्या हितांचे रक्षण करणारा एक विचार आहे, एक कुटुंब आहे. भारत एक अशी भावना आहे, जिथे राष्ट्र ‘स्व’ च्या वर असते, सर्वोपरी असते. जिथे एकच मंत्र असतो - राष्ट्र प्रथम. Nation First. जिथे एकच संकल्प असतो - एक भारत. आपण बघा, लुईस दी मिनेझीस ब्रागांझा, त्रिस्ताव ब्रागांझा द कुन्हा, ज्युलिओ मिनेझीस यासारखी नावं असोत, पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष्मीकांत भेंबरे यांच्यासारखे सैनिक असोत, किंवा बाला राय मापारी सारख्या युवकांचं बलिदान असो, आपल्या कितीतरी सैनिकांनी स्वातंत्र्यानंतर देखील आंदोलनं केली, त्रास सहन केला, बलिदान दिलं, मात्र हे आंदोलन थांबू दिलं नाही. स्वातंत्र्याच्या अगदी पूर्वी, राममनोहर लोहियाजी असोत, स्वातंत्र्य नंतर जनसंघाच्या कितीतरी नेत्यांनी हे आंदोलन सातत्याने सुरु ठेवलं. मोहन रानडे आपल्याला आठवत असतील, ज्यांना गोवा मुक्ती आंदोलन केलं म्हणून तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यांना अनेक वर्षे तुरुंगात यातना सहन कराव्या लागल्या. गोव्याच्या मुक्तीनंतरही त्यांना अनेक वर्ष तुरुंगात राहावं लागलं होतं. तेव्हा रानडेजींसारख्या क्रांतिकारकांसाठी अटलजींनी देशाच्या संसदेत आवाज उठवला होता. स्वतंत्र गोमंतक दलाशी संबंधित अनेक महान नेत्यांनी देखील गोवा आंदोलनात आपल्या सर्वस्वाची आहुती दिली होती. प्रभाकर त्रिविक्रम वैद्य, विश्वनाथ लवांडे, जगन्नाथ जोशी, नाना काजरेकर, सुधीर फडके, असे कित्येक सेनानी होते ज्यांनी गोवा, दमन, दीव, दादरा आणि नगर हवेलीच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, या आंदोलनाला दिशा दिली, उर्जा दिली.  

|

मित्रांनो, 

गोवा मुक्ती विमोचन समितीच्या सत्याग्रहात 31 सत्याग्रहींनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. 

आपण विचार करा, या क्रांतिकारकांविषयी, पंजाबचे वीर कर्नैल सिंग बेनीपाल सारख्या वीरांविषयी, यां सर्वांच्या मनात एक अस्वस्थता होती, कारण त्या वेळी देशाचा एक भाग-गोवा अजूनही पारतंत्र्यात होता, काही देशबांधवांना तेव्हा देखील स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. आणि आज याप्रसंगी मी हे देखील म्हणेन की जर सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही वर्ष जगले असते, तर गोव्याला आपल्या मुक्तीसाठी इतकी वाट बघावी लागली नसती.

मित्रांनो,

गोव्याचा इतिहास हा केवळ स्वराज्यासाठी भारताच्या

संकल्पाचे प्रतीकच नाही तर भारताच्या एकात्मतेचा आणि एकतेचाही तो जिवंत दस्तावेज आहे. गोव्याने शांततेने प्रत्येक विचाराला फलद्रुप होण्यास वाव दिला. प्रत्येक मत-धर्म-पंथ एकत्रितपणे 'एक भारत-श्रेष्ठ भारत'मध्ये कसा रंग भरतो, हे गोव्याने दाखवून दिले आहे. गोवा हे असे ठिकाण आहे ज्याने जॉर्जियाच्या सेंट क्वीन केतेवानचे पवित्र अवशेष शतकानुशतके जतन केले आहेत. काही महिन्यांपूर्वीच भारताने सेंट क्वीन केतेवानचे पवित्र अवशेष जॉर्जिया सरकारला सुपूर्द केले. सेंट क्वीन केतेवानचे हे पवित्र अवशेष 2005 मध्ये येथील सेंट ऑगस्टीन चर्चमधून सापडले होते.

मित्रांनो,

गोवा मुक्तीसाठी जेव्हा संघर्ष झाला तेव्हा सर्वांनी मिळून लढा दिला, एकत्रितपणे संघर्ष केला. परकीय राजवटीविरुद्ध पिंटो क्रांतीचे नेतृत्व येथील मूळ ख्रिश्चनांनी केले. ही भारताची ओळख आहे. येथे मतभिन्नतेचा एकच अर्थ - मानवतेची सेवा. मानवजातीची सेवा. भारताच्या या एकात्मतेचे, या मिश्र अस्मितेचे सारे जग कौतुक करते. काही काळापूर्वी मी इटली आणि व्हॅटिकन सिटी मध्ये गेलो होतो. तिथे मला पोप फ्रान्सिस यांना भेटण्याची संधीही मिळाली. भारताबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनही तितकाच भारावून टाकणारा होता. मी त्यांना भारतात येण्याचे निमंत्रणही दिले होते. आणि मला तुम्हाला सांगायलाच हवे, माझ्या आमंत्रणानंतर त्यांनी काय सांगितले - पोप फ्रान्सिस म्हणाले - "तुम्ही मला दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे" ही भारताच्या विविधतेबद्दल, आमच्या चैतन्यशील लोकशाहीबद्दलची त्यांची ओढ आहे.

मित्रांनो,

गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य हे नेहमीच त्याचे वैशिष्ट्य राहिले आहे. मात्र आता येथील सरकार गोव्याची आणखी एक ओळख मजबूत करत आहे. ही एक नवीन ओळख आहे - प्रत्येक कामात अव्वल राहणाऱ्या, सर्वोच्च स्थानी राहणाऱ्या राज्याची ओळख. इतरत्र, जेव्हा काम सुरू होते, किंवा काम प्रगतीपथावर असते, तेव्हा गोवा ते पूर्ण देखील करतो. पर्यटन स्थळ म्हणून गोव्याला लोकांची नेहमीच पसंती असते, पण आता सुशासनाचा विचार करता गोवा अव्वल आहे. दरडोई उत्पन्न असले तरी गोवा अव्वल! उघड्यावर शौचमुक्त राज्य म्हणून - गोव्याचे 100% काम! शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह सुविधा असो - गोव्याला 100% पूर्ण गुण! घरोघरी कचरा संकलनाचे काम असो, इथेही गोवा शंभर टक्के! 'हर घर जल' साठी नळ जोडणी असो - गोवा यातही 100%! गोव्यातील आधार नोंदणीचे कामही 100 टक्के पूर्ण झाले आहे. अन्नसुरक्षेच्या बाबतीतही गोवा अव्वल! प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बारमाही रस्ते जोडणी असो - गोव्याचे 100% काम! जन्म नोंदणी असली तरी गोव्याची नोंद 100% आहे. ही यादी इतकी मोठी आहे की मोजणी करताना वेळ कमी पडू शकतो. प्रमोद जी तुमचे आणि तुमच्या संपूर्ण चमूचे मी अभिनंदन करतो. गोव्याने जे साध्य केले ते अभूतपूर्व आहे. गोव्यातील जनतेने जे करून दाखवले ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आत्ता मी गोवा सरकारचे आणि विशेषत: सर्व गोवावासियांचे अभिनंदन करू इच्छितो, तुमच्या एका नवीन कामगिरीबद्दल, ही कामगिरी म्हणजे 100% लसीकरण! गोव्यात, सर्व पात्र लोकांना लस मिळाली आहे. दुसऱ्या मात्रेची मोहीमही जोरात सुरू आहे. हे चमत्कार करणाऱ्या देशातील पहिल्या राज्यांपैकी तुम्ही आहात. यासाठी मी गोव्यातील जनतेचे अभिनंदन करतो.

बंधू आणि भगिनींनो,

जेव्हा मी गोव्याची ही कामगिरी, ही नवीन ओळख दृढ होताना पाहतो, तेव्हा मला माझे अतूट सहकारी मनोहर पर्रीकर जी यांची सुद्धा आठवण येते. त्यांनी गोव्याला विकासाच्या नव्या उंचीवर तर नेलेच, पण गोव्याची क्षमताही वाढवली. गोव्यातील लोक किती प्रामाणिक आहेत, किती हुशार आणि कष्टाळू आहेत, देशाला मनोहरजींमध्ये गोव्याचे चरित्र दिसायचे. शेवटच्या श्वासापर्यंत कोणी आपल्या राज्यासाठी, आपल्या लोकांसाठी कसे एकनिष्ठ राहू शकतो, हे आपण त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवले आहे. या प्रसंगी मी माझे परममित्र आणि गोव्याचे महान सुपुत्र मनोहरजी यांना सुद्धा अभिवादन करतो. 

मित्रांनो,

गोव्याच्या विकासासाठी, गोव्यातील पर्यटनाची अफाट क्षमता वाढवण्यासाठी पर्रीकरांनी जी मोहीम सुरू केली होती, ती आजही त्याच उत्साहाने सुरू आहे. कोरोनाच्या एवढ्या मोठ्या जागतिक महामारीतून गोवा ज्या वेगाने सावरतो आहे त्यात हे प्रतीत होत आहे. पर्यटन उद्योगाला नवी उंची देण्यासाठी केंद्र सरकारकडूनही सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. व्हिसा नियम सोपे करणे असो, ई-व्हिसा असलेल्या देशांची संख्या वाढवणे असो, पर्यटन उद्योगाला सर्व बाजूंनी पाठिंबा देण्याचे काम झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या चित्रपट महोत्सवाच्या यशावरूनही गोव्यात पर्यटन कसे वाढत आहे हे दिसून येते.

मित्रांनो,

गोवा सरकारने जसे चांगले रस्ते तयार केले, पायाभूत सुविधा आणि सेवा मजबूत केल्या त्यामुळे तिथे पर्यटकांच्या सोयी वाढल्या, त्याचप्रमाणे आज देशभरात महामार्ग, द्रुतगती मार्ग, उच्च तंत्रज्ञान आधारित पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जात आहे, आज रेल्वेचे पुनरुज्जीवन होत आहे, देशातील सर्व शहरांमध्ये विमानतळे बांधली  जात आहेत, ज्यामुळे लोकांचा प्रवास सुकर झाला आहे. ते जर गोव्यात येण्याचा विचार करत असतील, तर वाटेची चिंता करत त्यांचा विचार बारगळत नाही. हे अभियान आता आणखी गतिमान करण्यासाठी, बळकट करण्यासाठी पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनवरही काम सुरू करण्यात आले आहे. येत्या काही वर्षांत हे गतीशक्ती अभियान देशात पायाभूत आणि पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात करेल.

मित्रांनो,

एकीकडे गोव्यात अथांग महासागर आहे, तर दुसरीकडे इथल्या तरुणांची सागरासारखी व्यापक स्वप्ने आहेत. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठीही अशीच व्यापक दृष्टी आवश्यक आहे. मी म्हणू शकतो की प्रमोद सावंत जी आज अशाच मोठ्या दूरदृष्टीने काम करत आहेत. आज भविष्यातील शिक्षण पद्धतीविषयी गोव्यातील शाळांमध्ये कोडिंग आणि रोबोटिक्सचा प्रचार केला जात आहे, तांत्रिक शिक्षणाला अनुदान दिले जात आहे, उच्च शिक्षणासाठी सरकार 50 टक्के फी माफीही देत आहे. आज येथे उदघाटन झालेल्या एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटरमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होणार आहेत. त्याचप्रमाणे आज जर 'आत्मनिर्भर भारत अभियान'चा संकल्प घेऊन देश आपल्या पायावर उभा रहात आहे, तर गोवा 'स्वयंपूर्ण गोवा' अभियानाने देशाला बळ देत आहे. मला या अभियानाच्या 'स्वयंपूर्ण मित्रांसोबत' आभासी माध्यमातून बोलण्याची संधीही मिळाली. ज्या पद्धतीने तुम्ही सर्वजण गोव्याला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहात, ज्या प्रकारे सध्याचे सरकार स्वतः घरोघरी फिरत आहे, ज्याप्रकारे सरकारी सेवा नागरिकांच्या हातात ऑनलाइन येत आहेत, तितक्याच वेगाने भ्रष्टाचारासाठी गोव्यात सर्व दारे बंद होत आहेत, 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' हा संकल्प आज गोव्यात पूर्ण होताना दिसत आहे.

मित्रांनो, 

आज देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये स्‍वातंत्र्याच्‍या 100 वर्षांसाठी नवनवे संकल्प घेत आहे, तसेच गोवा त्याच्या मुक्तीच्‍या 75 वर्षे पूर्ण होताना कुठे पोहोचलेला असेल यासाठी मी तुम्‍हाला नवे संकल्प घेण्‍याचे आणि नवीन उद्दिष्टे ठरवण्याचे आवाहन करतो. त्यासाठी गोव्यात जे सातत्य आजवर दिसले, तेच यापुढेही राहिले पाहिजे. आम्हाला थांबायचे नाही, आपला वेग कमी होऊ द्यायचा नाही. गोंय आनी गोंयकारांची, तोखणाय करीत, तितकी थोडीच! तुमकां सगळ्यांक, परत एक फावट, गोंय मुक्तीदिसाचीं, परबीं दिवन, सगळ्यांखातीर, बरी भलायकी आनी यश मागतां! खूप खूप धन्यवाद! भारत माता की जय ! भारत माता की जय ! भारत माता की जय ! धन्यवाद.

  • krishangopal sharma Bjp December 18, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
  • krishangopal sharma Bjp December 18, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
  • krishangopal sharma Bjp December 18, 2024

    नमो नमो 🙏 जय भाजपा 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
  • MLA Devyani Pharande February 17, 2024

    जय श्रीराम
  • Vaishali Tangsale February 16, 2024

    🙏🏻🙏🏻👏🏻
  • Ajit Soni February 08, 2024

    हर हर महादेव ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏जय हो मोदीजी की जय हिंदु राष्ट्र वंदेमातरम ❤️❤️❤️❤️❤️दम हे भाई दम हे मोदी की गेरंटी मे दम हे 💪💪💪💪💪❤️❤️❤️❤️❤️हर हर महादेव ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
  • Gopal Banik February 06, 2024

    modi modi
  • Mahendra singh Solanki Loksabha Sansad Dewas Shajapur mp October 30, 2023

    Jay shree Ram
  • GOPALAKRISHNAN GOPALAKRISHNAN December 13, 2022

    🙏🙏🙏🙏🙏
  • Laxman singh Rana August 15, 2022

    namo namo 🇮🇳🌹🌷
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Govt to boost rare earth magnet output via PLI scheme, private sector push

Media Coverage

Govt to boost rare earth magnet output via PLI scheme, private sector push
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates eminent personalities nominated to Rajya Sabha by the President of India
July 13, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has extended heartfelt congratulations and best wishes to four distinguished individuals who have been nominated to the Rajya Sabha by the President of India.

In a series of posts on social media platform X, the Prime Minister highlighted the contributions of each nominee.

The Prime Minister lauded Shri Ujjwal Nikam for his exemplary devotion to the legal profession and unwavering commitment to constitutional values. He said Shri Nikam has been a successful lawyer who played a key role in important legal cases and consistently worked to uphold the dignity of common citizens. Shri Modi welcomed his nomination to the Rajya Sabha and wished him success in his parliamentary role.

The Prime Minister said;

“Shri Ujjwal Nikam’s devotion to the legal field and to our Constitution is exemplary. He has not only been a successful lawyer but also been at the forefront of seeking justice in important cases. During his entire legal career, he has always worked to strengthen Constitutional values and ensure common citizens are always treated with dignity. It’s gladdening that the President of India has nominated him to the Rajya Sabha. My best wishes for his Parliamentary innings.”

Regarding Shri C. Sadanandan Master, the Prime Minister described his life as a symbol of courage and resistance to injustice. He said that despite facing violence and intimidation, Shri Sadanandan Master remained committed to national development. The Prime Minister also praised his contributions as a teacher and social worker and noted his passion for youth empowerment. He congratulated him on being nominated to the Rajya Sabha by Rashtrapati Ji and wished him well in his new responsibilities.

The Prime Minister said;

“Shri C. Sadanandan Master’s life is the epitome of courage and refusal to bow to injustice. Violence and intimidation couldn’t deter his spirit towards national development. His efforts as a teacher and social worker are also commendable. He is extremely passionate towards youth empowerment. Congratulations to him for being nominated to the Rajya Sabha by Rahstrapati Ji. Best wishes for his role as MP.”

On the nomination of Shri Harsh Vardhan Shringla, the Prime Minister stated that he has distinguished himself as a diplomat, intellectual, and strategic thinker. He appreciated Shri Shringla’s contributions to India’s foreign policy and his role in India’s G20 Presidency. The Prime Minister said he is glad to see him nominated to the Rajya Sabha and expressed confidence that his insights will enrich parliamentary debates.

The Prime Minister said;

“Shri Harsh Vardhan Shringla Ji has excelled as a diplomat, intellectual and strategic thinker. Over the years, he’s made key contributions to India’s foreign policy and also contributed to our G20 Presidency. Glad that he’s been nominated to the Rajya Sabha by President of India. His unique perspectives will greatly enrich Parliamentary proceedings.
@harshvshringla”

Commenting on the nomination of Dr. Meenakshi Jain, the Prime Minister said it is a matter of immense joy. He acknowledged her distinguished work as a scholar, researcher, and historian, and noted her contributions to education, literature, history, and political science. He extended his best wishes for her tenure in the Rajya Sabha.

The Prime Minister said;

“It’s a matter of immense joy that Dr. Meenakshi Jain Ji has been nominated to the Rajya Sabha by Rashtrapati Ji. She has distinguished herself as a scholar, researcher and historian. Her work in the fields of education, literature, history and political science have enriched academic discourse significantly. Best wishes for her Parliamentary tenure.
@IndicMeenakshi”