Lays foundation stone of 1406 projects worth more than Rs 80,000 crores
“Only our democratic India has the power to meet the parameters of a trustworthy partner that the world is looking for today”
“Today the world is looking at India's potential as well as appreciating its performance”
“We have laid emphasis on policy stability, coordination and ease of doing business in the last 8 years”
“For faster growth of Uttar Pradesh, our double engine government is working together on infrastructure, investment and manufacturing”
“As a MP from the state, I have felt the capability and potential in the administration and government of the state that the country expects from them”
“We are with development by policy, decisions and intention”

उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री श्रीयुत योगी आदित्यनाथ जी, लखनौचे खासदार आणि भारत सरकारमधील आमचे वरिष्‍ठ सहकारी श्रीयुत राजनाथ सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारीवर्ग, यूपीचे उप-मुख्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्रीगण, विधानसभा आणि विधान परिषदेचे सभापती महोदय, येथे उपस्थित उद्योग जगतातील सर्व सहकारी, अन्य मान्यवर, स्त्री-पुरुषहो!

सर्वात आधी तर मी उत्‍तर प्रदेशातील खासदार या नात्याने, काशीचा खासदार या नात्याने गुंतवणूकदारांचे स्‍वागत करतो आणि गुंतवणूकदारांना यासाठी धन्‍यवाद देतो कारण त्यांनी उत्‍तर प्रदेश च्या युवा शक्ती वर विश्वास ठेवला आहे. उत्‍तर प्रदेशच्या युवा शक्तीमध्ये असे सामर्थ्‍य आहे की आपली स्वप्ने आणि संकल्‍पांना नवी भरारी, नवी उंची देण्याचे सामर्थ्‍य उत्‍तर प्रदेशच्या तरुणांमध्ये आहे आणि तुम्ही जो संकल्‍प घेऊन आला आहात, उत्‍तर प्रदेशच्या तरुणांचे परिश्रम, त्यांचा पुरुषार्थ, त्यांचे सामर्थ्‍य, त्यांचे विचार, त्यांचे समर्पण तुम्हा सर्वांची स्वप्ने-संकल्‍प साकार करून दाखवतील, याची मी तुम्हाला हमी देत आहे.

काशीचा खासदार असल्याने एक खासदार या नात्याने मी हा लोभ सोडू शकत नाही, मोह टाळू शकत नाही आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही लोक तर खूपच व्यग्र असता पण कधी तरी वेळ काढून माझी काशी बघून या, काशी खूप बदलली आहे. जगातील एक अशी नगरी जी आपल्या प्राचीन सामर्थ्यासह नव्या रंगरुपात सजू शकते, हे उत्‍तर प्रदेशच्या सामर्थ्याचे जिवंत उदाहरण आहे.

मित्रांनो,

यूपीमध्ये 80 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीशी संबंधित करार येथे झाले आहेत. ही विक्रमी गुंतवणूक यूपीमध्ये रोजगाराच्या हजारों नव्या संधी निर्माण करेल.  भारतासोबतच उत्तर प्रदेशच्या विकासाच्या गाथेवर वाढलेला विश्वास यातून दिसून येत आहे. आजच्या या आयोजनाबद्दल मी यूपीच्या तरुणांचे विशेष अभिनंदन करेन, कारण याचा सर्वात मोठा लाभ यूपीच्या युवकांना, युवतींना, आपल्या नव्या पिढीला होणार आहे.

मित्रांनो,

सध्याच्या काळात आपण आपल्या स्वातंत्र्याचे 75वें वर्ष साजरे करत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करत आहोत. हा काळ आगामी 25 वर्षांसाठी अमृतकाळ, नव्या संकल्‍पांचा काळ, नव्या लक्ष्‍यांचा काळ आणि नवीन लक्ष्ये साध्य करण्यासाठी ‘सबका प्रयास’चा  मंत्र घेऊन परिश्रमांची पराकाष्‍ठा करण्याचा अमृतकाळ आहे. आज जगभरात ज्या वैश्विक परिस्थिती निर्माण झाल्या आहेत, त्या आपल्यासाठी अनेक मोठ्या संधी देखील घेऊन आल्या आहेत. जग आज ज्या विश्वासू सहकाऱ्याच्या शोधात आहे तो विश्वास सार्थ ठरवण्याचे सामर्थ्य केवळ आपल्या लोकशाही व्यवस्था असलेल्या भारतात आहे. जग आज भारतामध्ये असलेल्या क्षमतेकडे देखील पाहात आहे आणि भारताच्या कामगिरीची देखील प्रशंसा करत आहे.

कोरोना कालखंडातही भारत थांबला नाही. उलट आपल्या सुधारणांच्या गतीमध्ये आणखी वाढ केली. याचा परिणाम आज आपण सर्वजण पाहात आहोत. आपण G-20 अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात जलदगतीने विकसित होत आहोत. आज भारत, Global Retail Index मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत, जगातील तिसरा सर्वात मोठा Energy Consumer देश आहे. गेल्या वर्षी जगातील 100 पेक्षा जास्त से अधिक देशांमधून 84 अब्ज डॉलरची विक्रमी थेट परदेशी गुंतवणूक (FDI) आली आहे. भारताने गेल्या आर्थिक वर्षात 417 अब्ज डॉलर म्हणजे 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यापारी निर्यात करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

मित्रांनो,

एका राष्ट्राच्या रुपात आता हा काळ आपल्या एकत्रित प्रयत्नांना अनेक पटींनी वाढवण्याचा काळ आहे. हा एक असा काळ आहे ज्यावेळी आपण आपल्या निर्णयांना केवळ एका वर्षासाठी किंवा पाच वर्षांचा विचार करून मर्यादित ठेवू शकत नाही. भारतात एक मज़बूत मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम, एक मज़बूत आणि वैविध्यपूर्ण मूल्य आणि पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. सरकार आपल्या परीने सातत्याने धोरणे तयार करत आहे, जुन्या धोरणांमध्ये सुधारणा करत आहे.

अगदी अलीकडेच केंद्रातील एनडीए सरकारने आपली 8 वर्ष पूर्ण केली आहेत. या वर्षांमध्ये आता ज्या प्रकारे योगी जी सांगत होते, Reform-Perform-Transform च्या मंत्रासोबत पुढे वाटचाल केली आहे. आम्ही Policy Stability वर भर दिला आहे, समन्वयावर भर दिला आहे, Ease of Doing Business वर भर दिला आहे. गेल्या काही काळात आम्ही हजारो कंप्लायंस संपुष्टात आणले आहेत, जुने कायदे रद्दबातल केले आहेत. आम्ही आमच्या Reforms ने एका राष्ट्राच्या रूपात भारताला बळकटी देण्याचे काम केले आहे. One Nation-One Tax GST असो, One Nation-One Grid असो, One Nation-One Mobility Card असो, One Nation-One Ration Card असो, हे सर्व प्रयत्न, आमच्या भक्कम आणि स्पष्ट धोरणांचे प्रतिबिंब आहेत.

जेव्हापासून यूपीमध्ये डबल इंजिनाचे सरकार स्थापन झाले आहे, तेव्हापासून यूपीमध्येही या दिशेने वेगाने काम होत आहे. विशेषतः यूपीमध्ये ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे, व्यवसायासाठी अतिशय योग्य वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये येथील प्रशासनिक क्षमता आणि शासनामध्ये सुधारणा झाली आहे. म्हणूनच आज जनतेचा विश्वास योगी जींच्या सरकारवर आहे. आणि उद्योग विश्वातील सहकारी आपल्या अनुभवांच्या आधारे आताच उत्तर प्रदेशाची देखील प्रशंसा करत होते. मी खासदार म्हणून आपले अनुभव सांगत आहे. आम्ही कधीच उत्‍तर प्रदेशचे administration जवळून पाहिले नव्हते. कधी मुख्‍यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये लोक येत असत त्यावेळी तेथील अजेंडा काही तरी वेगळा असायचा. पण एक खासदार म्हणून जेव्हा मी येथे काम करू लागलो तेव्हा मला इतका जास्त विश्वास वाटू लागला की उत्‍तर प्रदेशाची ब्‍यूरोक्रेसी, उत्‍तर प्रदेशच्या administration मध्ये ती ताकद आहे ज्याची देशाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

उद्योग जगतातील लोक जे काही सांगत होते, त्या सामर्थ्याचा एक खासदार म्हणून मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि म्हणूनच मी येथील सरकारचे सर्व नोकरशहा, सरकारमधील लहान मोठ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांची ही जी काही वृत्ती निर्माण झाली आहे त्याबद्दल धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो, आज यूपीच्या जनतेने 37 वर्षांनी एखाद्या सरकारला पुन्हा सत्तेमध्ये परत आणून आपल्या सेवकाला एक जबाबदारी सोपवली आहे.

मित्रांनो,

उत्तर प्रदेशात भारताच्या लोकसंख्येच्या पाचव्या-सहाव्या भागाइतके इतके लोक राहतात. म्हणजेच यूपीमधील एका व्यक्तीच्या स्थितीमधील सुधारणा म्हणजे भारताच्या प्रत्येक सहाव्या व्यक्तीच्या स्थितीमधील सुधारणा असेल. 21 व्या शतकात भारताच्या विकासाच्या गाथेला (Growth story) जर कोणी चालना (momentum) देणार असेल तर ते राज्य यूपीच असेल असा मला ठाम विश्वास आहे आणि तुम्ही याच दहा वर्षात पहाल एक उत्तर प्रदेश भारताचा खूप मोठा Driving Force बनणार आहे. या 10 वर्षात तुम्हाला हे दिसून येईल.

जिथे परिश्रमाची पराकाष्ठा करणारे लोक आहेत, जिथे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 16 टक्क्यांहून अधिक ग्राहकसंख्या आहे, जिथे 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली डझनावारी शहरे आहेत, जिथे प्रत्येक जिल्ह्याचे स्वतःचे असे खास उत्पादन आहे. जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) आहेत, लघुउद्योग आहेत, जिथे वेगवेगळ्या हंगामात विविध कृषी उत्पादनांचा-तृणधान्ये-फळे-भाज्या यांचा बहर आहे, गंगा, यमुना, शरयूसह अनेक नद्यांचे वरदान लाभले आहे, अशा उत्तर प्रदेशाला गतीशील विकासापासून भले कोण रोखू शकेल?

मित्रानों,

यंदाच्या अर्थसंकल्पातच, आम्ही गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांवर, 5 किमीच्या परिघात, रसायनमुक्त नैसर्गिक शेती कॉरिडॉर बनवण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल सांगतोय.. संरक्षण कॉरिडॉरची चर्चा होते, पण या कॉरिडॉरबाबत कोणी बोलत नाही.  उत्तर प्रदेशात गंगा अकराशे किलोमीटरहून जास्त लांब वाहते आणि इथल्या 25 ते 30 जिल्ह्यांतून जाते.  तुम्ही कल्पना करू शकता की नैसर्गिक शेतीची किती प्रचंड क्षमता उत्तर प्रदेशात निर्माण होऊ शकणार आहे.  यूपी सरकारने काही वर्षांपूर्वी अन्न प्रक्रिया धोरणही जाहीर केले आहे.  कॉर्पोरेट जगत आणि उद्योग जगतातील लोकांना मी आग्रहाने सांगू इच्छीतो,  यावेळी कॉर्पोरेट जगताला कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

मित्रानों,

जलद विकासासाठी आमचे दुहेरी इंजिनचे सरकार पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि उत्पादनावर एकत्रितपणे काम करत आहे.  यंदाच्या अर्थसंकल्पात साडेसात लाख कोटी रुपयांच्या अभूतपूर्व भांडवली खर्चाची केलेली तरतूद या दिशेने टाकलेले पाऊल आहे. उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी आम्ही पीएलआय योजना जाहीर केल्या आहेत, त्याचे लाभ  तुम्हाला इथे यूपीतही मिळतील.

यूपीमध्ये तयार होत असलेला संरक्षण कॉरिडॉर तुमच्यासाठी मोठ्या संधी घेऊन येत आहे. भारतात आज संरक्षण उत्पादनावर भर दिला जात आहे तितका पूर्वी कधीच दिला गेला नाही.  आम्ही आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत मोठ्या हिमतीने निर्णय घेतला आहे, आम्ही अशी 300 उत्पादने निवडली आहेत आणि आम्ही ठरवले आहे की ही  300 उत्पादने यापुढे परदेशातून येणार नाहीत. म्हणजेच लष्करी उपकरणांशी संबंधित या 300 वस्तू आहेत. याचाच अर्थ,  संरक्षणा संबंधित उत्पादन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी या 300 उत्पादनांसाठी खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध आहे. याचाही तुम्हाला खूप लाभ होईल.

मित्रानों,

उत्पादन आणि वाहतूक यांसारख्या पारंपरिक व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही भौतिक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करत आहोत. येथे यूपीमध्ये, आधुनिक पॉवर ग्रीड असो, गॅस पाइपलाइनचे जाळे असो किंवा बहुआयामी संपर्कव्यवस्था असो, सर्वांवर 21 व्या शतकातील गरजांनुसार काम केले जात आहे.  आज यूपीमध्ये जेवढ्या किलोमीटरच्या द्रुतगती महामार्गांचे काम केले जात आहे, तो एक विक्रम आहे.  आधुनिक द्रुतगती महामार्गांचे मजबूत जाळे उत्तर प्रदेशातील सर्व आर्थिक क्षेत्रांना जोडणार आहे. लवकरच यूपी आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा संगम म्हणून ओळखले जाणार आहे.  पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतुक  कॉरिडॉर येथे यूपीमध्येच परस्परांशी जोडले जाणार आहेत.  जेवरसह यूपीचे 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील आंतरराष्ट्रीय संपर्क व्यवस्था आणखी मजबूत करणार आहेत.  ग्रेटर नोएडा किंवा वाराणसीचा परिसर असो, येथे दोन  मल्टी-मॉडल लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट हब देखील बांधले जात आहेत.  औद्योगिक धोरणाच्या बाबतीत, लॉजिस्टिक्सच्या बाबतीत, यूपी देशातील सर्वात आधुनिक पायाभूत सुविधा असलेल्या राज्यांमध्ये सामील होत आहे. ही वाढती संपर्क व्यवस्था आणि यूपीमधील वाढती गुंतवणूक यूपीच्या तरुणांसाठी अनेक नवीन संधी घेऊन येत आहे.

मित्रानों,

आधुनिक पायाभूत सुविधांच्या जलद विकासासाठी आमच्या सरकारने पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा तयार केला आहे.  केंद्र सरकार, राज्य सरकार, वेगवेगळे विभाग, विविध संस्था, इतकेच नाही तर स्थानिक पातळीवरील सामाजिक संस्था या सर्वांना एकत्र जोडण्यासाठी, त्याच प्रकारे खासगी क्षेत्र, उद्योगांशी संबंधित संस्थांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम पंतप्रधान गतिशक्ती योजनेद्वारे केले जात आहे. या मंचाद्वारे, कोणत्याही प्रकल्पाशी संबंधित प्रत्येक भागधारकाला वास्तव वेळेत माहिती मिळेल. काम किती दिवसात पूर्ण करायचे आहे याचे नियोजन तो वेळेवर करू शकेल. गेल्या 8 वर्षांत, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची नवी संस्कृती देशात विकसित झाली आहे त्यास याद्वारे नवा आयाम मिळणार आहे.

मित्रानों,

भारताने गेल्या काही वर्षांत ज्या गतीने काम केले आहे त्याचे उदाहरण म्हणजे आपली डिजिटल क्रांती.  2014 मध्ये, आपल्या देशात फक्त 6 कोटी ब्रॉडबँड ग्राहक होते.  आज त्यांची संख्या 78 कोटींच्या पुढे गेली आहे.  2014 मध्ये, एक जीबी डेटाची किंमत सुमारे 200 रुपये होती.  आज त्याची किंमत 11-12 रुपयांपर्यंत खाली आली आहे.  भारत हा जगातील अशा देशांपैकी एक आहे ज्याकडे डेटा इतका स्वस्त मिळतो. 2014 मध्ये देशात 11 लाख किमी ऑप्टिकल फायबर होते.  आता देशात टाकण्यात आलेल्या ऑप्टिकल फायबरची लांबी 28 लाख किमीच्या पार गेली आहे. 2014 मध्ये देशातील 100 पेक्षा कमी ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर पोहोचले होते.  आज ऑप्टिकल फायबरने जोडलेल्या ग्रामपंचायतींची संख्याही पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे.  2014 मध्ये देशात फक्त 90 हजार सामान्य सेवा केंद्रे होती.  आज देशात सामान्य सेवा केन्द्रांची संख्याही 4 लाखांच्या पुढे गेली आहे. आज जगातील सुमारे 40 टक्के डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. जगातील 40 टक्के.  कोणत्याही भारतीयाला याचा अभिमान वाटेल.  ज्या भारताला लोक निरक्षर म्हणतात, तो भारत हा चमत्कार करत आहे.

गेल्या 8 वर्षात डिजिटल क्रांतीसाठी आपण जो पाया मजबूत केला आहे, त्याचाच परिणाम म्हणजे आज विविध क्षेत्रांसाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. याचा मोठा फायदा आपल्या तरुणांना झाला आहे.  2014 पूर्वी, आपल्याकडे फक्त काहीशे स्टार्ट-अप होते. पण आज देशात नोंदणीकृत स्टार्टअप्सची संख्याही 70 हजारांच्या आसपास पोहोचली आहे.  अगदी अलीकडे, भारताने 100 युनिकॉर्नचा विक्रमही केला आहे. आपल्या नवीन अर्थव्यवस्थेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला मजबूत  डिजिटल पायाभूत सुविधांचा खूप फायदा होणार आहे.

मित्रानों,

मी तुम्हाला आश्वस्त करतो की उत्तर प्रदेशच्या विकासासाठी, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी, कोणत्याही क्षेत्रात, ज्या काही सुधारणा आवश्यक असतील, त्या सुधारणा सातत्याने केल्या जातील.  आम्ही धोरणाने विकासासोबत आहोत, निर्णयाने विकासासोबत आहोत, हेतूने विकासासोबत आहोत आणि स्वभावानेही विकासासोबत आहोत.

आम्ही सर्वजण तुमच्या प्रत्येक प्रयत्नात तुमच्या सोबत असू आणि तुम्हाला प्रत्येक पावसावर साथ देऊ.  उत्तर प्रदेशच्या विकासाच्या प्रवासात पूर्ण उत्साहाने सामील व्हा.  उत्तर प्रदेशच्या भविष्य निर्माणाने तुमचे भविष्यही उज्ज्वल होईल.  ही सगळ्यांसाठीच फायद्याची (विन-विन सिच्युएशन) स्थिती आहे.  ही गुंतवणूक सर्वांसाठी शुभ असो, सर्वांसाठी लाभदायक ठरो.

या सदिच्छेसह, इति शुभम म्हणत, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...

Prime Minister Shri Narendra Modi paid homage today to Mahatma Gandhi at his statue in the historic Promenade Gardens in Georgetown, Guyana. He recalled Bapu’s eternal values of peace and non-violence which continue to guide humanity. The statue was installed in commemoration of Gandhiji’s 100th birth anniversary in 1969.

Prime Minister also paid floral tribute at the Arya Samaj monument located close by. This monument was unveiled in 2011 in commemoration of 100 years of the Arya Samaj movement in Guyana.