PM Modi inaugurates and lays foundation stone of various development projects in Varanasi
Today Kashi is becoming a hub of health facilities for the entire Purvanchal: PM Modi
PM Modi requests people to promote 'Local for Diwali' in addition to 'vocal for local', says buying local products will strengthen local economy

आता तुम्हा सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. मला आनंद झाला, शहरात विकासाची जी कामे होत आहेत, सरकारने जे निर्णय घेतले आहेत, त्याचा लाभ बनारसच्या जनतेलाही होत आहे. आणि हे सगळे होत आहे त्यामागे बाबा विश्वनाथ यांचाच आशीर्वाद आहे आणि म्हणूनच जेव्हा मी , भले  आज वर्चुअली इथे आलो आहे, मात्र जी आपली काशीची परंपरा आहे, ती परंपरा पार पाडल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच आता जे जे माझ्याबरोबर कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, आपण सर्वजण एकदम म्हणूया  – हर हर महादेव ! धनतेरस, दीपावली, अन्नकूट, गोवर्धन पूजा अऊर डाला छठच्या तुम्हा सर्वाना खूप शुभेच्छा.

माता अन्नपूर्णा तुम्हा सर्वाना धन धान्याने समृद्ध करो. बाजारात  खरेदी वाढावी अशी आमची इच्छा आहे. माझ्या काशीच्या गल्ल्यांमध्ये पुन्हा तीच वर्दळ पुन्हा दिसावी आणि  बनारसी साड्यांच्या व्यवसायाला देखील गती मिळावी. कोरोनाशी लढताना देखील आपल्या  शेतकरी बांधवानी शेतीकडे उत्तम लक्ष दिले. बनारसच नाही तर पूर्ण  पूर्वांचल मध्ये यंदा विक्रमी पीक येईल असे वृत्त मिळत आहे. शेतकऱ्याचे परिश्रम स्वत: साठी नाहीत तर संपूर्ण देशाला त्याचा लाभ होणार आहे. तुम्हा अन्न  देवता लोकांचे खूप  अभिनंदन. कार्यक्रमात माझ्याबरोबर सहभागी झालेले  उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उप-मुख्‍यमंत्री केशव प्रसाद मौर्य, उत्तर प्रदेशचे  मंत्रीगण, आमदार, बनारसचे निवडून आलेले सर्व लोक प्रतिनिधी, बनारसचे माझे  प्रिय बंधू आणि भगिनीनो,

महादेवाच्या आशीर्वादामुळे काशी कधीही थांबत नाही. गंगा मातेप्रमाणे निरंतर पुढे जात असते.  कोरोनाच्या कठीण काळातही काशी आपल्या याच स्वरूपात पुढे जात राहिली.  कोरोनाविरुद्ध बनारसने ज्या चिवटपणे लढाई लढली आहे, या कठीण काळात ज्या सामाजिक एकजुटत्याचे दर्शन घडवले आहे ते खरोखरच खूप  प्रशंसनीय आहे. आता आज याच मालिकेत  बनारसच्या विकासाशी संबंधित हजारों कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी होत आहे. तसा  हा देखील महादेव यांचाच आशीर्वाद आहे, जेव्हा कधी काशीसाठी काही नव्या कार्याची सुरुवात होते, जुने अनेक संकल्प सिद्धीला  गेलेले असतात. म्हणजे एकीकडे पायाभरणी, तर दुसरीकडे लोकार्पण. आजही सुमारे  220 कोटी रुपयांच्ग्या 16 योजनाच्या लोकार्पणबरोबर सुमारे  400 कोटी रुपयांच्या  14 योजनावर काम सुरु झाले आहे. मी सर्व विकास कामांसाठी बनारसच्या लोकांचे खूप अभिनंदन करतो.  काशी मध्ये  उत्तर प्रदेशात न थांबता न थकता सुरु असलेल्या या विकास कामांचे श्रेय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या पूर्ण चमूला, – मंत्रिमंडळातील सदस्यांना , निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना, सरकारी यंत्रणेशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना या यशाचे पूर्ण  श्रेय जाते. योगी आणि त्यांच्या  टीमचे या  एकनिष्ठ प्रयत्नांसाठी खूप-खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

बनारसच्या शहरी आणि ग्रामीण विकास योजनांमध्ये  पर्यटन देखील आहे, संस्कृती देखील आहे, आणि रस्ते , वीज आणि पाणी देखील आहे.  कायम हाच प्रयत्न राहिला आहे  कि काशीच्या प्रत्येक नागरिकांच्या भावनांनुसार विकासाचे चाक पुढे जावे. म्हणूनच हा  विकास आज या गोष्टीचे  उदाहरण आहे कि बनारस कशा प्रकारे एकसाथ प्रत्येक क्षेत्रात , प्रत्येक दिशेने वेगाने पुढे जात आहे. गंगा नदीच्या स्वच्छतेपासून आरोग्य सेवांपर्यंत , रस्ते आणि पायाभूत सुविधांपासून पर्यटनापर्यंत , विजेपासून युवकांसाठी क्रीडा पर्यंत आणि शेतकऱ्यांपासून गाव -गरीबांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात बनारस विकासाची नाव गती  प्राप्त करत आहे. आज गंगा कृती आराखडा प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नूतनीकरणाचे   काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर शाही नालामधून अतिरिक्त सांडपाणी  गंगा नदीत जाण्यापासून रोखण्यासाठी वळण मार्गिकेची पायाभरणी देखील करण्यात आली आहे.  35 कोटींपेक्षा अधिक खर्चामुळे  खिड़किया घाट चे देखील सुशोभीकरण केले जात आहे. इथे सीएनजीवर नाव देखील चालेल ज्यामुळे गंगा नदीतील  प्रदूषण देखील कमी होईल. अशाच प्रकारे  दशाश्वमेध घाट येथील  टूरिस्ट प्लाज़ा देखील आगामी काळात  पर्यटकांच्या  सुविधा आणि  आकर्षणाचे  केंद्र बनेल. यामुळे घाटाचे सौंदर्य वाढेल, व्यवस्था देखील वाढेल. जे स्थानिक छोटे छोटे व्यापार आहेत त्यांनाही हा प्लाझा बनल्यामुळे सुविधा मिळेल आणि  ग्राहक वाढतील.

गंगा नदीसंदर्भात हे प्रयत्न, ही कटिबद्धता  काशीचा संकल्प देखील आहे आणि काशीसाठी  नवीन संधींचा मार्ग देखील आहे. हळूहळू इथल्या घाटांचे चित्र बदलत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यांनंतर जेव्हा पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, तेव्हा ते बनारसचे अधिक सुंदर चित्र घेऊन इथून जातील. गंगा घाटांची स्वच्छता आणि सुशोभीकरणासह सारनाथ देखील नव्या रंगरूपासह उजळत आहे. आज ज्या प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमाचे लोकार्पण करण्यात आले त्यामुळे सारनाथची भव्यता आणखी वाढेल.

बंधू आणि भगिनींनो

इथे लटकणाऱ्या विजांच्या तारांचे जाळे हा काशीची एक खूप मोठी  समस्या आहे. आज काशीचे मोठे क्षेत्र विजेच्या ताराच्या जाळ्यापासून मुक्त होत आहे. तारा भूमिगत करण्याचा आणखीन एक टप्पा आज पूर्ण झाला आहे. कँट स्टेशन पासून लहुराबीर, भोजूबीर ते  महाबीर मंदिर, कचहरी चौक ते भोजूबीर तिराहा, अशा 7 मार्गांवर आता विजेच्या तारांपासून मुक्ती मिळाली आहे. एवढेच नाही, स्मार्ट एलईडी दिव्यांमुळे गल्ल्यांमध्ये प्रकाश आणि सौंदर्य देखील वाढेल.

मित्रांनो.

बनारसच्या संपर्क व्यवस्थेला आमच्या सरकारने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.  काशीवासियांचे आणि काशीला येणाऱ्या प्रत्येक पर्यटक, प्रत्येक भाविकाचा वेळ वाहतूक कोंडीत वाया जाऊ नये यासाठी नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. बनारसमध्ये आज विमानतळावर  सुविधांमध्ये वाढ होत आहे.  बाबतपुर इथून शहराला जोडणारा रस्ताही आता बनारसची नवी ओळख बनला आहे. आज विमानतळावर दोन प्रवासी पुलांचे लोकार्पण झाल्यांनंतर या सुविधांचा आणखी विस्तार होईल. हा विस्तार यासाठी देखील आवश्यक आहे कारण ६ वर्षांपूर्वी म्हणजे तुम्ही मला तुमची सेवा करण्याची संधी दिली त्याआधी  बनारस मध्ये दररोज 12 उड्डाणे होत होती, आज याच्या 4 पट म्हणजे  48 उड्डाणे होत आहेत. म्हणजे बनारसमध्ये वाढत्या सुविधा पाहून बनारसला येणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत आहे.

बनारसमध्ये तयार होत असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधा इथे राहणाऱ्या आणि इथे येणाऱ्या दोन्ही प्रकारच्या लोकांचे जीवन सुलभ बनवत आहे. विमानतळाला जोडणाऱ्या व्यवस्थेबरोबरच रिंग रोड असेल,  महमूरगंज-मण्डुवाडीह उड्डाणपूल असेल, एनएच-56 चे  रुंदीकरण असेल, बनारस आज रस्ते पायाभूत सुविधांचा कायापालट होताना पाहत आहे. शहरात आणि  आसपासच्या परिसरात देखील रस्त्यांचे चित्र बदलत आहे. आजही वाराणसीच्या विविध  क्षेत्रांसाठी रस्ते बांधणीचे काम सुरु झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग, फुलवरिया-लहरतारा मार्ग, वरूणानदी आणि  3 पुल आणि अनेक रस्त्यांचे काम, अशी कित्येक कामे आहेत जी आगामी काळात लवकर पूर्ण होणार आहेत. रस्तेमार्गाच्या या जाळ्याबरोबर आता जलमार्ग जोडणीचे  एक मॉडल बनत आहे. आपल्या  बनारसमध्ये  आज देशातील पहिले इनलँड वॉटर  पोर्ट बनले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

मागील सहा वर्षांपासून  बनारसमध्ये आरोग्य संबंधी पायाभूत विकासाबाबत अभूतपूर्व काम झाले आहे. आज काशी उत्तर प्रदेशच नव्हे तर एक प्रकारे संपूर्ण पूर्वांचलसाठी आरोग्य सुविधांचे केंद्र बनत आहे. आज रामनगर मध्ये लाल बहादुर शास्त्री रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाशी संबंधित कामाच्या लोकार्पणामुळे  काशीच्या या भूमिकेचा विस्तार झाला आहे.  रामनगरच्या रुग्णालयात आता यांत्रिक लॉंड्री,  व्यवस्थित नोंदणी काउंटर आणि  कर्मचाऱ्यांसाठी निवासी परिसर सारख्या सुविधा  उपलब्ध होतील. होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि पंडित महामना मालवीय कर्करोग रुग्णालय सारख्या मोठ्या कॅन्सर संस्था इथे आधीपासूनच कार्यरत आहेत. त्याचबरोबर  ESIC रुग्णालय आणि  BHU अतिविशिष्ट रुग्णालय देखील इथे गरीब मित्रांना,  गर्भवती महिलाना उत्तम आरोग्य सुविधा पुरवत आहे.

बनारसमध्ये आज हा जो चौक विकसित होत आहे, त्याचा पूर्वांचलसह संपूर्ण पूर्व भारताला लाभ होत आहे. आता  पूर्वांचलच्या लोकांना छोट्या छोट्या गरजांसाठी  दिल्ली आणि  मुंबईच्या चकरा माराव्या लागत नाहीत. बनारस आणि पूर्वांचलच्या शेतकऱ्यांसाठी साठवणुकीपासून वाहतुकीपर्यंत अनेक सुविधा गेल्या काही वर्षात तयार करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय तांदूळ संस्थेचे केंद्र असेल, दूध प्रकिया कारखाना असेल, नाशवंत कार्गो सेंटरची निर्मिती असेल, अशा अनेक सुविधामुळे इथल्या शेतकऱ्यांना खूप लाभ होत आहे. ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे कि यावर्षी प्रथमच  वाराणसी मधून फळे, भाजीपाला आणि धान्य परदेशात निर्यात केले आहे. शेतकऱ्यांसाठी बनलेल्या साठवणूक सुविधांचा विस्तार करत आज कपसेठी येथे 100 मेट्रिक  टन साठवणूक क्षमता असलेल्या  गोदामांचे लोकार्पण देखील करण्यात आले आहे. याशिवाय जनसा इथंही बहुउद्देशीय  गोदाम आणि  डिस्सेमिनेशन सेंटर बनवले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

गाव-गरीब आणि शेतकरी आत्मनिर्भर भारत अभियानाचे सर्वात मोठे स्तंभ देखील आहेत आणि सर्वात मोठे लाभार्थी देखील आहेत. अलिकडेच ज्या कृषी सुधारणा झाल्या आहेत त्यांचा शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. बाजारातून  थेट जोडणी  सुनिश्चित होणार आहे. शेतकऱ्यांच्या नावावर शेतकऱ्यांची मेहनत हड़पणाऱ्या दलालांना आता व्यवस्थेतून हद्दपार करण्यात आले आहे. याचा थेट लाभ  उत्तर प्रदेश पूर्वांचल, बनारसच्या शेतकऱ्यांना होणार आहे.

मित्रांनो.

शेतकऱ्यांप्रमाणेच रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी देखील एक अतिशय  महत्‍वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. आज प्रधानमंत्री स्वनिधि योजनेच्या माध्यमातून फेरीवाले विक्रेत्यांना सहज कर्ज मिळत आहे.  कोरोनामुळे त्यांना ज्या अडचणी आल्या  त्या दूर व्हाव्यात, त्यांचे काम पुन्हा सुरु व्हावे यासाठी त्यांना 10 हजार रुपयांचे कर्जपुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे गावात राहणाऱ्या लोकांना गावातील जमीन, गावातील घराचा कायदेशीर अधिकार देण्यासाठी  'स्वामित्व योजना' सुरु करण्यात आली आहे गावांमध्ये घरासंदर्भात जे वाद व्हायचे, कधी कधी मारामारी देखील व्हायची. कधी जर गावातून लग्न विवाह सोहळ्यातून परत यायचे तेव्हा घरावर दुसरे कुणीतरी कब्जा करायचे. या सर्व समस्यांपासून मुक्तीसाठी या स्‍वामित्‍व योजनेतुन मिळालेली मालमत्ता कार्डे यामुळे अशा अडचणी उद्भवणार नाहीत. आता गावातील घर किंवा जमिनीवर तुमच्याकडे मालमत्ता कार्ड असल्यामुळे बँकेकडून कर्ज मिळणे देखील सुलभ होईल. त्याचबरोबर  जमीनीवर  अवैध कब्जेदारीचा खेळ संपुष्टात येईल. पूर्वांचलला, बनारसला या योजनांचा मोठा लाभ मिळणार आहे.

मित्रांनो,

आपल्या शास्त्रात म्हटले आहे – 'काश्याम् हि काशते काशी, काशी सर्व प्रकाशिका'। अर्थात, काशीला काशीच  प्रकाशमय करते. आणि  काशी सर्वाना प्रकाशमय करते. म्हणूनच  आज विकासाचा  जो प्रकाश पसरत आहे, जो बदल  घडत आहे, हे सर्व काशी आणि  काशीवासियांच्या आशीर्वादाचाच परिणाम आहे. काशीच्या  आशीर्वादामुळेच साक्षात महादेवाचा  आशीर्वाद आहे, आणि जर  महादेवाचा आशीर्वाद असेल तर कठीण काम देखील सोपे होते. मला विश्वास आहे  कि काशीच्या आशीर्वादामुळे  विकासाची ही  गंगा अशीच अविरत वाहत राहील. याच शुभेच्छांसह तुम्हा सर्वाना पुन्हा एकदा  दीपावली, गोवर्धन पूजा आणि भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझी  तुम्हाला आणखी एक विनंती आहे . आजकाल तुम्ही पाहत आहात 'लोकलसाठी  वोकल' ‘वोकल फॉर लोकल’ याचबरोबर  'लोकल फॉर दीवाली' या मंत्राचा आवाज चोहोबाजूनी ऐकू येत आहे.  मी बनारसच्या लोकांना आणि  देशवासियांना देखील सांगू इच्छितो कि लोकल फॉर दिवाळीला खूप प्रोत्साहन द्या, खूप प्रचार करा. किती सुंदर आहेत, अपली ओळख आहेत, या सर्व गोष्टी  दूर-दूर पर्यंत पोहचतील. यामुळे स्थानिक ओळख मजबूत होईलच, जे लोक हे सामान बनवतात त्यांची दिवाळीही प्रकाशमय होईल. म्हणूनच मी  देशवासियांना दिवाळीपूर्वी वारंवार आवाहन करतो कि आपण स्थानिक वस्तूंसाठी आग्रह धरा. प्रत्येकाने लोकलसाठी व्होकल बनावे, दिवाळी लोकलसह साजरी करावी. तुम्ही बघा पूर्ण अर्थव्यवस्थेत एक नवी चेतना जगेल. त्या गोष्टी ज्यात माझ्या देशवासीयांच्या घामाचा सुगंध असेल, ज्या गोष्टी माझ्या देशातील युवकांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या असतील, ज्या गोष्टी माझ्या देशातील अनेक कुटुंबाना नवी उमेद आणि  उत्‍साहाबरोबर नवा  संकल्‍प घेऊन आपले काम करण्याची ताकद देतील. त्या सर्वांसाठी एक भारतीय या नात्याने माझ्या देशवासीयांप्रती हे माझे कर्तव्य आहे. माझ्या देशाच्या प्रत्येक वस्तूसाठी माझी बांधिलकी आहे. चला, या भावनेसह  लोकल साठी  वोकल बना. दिवाळी स्थानिक वस्तुंनी साजरी करा आणि केवळ दिवे नाहीत प्रत्येक वस्तू  स्थानिक घ्या.जी वस्तू आपल्या देशात बनणे शक्य नाही ती जरूर परदेशातून मागवा.

मी हे देखील सांगेन कि तुमच्या घरात बाहेरून जर एखादी वस्तू आधीच आणली असेल तर ती फेकून द्या, गंगेत वाहून जाऊ द्या , नाही, मी असे नाही म्हणत. माझी एवढीच इच्छा आहे कि माझ्या देशातील लोक जो घाम गल्त आहेत , माझ्या देशातील युवक आपल्या  बुद्धि, शक्ति,  सामर्थ्यासह काही नवे करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे बोट पकडणे हे आपणा सर्वांची जबाबदारी आहे. त्यांची वस्तू खरेदी केली कि त्यांचा उत्साह वाढतो. तुम्ही बघा, बघता बघता विश्वासाने भरलेला   एक नवीन  वर्ग तयार होईल.  जो भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी एक नवीन शक्ती म्हणून जोडला जाईल. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा माझ्या  काशीवासियांशी बोलताना दिवाळीच्या शुभेच्छांसह काशीकडे जेव्हा मी मागितले , काशीने मला भरभरून दिले. मात्र मी माझ्यासाठी कधीही काहीही मागितले नाही, , आणि मला गरज पडेल असे तुम्ही काही शिल्लक ठेवले नाही. मात्र मी काशीच्या प्रत्येक गरजेसाठी, काशीत निर्माण होणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी  गीत गातो,  गौरव करतो, घरोघरी ती पोहचवण्याचा प्रयत्न करतो. . माझ्या देशातील प्रत्येक वस्तूला ही संधी मिळावी असा माझा आग्रह आहे. पुन्हा एकदा काशीवासीयांना नमन करत  काशी विश्‍वनाथ यांच्या चरणी नतमस्तक होत  काल भैरवला  नमन करत, माता अन्‍नपूर्णाला  प्रणाम करत तुम्हा सर्वाना आगामी सर्व सणांच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian Toy Sector Sees 239% Rise In Exports In FY23 Over FY15: Study

Media Coverage

Indian Toy Sector Sees 239% Rise In Exports In FY23 Over FY15: Study
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi highlights extensive work done in boosting metro connectivity, strengthening urban transport
January 05, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has highlighted the remarkable progress in expanding Metro connectivity across India and its pivotal role in transforming urban transport and improving the ‘Ease of Living’ for millions of citizens.

MyGov posted on X threads about India’s Metro revolution on which PM Modi replied and said;

“Over the last decade, extensive work has been done in boosting metro connectivity, thus strengthening urban transport and enhancing ‘Ease of Living.’ #MetroRevolutionInIndia”