17 व्या लोकसभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. ही पाच वर्षे 'रीफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' ची होती.
"सेंगोल हे भारताच्या वारशाच्या पुनरुज्जीवनाचे आणि स्वातंत्र्याच्या पहिल्या क्षणाच्या स्मृतीचे प्रतीक आहे."
"याच काळात भारताला जी -20 चे अध्यक्षपद मिळाले आणि प्रत्येक राज्याने देशाचे सामर्थ्य आणि त्याची ओळख जगाला दाखवून दिली. "
"अनेक पिढ्यानी अनेक शतके ज्या कामांची प्रतीक्षा केली ती कामे 17 व्या लोकसभेत पूर्ण झाली असे आपण समाधानाने म्हणू शकतो"
“आज सामाजिक न्यायाप्रति आपली बांधिलकी जम्मू-काश्मीरच्या लोकांपर्यंत पोहोचत आहे”
" या देशाने 75 वर्षे पीनल कोड अंतर्गत काढली असतील मात्र आता आपण न्याय संहिता अंतर्गत राहतो असे आपण अभिमानाने म्हणू शकतो "
"मला विश्वास आहे की निवडणुका आपल्या लोकशाहीच्या वैभवाला साजेशा होतील"
“श्री राम मंदिराबाबतच्या आजच्या भाषणांमध्ये ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्रासोबत ‘संवेदना’, ‘संकल्प’ आणि ‘सहनुभूती’ आहेत.

आदरणीय अध्यक्ष जी,

आजचा हा दिवस लोकशाहीच्या महान परंपरेचा महत्वाचा दिवस आहे.सतराव्या लोकसभेने पाच वर्षे देश सेवेत ज्या प्रकारे अनेक विविध महत्वपूर्ण निर्णय घेतले, अनेक आव्हानांना सर्वांनी आपल्या सामर्थ्याने देशाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला,एका प्रकारे आजचा हा दिवस आपणा सर्वांचा हा पाच वर्षांचा वैचारिक  प्रवास, राष्ट्राला समर्पित तो काळ, देशाला पुन्हा एकदा आपले संकल्प राष्ट्र चरणी समर्पित करण्याची ही संधी आहे. ही पाच वर्षे देशात  रिफॉर्म, परफॉर्म आणि  ट्रान्सफॉर्म,हे फार क्वचितच घडते.सुधारणाही होतात,कामगिरीही होते आणि परिवर्तन होताना आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहतो,एक नवा विश्वास निर्माण होतो. हे सतराव्या लोकसभेद्वारे देश अनुभवत आहे.मला विश्वास आहे की देश सतराव्या लोकसभेला नक्कीच आशीर्वाद देत राहील. या सर्व प्रक्रियेत सदनाच्या सर्व माननीय सदस्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. सर्व  माननीय सदस्यांच्या या चमूचा नेता या नात्यानेही आणि आपणा सर्वांचा एक सहकारी या नात्यानेही मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.    

विशेष करून आदरणीय अध्यक्ष जी,

मी आपले हार्दिक आभार मानतो.पाच वर्षात कधी कधी सुमित्रा जी मुक्त हास्य करत असत.मात्र आपण, प्रत्येक क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य विलसत असे.इथे काहीही घडले तरी आपल्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले नाही.अनेक वेगवेगळ्या परिस्थितीत आपण अतिशय संतुलित भावनेने आणि खऱ्या अर्थाने निष्पक्ष भावनेने या सदनाला मार्गदर्शन केले, सदनाचे नेतृत्व केले. यासाठी मी आपली प्रशंसा करतो.रागाचे क्षण आले, आरोपाचे क्षण आले मात्र आपण अतिशय संयमाने ही परिस्थिती सांभाळत, समंजसतेने सदनाची कार्यवाही चालवली, आम्हा सर्वाना मार्गदर्शन केले यासाठीही मी आपला आभारी आहे.  

आदरणीय सभापति जी,

या पाच वर्षात या शतकातले सर्वात मोठे संकट अवघ्या मानव जातीने झेलले. यापासून कोण वाचेल ?कोण वाचू शकेल ? कोणी कोणाला वाचवू शकतो की नाही ? अशी अवस्था होती. अशा काळात सदनात येणे हेही, आपले घर सोडून येणे हेसुद्धा  संकट होते.त्यानंतर जी व्यवस्था करावी लागली आपण ती केली,देशाचे काम थांबू दिले नाही.सदनाची प्रतिष्ठाही कायम राहावी आणि देशाच्या आवश्यक कामांना जो वेग आवश्यक आहे तो कायम राहावा आणि यामध्ये सदनाची जी भूमिका आहे ती जराही मागे राहता कामा नये हे सर्व आपण अतिशय कुशलतेने सांभाळले आणि जगासाठीही हे उदाहरण ठरले. 

आदरणीय सभापति जी,

माननीय खासदारांचेही मी आभार मानू इच्छितो की त्या कालखंडात देशाची आवश्यकता ओळखून खासदार निधी त्यागण्याचा प्रस्ताव माननीय खासदारांच्या समोर ठेवला आणि एका क्षणाचाही विलंब न लावता सर्व माननीय खासदारांनी तेव्हा  खासदार निधी त्यागला.इतकेच नव्हे तर देशवासियांना सकारात्मक संदेश देण्यासाठी खासदारांनी आपल्या पगारात 30 टक्के कपातीचा निर्णय सर्वांनी स्वतः घेतला. देशाला यातून विश्वासाचा संदेश गेला की काही त्यागावे लागले तर हे  सर्वात  पहिले लोक आहेत.

आदरणीय सभापति जी,

आम्ही सर्व खासदार विनाकारण वर्षातून दोनदा हिंदुस्तानच्या प्रसारमाध्यमांच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात टीकेची आगपाखड झेलत असतो की या खासदारांना इतके मिळते आणि कॅन्टीनमध्ये इतक्या कमी पैशात खातात.बाहेर इतक्या पैशात मिळते, कॅन्टीनमध्ये इतक्या पैशात मिळते,माहित नाही, नकोसे करून सोडत होते.आपण निर्णय घेतला कॅन्टीनमध्ये सर्वांसाठी समान दर  राहतील आणि खासदारांनीही कधी विरोध केला नाही, तक्रारही केली नाही. खासदारांची विनाकारण बदनामी करण्यात लोक आनंद मानायचे.त्यापासून आपण आम्हाला वाचवले यासाठीही मी आपला आभारी आहे.

आदरणीय सभापति जी,

हे खरे आहे की आपल्या अनेक लोकसभांमध्ये मग सतरावी असो, सोळावी असो,पंधरावी असो,नवे संसद भवन हवे यावर सर्वांनी चर्चा केली,सामुहिक चर्चा केली, एक मुखाने चर्चा केली मात्र निर्णय होत नव्हता.आपल्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला, गोष्टी पुढे नेल्या, सरकारसमवेत  बैठका घेतल्या आणि  परिणामी आज देशाला हे नवे संसद भवन प्राप्त झाले आहे. 

आदरणीय सभापति जी,

नव्या संसद भवनात वारश्याचा एक अंश आहे जो स्वातंत्र्याचा पहिला क्षण होता तो जीवंत ठेवणारा सदैव आपला मार्गदर्शक या रूपाने हा सेन्गोल इथे स्थापित करण्याचे काम आणि दर वर्षी सोहळ्याच्या रूपात त्याला एक भाग बनवण्याचे अतिशय मोठे काम आपल्या नेतृत्वात झाले जे भारताच्या  भावी पिढ्यांना स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या क्षणाशी नेहमीच जोडून ठेवेल.स्वातंत्र्याचा तो क्षण काय होता  हे आपल्या स्मरणात राहील तर  देशाला आगेकूच करण्यासाठी तो प्रेरणादायी राहील, हे पवित्र कार्य आपण केले आहे.

आदरणीय सभापति जी,

या कालखंडात भारताला जी -20 अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, भारताला अतिशय सन्मान मिळाला, देशातल्या प्रत्येक राज्याने जगासमोर भारताचे सामर्थ्य  आणि आपल्या राज्याची ओळख अतिशय  उत्तम रीतीने सादर केली ज्याचा प्रभाव आजही जागतिक मंचावर आहे. त्याचबरोबर आपल्या नेतृत्वाखाली जी -20 प्रमाणे पी-20 परिषद झाली आणि जगातल्या अनेक देशांमधले संसद अध्यक्ष इथे आले, लोकशाहीची जननी, भारताची ही महान परंपरा घेऊन ही लोकशाही मुल्ये घेऊन शतकांपासून आपण वाटचाल करत आहोत. व्यवस्था बदलल्या असतील मात्र भारताचा गाभा नेहमीच लोकशाहीचा राहिला आहे ही बाब आपण जागतिक संसदीय नेत्यांसमोर अतिशय उत्तम रीतीने मांडली आणि लोकशाही व्यवस्थांमध्ये भारताला अधिक प्रतिष्ठा प्राप्त करण्याचे काम आपल्या नेतृत्वाखाली झाले.      

आदरणीय सभापति जी,

मी आणखी एका बाबीसाठी आपले विशेष अभिनंदन करू इच्छितो कदाचित आपले सर्व माननीय खासदार आणि प्रसारमाध्यमांचेही याकडे लक्ष गेले नाही.आपण संविधान सदन ज्याला म्हणतो ते जुने संसद भवन ज्यामध्ये थोर नेत्यांच्या जयंतीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यासाठी आपण जमतो.तो कार्यक्रम दहा मिनिटांचा असे आणि आपण सर्वजण  त्यानंतर निघून जात होतो. आपण देशभर या महान नेत्यांसाठी वक्तृत्व  स्पर्धा,निबंध स्पर्धा यांचे एक अभियान चालवले.त्यामधले सर्वोत्कृष्ट वक्ते आणि उत्कृष्ट निबंध असत ती राज्यामधली  2-2 मुले दिल्लीला येत असत आणि त्या महान नेत्याच्या जयंतीला, पुष्पांजली कार्यक्रमाला देशाचे नेते आणि  ही मुले उपस्थित राहत, त्यानंतर त्या नेत्याविषयी व्याख्यान देत असत.दिल्लीतल्या इतर ठिकाणांना भेट देत असत, खासदारांचे कामकाज त्यांना जाणून घेता येत असे म्हणजेच आपण ही अखंड प्रक्रिया राबवत देशाच्या लाखो विद्यार्थ्यांना भारताच्या संसदीय परंपरेशी जोडण्याचे अतिशय मोठे काम  केले आहे.   

आणि ही परंपरा तुमच्या खात्यात राहील आणि येणाऱ्या काळात ही परंपरा सर्वजण मोठ्या अभिमानाने पुढे नेतील. मी यासाठी सुद्धा तुमचे अभिनंदन करतो.

आदरणीय अध्यक्ष जी,

संसदेचे ग्रंथालय, ज्यांनी त्याचा वापर करायला हवा, ते कितपत करू शकत होते, हे मी सांगू शकत नाही, परंतु तुम्ही त्याची दारे सर्वसामान्यांसाठी खुली केलीत. ज्ञानाचा हा खजिना, परंपरांचा वारसा, सर्वसामान्यांसाठी खुला करून तुम्ही मोठी सेवा केली आहे, त्याबद्दल सुद्धा मी तुमचे हृदयपूर्वक अभिनंदन करतो. कागदरहित संसद, डिजिटलायझेशन, तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या व्यवस्थेत कसा समावेश केला.. सुरुवातीला काही सहकाऱ्यांना अडचणी आल्या पण आता सगळ्यांना त्याची सवय झाली आहे. जेव्हा मी पाहतो की इथे बसला आहात तेव्हा तुम्ही काहीतरी करत राहता, तुम्ही फार मोठे काम केले आहे, या कायमस्वरूपी व्यवस्था तुम्ही निर्माण केल्या आहेत. याबद्दल मी खूप आभारी आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

तुमच्या कार्यक्षमतेमुळे आणि या आदरणीय खासदारांच्या सजगतेमुळे, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे 17 व्या लोकसभेची उत्पादकता सुमारे 97 टक्के इतकी झाली आहे. 97 टक्के उत्पादकता ही खरोखर आनंदाची बाब आहे, परंतु मला विश्वास आहे की आज आपण 17 व्या लोकसभेच्या समाप्तीकडे वाटचाल करत असताना, 18 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासूनच आपण नेहमी 100 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादक कामकाज सुनिश्चित करण्याचा संकल्प करू. आणि यामध्येही सात सत्रे 100 टक्क्यांपेक्षा जास्त फलदायी ठरली. आणि मी पाहिले आहे की रात्रभर बसून तुम्ही प्रत्येक खासदाराचे विचार सरकारच्या लक्षात आणून देण्याचा खूप प्रयत्न केला. या यशांबद्दल मी सर्व आदरणीय खासदारांचे आणि सर्व नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. 17 व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात दोन्ही सभागृहांनी 30 विधेयके मंजूर केली, हा एक विक्रम आहे. आणि 17 व्या लोकसभेत नवीन मापदंड सुनिश्चित करण्यात आले आहेत.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा, आपल्या सर्वांना केवढे मोठे सौभाग्य लाभले आहे की अशा प्रसंगी आपल्या सभागृहाने अत्यंत महत्त्वाच्या कामांचे नेतृत्व केले आहे, सगळीकडेच केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 वर्षांना लोकोत्सव बनवण्यात आपापल्या क्षेत्रात भूमिका बजावली नसेल, असा क्वचितच एखादा खासदार असेल. म्हणजे प्रत्यक्षात देशाने स्वातंत्र्याची 75 वर्षपूर्ती उत्साहात साजरी केली आणि त्यात आपल्या माननीय खासदारांचा आणि या सभागृहाचा मोठा वाटा आहे. आपल्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीला 75 वर्षे झाली, आणि ही संधी सुद्धा सभागृहाला मिळाली आहे, सर्व सन्माननीय खासदारांना ही संधी मिळाली आहे आणि राज्यघटनेच्या सर्व जबाबदाऱ्या इथून सुरू होतात आणि त्यांच्यासोबत जोडलेले असणे, हे फारच प्रेरक आहे.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

या कार्यकाळात अनेक सुधारणा झाल्या आहेत आणि त्या परिवर्तन घडवणाऱ्या आहेत. एकविसाव्या शतकातील भारताचा भक्कम पाया या सर्व गोष्टींमध्ये दिसून येतो. देश एका मोठ्या बदलाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे आणि या कामी सभागृहातील सर्व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे, आपला वाटा उचलला आहे, आणि देश… आपण समाधानाने म्हणू शकतो की आपल्या अनेक पिढ्या ज्याची वाट पाहत होत्या, अशी अनेक कामे या 17व्या लोकसभेच्या माध्यमातून पूर्ण झाली, पिढ्यांची प्रतीक्षा संपली. अनेक पिढ्यांनी एका संविधानाचे स्वप्न पाहिले होते. पण प्रत्येक क्षणी या संविधानात एक तफावत दिसत होती. एक अडथळा त्रासदायक होता. परंतु या सभागृहाने कलम 370 आणि 310 कलम काढून टाकले आणि राज्यघटनेचे पूर्ण स्वरूप पूर्ण क्षमतेसह प्रकाशमान झाले. आणि मला असे वाटते की राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण होत असताना… राज्यघटना रचणाऱ्या महापुरुषांचे आत्मे जिथे असतील तिथून ते आशीर्वाद नक्कीच देत असतील, हे काम आपण पूर्ण केले आहे. जम्मू-काश्मीरमधील जनताही सामाजिक न्यायापासून वंचित होती. आज आम्ही समाधानी आहोत की सामाजिक न्यायाप्रति आपली बांधिलकी ही जम्मू आणि काश्मीरमधील आमच्या बंधू-भगिनींपर्यंत पोहोचली आहे, आणि आम्हाला त्याचे समाधान वाटते आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

दहशतवाद हा त्रासदायक जखम होऊन देशाच्या छातीवर गोळ्या झाडत राहिला. भारतमातेची भूमी रोज रक्तरंजित व्हायची. दहशतवादामुळे देशातील अनेक शूर आणि आशावादी लोकांचा बळी जात असे. दहशतवादाविरोधात आम्ही कठोर कायदे केले, ते याच सभागृहाने बनवले. त्यामुळेच अशा समस्यांशी दोन हात करणाऱ्या लोकांना बळ मिळाले आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. मानसिक स्तरावर सुद्धा आत्मविश्वास वाढला आहे. आणि भारत दहशतवादापासून पूर्णपणे मुक्त होत असल्याची भावना आहे. आणि ते स्वप्नही पूर्ण होईल. आपण 75 वर्षांपासून इंग्रजांनी दिलेल्या दंड संहितेखाली जगत आलो आहोत. आम्ही देशाला अभिमानाने सांगू, नव्या पिढीलाही सांगू, तुम्ही तुमच्या नातवंडांहीना अभिमानाने सांगू शकाल की देश 75 वर्षे दंडसंहितेच्या अधीन राहिला असला तरी आता येणाऱ्या पिढ्या या न्याय संहितेनुसार जगतील. आणि हीच खरी लोकशाही आहे.

आदरणीय अध्यक्ष जी,

आणखी एका गोष्टीबद्दल मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो की नवीन सदन, त्याची भव्यता तर आहेच, परंतु भारताच्या मूलभूत मूल्यांना बळ देणाऱ्या कार्याने त्याची सुरुवात झाली आहे आणि तो म्हणजे नारी शक्ती वंदन कायदा. जेव्हा या नव्या सभागृहाबाबत चर्चा होईल, त्या प्रत्येक वेळी नारी शक्ती वंदन कायद्याचा उल्लेख केला जाईल. ते अधिवेशन, जरी ते लहान असले तरी दूरगामी निर्णय घेणारे अधिवेशन होते. या नव्या सदनाच्या पावित्र्याची जाणीव त्याच क्षणी सुरू झाली होती, जी आपल्याला एक नवे बळ देणारी आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे भविष्यात जेव्हा आपल्या माता-भगिनी मोठ्या संख्येने येथे बसतील. देशाला अभिमान वाटेल.. आमच्या मुस्लिम भगिनी तिहेरी तलाकसाठी अनेक खाचखळग्यांमधून वाट काढण्याच्या प्रयत्नांत होत्या. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिले होते, पण त्यांना तो अधिकार मिळत नव्हता. संकोचात जगावे लागत होते. कोणी उघडपणे सांगतात, तर कोणी आडून बोलतात.

पण 17 व्या लोकसभेने तिहेरी तलाकपासून मुक्ती देण्याचे आणि स्त्री शक्तीचा आदर करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले आहे. सर्व आदरणीय खासदार, त्यांचे विचार काहीही असोत, त्यांचा निर्णय काहीही असो, पण कधी ना कधी ते म्हणतील की होय, या मुलींना न्याय मिळवून देण्याचे काम करण्यासाठी आम्ही येथे उपस्थित होतो. पिढ्यानपिढ्या होत असलेला हा अन्याय आम्ही दूर केला आणि त्या भगिनी आम्हाला आशीर्वाद देत आहेत.

सन्माननीय अध्यक्ष जी,

येणारी 25 वर्षे आपल्या देशासाठी, आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. राजकारणातली चढाओढ आपल्या जागी आहे. राजकीय क्षेत्रातील लोकांच्या आशा-आकांक्षा आपल्या जागी आहेत.  पण देशाची अपेक्षा, देशाची आशा  , देशाचे स्वप्न, देशाचा संकल्प, हा  झाला आहे की, वर्षात  देश अपेक्षित परिणाम साध्य करणारच आहे. 1930 मध्ये महात्मा गांधीजींनी जेव्हा दांडी यात्रा  काढली तेव्हा मिठाचा सत्याग्रह झाला होता. स्वदेशी चळवळ असो, सत्याग्रहाची परंपरा असो, मिठाचा सत्याग्रह असो  लोकांना घोषणेपूर्वी याचे सामर्थ्य दिसले  नाही. त्यावेळी घटना छोट्या वाटत होत्या पण 1947 च्या त्या 25 वर्षांच्या कालखंडाने तो जोश देशात निर्माण केला होता. आता स्वातंत्र्य मिळवायचेच आहे , अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली.आज मी पाहतो आहे  की देशात तीच भावना निर्माण होत आहे. गल्लोगल्ली  प्रत्येक मुलाच्या वाणीत हेच आहे . 25 वर्षात आपला विकसित भारत होणारच आहे .  त्यामुळे ही  25  वर्षे माझ्या देशाच्या युवाशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे.आणि आपल्यापैकी असे कोणीही नाही ज्याला 25 वर्षात देश विकसित भारत होऊ नये  असे वाटत असेल . प्रत्येकाचे एक स्वप्न आहे,  काही लोकांनी स्वप्नाला संकल्प बनवले आहे ,काही लोकांना संकल्प करायला उशीर होईल, पण प्रत्येकाला याच्याशी संलग्न व्हावे लागेल. आणि जे  जोडले  जाऊ शकणार नाहीत आणि जिवंत असतील  ते नक्कीच फळे खातील, हा माझा विश्वास आहे.

सन्माननीय अध्यक्ष जी,

या  5 वर्षात तरुणांसाठी खूप ऐतिहासिक कायदेही आणण्यात आले आहेत.  व्यवस्थेत पारदर्शकता आणून तरुणांना नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. पेपर फुटीसारख्या समस्यांमुळे तरुण चिंतेत होते.  यासाठी आपण कठोर कायदा केला आहे तसेच तरुणांच्या मनातील प्रश्न किंवा शंका  आणि व्यवस्थेबद्दलचा त्यांचा राग घालवण्यासाठी सर्व माननीय खासदारांनी देशातील तरुणांच्या भावना समजून घेऊन अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सन्माननीय अध्यक्ष जी,

संशोधनाशिवाय कोणतीही मानवजात प्रगती करू शकत नाही हे खरे आहे.  निरंतर बदलासाठी संशोधन आवश्यक आहे.आणि मानवजातीचा कोट्यवधी वर्षांचा इतिहास याचा  साक्षीदार  आहे की, प्रत्येक कालखंडात संशोधन झाले आहे, जीवन वाढत गेले , जीवनाचा विस्तार होत गेला. या सभागृहाने विधिवत कायदेशीर व्यवस्था निर्माण करून संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे मोठे काम केले आहे. राष्ट्रीय संशोधन  फाउंडेशन,हा कायदा साधारणपणे दैनंदिन राजकारणात चर्चेचा विषय कधीच बनला नसता पण त्याचे परिणाम खूप दूरगामी होणार आहेत आणि या 17व्या लोकसभेने असे अत्यंत महत्त्वाचे काम केले आहे.माझा देशाच्या युवा शक्तीवर पूर्ण विश्वास आहे… या व्यवस्थेमुळेच   देश जगाचे संशोधन केंद्र बनू शकतो.अशी आहे आपल्या देशातील तरुणांची प्रतिभा, आजही जगात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांचे नवोन्मेषाचे  काम भारतात सुरू आहे. पण हे खूप मोठे केंद्र बनेल, हा माझा पूर्ण विश्वास आहे.

सन्माननीय अध्यक्ष जी,

 21 व्या शतकात आपल्या मूलभूत गरजा पूर्णपणे बदलत आहेत. कालपर्यंत ज्याचे  काही मूल्य नव्हते, ज्याच्याकडे लक्ष नव्हते, त्या  डेटा सारख्या गोष्टी भविष्यात खूप अमूल्य झाल्या आहेत  … डेटाचे सामर्थ्य काय आहे याची जगभरात चर्चा सुरू आहे.आम्ही डेटा संरक्षण विधेयक आणून संपूर्ण भावी पिढीला  सुरक्षित केले आहे. संपूर्ण भावी पिढीच्या हातात  आम्ही एक नवीन शस्त्र दिले आहे, ज्याच्या आधारे ते त्यांचे भविष्य घडवण्यासाठी त्याचा योग्य वापर करतील.आणि डिजिटल वैयक्तिक  डेटा संरक्षण कायदा , आपल्या 21व्या शतकातील पिढीला आणि जगातील लोकांनाही भारताच्या या कायद्याबद्दल स्वारस्य  निर्माण झाले आहे. जगातील देश त्याचा अभ्यास करत आहेत . प्रत्येकजण नवीन व्यवस्थेशी  जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि डेटा कसा वापरावा याबद्दलही मार्गदर्शक तत्त्वे आहेत.म्हणजे एक प्रकारे सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करताना त्याची ताकद कशी साधता येईल, ज्या डेटाला लोक सोन्याची खाण, न्यू ऑईल  म्हणतात. मला वाटते की भारताकडे ते सामर्थ्य आहे आणि   भारत या सामर्थ्यात विशेष आहे कारण हा विविधतेने परिपूर्ण देश आहे.आपल्याकडे ज्या प्रकारची माहिती  आणि आमच्याबद्दल व्युत्पन्न केलेला डेटा,आपल्याशी  संबंधित डेटा व्युत्पन्न केला जातो, केवळ आपल्या  रेल्वे प्रवाशांचा डेटा पाहा, जगासाठी एक मोठा संशोधनाचा विषय होऊ शकतो.आम्ही याची ताकद ओळखली  आणि ती या कायदेविषयक  व्यवस्थेला दिली आहे.

सन्माननीय अध्यक्ष जी,

पाणी जमीन आकाश या क्षेत्रांची चर्चा शतकानुशतके होत आहे.पण आता सागरी शक्ती, अवकाश शक्ती आणि सायबर शक्ती अशा तिहेरी शक्तींचा सामना करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि जग ज्या प्रकारच्या संकटातून जात आहे. आणि जग ज्या प्रकारचे वैचारिक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मग या क्षेत्रांमध्ये आपल्याला सकारात्मक सामर्थ्य  निर्माण करावे  लागेल  आणि नकारात्मक शक्तींच्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी स्वतःला सक्षम बनवावे लागेल.आणि त्यासाठी अंतराळाशी  संबंधित सुधारणा अत्यंत आवश्यक होत्या आणि अंतराळ क्षेत्रातील  सुधारणेचे काम   फार दूरगामी दृष्टीकोन  ठेवून आपल्या इथे  करण्यात आले आहे.

सन्माननीय अध्यक्ष जी,

17 व्या लोकसभेच्या सर्व सन्माननीय खासदारांनी देशाने केलेल्या आर्थिक सुधारणांमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. वर्षानुवर्षे, आपण हजारो अनुपालनांनी   विनाकारण जनतेला अशा गोष्टींमध्ये अडकवून ठेवले आहे.विकसित झालेल्या अशा विकृत प्रशासन  व्यवस्थेपासून मुक्ती मिळवण्याचे मोठे कार्य आपल्या देशात झाले आहे आणि त्याबद्दल मी या सभागृहाचाही आभारी आहे.म्हणजेच  या प्रकारच्या अनुपालनाने   सामान्य व्यक्ती दाबून जाते. आणि हे मी एकदा लाल किल्ल्यावरूनही सांगितले होते. जेव्हा आपण   किमान शासन , कमाल  प्रशासन म्हणतो,  म्हणजेच लोकांच्या जीवनातून सरकार जितक्या लवकर निघून जाईल तितकी लोकशाहीची ताकद वाढेल.दैनंदिन जीवनातील प्रत्येक पावलावर  सरकारचा  का हस्तक्षेप  आहे? होय, ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी सरकार प्रत्येक क्षणी उपस्थित असेल.पण सरकारच्या प्रभावामुळे एखाद्याच्या जीवनात अडथळे येत असतील तर अशी लोकशाही असू शकत नाही.

आणि म्हणूनच आमचा उद्देश हा आहे की सामान्य माणसाच्या जीवनापासून सरकार जेवढे दूर राहील, त्याच्या जीवनातला सरकारचा हस्तक्षेप कमी असेल अशी समृद्ध लोकशाही जगासमोर आपण आणायला हवी. ते स्वप्न पूर्ण करूया.

आदरणीय अध्यक्ष जी,

आम्ही कंपनी कायदा, मर्यादित दायित्व भागीदारी कायदा असे साठहून अधिक अनावश्यक कायदे रद्द केले आहेत. व्यवसाय सुलभतेसाठी हे खूप गरजेचे होते  कारण आता देशाला पुढे जायचे असेल तर अनेक अडथळे पार करावे लागतील. आपले अनेक कायदे तर असे होते ज्यामध्ये छोट्या छोट्या कारणांसाठी तुरुंगात पाठवले जात होते.  इथपर्यंत की एक कारखाना आहे आणि तिथले शौचालय सहा महिन्यातून एकदा व्हाइट पोस्ट  केले नाही म्हणून त्यासाठी तुरुंगवास होता

भले तो कितीही मोठ्या कंपनीचा मालक असो. हे जे स्वत:ला मोठे डावे उदारमतवादी म्हणवून घेतात, त्या लोकांच्या विचारसरणीपासून तसेच देशातला हा कुमारशाहीचा कालखंड या सगळ्यांमधून मुक्ती देण्याचा आत्मविश्वास आपल्याला असायला हवा.  लोकांमध्ये सहभागी होऊनच ते करता येईल. बहुमजली इमारतीत राहणारे लोक लिफ्ट वर-खाली करत असतात. सगळे करतात. हे  समाजावर, नागरिकांवर विश्वास ठेवण्याचे काम सतराव्या लोकसभेने अतिशय वेगाने केले आहे.

आणखी  पुढे जाऊया - जनविश्वास कायदा. मला वाटते की त्याने 180 पेक्षा जास्त तरतुदींना गुन्हेगारीच्या व्याख्येतून वगळण्याचे काम केले आहे. मी जे म्हटले छोट्या -छोट्या गोष्टीसाठी तुरुंगात टाकणे. ते आम्ही गुन्हेगारीच्या व्याख्येतून वगळून नागरिकांना बळ दिले आहे. याच सभागृहाने हे केले आहे, याच  मानव्यर खासदारांनी केले आहे. न्यायालयीन हेलपाट्यापासून जीव वाचवण्याचे खूप महत्त्वाचे काम , न्यायालयाबाहेर वाद-तंट्यापासून मुक्ती देण्याचे काम , त्या दिशेने महत्त्वाचे काम मध्यस्थी कायदा, त्या दिशेनेही याच  सन्माननीय खासदारांनी मोठी भूमिका बजावली आहे.

जे नेहमी बहिष्कृत होते, बाजूला होते, ज्यांना कोणी विचारत नव्हते. सरकार आहे याची त्यांना जाणीव झाली आहे. हो, सरकार महत्वाचे आहे, जेव्हा कोविडमध्ये मोफत इंजेक्शन्स दिली जात होती, तेव्हा लोकांना विश्वास वाटायचा, चला जीव वाचला . सरकार आहे याची त्यांना जाणीव असायची. सामान्य माणसाच्या जीवनात हेच  खूप महत्वाचे आहे. आता काय होणार, ही असहायतेची भावना, अशी परिस्थिती उद्भवायला नको.

तृतीयपंथी समुदायाला अपमानित वाटायचे. आणि जेव्हा त्याचा वारंवार अपमान व्हायचा, तेव्हा त्याच्यातही विकृतीची शक्यता वाढत असायची ..  आणि आपण  अशा विषयांपासून दूर पळायचो.  17 व्या लोकसभेच्या सर्व सन्माननीय खासदारांनी देखील तृतीयपंथी समुदायाप्रति संवेदना व्यक्त केल्या आणि त्यांनाही चांगले जीवन जगता यावे. आणि आज भारताने तृतीयपंथी समुदायासाठी केलेले काम आणि घेतलेल्या निर्णयांची जगभरात चर्चा होत आहे. जगासाठी आश्चर्य असे जेव्हा आपण म्हणतो ना ... आपल्याकडे माता-भगिनींना बाळंतपणासाठी  26 आठवडे रजा दिली जाते .. जगातील श्रीमंत देशांनाही याचे आश्चर्य वाटते. म्हणजेच असे पुरोगामी निर्णय या 17 व्या लोकसभेत घेतले गेले आहेत. आपण तृतीयपंथी लोकांना एक ओळख दिली आहे.  आतापर्यंत सुमारे 16-17 हजार ट्रान्सजेंडरना त्यांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांचे ओळखपत्र दिले आहे आणि मी पाहिले आहे की आता त्यांनी  मुद्रा योजनेतून पैसे घेऊन छोटे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे आणि कमवायलाही लागले आहेत. आम्ही ट्रान्सजेंडर्सना सन्मानाने जीवन जगण्यासाठी पद्म पुरस्कार दिला आहे. जोपर्यंत त्यांना सरकारच्या विविध योजनांचे लाभ मिळत राहतील,  त्यांना ते मिळू लागले असून, ते सन्मानाने जीवन जगू लागले आहेत.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

अतिशय कठीण काळात आपला वेळ गेला का मदींचीरण कोविडमुळे आपल्यावर दीड ते दोन वर्षे खूप दबाव होता , मात्र असे असूनही, 17 वी लोकसभा देशासाठी खूप उपयुक्त ठरली आहे आणि खूप चांगले काम केले आहे.  मात्र याकाळात आपण अनेक मित्रही गमावले आहेत. आज ते आपल्यात असते तर या निरोप समारंभाला हजर राहिले असते. परंतु दरम्यानच्या काळात कोविडमुळे आपल्याला अतिशय धडाडीचे सहकारी गमवावे लागले. त्याचे दुःख  कायम आपल्याला राहील.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

17 व्या लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन आणि  शेवटचा  तासच  म्हणूया. लोकशाही आणि भारताचा प्रवास अनंत आहे. आणि  हा देश एका उद्देशासाठी आहे, त्याचे एक ध्येय आहे, तो संपूर्ण मानवजातीसाठी आहे. अशीच कल्पना अरविंदांनी केली असेल किंवा स्वामी विवेकानंदजींनी असेच स्वप्न पाहिले असेल. मात्र आज आपण आपल्या डोळ्यांसमोर त्या शब्दांमध्ये , त्या स्वप्नांमध्ये असलेले सामर्थ्य पाहू शकतो. ज्या पद्धतीने जग भारताचे मोठेपण स्वीकारत आहे, भारताचे सामर्थ्य मान्य करायला लागले आहे , आता हा प्रवास आपल्याला अधिक ताकदीने पुढे न्यायचा आहे.

आदरणीय अध्‍यक्ष जी,

निवडणुका फार दूर नाहीत. काही लोकांना थोडी भीती वाटत असेल, मात्र हा  लोकशाहीचा नैसर्गिक, आवश्यक पैलू आहे. आणि ते आपण सर्वजण अभिमानाने मान्य करतो. आणि मला विश्वास आहे की आपल्या निवडणुका देशाचा गौरव  आणि लोकशाहीची परंपरा जपणाऱ्या  असतील आणि संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करतील  हा माझा ठाम विश्वास आहे.

आदरणीय अध्यक्ष,

आम्हाला सर्व सन्माननीय खासदारांकडून जे सहकार्य मिळाले  आम्ही जे निर्णय घेऊ शकलो त्याबद्दल त्यांचे आभार मानतो . त्यांचे आरोप देखील इतके मजेशीर असायचे की आमच्या अंतर्मनातील शक्ती अनेक पटींनी खुलून आली आहे. आणि माझ्यावर तर देवाची कृपा राहिली  आहे की जेव्हा एखादे आव्हान येते तेव्हा मला थोडा जास्त आनंद होतो. आम्ही प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकलो आहोत, आम्ही मोठ्या आत्मविश्वासाने आणि विश्वासाने पुढे मार्गक्रमण करत आहोत. राम मंदिरासंदर्भात आज या सभागृहाने मंजूर केलेला ठराव देशाच्या भावी पिढ्यांना या देशाच्या मूल्यांचा अभिमान बाळगण्याची घटनात्मक शक्ती देईल. हे खरे आहे की  अशा गोष्टींमध्ये धाडस दाखविण्याची ताकद प्रत्येकामध्ये नसते,  काही लोक मैदान सोडून पळून जातात. मात्र तरीही भविष्यातील नोंदी पाहिल्या तर आज जी भाषणे झाली आहेत, जे मुद्दे मांडण्यात आले, यात संवेदनशीलता आहे, संकल्प देखील आहे, सहानुभूती देखील आहे आणि सबका साथ, सबका विकास हा मंत्र पुढे नेण्याचे तत्वही यात आहे. हा देश, कितीही वाईट दिवस येऊन गेले तरी आपण भावी पिढ्यांसाठी काहीतरी चांगले करत राहू. हे सभागृह आपल्याला कायम ती प्रेरणा देत राहील आणि सामूहिक संकल्प आणि सामूहिक शक्तीने आपण भारताच्या तरुण पिढीच्या आशा आणि आकांक्षेनुसार सर्वोत्तम परिणाम साध्य करत राहू.

याच  विश्वासाने मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो , सर्व मान्यवर  खासदारांचे आभार मानतो.

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII

Media Coverage

PLI, Make in India schemes attracting foreign investors to India: CII
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 नोव्हेंबर 2024
November 21, 2024

PM Modi's International Accolades: A Reflection of India's Growing Influence on the World Stage