“गेल्या वर्षी, भारतात, प्रथमच एटीएममधून पैसे काढण्यापेक्षा मोबाईलद्वारे करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचे प्रमाण अधिक ”
"डिजिटल इंडिया अंतर्गत परिवर्तनात्मक उपक्रमांनी प्रशासनात वापरण्यायोग्य नाविन्यपूर्ण फिनटेक संशोधनासाठी संधी खुल्या केल्या आहेत"
“आता या फिनटेक उपक्रमांना फिनटेक क्रांतीमध्ये रूपांतरित करण्याची वेळ आली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे आर्थिक सक्षमीकरण साध्य करण्यास मदत करणारी ही क्रांती.
“लोकांचे हित जपले जाईल हे तुम्ही सुनिश्चित करणे आवश्यक आहे हा विश्वासाचा अर्थ आहे. फिनटेक सुरक्षा संशोधनाशिवाय फिनटेक संशोधन अपूर्ण असेल”
"आपले सार्वजनिक पायाभूत विकास संबंधी डिजिटल संशोधन जगभरातील नागरिकांचे जीवन सुधारू शकते "
“गिफ्ट सिटी हा केवळ एक परिसर नसून ते भारताचे प्रतिनिधित्व करते. भारतातील लोकशाही मूल्ये, मागणी, लोकसंख्या आणि विविधता यांचे प्रतिनिधित्व करते. कल्पना, नवसंशोधन आणि गुंतवणुकीसाठी भारताच्या खुलेपणाचे प्रतिनिधित्व करते”
"वित्त पुरवठा ही अर्थव्यवस्थेची रक्त वाहिनी आहे आणि तंत्रज्ञान त्याचा वाहक आहे. अंत्योदय साधण्यासाठी दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत

मान्यवरहो,

विशेष सहकारी,

तंत्रज्ञान आणि आर्थिक विश्वातील माझे सहकारी नागरीक, आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले 70 देशांमधील हजारो नागरीक,

नमस्कार ,

मित्रहो,पहिल्यावहिल्या इन्फिनिटी चर्चासत्राचे उद्‌घाटन करताना आणि आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आर्थिक आणि तंत्रज्ञान या क्षेत्राला भारतात उपलब्ध असणाऱ्या अनेक शक्यतांचे प्रतिनिधित्व “इन्फिनिटी फोरम” करतो. भारताच्या फिन-टेक विश्वात सामावलेली अफाट क्षमता संपूर्ण जगाला उपयुक्त ठरू शकते याचे उदाहरण त्यातून दिसून येते.

मित्रहो,

चलनाचा इतिहास उत्क्रांतीची अनेक स्थित्यंतरे दाखवतो. मानवाप्रमाणे त्याने व्यवहारासाठी वापरलेल्या चलनही उत्क्रांत होत गेले. वस्तुविनिमयाच्या पद्धतीपासून धातूचा वापरापर्यंत, नाण्यांपासून नोटांपर्यंत, चेकपासून  इलेक्ट्रोनिक कार्डपर्यंत आपण प्रवास केला. आधी कोणतीही विकसित पध्दत जगभरात पोचण्यासाठी दशके लागत. पण या जागतिकिकरणाच्या, ग्लोबलाझेशनच्या युगात हे चुटकीसरशी होते. तंत्रज्ञानाने आर्थिक विश्वात महत्वाचे बदल घडवून आणले आहेत. गेल्या वर्षी मोबाईलमार्फत झालेल्या व्यवहाराच्या रकमेने एटीएममधून निघणाऱ्या रकमेवर पहिल्यांदाच आघाडी घेतली. कोणतेही शाखा कार्यालय अस्तित्वात नसणारी संपूर्णपणे डिजिटल अशी  बँक आधीच प्रत्यक्षात आली आहे आणि येत्या  काही दशकातच ती सर्वसामान्य होईल.

तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत किंवा त्याचे नवे आयाम शोधण्याची वेळ येते तेव्हा आपण कोठेही मागे नाही हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. डिजिटल इंडियाद्वारे घडून आलेल्या बदलांमुळे  अनेक फिन-टेक उपक्रमांचा अवलंब प्रशासनात होण्यासाठी दरवाजे खुले झाले. आर्थिक बाबींच्या सहभागाला तंत्रज्ञानामुळे वेग आला. 2014 मध्ये 50 टक्केंपेक्षाही कमी भारतीयांची बँकेत खाती होती. गेल्या सात वर्षात आम्ही 430 दशलक्ष  जनधन खाती उघडली. 690 दशलक्ष रुपे- कार्डस दिली गेली.  रुपे-कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या विनिमयाने 4.2 दशलक्षांचा विनिमय टप्पा गेल्याच महिन्यात गाठला.

दर महिन्याला जवळपास 300 दशलक्ष बिले जीएसटी पोर्टलवर अपलोड होतात. केवळ जीएसटी पोर्टलवरुन दर महिन्याला 12 अब्ज  हून अधिक अमेरिकन डॉलर्सची रक्कम चुकती गेली. महामारी असतानाही 1.5 दशलक्ष रेल्वे तिकिटे दरदिवशी घेतली जात होती. गेल्या वर्षी फास्ट टॅग साठी 1.3 अब्जांचे सततचे व्यवहार सुरु राहिले. पीएम स्वनिधी योजनेने  छोट्या व्यापाऱ्यांना  कर्ज उपलबध करून दिले. ई-रुपी (e-RUPI)मुळे विशिष्ठ सेवा व्यत्ययाविना थेट पोहोचवत्या आल्या. अशी यादी मला कितीतरी वाढवता येईल पण ही सर्व उदाहरणे आहेत ती भारतातील फिन-टेक विश्वाची झेप आणि क्षमता यांची.

मित्रहो,

फिन-टेक उपक्रमांना आर्थिक बाबीमुळे वेग मिळतो. उत्पन्न, गुंतवणूक, विमा आणि संस्थांत्मक कर्ज हे फिन-टेक उपक्रमांचे चार खांब आहेत. उत्पन्न वाढले की गुंतवणूक शक्य होते, विमासंरक्षणामुळे जोखीम घेण्याची शक्यता वाढते तसेच गुंतवणूकही वाढीला लागते. संस्थांकडून उपलब्ध होणाऱ्या कर्जामुळे विकासाला वाव मिळतो. या सर्व बाबी एकत्र येतात तेव्हा आर्थिक क्षेत्रात अधिकाधिक लोकांचा वावर वाढतो. अशा तऱ्हेने तयार झालेला भक्कम मोठा पाया हा आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी सुयोग्य अश्या स्प्रिंगबोर्डसारखे काम करतो. भारतातील फिनटेक उपक्रम हे अर्थविश्वातील प्रवेशाला सहकार्य करतात आणि देशातील प्रत्येक नागरिकासाठी  कर्जाची औपचारिक व्यवस्था खुली करतात. आता फिनटेक उपक्रमांचे रुपांतर फिनटेक क्रांतीत करण्याची वेळ आली आहे. अशी क्रांती जी प्रत्येक भारतीय नागरिकाला आर्थिक शक्ती प्रदान करेल.

मित्रहो,

आपल्याला फिन-टेक क्षेत्र विस्तारताना दिसते आहे, अश्यावेळी काही बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. फिन-टेक उपक्रमाने खूप काही कमावले आहे. आणि कमावले आहे याचा अर्थ म्हणजे वेगवेगळे लोक, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे लोक याचे  ग्राहक आहेत. सर्वसामान्यांनी फिन-टेक उद्योगाला स्वीकारले आहे ही एक विशेष बाब मानली पाहिजे आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे विश्वास. डिजिटल पेमेंट वा त्यासम तंत्रज्ञानाचा सहजपणे स्वीकार करून सर्वसामान्य भारतीयांनी आपल्या फिनटेक उदयोगांवर विश्वास दर्शवला. हा विश्वास म्हणजे जबाबदारी. या विश्वासाचा अर्थ म्हणजे लोकांचे हितरक्षण केले जायला हवे. फिनटेक सुरक्षा उपक्रमाच्या साथीविना फिनटेक उपक्रम अधुरे आहेत.

मित्रहो,

आपण आपले अनुभव आणि योग्यता जगाला सांगितली पाहिजे आणि त्यांच्याकडूनही शिकले पाहिजे. आपल्यासारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा जगभरातील जनांची जीवने सुधारु शकतात. युपीआय व रुपेसारखी संसाधने प्रत्येक देशाला अजोड संधी उपलब्ध करुन देतील. किफायतशीर व विश्वसनीय रिअल टाईम पेमेंट सिस्टिम आणि स्वदेशी कार्ड योजना आणि  निधी उपलब्धता व्यवस्था यासारख्या व्यवस्था उपलब्ध करून देण्याची संधी.

गिफ्ट सिटी म्हणजे फक्त प्रिमाईस नाही तर भारताचे प्रॉमिस आहे. भारताची लोकशाही मूल्ये, मागणी, लोकसंख्या आणि विविधता यांचे ते प्रतिक आहे. संकल्पनांप्रती  भारताचा खुलेपणा, उपक्रमशीलता आणि गुंतवणूक यांचे ते प्रतिक आहे. जागतिक अर्थ-तंत्र उपक्रमाकडे जाणारा मार्ग म्हणजे ही गिफ्ट सिटी. भारताच्या भावी विकासाच्या दृष्टीने अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा संयोग महत्वाचा असल्याच्या दृष्टीकोनातून गिफ्ट सिटी येथील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) अस्तित्वात आले आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा या फक्त भारतालाच नव्हे तर जगाला पुरवता याव्यात हे आमचे लक्ष्य आहे.

वित्त हे अर्थव्यवस्थेची रक्तवाहिनी आहे तर तंत्रज्ञान हा वाहक. अंत्योदय  आणि सर्वोदय  साध्य करण्याच्या दृष्टीने दोन्हीचेही समान महत्व आहे. आपले महत्वपूर्ण इन्फिनिटी फोरम हे जागतिक अर्थ-तंत्र उद्योगाला आपल्या असीम भविष्याचा वेध घेता यावा या हेतूने सर्व संबधितांना एकत्र आणण्याच्या उपक्रमाचा महत्वाचा भाग आहे. माईक ब्लुमबर्ग यांच्याशी भेट झाली तेव्हा झालेल्या संभाषण मला आठवते आहे. आणि ब्लुमबर्ग समुहाला मी त्यांनी केलेल्या सहकार्यासाठी धन्यवाद देतो. इन्फिनिटी फोरम हा विश्वासाचा फोरम आहे. उपक्रमाच्या नाविन्यावर आणि कल्पनांच्या शक्तीवर विश्वास, युवाशक्तीवर विश्वास आणि बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या सामर्थ्यावर विश्वास. जग सर्वोत्तम घडवण्यावर विश्वास. चला, आपण एकत्रितपणे फिनटेकमधील  नाविन्यपूर्ण कल्पना आणि क्षमतांचा वेध घेऊ आणि या जगभरातील दडपलेले मुद्दे सोडवण्यासाठी त्यांचा उपयोग करू.

धन्यवाद!

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"