माझे मित्र, पंतप्रधान किशिदा जी,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी,
गुजरातचे अर्थमंत्री श्री कनुभाई देसाई,
भारत-जपान उद्योग मंचाचे सर्व सदस्य,
तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.
सर्वांना नमस्कार!
पंतप्रधान किशिदा जी आणि जपानमधून भारतात आलेल्या सर्व मित्रांचे हार्दिक स्वागत.
दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतर आपण भारत आणि जपान यांच्यातील शिखर परिषदेच्या बैठकांच्या मालिकांना पुन्हा आरंभ करत आहोत, याचा मला खूप आनंद होत आहे.
आपले आर्थिक संबंध हे भारत-जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचे सर्वात मजबूत स्तंभ आहेत.
आपले आर्थिक संबंध हे भारत-जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचे सर्वात मजबूत स्तंभ आहेत.
कोविड नंतरच्या काळात, आर्थिक पुनर्प्राप्ती आणि आर्थिक सुरक्षेसाठी, भारत-जपान आर्थिक भागीदारी केवळ दोन देशांनाच नव्हे, तर पूर्ण भूप्रदेशाला आणि जगालाही आत्मविश्वास आणि लवचिकतेचे प्रदान करेल.
विकास आणि आमच्या उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना, ज्या भारतात मोठ्या प्रमाणावर राबवल्या जात आहेत, पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक परिसंस्था निर्माण करत आहेत.
महामहिम,
भारताच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांमध्ये 1.8 ट्रिलियन डॉलर्सचे 9000 हून अधिक प्रकल्प पूर्ण होणार आहेत, ज्या माध्यमातून सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत.
मला आशा आहे, की जपानी कंपन्या आमच्या प्रयत्नांमध्ये उत्साहाने सहभागी होतील, आणि यासाठी आम्ही देखील भारतातील जपानी कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास वचनबद्ध आहोत.
मित्रांनो,
प्रगती, समृद्धी आणि भागीदारी हा भारत-जपान संबंधांचा गाभा आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध पुढे नेण्यात इंडिया जपान बिझनेस लीडर्स फोरमची महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद!