Swami Vivekananda's powerful thoughts continue to shape several minds: PM Modi
India today is a young country and it should develop both spiritually and materially: PM
India is a youthful nation. The thoughts of Swami Vivekananda inspire the youth towards nation building: PM
Unity in diversity is India's strength and countrymen should resolve to maintain oneness: PM
Poverty will be eliminated when the poor are empowered: PM Modi

आदरणीय मोरारी बापूजी, विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी. परमेश्वरनजी, माझे मंत्रिमंडळातील सहकारी पोन राधाकृष्णनजी, विवेकानंद आश्रमाचे स्वामी चैतन्यानंदजी, बालकृष्णजी, भानुदासजी,विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिताजी आणि माझ्या प्रिय मित्रांनो !

मला तुमच्याबरोबर उपस्थित रहायला आवडले असते, मात्र तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यामुळे याप्रसंगी आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत. आणि तसेही मी काही पाहुणा नाही, मी या कुटुंबाचा एक भाग आहे. मी तुमच्यातील एक आहे.

१२ जानेवारी - हा काही साधारण दिवस नाही. इतिहासात सुवर्णाक्षरात कोरलेल्या या दिवशी भारताला एक महान विचारवंत लाभला , असा मार्गदर्शक आणि निष्ठावंत ज्याने भारताचा संदेश संपूर्ण जगात पोहोचवला.

मी परमपूज्य स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहतो. ते महान होते, त्यांचे सामर्थ्यशाली विचार आजही अनेकांना प्रेरित करतात.

आज विवेकानंदपुरम येथे रामायण दर्शनम, भारत माता सदनमचे लोकार्पण होत आहे. हनुमानाची २७ फूट उंच मूर्ती जी एकाच दगडातून बनवण्यात आली आहे , तिची स्थापना होत आहे. तुम्ही या संबंधित मला जो व्हिडिओ पाठवला होतात, तो मी पाहिला आणि हा व्हिडिओ पाहून मी म्हणू शकतो की यामध्ये दिव्यता देखील आहे - भव्यता देखील आहे.

आजच विवेकानंद केंद्राचे संस्थापक दिवंगत एकनाथ रानडे यांच्या तैलचित्राचे देखील अनावरण होणार आहे. तुम्हा सर्वांचे आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मनापासून खूप खूप अभिनंदन करतो.

बंधू आणि भगिनींनो, आज तुम्ही सर्व ज्या ठिकाणी आहात, ते सामान्य ठिकाण नाही. ही भूमी या देशाच्या तपोभूमी सारखी आहे. हनुमानाला आपल्या जीवनाचा उद्देश मिळाला ,तो याच ठिकाणी मिळाला, जेव्हा जामवंतने त्याला सांगितले की तुझा जन्म तर भगवान श्रीरामाच्या कार्यासाठीच झाला आहे. याच धरतीवर माता पार्वतीच्या कन्याकुमारीला तिच्या जीवनाचे उद्दिष्ट मिळाले. हीच ती जागा आहे, जिथे महान समाज सुधारक संत थिरुवल्लूवर यांना दोन हजार वर्षांपूर्वी ज्ञानाचे अमृत मिळाले.

हिच ती धरती आहे जिथे स्वामी विवेकानंद यांना देखील जीवनाचा उद्देश प्राप्त झाला. याच ठिकाणी तप केल्यानंतर त्यांना जीवनाचा उद्देश आणि तो साध्य करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले होते. हिच ती जागा आहे, जिथे एकनाथ रानडे यांना देखील आपल्या जीवनाचा, आयुष्याचा जो प्रवास होता त्याला एक नवीन वळण मिळाले. एक नवीन उद्दिष्ट निश्चित झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य 'एक आयुष्य एक उद्दिष्ट ' या स्वरूपात याच कार्यासाठी समर्पित केले. या पवित्र भूमीला, या तपोभूमीला मी शतशः वंदन करतो, नमस्कार करतो.

२०१४ साली जेव्हा आपण एकनाथ रानडे यांची जन्मशताब्दी साजरी करत होतो, तेव्हा मी म्हटले होते- ही वेळ तरुणांचे मन जागृत करण्याची आहे. आपला भारत तरुण आहे- तो दिव्य देखील बनावा आणि भव्य देखील बनावा. आज जग भारताकडून दिव्यतेच्या अनुभूतीची अपेक्षा करत आहे आणि भारताचा गरीब, दलित, पीडित, शोषित, वंचित भारताच्या भव्यतेची अपेक्षा करत आहे. आणि जगासाठी दिव्यता आणि देशातल्यांसाठी भव्यता आणि या दोन्हीचा मेळ घालूनच राष्ट्र निर्माणाच्या दिशेने आपल्याला पुढे जायचे आहे.

बंधू-भगिनींनो, आज भारत जगातील सर्वात तरुण देश आहे. युवा देश आहे. ८० कोटींहून अधिक लोकसंख्या ३५ वर्षापेक्षा कमी वयाची आहे. स्वामी विवेकानंद आज आपल्यात नाहीत, प्रत्यक्ष रूपात नाहीत. मात्र त्यांच्या विचारामध्ये इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे, इतकी प्रेरणा आहे की देशातील तरुणांना संघटित करून राष्ट्र निर्माणाची दिशा ते दाखवत आहे.

एकनाथ रानडे यांनी तरुणांच्या या शक्तीला एकजूट करण्यासाठी विवेकानंद केंद्र आणि स्वामी विवेकानंद शिळा स्मारकाची स्थापना केली होती. एकनाथ रानडे म्हणायचे की आपल्याला स्वामी विवेकानंद आवडतात, एवढेच पुरेसे नाही. देशासाठी स्वामी विवेकानंद यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते साकार करण्यासाठी सतत योगदान देणे ते महत्वाचे मानायचे.

स्वामी विवेकानंद यांच्यासारखे तरुण घडवणे या एकाच उद्दिष्टासाठी एकनाथजी यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले होते. त्यांनी तरुणांमध्ये राष्ट्रनिर्माणाचे तेच आदर्श स्थापन करण्याचा नेहमी प्रयत्न केला, जे आदर्श, जी मूल्ये स्वामी विवेकानंद यांची होती. माझे हे खूप मोठे सौभाग्य आहे की आयुष्यातील अनेक वर्षे मला एकनाथजी यांचा निकटचा सहकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. याच धरतीवर अनेकदा येऊन त्यांच्या सान्निध्यात आयुष्य उजळवण्याची मला संधी मिळायची.

एकनाथजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यादरम्यान ठरले होते की आपली संस्कृती आणि आपल्या विचार प्रक्रियेवर रामायणाचा प्रभाव दर्शवणारे एक प्रदर्शन सुरु करायचे. आज रामायण दर्शनम भव्य स्वरूपात आपणा सर्वांसमोर आहे. आणि मला विश्वास आहे देशातील आणि जगभरातील जे पर्यटक येथील शिळा स्मारकाला भेट देतात, त्यांना हे रामायण दर्शनम बहुधा अधिक प्रेरित करेल. प्रभावित देखील करेल. श्रीराम भारताच्या कणाकणात आहेत. लोकांच्या मनात आहेत. आणि म्हणूनच जेव्हा आपण श्रीराम यांच्याबाबत विचार करतो, तेव्हा आढळते श्रीराम एक आदर्श मुलगा- भाऊ-पती, मित्र आणि आदर्श राजा होते. अयोध्या देखील एक आदर्श नगर होते तर रामराज्य एक आदर्श शासन व्यवस्था होती. म्हणूनच भगवान राम आणि त्यांच्या राज्याचे आकर्षण वेळोवेळी देशातील महान व्यक्तींना आपल्या पद्धतीने रामायणाची व्याख्या करण्यासाठी प्रेरित करते. या व्याख्यांची झलक आता रामायण दर्शनममधे पाहायला मिळेल.

महाकवि कम्बन ने कंब रामायणम में कौशल राज्य को एक सुशासित राज्य बताया है। उन्होंने तमिल में जो लिखा, मैं उसका अंग्रेजी में अनुवाद अगर करूं तो उन्होंने लिखा था-

महाकवी कम्बन यांनी कम्ब रामायणम मध्ये कौशल राज्याला एक सुशासित राज्य म्हटले आहे. त्यांनी तामिळ भाषेत जे लिहिले, मी त्याचा इंग्रजी भाषेत जर अनुवाद केला , तर त्यांनी लिहिलंय-

None were generous in that land as

None was needy;

None seemed brave as none defied;

Truth was unnoticed as there were no liars;

No learning stood out as all were learned.

Since no one in that City ever stopped learning

None was ignorant and none fully learned;

Since all alike had all the wealth

None was poor and none was rich.

हे कम्बन यांनी केलेले रामराज्याचे सादरीकरण आहे. महात्मा गांधी देखील या वैशिष्ट्यांमुळेच रामराज्याविषयी बोलायचे. निश्चितपणे ही एक अशी राजवट होती, जिथे व्यक्ति महत्वाची नव्हती, तर तत्वे महत्वाची असायची.

गोस्वामी तुलसीदास यांनी देखील रामचरितमानसमध्ये रामराज्याचे विस्तृत वर्णन केले आहे. रामराज्य म्हणजे जिथे कुणी गरीब नसेल, दुःखी नसेल,कुणी कुणाचा तिरस्कार करत नसेल, जिथे सर्व धडधाकट आणि सुशिक्षित असतील. जिथे निसर्ग आणि मनुष्य यांच्यात ताळमेळ असेल. त्यांनी लिहिले आहे-

दैहिक दैविक भौतिक तापा, राम राज नहिं काहुहि व्यापा।

सब नर करहिं परस्पर प्रीती, चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीति।

अल्पमृत्यु नहिं कवनिउ पीरा, सब सुंदर सब बिरुज सरीरा।

नहिं दरिद्र कोउ दुखी न दीना, नहिं कोउ अबुध न लच्छन हीना।

राम रावणाला नमवून मोठे नाही झाले. तर राम तेव्हा राम बनले जेव्हा त्यांनी अशा लोकांना बरोबर घेतले जे सर्वहारी होते, साधनहीन होते. त्यांनी त्या लोकांचा आत्मसन्मान वाढवला आणि त्यांच्यात विजयाचा विश्वास निर्माण केला. भगवान राम यांच्या आयुष्यात त्या भूमिकेचा स्वीकार केला नाही, जी त्यांच्या वंशात परंपरा होती. एकेका वरदानात अनेक गोष्टी आपल्याला माहित आहेत. ते अयोध्येतून बाहेर पडले होते. अजून नगराच्या सरहद्दीतुन देखील बाहेर पडले नव्हते मात्र संपूर्ण जगाला, संपूर्ण मानवतेला स्वतःमध्ये सामावून घेऊन आदर्श काय असतो, मूल्ये काय असतात. मूल्यांप्रति आयुष्याचे समर्पण काय असते. ते त्यांनी जगण्यातून दाखवले होते. आणि म्हणूनच मला वाटते की हे रामायण दर्शनम विवेकानंदपुरम मध्ये समयोचित आहे आणि आपण सर्व जाणतो की प्रगतीसाठी समाज जेवढा सशक्त हवा, राज्य देखील सुराज्य असायला हवे.

जेव्हा रामाकडे पाहतो, तेव्हा व्यक्तीचा विकास, व्यवस्थेचा विकास या गोष्टी स्वाभाविकपणे नजरेसमोर येतात.

बंधू भगिनींनो, एकनाथजी यांनादेखील नेहमी वाटायचे की देशाची अध्यात्मिक शक्ती जागृत करून देशाच्या कार्मशक्तीला रचनात्मक कार्याच्या दिशेने वळवावे. आज जेव्हा विवेकानंद केंद्रात हनुमानाच्या मूर्तीची स्थापना होत आहे , तेव्हा त्यांच्या या म्हणण्यामागची प्रेरणा समजते.

हनुमान म्हणजे सेवा, हनुमान म्हणजे समर्पण भक्तीचे ते रूप होते, ज्यात सेवा हीच श्रेष्ठ धर्म बनली होती. जेव्हा ते समुद्र पार करत होते, तेव्हा मैनाक पर्वताला त्यांना मध्येच विश्रांती द्यायची होती. मात्र संकल्प सिद्धी पूर्वी हनुमानासाठी शिथिलता शक्यच नव्हती. आपले उद्दिष्ट साध्य होईपर्यंत त्यांनी आराम केला नाही..

हनुमानाच्या सेवाभावी वृत्तीवर भारतरत्न सी राजगोपालाचारी यांनी देखील आपल्या रामायणात लिहिले आहे. जेव्हा हनुमान सीता मातेला भेटून परत येत असतात, भगवान राम त्यांना मातेच्या सकुशलतेबाबत सांगतात, तेव्हा राम म्हणतात,

"The deed done by Hanumaan none else in the world could even conceive of attempting-crossing the sea, entering Lanka protected by Raavana and his formidable hosts and accomplishing the task set him by his king not only fully but beyond the fondest hopes of all."

राजजी यांनी म्हटले की हनुमान यांनी ते काम केले आहे,ज्याची कुणी अपेक्षा देखील केली नव्हती. अडचणींचा जो समुद्र त्यांनी पार केला होता त्याचा कुणी विचार देखील केला नसेल.

आणि म्हणूनच बंधू भगिनींनो, आम्ही देखिल “सबका साथ सबका विकास” या मार्गदर्शक तत्वांवर चालत आहोत. गरीबातील गरीब व्यक्तीला जन धन योजनेच्या माध्यमातून बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही केला. यासाठीच विमा उतरवण्याचा पर्याय आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांना सर्वात कमी प्रीमियम वर पीक विमा योजना देण्यात आली आहे. मुलींना वाचवण्यासाठी त्यांना शिकवण्यासाठी “बेटी बचाओ बेटी पढाओ” अभियान राबवण्यात येत आहे. गरोदर महिलांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी देशव्यापी योजना तयार करण्यात आली आहे. ५ कोटी कुटुंबे, जिथे लाकडाची चूल पेटवून माता जेवण बनवायच्या. आणि एका दिवसात चारशे सिगारेटीएवढा धूर अशा प्रकारे जेवण बनवताना त्या मातेच्या शरीरात जायचा. त्या मातांना उत्तम आरोग्य लाभावे, प्राथमिक सुविधा मिळाव्यात यासाठी ५ कोटी कुटूंबाना गॅस जोडणी करण्याचा विडा उचलला आणि दिड कोटी जोडण्या दिल्या आहेत.

दलित, पीडित, वंचितांची सेवा हीच तर जन सेवा, ईश्वरी सेवेचा मंत्र देते. आपल्या देशातील दलित युवकांना स्टॅन्ड-अप भारत, स्टार्ट -अप भारत माध्यमातून सशक्त केले जात आहे. लहान व्यापाऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज मिळावे यासाठी मुद्रा योजना सुरु करण्यात आली. . गरीबाची गरीबी तेव्हाच दूर होईल जेव्हा त्याला सशक्त केले जाईल. जेव्हा गरीब सशक्त होईल, तेव्हा तो स्वतः गरीबी दूर करेल. आणि गरीबीपासून मुक्तीचा तो आनंद घेईल आणि एका नव्या शक्तीसह तो पुढे जाईल.

रामायणात जेव्हा भगवान राम आणि भरत यांच्यात शासनाशी संबंधित संवाद होत होता तेव्हा भगवान राम यांनी भरताला म्हटले होते-

कच्चिद् अर्थम् विनिश्चित्य लघु मूलम् महा उदयम् |

क्षिप्रम् आरभसे कर्तुम् न दीर्घयसि राघव ||

याचा अर्थ, हे भरत, अशा योजना लागू कर ज्यामुळे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांचा फायदा होईल. रामाने भरताला हे देखील सांगितले की या योजनांची अंमलबजावणी करण्यात अजिबात विलंब होता कामा नये.

आयः ते विपुलः कच्चित् कच्चिद् अल्पतरो व्ययः |

अपात्रेषु न ते कच्चित् कोशो गग्च्छति राघव ||

म्हणजे, भरत , एक गोष्ट लक्षात ठेव की उत्पन्न अधिक असावे आणि खर्च कमी असावा. त्यांनी या गोष्टीची देखील सूचना केली की अपात्र किंवा लायक नसलेल्या व्यक्तींना राज्याच्या निधीचा लाभ मिळू नये.

अपात्र लोकांपासून सरकारी तिजोरीचे रक्षण करणे हा देखील सरकारच्या कार्यसंस्कृतीचा भाग आहे. तुम्ही पाहिले असेल, आम्ही आधार कार्डाशी जोडून बँक खात्यात थेट आर्थिक सहाय्य जमा केले, बनावट शिधापत्रिका धारकांना हटवणे, बनावट गॅस जोडणी असलेल्याना हटवणे, बनावट शिक्षकांना हटवणे, दुसऱ्यांचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना हटवणे, हे सर्व या सरकारने मिशन स्वरूपात हाती घेतले आहे.

बंधू भगिनींनो, आजच भारतमाता सदनात पंचधातूपासून बनवलेल्या माता भारतीच्या प्रतिमेचे अनावरण देखील होत आहे. माता भारतीच्या या प्रतीकाचे लोकार्पण ही सौभाग्याची गोष्ट आहे. ज्या कुणी व्यक्ती या विशेष यज्ञात सहभागी झाल्या होत्या त्या सर्वांचे या पवित्र कार्यासाठी मी अभिनंदन करतो.

सहकाऱ्यांनो, मी विवेकानंद शिळा स्मारकाजवळ बांधण्यात आलेल्या संत थिरुवल्लूवर यांच्या प्रतिमेला देखील वंदन करतो.. थिरुवल्लूवर यांनी जो उपदेश केला, जो मंत्र दिला तो आज देखील तितकाच समर्पक आहे, योग्य आहे. युवकांसाठी त्यांची शिकवण होती-

“In sandy soil, when deep you delve, you reach the springs below; The more you learn, the freer streams of wisdom flow.”

म्हणजे, रेताड जमिनीत तुम्ही जितके खोलवर खोदत जाल, एक दिवस पाण्यापर्यंत नक्की पोहोचाल. अगदी तसेच, जितके जास्त तुम्ही शिकत जाल, एक दिवस ज्ञानाच्या, बुद्धिमत्तेच्या गंगेपर्यंत नक्की पोहोचाल.

आजच्या युवक दिनी, मी देशातील तरुणांना आवाहन करतो- शिकण्याच्या या प्रक्रियेत कधीही खंड पडू देऊ नका. आपल्या आतील या विद्यार्थ्याला कधी मरु देऊ नका. जितके तुम्ही शिकाल, जितकी तुम्ही तुमची अध्यात्मिक शक्ती विकसित कराल, जितके तुम्ही आपले कौशल्य विकसित कराल, तेवढाच तुमचा देखील विकास होईल आणि देशाचा देखील.

अध्यात्मिक शक्तीचा जेव्हा मुद्दा येतो, तेव्हा काही लोक तो समजून घेऊ शकत नाहीत, त्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहतात. मात्र अध्यात्मिक शक्ती धर्मापेक्षा वेगळी आहे, बंधनापेक्षा वेगळी आहे. त्याचा थेट संबंध मानवी मूल्यांशी आहे. दैवी शक्तीशी आहे. आपले माजी राष्ट्रपती आणि या धरतीचे सुपुत्र डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे-

“Spirituality to me is the way we relate to God and the Divine. Staying connected with our spiritual life keep us grounded and always be reminded of the value of life and important values such as honesty, loving our neighbours, and many other important traits that will make the workplace a positive environment”.

मला आनंद वाटतो, की गेली अनेक दशके विवेकानंद केंद्र याच दिशेने प्रयत्न करत आहे. आज विवेकानंद केंद्राच्या दोनशेहून अधिक शाखा आहेत. देशभरात ८०० पेक्षा अधिक ठिकाणी केंद्राचे प्रकल्प सुरु आहेत. आरोग्य, शिक्षण, ग्रामीण भारत आणि संस्कृती यासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सातत्याने काम करत आहे.

पाटणा पासून पोर्ट ब्लेअर पर्यंत, अरुणाचल प्रदेशातील कार्बी आंग्लांग पासून काश्मीरमधील अनंतनाग पर्यंत, रामेश्वरम्‌ ते राजकोट पर्यंत त्याचे अस्तित्व आहे. दूरवरच्या दुर्गम ठिकाणी सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांना या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे.

मी खासकरून ईशान्येकडील राज्यांमधील विवेकानंद केंद्राच्या कार्याची प्रशंसा करू इच्छितो. एकनाथजी असतानाच अरुणाचल प्रदेशात ७ आश्रमशाळा उघडण्यात आल्या होत्या. आज ईशान्येकडील ५० पेक्षा अधिक ठिकाणी विवेकानंद केंद्र सामाजिक कार्याशी निगडित आहे.

अगणित विद्यार्थी, आयआयटी विद्यार्थी, डॉक्टर आणि अनेक व्यावसायिक स्वेच्छेने विवेकानंद केंद्रांमध्ये सेवाव्रती म्हणून काम करत आहेत. यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचे वेतन दिले जात नाही, तर हे सर्व सेवाभावातून केले जाते. मला वाटते की निःस्वार्थ भावाने समाजाची सेवा करणारे हे सेवाव्रती आपणा सर्वांसाठी प्रेरणा आहेत. सामान्य आयुष्य जगत समाजसेवेचे हे आदर्श उदाहरण आहे. देशाच्या तरुणांसाठी एक दिशा आहे, एक मार्ग आहे.

विवेकानंद केंद्राशी निगडित लोक आज राष्ट्र निर्माणात आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. मला आशा वाटते की हे केंद्र येणाऱ्या पिढ्यांसाठी अशाच प्रकारे नवीन विवेकानंद घडवण्याचे काम करत राहील.

आज ती प्रत्येक व्यक्ती जी राष्ट्र निर्माणात सक्रिय होऊन आपली जबाबदारी पार पाडत आहे, ती विवेकानंद आहे. ती प्रत्येक व्यक्ती जी दलित-पीडित-शोषित आणि वंचितांच्या विकासासाठी काम करत आहे, ती विवेकानंद आहे. ती प्रत्येक व्यक्ती, जी आपली ऊर्जा, आपल्या कल्पना, आपले नावीन्य समाजाच्या हितासाठी उपयोगात आणत आहे, ती विवेकानंद आहे.

तुम्ही सर्व ज्या अभियानात सहभागी झाला आहात,ते मानवतेसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी एका मोठ्या तपश्चर्येप्रमाणे आहे. तुम्ही अशाच भावाने देशाची सेवा करत रहाल अशी इच्छा व्यक्त करतो.

विवेकानंद यांच्या जन्मदिनी, युवक दिनी, तुम्हा सर्वाना पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा. बापूंना माझा जय श्रीराम, आणि तिथे परमेश्वरमजी वगैरे सर्वाना प्रणाम करत मी माझ्या वाणीला विराम देतो. आणि मला विश्वास आहे, जसे मला निमंत्रण देण्यात आले कन्याकुमारीला येण्यासाठी, हे माझे आपले घर आहे, बघूया कधी संधी मिळते, धावत असतो. धावता-धावता कधीतरी मध्येच संधी मिळून जाईल. मी नक्की तिथे त्या धरतीला वंदन करण्यासाठी येईन. तुमच्याबरोबर थोडा वेळ व्यतीत करेन. याप्रसंगी, मी तिथे प्रत्यक्ष येऊ शकलो नाही याबाबत मला खेद वाटतो, मात्र तरीही लांबून उपस्थित राहता आले. इथे दिल्लीत थंडी आहे , तिथे गरम होतेय. या दोन्ही मध्ये आपण नवीन ऊर्जा आणि उत्साहाने पुढे जाऊ. याच विश्वासासह तुम्हा सर्वाना या पवित्र प्रसंगी खूप-खूप शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait

Media Coverage

Snacks, Laughter And More, PM Modi's Candid Moments With Indian Workers In Kuwait
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to attend Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 22, 2024
PM to interact with prominent leaders from the Christian community including Cardinals and Bishops
First such instance that a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India

Prime Minister Shri Narendra Modi will attend the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) at the CBCI Centre premises, New Delhi at 6:30 PM on 23rd December.

Prime Minister will interact with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent lay leaders of the Church.

This is the first time a Prime Minister will attend such a programme at the Headquarters of the Catholic Church in India.

Catholic Bishops' Conference of India (CBCI) was established in 1944 and is the body which works closest with all the Catholics across India.